थंड झाल्यार खावचा book and story is written by Prof Shriram V Kale in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. थंड झाल्यार खावचा is also popular in सामाजिक कथा in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
थंड झाल्यार खावचा - कादंबरी
Prof Shriram V Kale
द्वारा
मराठी सामाजिक कथा
पहिला कोंबडा झालाआणि सनई चौघडा सुरु झाला. तशी आचाऱ्यांची लगबग सुरु झाली . जनूभटाने मोठा टोप भरून पाणी तापत लावले आणि बरोबरच्या पोराना हाकारायला लागला. “पद्या, सख्या, हऱ्या , भिक्या चला पट पट आंघोळी करून घ्या नी रांधपाला लागा. ” त्याचे बरोबरच होते. पाच गावचे हजार दीड हजार माणूस लोटणार होते. वरण भात,पाच भाज्या, खीर, जिलेबी , मसाले भात , साखर भात असा जंगी बेत आखलेला होता. त्यात बोंबडोजीने बजावून सांगितलेले होते. पाच पक्वान्नांपैकी कोण काय मागेल ते ते त्याला मिळायल
पहिला कोंबडा झालाआणि सनई चौघडा सुरु झाला. तशी आचाऱ्यांची लगबग सुरु झाली . जनूभटाने मोठा टोपभरून पाणी तापत लावले आणि बरोबरच्या पोराना हाकारायला लागला. “पद्या, सख्या, हऱ्या , भिक्या चला पट पट आंघोळी करून घ्या नी रांधपालालागा. ” त्याचे ...अजून वाचाहोते. पाचगावचे हजार दीड हजार माणूस लोटणार होते. वरण भात,पाच भाज्या, खीर, जिलेबी , मसाले भात , साखर भात असा जंगीबेत आखलेला होता. त्यात बोंबडोजीने बजावून सांगितलेले होते. पाच पक्वान्नांपैकी कोण काय मागेल ते ते त्याला
थंड झाल्यार खावचा भाग २ पार्वतीची नड ओळखून भटणीने आपल्या गोठ्यातली हत्ती सारखी दांडगी ,वेळेला अडीच शेर दूध देणारी ढवळी गाय तिने सोडून दिली नी रत्नूला बजावले, “ सोयन् बाळगलस तर तुजो झील अन्नाक लागासर दुद काय ...अजून वाचापडणार नाय. कासेकक पाडो हा.... तीन चार वर्सान जोताक उजवता येयत्... धारेरच्या पडणात आयन, बिवळे,हसाणी नी धमणी हत.... रोज येंगाटभर हिरवोपालो घतलस तर गाय येक्या धारेन् दुद देयत नी पाडोदुकु उजवारात. सोयन् बाळगलस तर माज्या ढवळीचा जायपा तुजो गोटो भरीत.....”
थंड झाल्यार खावचा भाग ३त्याला भाताचा भला खासा ठाय आज्जी वाढून देई नी वर पावशेर भर विरजण ओती. तोण्डी लावायला पाच सहा तळलेल्या सांडग्या मिरच्या किंवा बचकाभर लोणचं घाली. बोंबड्या आमच्यासारखा सगळा भात एकदम कालवून न घेता एका बाजूने ...अजून वाचाभात कोलसवून घास हातात झेलवून झेलवून त्याचा चेण्डू सारखा गोळा करून तो मोठा आ करून चोंदित असे. वाटेली विठू घाडी नी त्याची चेडवं सुद्धा असंच जेवीत . आम्हाला त्याचं अप्रूप वाटायचं . आज्जीच्या मागिलदारी डेगेखाली खूप
थंड झाल्यार खावचा भाग ४ यंदा आंबीच्या आडव्या फाट्यावरचे आंबे बोंबड्यानेकाढून दिले. भटणीला सांगून जत्रेला विठू बरोबर बोंबड्याही आंबे विकायला गेला. तो हिशोब अगदी बिनचूक करायचा. दिलेल्या पैशाचे आंबे उज्जू मोजून द्यायचा. आठ आण्याचे , ...अजून वाचाआंबे घेणारं एखादं गिऱ्हाईक दोन चार आंबे वरून जादा मागायचं .... विठू द्यायला लागला तर हा त्याच्यावर खेकसून म्हणाला, “ह्यो इलो मोटो शेटयो.... चार जणांक अशे जादा दिलस काय येका चवलीचानुकसान करशी भटणीचा.” मिळालेला गल्ला नी खपलेलेआंबे यांचॎही बरोबर ताळमेळ तो घेई. भटणीने त्याला जत्रेत खरचण्या साठी आठ आणे दिलेले. अधून मधून विठू त्याला सांगे,
थंड झाल्यारखावचा भाग ५ दिसायला उंचापुरा नी मजबूत पिळदारअंगकाठी च्या भगवानालाबघूनच त्याच्या ताकतीचा अंदाज बांधून एक तगडा शीख पैलवान पुढे आला. पाच रुपये टाकून तो समोर बसला.पंच ग्यानी सेठनी दोघांचे हात एकामेकांच्या हातात दिले नी लढत ...अजून वाचाझाली. दोन तीनमिनिटं कोणीच रेसभरही चळला नाही. बघ्यानी टाळ्या नीशिट्ट्या वाजवीत , चलो भाई .... जोर लगा.. वाहे गुरु .... डगमग़ाने लगे क्या ओरडत गिल्लाकेला.... भग्याने समोरच्या भिडूला पुरता अजमावला नी ‘ हरा रा रा म्हादेव’ असा गजर करीत समोरच्या शिखाचा हात दबवीत विरुद्ध दिशेलाटेकवला. हरलेला शीख घामाने डबडबला नी डाव्या हाताने उजव्या हाताचे ननगट मनगट चोळीत मान खाली