जत्रा - एक भयकथा - भाग - ४

(18)
  • 20.9k
  • 1
  • 9.1k

एक दिवस मी तिला लग्नाची मागणी घातली . तिला अनपेक्षित नव्हते , ती म्हणाली मी तर केव्हाच तुझी झाली आहे पण…. पण काय मी म्हणालो बाबा परवानगी देणार नाहीत मी येईन त्यांची समजूत काढून अरे जरी माझ्या प्रेमापोटी माझ्या बाबांनी परवानगी दिली तरी समाज हे स्वीकृत करणार नाही बाबा एकटे पडतील पाद्री सांगत होता मधेच राम्या म्हणाला मूर्ख मुलगी .. या मुली अशाच असतात त्यांना सांगायला पाहिजे हमको मिटा सके ये जमाने में दम नही हमसे जमाना खुद हे जमाने से हम नही तुमचं चालू द्या पुढे त्याच ब्रेकअप झाल्यापासून तो जरा पिसाळल्यासारखे करतोय मन्या आवेशाने उठलेल्या राम्याला बसवत म्हणाला