कायाकल्प ---उत्तरार्ध

(17)
  • 7.2k
  • 1
  • 2.1k

कौसल्याबाईनी घरी आल्याबरोबर ऑनलाईन न्यूयार्कची फ्लाईट बुक केली. भराभर पॅकिंग करून घेतले. घराजवळच्या बँकेत त्याचे खाते होते. त्यातून होते तितके म्हणजे साडेतीन लाख रुपये काढून घेतले. तडक त्यांनी इंटरनॅशनल एअरपोर्ट गाठले. एक्सचेंज कॉउंटरवर जवळचे रुपये, डॉलरमध्ये बदलून घेतले. रात्री साडेअकराच्या बोईंग मध्ये त्या बसत होत्या, तेव्हाच डॉ. राजेंनी फोन केलेल्या कम्पनीचे दोन इंजिनियर्स एअरपोर्ट बाहेर पडत होते! काही क्षणात कौसल्याबाईंनी भारत सोडला होता! ००० ते दोघे इंजिनियर्स साधारण आठरा तास डॉ. राजेंच्या लॅब मध्ये होते. त्या दोघांनी प्रथम ती असेम्ब्ली बंद करून, हार्मोन सिंथसायझिंगची प्रोसेस थांबावी. असेंब्लितली प्रत्येक मशीन, मशीन मधला प्रत्येक पार्ट, प्रत्येक कनेक्शन, वायरिंग, सॉफ्टवेरचेजोड तपासून पहिले. सगळं