२) पवनचे सोनापुरात आगमन आणि शुरुवात... तितक्यात समोर गणेशाची मुर्ती दिसली, तिला ही नमन करून मी सुखरूप घरी पोचवण्याची विनंती करु लागलो. माणूस जेव्हा संकटात सापडतो तेव्हा त्याचं असचं होत. आता माझंच बघा ना!!! किती देवांच्या पायी पडत आलो. कित्येकांना स्मरलं मी माझं जीव वाचवण्यासाठी. इतरांसारखी माझी अवस्था होवु नये म्हणुन .... आता नेमकं एखाद किलोमीटर अंतर उरलं असेल. मला जगण्यासाठी पुरेसे काही क्षण.पुरेशी काही वाट. अख्खं जीव एकवटुन मी धावत होतो. नाकातून,तोंडातून श्वास जोरा जोरात घेतला जात होता. त्याचा आवाज दुर दूर पर्यंत घुमत होता.... आणि आता माझं एकवटलेल शरीर साथ