२९ जून २०६१ - काळरात्र - 7

  • 8.7k
  • 3.4k

सर्वजण सुन्न होऊन हंसीकाचं बोलणं ऐकत होते. तिने सर्वांच्या चेहर्‍याकडे बघितलं. त्यांची अजून ऐकण्याची उत्सुकता चेहर्‍यावर खूप मोठ्या प्रमाणात दिसत होती. हंसीका म्हणाली, “मला माहिती असलेल्या पैकी हे शेवटचं, काकभुशुंडी यांनी अकरा वेळा रामायण आणि सोळा वेळा महाभारत वेगवेगळ्या काळात ऐकलं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे सर्व रामायण आणि महाभारत कथांचा शेवट एकमेकांपेक्षा पुर्णपणे वेगळा होता.” तिचं हे बोलणं ऐकताच आर्या आणि सारंग डोक्याला हात लावून बसले. कुणाला काहीच कळत नव्हतं. अनिने हंसीकाला विचारलं, “आता यावर काय उपाय? हे आपल्यासोबत का घडतंय? याची तुला काही कल्पना आहे का?” हंसीका म्हणाली, “नाही. पण मी अंदाज लावू शकते. आज आपल्या आकाशगंगेतले