वाचलास रेsssss वाचलास ! - 5

  • 11.7k
  • 1
  • 5k

'काल रात्री बन्याच्या टपरीला भेट देऊन आल्यापासून रक्षाच्या डोक्यात सतत काही ना काही वाईट विचार येत होते. अभिमन्यू ज्या विश्वासाने तिला तिथे घेऊन गेला होता, त्या नुसार काहीही माहिती हाती लागली नाही. उलट तिथे बन्या नावाचा कोणीही टपरीवाला दिसला नाही. जी एक टपरी त्याच जागेवर उभी होती, ती कुण्या जग्या नावाच्या बिहारी माणसाची होती. तो तर म्हणाला कि, ' त्याने दोन दिवसापूर्वीच नवीन टपरी चालू केली आहे, त्याआधी तिथे काहीही नव्हते. अगदी निर्जन अशी ती जागा...' कोणाच खरं आणि कोणाच खोटं? तिला काही समजेना.' काय करावं? याच विचारात ती असताना बाजूचा फोन खणाणला. अपेक्षित होत, त्याप्रमाणे पलीकडून