पेरजागढ- एक रहस्य.... - २८

  • 4.8k
  • 1.8k

२८.भ्रमंती.... मी आकाशच्या मागोमाग जाऊ लागलो.जसजशी गुंफेची पायरी चढत होतो. आतमधला गर्द अंधार पुसट पुसट डोळ्यात साठवू लागला.कसं आहे?आपण जेव्हा उजेडात असतो ना दारातून घरातलं सगळं काही अंधारच वाटते.पण आपण जसजसं दाराच्या आत पाऊल टाकतो तेव्हा सगळं काही वेळाने स्पष्ट होत जाते.गुंफेत वावरायला फार कमी जागा होती.अगदी गुंफेच्या तोंडाशी येता एक दाराशी असलेली घंटी समोर होती.आकाशने तिला वाजवताच गुंफेमध्ये बरीच हालचाल चालू झाली.ती हालचाल होती वटवाघळांची.आतमध्ये वटवाघळे कळपाने होते.आणि ते सारखे आतबाहेर येरझारा मारत होते.त्यामुळे कानांशी त्यांचा आवाज, शिवाय त्यांचा समोरून मागाहून येणे जाणे थोडं फार भयानक वाटत होतं. गुंफेच्या आत जाताच उजव्या बाजूला काही चित्रफीत दिसल्या.आणि काही दगडांच्या मुर्त्या