अभयारण्याची सहल - भाग १

  • 12.6k
  • 6.5k

रात्रीचे किती वाजले हे कळत नव्हतं. हाताला घडयाळ असूनही इतका गडद अंधार होता की काटे दिसणं तर दूर, घडयाळ पण दिसत नव्हतं. आपल्याला पंचांग कळत नसल्या मुळे अमावस्या आहे का, हे समजत नव्हतं. अर्थात आता ते समजूनही काही उपयोग झालाच नसता. संदीप नुसता वैतागलाच नव्हता तर सॉलिड घाबरला पण होता. कारण प्रसंगच तसा होता. संदीप च्या मित्राचा वाढदिवस होता. त्याच्या ऑफिस मधले काही मित्र मिळून त्याचा बर्थ डे साजरा करण्यासाठी ताडोबा च्या सफरीवर आले होते. तलावाकाठी असलेल्या गेस्ट हाऊस मधे थांबले होते. वाढ दिवस आणि जेवण खाण झाल्यावर, सर्व जणं थोडं जंगल फिरू म्हणत फेर फटका मारण्यासाठी निघाले. गेस्ट हाऊस च्या वाचमनने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला पण सर्व तरुण, आणि त्यात दोन तीन पेग पोटात गेलेले, सगळेच एकदम शूर वीर झाले होते. मग काय कोणीच ऐकलं नाही. आणि सर्व सात जणं जंगलात शिरले.