तू ही रे माझा…. “मितवा”

  • 6.3k
  • 2.1k

नमस्कार मंडळी आजच्या या ब्लॉगला खरंतर कशी आणि कुठून सुरुवात करू सुचत नाहीये , कारण ज्या नात्याविषयी आज मी बोलणार आहे त्याबद्दल जितकं लिहावं तितकं कमीच आहे… या नात्याची सुरुवात नक्की कधी पासून झाली हे देखील मला ठीकस आठवत नाही ,  पण जितक आठवेल आणि जसं जमेल तसं सांगण्याचा मी प्रयत्न  करतो. काळ  साधारण 1990-91  दशकातला ,  माझं वय साधारण सात ते आठ वर्ष ,  शाळेत जायला नुकतीच सुरुवात झाली होती,  कदाचित पहिली किंवा दुसरीत असेल . माझी शाळा म्हणजे सर्वांच्या परिचयाची अर्थात बालमोहन विद्यामंदिर दादर शिवाजी पार्क ,  तिथून थोडसं पुढे गेलो की लगेच शिवसेना भवन आणि त्याच रस्त्याच्या