रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 80

  • 3.3k
  • 1k

अध्याय 80 गुहकाला श्रीरामांचे दर्शन – ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रामदर्शनाला जाण्यासाठी सैन्य सिद्धकरण्याची सुमंतांची सेनापतींना आज्ञा : सुमंता आज्ञापी मारुती । शीघ्र संजोग सैन्यसंपत्ती ।येरें ऐकतां अति प्रीतीं । आनंद चित्ती उथळला ॥ १ ॥तेणें आनंदेकरोनि जाण । घातलें मारुतीसीं लोटांगण ।सेनापतीसी आज्ञापन । केले आपण सुमंतें ॥ २ ॥आपुलाले दळभार । सिद्ध करा अति सत्वर ।भरत निघाला वेगवत्तर । श्रीरघुवीरदर्शना ॥ ३ ॥तंव भरतें करोनियां दान । सुखी केलें दीनजन ।आनंदमय प्रसन्नवदन । काय गर्जोन बोलत ॥ ४ ॥ भरताची नगर शृंगारण्याची शत्रुघ्नाला आला : भवशत्रुविनाशना । ऐकें सुबंधो शत्रुघ्ना |सेनापतीसी करोनि आज्ञा । सहित प्रधानां सिद्ध करवीं