रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 20

  • 1.4k
  • 333

अध्याय 20 रावणाचे नर्मदातीरावर आगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ तदनंतरें श्रावणारिनंदन । अगस्तीप्रति कर जोडून ।म्हणता झाला स्वामीनें निरुपण । रावणाचें सांगितलें ॥१॥दशानन विचरत क्षितीं । पृथ्वीचे भूप शरण येती ।तयांतें जिंकोनि लंकापती । पुढारां चाले जिंतित ॥२॥ऐसें जिंतिलें भूमंडळ । राजे जिंतिले ज्यांचा पराक्रम प्रबळ ।ऐसा दशानन अति सबळ । कोठे नाहीं पराभविला ॥३॥निर्वीर होती तैं सृष्टी । ऐसें गमतें माझे पोटीं ।यदर्थी आशंका थोर मोठी । माझे जीवीं वाटतसे ॥४॥बलाढ्य राजे अवनीं नव्हते । ऐसें वाटतें माझेनि मतें ।तैं पाशुपतादिक होतीं शस्त्रें । त्याचें काहीं न चलेचि ॥५॥ऐसें श्रीरामाचे वचन । ऐकोनियां हास्यवदन ।बोलता झाला तूं ब्रह्म पूर्ण