सोबतीचा पाऊस

(33)
  • 27.8k
  • 7
  • 14.1k

आजही तो क्षण आठवतोय मला. मी पहिल्यांदाच पुण्याला जाणार होती. ऑफिसच्या कामानिमित्त आणि तिकडेच आमची पहिली भेट झालेली. जायचं म्हणुन लवकर आवरून झोपायच ठरलं. तस वन डे रिटर्न यायचं होत, म्हणून काही पॅकिंग नव्हती. आज लवकर झोपावं लागणार होतं नाही तर सकाळी जाग आली नसती. आईचा ओरडा पडल्यावर गप्प झोपावं लागलं. झोप काही केल्या येत नव्हती. पण झोपलो नाही तर ट्रेन मिस झाली असती म्हणून झोपावं लागलं. डोळे बंद करून पडले होते, पण झोप काही केल्या येईना. विचार करता करता कधी झोपले हे देखील कळले नाही. आईच्या आवाजाने जाग आली, घडाळ्यात पाच वाजले होते. धडपडत उठून बसले. अलार्म कसा झाला नाही

Full Novel

1

सोबतीचा पाऊस- भाग-१

आजही तो क्षण आठवतोय मला. मी पहिल्यांदाच पुण्याला जाणार होती. ऑफिसच्या कामानिमित्त आणि तिकडेच आमची पहिली भेट झालेली. जायचं लवकर आवरून झोपायच ठरलं. तस वन डे रिटर्न यायचं होत, म्हणून काही पॅकिंग नव्हती. आज लवकर झोपावं लागणार होतं नाही तर सकाळी जाग आली नसती. आईचा ओरडा पडल्यावर गप्प झोपावं लागलं. झोप काही केल्या येत नव्हती. पण झोपलो नाही तर ट्रेन मिस झाली असती म्हणून झोपावं लागलं. डोळे बंद करून पडले होते, पण झोप काही केल्या येईना. विचार करता करता कधी झोपले हे देखील कळले नाही. आईच्या आवाजाने जाग आली, घडाळ्यात पाच वाजले होते. धडपडत उठून बसले. अलार्म कसा झाला नाही ...अजून वाचा

2

सोबतीचा पाऊस - भाग-२

ठाणे स्टेशनवर पोहोचताच मी धावत प्लॅटफॉर्मवर नंबर पाचवर जाऊन उभी राहिली. तेवढ्यात पुण्याला जाणाऱ्या ट्रेनची घोषणा झाली. कोणत्याही क्षणात येण्याची ती घोषणा होती. मी तय्यारच होते जसे यौध्ये जायचे ना लढायला त्याच पध्दतीने मी देखील ट्रेनमध्ये चढायला तय्यार होते. तोच पुण्याला जाणारी ट्रेन प्लॅटफॉर्मवर आली. सगळे चढले म्हणून मी देखील चढले. ती ट्रेन देखील लगेच सुरू झाली. त्या डब्यात उभं राहायला ही जागा नव्हती आणि माझा बॉस नाचून सांगत होता त्या ट्रेन ने जाशील तर झोपून जाशील. एवढा राग येत होता काय सांगू. मग कानात हेडसेट टाकून गाणी ऐकत उभी राहिली. त्यात तो ट्रेनमधल्या बाथरूमचा वास जीव नकोस करत ...अजून वाचा

3

सोबतीचा पाऊस - भाग-३

तोच अनय माझ्यासमोर बाईक घेऊन उभा राहीला. आधी मला राग आला की हा कशाला आता माझा पिच्छा करतोय पण मग तोच बोलला. मॅडम काही खाल्लं नाही ओ तुम्ही. चला हॉटेलमध्ये जाऊया. मलाही भूक लागलीये. मग मी विचार केला एवढ्या मोठा पुण्यात कुठे शोधायचं हॉटेल जाऊ याच्या सोबतच. काही वाईट घडलंच तर गणु आहेच. आणि आपला पेपर स्प्रे देखील. मग जाऊन बसले बाईकवर. आधी आम्ही छान हॉटेलमध्ये दाबून खाल्ल. मग मीच काही तरी बोलायच म्हणुन विषय काढला, काय ओ मुंबईला परत जायची ट्रेन किती वाजताची आहे...? मॅडम आता ट्रेन डायरेक्ट सहा वाजताची .. इकडे अशाच ट्रेन असतात. मी मात्र काय करू एवढा वेळ याचा विचार करत ...अजून वाचा

4

सोबतीचा पाऊस- भाग-४ (अंतिम)

मग की देखील बाहेर आले. हे सर्व तो लांबून बघून हसत होता. त्याच्याजवळ येत मी त्याला ओरडणारच होते की, पाय सरकला आणि मी पडणारच होते की, त्याने मला झेलले. एक क्षण काहीच कळत नाही की काय होतंय. त्याच्या त्या डोळ्यात मी हरवून गेली काही क्षणांसाठी आणि तो आला. सोबतीचा पाऊस. पण तो क्षण अजूनही आठवला तरी अंगावर शहारे येतात. आम्ही परतीच्या वाटेला लागलो.. आता तो शांत होता आणि माझी बडबड चालु होती. कदाचित मी आता जास्त कम्फर्टेबल झाली असावी. त्याने एक ठिकाणी जातानाचा रस्ता बदलला तो कळताच मी त्याला विचारले. पण त्याच्या तोंडातुन एक शब्द फुटेनात. मला आता भीती वाटू ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय