Athavanitalya kathaa - 1 books and stories free download online pdf in Marathi

सोबतीचा पाऊस- भाग-१

आजही तो क्षण आठवतोय मला. मी पहिल्यांदाच पुण्याला जाणार होती. ऑफिसच्या कामानिमित्त आणि तिकडेच आमची पहिली भेट झालेली. जायचं म्हणुन लवकर आवरून झोपायच ठरलं. तस वन डे रिटर्न यायचं होत, म्हणून काही पॅकिंग नव्हती. आज लवकर झोपावं लागणार होतं नाही तर सकाळी जाग आली नसती. आईचा ओरडा पडल्यावर गप्प झोपावं लागलं. झोप काही केल्या येत नव्हती. पण झोपलो नाही तर ट्रेन मिस झाली असती म्हणून झोपावं लागलं. डोळे बंद करून पडले होते, पण झोप काही केल्या येईना. विचार करता करता कधी झोपले हे देखील कळले नाही.



आईच्या आवाजाने जाग आली, घडाळ्यात पाच वाजले होते. धडपडत उठून बसले. अलार्म कसा झाला नाही म्हणून बघितले तेव्हा कळलं. कसा होईल सकाळचे साडे चार वाजले होते. 'ही आई पण ना, पाचच्या नावाखाली तिने मला अर्धातास आधीच उठवले होते.' का... तर म्हणे, "तुझीच तय्यारी नाही होत मग करतेस घाई म्हणून उठवलं." काय बोलणार यावर. मी गप्पपणे बाथरूममध्ये निघून गेले. बाहेर भरपूर पाऊस पडत होता की कोसळत होता देव जाणे. पण खूप जोरात आवाज मात्र येत होता.



स्वतःच आवरून चहा नाश्ता करत होते की, आई ने विचारले" जायलाच हवं का..?" नाही म्हणजे बाहेर खुप पाऊस आहे ना.." मी गप्पपणे तिच्याकडे एक थंड नजरेने बघितले. (मी मनात, 'मला नाही ग हौस एवढ्या पावसात त्या पुण्यात जायची. पण तो खडूस बॉस बोलला जा नाही तर प्रोमोशन नाही. म्हणून जावं लागतंय.') माझ्या नजरेने कदाचित तिला तीच उत्तर मिळालं असावं तशी ती गप्प किचनमध्ये निघून गेली मला प्रवासाच खायचं बांधून द्यायला.



मी देखील पुढ्यातले पोहे अक्षरशः तोंडात कोंबत घडाळ्यात पाहिलं. आधीच उशीर आणि त्यात हा बाहेर पाऊस. सगळं आवरून निघाली एकदाची त्या पावसात. सकाळचे साडे सहा झाले होते तरीही बाहेर अंधारून आलेलं. छान हवा सुटली होती. वाटत होत पांघरूण घेऊन झोपून द्यावं, पण कसलं काय. ते नशीब आपलं नाही अस म्हणत मी ऑटोसाठी निघाले. आईच्या पाया पडून बाहेर पडले आणि दारातच ऑटो मिळाली. लगेच देवाचे आभार ही मानले.



ऑटोमध्ये बसुन मी त्या बाहेर पडणाऱ्या पावसाला एन्जॉय करत होते. थंडावा हवेत जाणवत होता मस्त अंग शहारले. पाण्याची काही स्पंदने तोंडावर येत होती, गुदगुदल्या झाल्यासारख वाटलं. एवढ्या त्या छान वातावरणात मधेच रिक्षावाला केकटला, "ओ ताई पैसे द्या मला दुसर भाड ही घ्यायचं आहे." अस वाटत होतं की बोलाव पैसे घेऊन पळुन जाणार नाहीये, पण मनाला आवरलं. पैसे देऊन स्टेशनवर पोहोचली, तिकीट काढली आणि ठाण्याला जाण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उभी राहून ट्रेनची वाट बघत होती. मोबाईलवर नजर जाताच टेंशन. ती ट्रेन पंधरा मिनिटांमध्ये ठाण्याला पोहोचणार होती.



तोच समोरून एक कल्याण ट्रेन आली आणि माझा जीव भांड्यात पडला. सकाळ असल्याने काहीच गर्दी नव्हती. एवढी जागा होती की तुम्ही कोणत्याही सीटवर झोपु शकत होता. मग एक सीटवर बसून मी ठाणे येण्याची वाट बघत बसले. बाहेर अजूनही पाऊस कोसळत होता. थंड वारा येताच अंगावर शहारे उभे राहत होते.



काही बोला, पण तो पाऊस आहे ना तो एवढा गोड आहे की, तो आला की मन कस आनंदी होते. वातावरण एकदम मस्त होत. एकदम रोमँटिक आणि त्यात आपल्या आवडत्या वेक्तीचा सहवास हवा हवासा वाटतो. तो सोबत असला की पाऊस पडावासा वाटतो आणि आपण त्या आवडत्या व्यक्तीच्या खांद्यावर आपले डोके ठेवून निवांत पडून राहायचं. तो प्रवास कधी संपूच नये असं वाटत नाही...!!
बाहेर पाऊस आणि सोबतीला आवडत्या व्यक्तीचा खांदा.. म्हणजेच स्वर्गसुख नाही..!!

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED