ठाणे स्टेशनवर पोहोचताच मी धावत प्लॅटफॉर्मवर नंबर पाचवर जाऊन उभी राहिली. तेवढ्यात पुण्याला जाणाऱ्या ट्रेनची घोषणा झाली. कोणत्याही क्षणात ट्रेन येण्याची ती घोषणा होती. मी तय्यारच होते जसे यौध्ये जायचे ना लढायला त्याच पध्दतीने मी देखील ट्रेनमध्ये चढायला तय्यार होते. तोच पुण्याला जाणारी ट्रेन प्लॅटफॉर्मवर आली. सगळे चढले म्हणून मी देखील चढले. ती ट्रेन देखील लगेच सुरू झाली. त्या डब्यात उभं राहायला ही जागा नव्हती आणि माझा बॉस नाचून सांगत होता त्या ट्रेन ने जाशील तर झोपून जाशील. एवढा राग येत होता काय सांगू. मग कानात हेडसेट टाकून गाणी ऐकत उभी राहिली. त्यात तो ट्रेनमधल्या बाथरूमचा वास जीव नकोस करत होता.
बघता बघता ट्रेन एक एक स्टेशन पार करत होती. बाहेरील दृष्य मनाला अजून ताज तवानं करत होत. त्या पावसाने काय जादू केली होती कोण जाणे सगळीकडे हिरवी शाल पांघरावी तसच वाटत होतं. त्यात रंगीबेरंगी फुले वाऱ्यासोबत डोलत होती. त्यावर बसलेला भुंगा मात्र फुलांवर बसून चांगलाच ताव मारत होता. सकाळचा ब्रेकफास्ट असावा. सकाळ झालेली पण त्या सुर्यदेवाने दर्शन काही दिले नाही. कदाचित त्याने देखील त्या पावसामुळे दांडी मारली असावी. अचानक कुठून तरी डोंगराच्या दिशेने मोठं मोठे ढग येत आणि पाऊस पाडून जात. झोपलेल्या प्रत्येक प्राणी, पक्षाला फ्रीमध्ये अंघोळ घालावी तसे ते घालून परतत होते.
हे सगळं मी ट्रेन मध्ये बसून टिपत होती. पावसाळ्यात निसर्ग किती जवळून जगता येतो नाही....!! त्याचाच आनंद मी घेत होते. परत एकदा पावसाला सुरुवात झाली. आणि आम्ही ही ट्रेन ने एक-एक स्टेशन पार करत होतो. मधेच एका भोगद्यामध्ये गाडी गेली आणि सगळीकडे छोटे मोठे धबधबे वाहताना दिसले. तो क्षण मनाला आनंद देऊन गेला. कस का होईना आज हे मी सुख अनुभवत होती.
तोच एका बाईने मला तिकीट विचारली म्हटलं "काकी मला शिवाजीनगरला उतरायचं आहे" त्यांनी आपण आधी उतरणार आहोत असं सांगून स्वतःची सीट मला दिली. मग काय निसर्ग अजून जवळ बघता येणार होता. मी काच हळूच वर केली आणि थंड वारा मनाला स्पर्शून गेला.
हळू हळू मी सगळी स्टेशन मागे टाकत पोहोचली एकदाची शिवाजीनगरला. मला घ्यायला एक तिकडच्या ऑफिसमधला येणार होता म्हणून मी त्याला कॉल केला. नंबर बॉसने देऊन ठेवला होता म्हणून नशीब. खुपदा कॉल केल्यावर एक कॉल लागला. "हॅलो, मिस्टर अनय..? मी रेविका बोलतेय. मी स्टेशनला पोहोचली आहे. तुम्ही कुठे पोहोचला आहात..??" समोरून, " हा मॅडम मी देखील पोहोचलो आहे. तुम्ही स्टेशन बाहेर या मी बाहेरच उभा आहे."
मी गेली तर एक पाच फूट वैगेरे असेल. अंगात एक ब्लॅक जॅकेट, तोंडावर रुमाल गुंडाळला होता. खाली घातलेली जीन्स तर चिखलाने माखलेली असा त्याचा तो अवतार बघून मलाच हसु आला. तस कोणालाही आलाच असत. मग मीच पूढे जाऊन हाय हॅलो केलं. पावसाने ही उसंत घेतली होती. मग एक कप चहा होऊन जाऊदे अस त्याने म्हणताच मी एका पायावर तय्यार झाले. काय करणार प्रवासाचा शिन कमी व्हावा एवढीच इच्छा. दोघांनी दोन कप गरमा-गरम चहा घेतला आणि आम्ही निघालो. छान बाईक होती त्याची. बुलेटची. पहिल्यांदाच बसणार होते अशी अनोळखी वेक्तीच्या बाईकवर, पण दुसरा ऑपशन ही नव्हता. आणि तो एवढा घ्यायला आलाय आणि आपण ऑटोने जाणे मला आवडणार नव्हते. मग आम्ही निघालो.
ऑफिसमध्ये पोहोचलो काम काही जास्त नव्हते. उगाचच नळ बोलावले आहे अस वाटलं. पण बॉसने पाठवले त्याला कोण नाही बोलणार. काम झालेले. अनयच ही काम झालं होतं म्हणुन तो बाहेर गेला. तिकडच्या मॅनेजर ने काम संपलं तुम्ही जावा अस बोलताच माझा राग आता तळपायावरचा मस्तकात जात होता. फक्त एका तासासाठी मला मुंबईहून पुण्याला बोलावले होते. तशीच उठून आणि मी निघाले. लंच ही नाही केला,म्हणून पोटात कावळे ओरडत होते. बस स्टॉप वर उभी राहून मी बस ची वाट बघत होती आणि त्यात हा मुसळधार पाऊस. मग सगळी चीड चीड होत होती. काय करणार पोटात काही नसले की डोकही चालत नाही, हे काय उगाच बोलत नाही हे आज कळलं.
To be continued....