राखणदार. प्रकरण १ गावाबाहेर मोठ्या वडाच्या झाडाखाली गावातले काही रिकाटेकडे गप्पावीर तुक्या नरसू, शिवा आणि इतर दोनचारजण बसले होते. भरदुपारची वेळ असली तरी गर्द पानांमुळे झाडाखाली चांगली सावली होती. सूर्य डोक्यावर आला. कडकडून भूक लागलीय. मी बाबा घरी चाललो! शिवा म्हणाला. आणि उठू लागला. थांब की रे थोडा वेळ! एवढी कसली घाई ? नरसू त्याला थांबवत म्हणाला. गजाली मारत सकाळपासून बसलोय! अजून पुरे नाही झालं? माझ्या पोटात पण कावळे ओरडायला लागलेयत ! संध्याकाळी परत येऊ! तुक्यासुद्धा निघायच्या तयारीला लागला. अरे पण माझी मनीआॅर्डर यायचीय ! इथेच घेतली की थोडे पैसे माझ्या खर्चाला काढून ठेवता येतात. एकदा

Full Novel

1

राखणदार. - 1

राखणदार. प्रकरण १ गावाबाहेर मोठ्या वडाच्या झाडाखाली गावातले काही रिकाटेकडे गप्पावीर तुक्या नरसू, शिवा आणि इतर दोनचारजण बसले होते. वेळ असली तरी गर्द पानांमुळे झाडाखाली चांगली सावली होती. सूर्य डोक्यावर आला. कडकडून भूक लागलीय. मी बाबा घरी चाललो! शिवा म्हणाला. आणि उठू लागला. थांब की रे थोडा वेळ! एवढी कसली घाई ? नरसू त्याला थांबवत म्हणाला. गजाली मारत सकाळपासून बसलोय! अजून पुरे नाही झालं? माझ्या पोटात पण कावळे ओरडायला लागलेयत ! संध्याकाळी परत येऊ! तुक्यासुद्धा निघायच्या तयारीला लागला. अरे पण माझी मनीआॅर्डर यायचीय ! इथेच घेतली की थोडे पैसे माझ्या खर्चाला काढून ठेवता येतात. एकदा ...अजून वाचा

2

राखणदार. - 2

राखणदार प्रकरण -- 2 तेव्हा तानाजीरावांच्या वडिलांची मोठी बहीण --- दुर्गाआत्या आडगावात रहात होती. थोड्याच दिवसांपूर्वी तिच्या पतींचे माधवरावांचे अचानक निधन झालं होतं. मुलं - बाळं नसल्यामुळे मोठ्या वाड्यात तिला एकटीलाच रहावं लागत होतं. रात्री सोबतीला एक गावातली मैत्रीण येत असे. आत्याचं तालुक्याच्या गावी प्राॅपर्टीचं काम होतं. तिनं फोन करून भावाला सोबत येण्याची गळ घातली कारण कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी नीट तपसणं महत्वाचं होतं. नारायणरावांनी स्वतः न जाता तानाजीरावांना पाठवलं. तिकडे धावपळ करायला तरूण माणूस असणं गरजेचं आहे असं त्यांचं मत पडलं. वडिलांचं म्हणणं तानाजीराव डावलू शकले नाहीत. सकाळी न्याहारीच्या वेळी ते आत्याकडे पोहोचले. ती त्यांची वाट पहातच होती. चहा- ...अजून वाचा

3

राखणदार. - 3

राखणदार प्रकरण - ३ दरवाजा उघडून आत्या घरात आली." तू झोपला नाहीस? इथं का उभा राहिलायस?" तिनं आश्चर्यानं विचारलं. मैत्रीण मात्र टक लावून त्यांच्याकडे बघत होती. जणू काही तिला काहीतरी जाणवलं होतं. ती सर्वसाधारण स्त्री वाटत नव्हती. कपाळाला चंदनाचा टिळा, गळ्यात तुळशीची माळ मुखात हरीनाम---- तिला ते आत्मे एवढे का घाबरत होते ; हे तिला पहाताच तानाजीरावांच्या लक्षात आलं. दुस-या दिवशी सकाळी निघताना कधी एकटी घरात रहाणार नाही; असं वचन त्यांनी आत्याकडून घेतलं होतं. "तू आमच्याकडे अनंतपूरला येऊन रहा! आताच चल माझ्याबरोबर! इथे एकटीने रहायची काय गरज आहे? " त्यांनी आग्रह करून पाहिला. त्यांना आत्याची काळजी वाटत होती, पण ...अजून वाचा

4

राखणदार. - 4

राखणदार प्रकरण ४ तो माणूस काठी उगारून उभा आहे ; तो आता काठीचा आघात आपल्यावर करणार आहे हे तानाजीरावांनी आणि सरळ-सरळ त्याला भिडले. त्या माणसानेही काठी फेकून दिली; आणि दोन हात करायला सुरूवात केली. काही वेळातच तानाजीरावांच्या लक्षात आलं की 'तो ' सुद्धा कसलेला पैलवान होता. प्रत्येक डावाला त्याच्याकडून प्रत्युत्तर मिळत होतं. " एवढा मोठा पैलवान अजून पर्यंत आपल्याला कोणत्याच कुस्तीच्या फडात दिसला कसा नाही?" तानाजीरावांना आश्चर्य वाटत होतं. पण त्यांना एका गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं त्याला मारलेले ठोसे त्याचं शरीर चुकवून भलतीकडे जात होते. त्याला कितीही पकडायचा प्रयत्न केला; तरी तो हातातून निसटत होता. "कशी कुस्ती शिकलाय हा ...अजून वाचा

5

राखणदार. - 5 - अंतिम भाग

राखणदार प्रकरण ५ "अहो! ही पेज तुमच्यासाठी बनवलीय! थोडीशी तरी पिऊन बघा! अंगात शक्ती येईल. तुम्हाला चवीला थोडं लिबाचं पण देते! " कांता तानाजीने काहीतरी खावं म्हणून तिच्या परीने प्रयत्न करत होती. आपल्या पतीची गलितगात्र अवस्था बघून ओलावलेले डोळे नव-याला दिसू नयेत म्हणून खोटं हसत होती. "हो! दे मला थोडी पेज! पण आता नको. थोड्या वेळाने दे! " तानाजीला बायकोची काळजी कळत होती. पण इच्छा नसताना काही खावं असंही वाटत नव्हतं. "आता संध्याकाळ झालीय! तुम्ही दुपारीसुद्धा असाच बहाणा करून काही खाणं टाळलं! तुम्हाला काय खावंसं वाटतं; मला सांगा! मी बनवून देईन! पण असे उपाशी राहू नका! स्वत:ची तुम्ही काय ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय