गुंतता हृदय हे !!

(151)
  • 125.5k
  • 20
  • 54.8k

गुड मॉर्निंग!! मुंबई!! मी आहे तुमचा सर्वांचा लाडका RJ अमेय.. सो, चला आजच्या दिवसाची सुरुवात करूया ह्या सुंदर अश्या गाण्याने.. "पाहिले न मी तुला तू मला न पाहिलेना कळे कधी कुठे मन वेडे गुंतलेपाहिले न मी तुला ????" मुबंईमधली सात मजली इमारत..आणि तिथे सहाव्या मजल्यावर राहणारे जोशी कुटूंब... घरात माणसे ४..सुभाष जोशी, त्यांची पत्नी सुकन्या जोशी, मुलगा ऋग्वेद जोशी आणि मुलगी आर्या जोशी.. सुभाष काका हे बँकेत मॅनेजर आणि सुकन्या काकू ह्या गृहिणी आहेत, तसेच ऋग्वेद ११वीत कॉलेजमध्ये शिकत आहे आणि आर्या एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये कामाला आहे.. दोन स्वतंत्र खोल्या, लिविंगरूम आणि किचन असलेले प्रशस्त घर.. सध्या सकाळ झाली आहे.काका

Full Novel

1

गुंतता हृदय हे!! (भाग १)

गुड मॉर्निंग!! मुंबई!! मी आहे तुमचा सर्वांचा लाडका RJ अमेय.. सो, चला आजच्या दिवसाची सुरुवात करूया ह्या सुंदर अश्या "पाहिले न मी तुला तू मला न पाहिलेना कळे कधी कुठे मन वेडे गुंतलेपाहिले न मी तुला ????" मुबंईमधली सात मजली इमारत..आणि तिथे सहाव्या मजल्यावर राहणारे जोशी कुटूंब... घरात माणसे ४..सुभाष जोशी, त्यांची पत्नी सुकन्या जोशी, मुलगा ऋग्वेद जोशी आणि मुलगी आर्या जोशी.. सुभाष काका हे बँकेत मॅनेजर आणि सुकन्या काकू ह्या गृहिणी आहेत, तसेच ऋग्वेद ११वीत कॉलेजमध्ये शिकत आहे आणि आर्या एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये कामाला आहे.. दोन स्वतंत्र खोल्या, लिविंगरूम आणि किचन असलेले प्रशस्त घर.. सध्या सकाळ झाली आहे.काका ...अजून वाचा

2

गुंतता हृदय हे!! (भाग २)

"अनिश ह्या साठे काकू आणि या जोशी काकू व ही त्यांची मुलगी आर्या', गोडबोले काकू म्हणाल्या. अनिश ने दोन्ही नमस्कार केला आणि आर्याला हॅलो म्हटले. आर्या ची नजर अनिश वरून हटतच नव्हती.. इतक्यात जोशी काकू म्हणाल्या, "अरे, रेडिओवर म्हणजे तू RJ अमेय ला ओळखत असशील ना? " "मी न चुकता त्याचा प्रोग्राम ऐकते..कोणता ग तो आर्या? हा "गुंतता हृदय हे", किती सुंदर असतो प्रोग्रॅम!! त्यातली मराठी गाणी तर खूपच सुंदर आणि त्याचा आवाज तर!!" काकूंना मध्येच थांबवत आर्या म्हणाली, " आई!! पुरे झाले त्या अमेयचं कौतुक". इतक्यात साठे काकू म्हणाल्या," मी पण ऐकते तो प्रोग्राम..फारच छान आवाज आहे हो ...अजून वाचा

3

गुंतता हृदय हे !! (भाग ३)

चक्क आर्या आपल्याशी बोलत आहे याचा आधी समीरला विश्वासच बसत नव्हता..पण त्याने स्वतःला सावरलं.. आणि म्हणाला, "अगं, आज एका बरोबर मीटिंग आहे..म्हणून थोड्या तयारी साठी लवकर आलो..जाईन आता ५-१० मिनिटात." तो पुढे म्हणाला,"आज कधी नवे ते, तू पण तर लवकर आलीयेस. काही खास कारण? तुझी पण मीटिंग वगैरे??" "तसे काही नाही. Anywy you carry on. मी निघते..मला भरपूर काम आहे..पुन्हा बोलू bye" असे बोलून आर्या कँटीन मधून निघून गेली.. आजचा दिवस रोजच्यापेक्षा खूपच बोर होता स्निग्धा नव्हती ना!! ती असली की, नेहमी ऑफिसमध्ये आवाज,गोंधळ असायचाच.. तोपर्यंत दुपार ही झाली..तिला लंच एकट्याने करायलाही बोरं झालं होतं. पण भूक पण लागली ...अजून वाचा

4

गुंतता हृदय हे !! (भाग ४)

आर्या हसत हसतच समीर जवळ आली.. इतक्यात तिला आठवले की, समीरला तिला काहीतरी सांगायचे होते.. ती लगेच म्हणाली, "अरे तू काहीतरी सांगणार होतास. बोल काय बोलायचंय." तो बोलणारच होता की, आर्याच्या फोनची मेसेज टोन वाजली..तिने पाहिले तर अनिशचा मेसेज होता. त्याने तिला भेटायची वेळ आणि ठिकाणाचे नाव मेसेज केले होते.. त्याने भेटायची वेळ ५ वाजताची दिली होती. आर्याने घड्याळाकडे बघितले तर ३ वाजत होते..म्हणजे आर्याकडे फक्त २ तासच होते..तयार व्हायला.. ती लगेच शेखरजवळ गेली व तिने शेखरला विनंती केली की, तिला एका महत्वाच्या कामामुळे आताच घरी जावे लागणार म्हणून..शेखरने एकवार समीरकडे पाहिले..तर समीरने मान हलवून हो असा इशारा केला..मग ...अजून वाचा

5

गुंतता हृदय हे !! (भाग ५)

ती तिच्या डेस्कजवळ गेली आणि तिने तिथे पर्स ठेवली. तेवढ्यात तिचं लक्ष समीरच्या डेस्क कडे गेलं..पण तिथे कुणीच नव्हतं.. समीर अजून ऑफिसला आला नव्हता.. कॉफी पिण्यासाठी आर्या कॅन्टीनमध्ये जाणार इतक्यात समीर आला.. अचानक आलेल्या पावसाच्या सरीमुळे त्याचे केस थोडेफार भिजले होते.. तो आज रोजच्यापेक्षा खूपच handsome दिसत होता.. आर्या ही एक क्षण त्याच्याकडे बघतच राहिली.. अचानक समीरने "गुड मॉर्निंग आर्या" अशी हाक मारल्यावर ती भानावर आली.. तिला काय बोलावे हेच सुचत नव्हते..तिने फक्त हाताने कॅन्टीनकडे खूण केली.. समीर पण त्याची बॅग ठेवून कॅन्टीनमध्ये आला..मग दोघांनीही कॉफी घेतली. तेवढ्यात आर्या पटकन म्हणाली, "समीर, तुला काल मला काहीतरी सांगायचं होतं ना?, ...अजून वाचा

6

गुंतता हृदय हे!! (भाग ६)

नेहमीप्रमाणे तिने घराची डोअरबेल वाजवली..आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसला कारण दरवाजा चक्क अनिशने उघडला होता..त्याला पाहून ती खूपच खुश जाऊन बघते तर.... अनिशचे आई बाबा सुद्धा आले होते व ते आर्याच्या आई-बाबांबरोबर गप्पा मारत चहा पित होते.. आर्याच्या आईने भजी पण केली होती..त्याचाही सगळे आस्वाद घेत होते.. आर्याला काहीच कळत नव्हते..नक्की काय चाललंय ते.. आर्याने खुणेने अनिशला विचारले. पण तो काहीच बोलला नाही..तेवढयात सगळ्यांची नजर आर्यावर गेली.. आर्या बऱ्यापैकी भिजली होती.. ती सगळ्यांना बघून म्हणाली, "मी पटकन फ्रेश होऊन येते" थोड्याचवेळात आर्या फ्रेश होऊन आली. तेव्हा अनिशच्या आईने म्हणजेच गोडबोले काकूंनी तिला जवळ बोलाविले आणि म्हणाल्या, "आर्या बेटा, मला ...अजून वाचा

7

गुंतता हृदय हे!! (भाग ७)

शेखरने आर्याला त्याच्या केबिनमध्ये बोलविले आणि तिला समीरबद्दल विचारले. पण आर्याने तिला ह्याबद्दल काहीच माहीत नाही हे सांगितले.. शेखरला एकंदरीत वागण्यावरून थोडा संशय आला होता की, नक्कीच या दोघांमध्ये काहीतरी बिनसलयं म्हणूनचं समीरने नोकरी सोडण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला असेल.. तरी शेखरने आर्याला समीरच्या नोकरी सोडण्याबाबत काहीच कळू दिले नाही..कारण इतक्यात त्याला हे ऑफिसमध्ये कोणालाही कळू द्यायचे नव्हते.. आर्या तिच्या डेस्कजवळ आली आणि विचार करू लागली, "हा समीर नक्की कुठे गेलाय? आणि हा शेखर त्याच्याबद्दल मला का विचारत होता? समीरने शेखरला त्याला माझ्याबद्दल वाटणाऱ्या भावना सांगितल्या असतील का? शीट यार. हा समीर पण ना..देव करो तो ठीक असू देत" आर्या ...अजून वाचा

8

गुंतता हृदय हे!! (भाग ८)

अनिशने आर्याबरोबर अमेयची ओळख करून देत असताना तो तिला म्हणाला, 'आर्या हा आमच्या रेडिओ स्टेशनचा सुपरस्टार "RJ अमेय" म्हणजेच पटवर्धन.. तुला आश्चर्य वाटलं असेल ना! पण हे खरं आहे की, सगळी मुंबई ह्याला RJ अमेय च्या नावाने ओळखते..पण ह्याचं खरं नाव समीर..' तो पुढे बोलू लागला, 'समीर, meet my wife आर्या जोशी आणि बरं का, मला ही हे आताच कळलं की ती पण तुझी फॅन आहे..but buddy ur late, कारण तुझ्या ह्या सुंदर फॅनला मी आधीच पटवलं आहे" आणि त्याने समीरच्या हातावर जोरात टाळी दिली व तो आणि समीर दोघेही हसू लागले.. आर्याला काय आणि कसं रिऍक्ट व्हावं हेच ...अजून वाचा

9

गुंतता हृदय हे!! (भाग ९)

आज सकाळपासून सुमती काकूंची लगबग सुरु होती..त्यांना तर काय करू काय नको असं होत होते..अहो, कारणच तसं होतं ना!! मुलगी गौरी चक्क २ वर्षांनी शिक्षण पूर्ण करून घरी येणार होती.. समीर नेहमीप्रमाणे सकाळचा नाश्ता करायला शास्त्री यांच्या घरीच आला.. तेव्हा त्याला कळले की, पुढच्या महिन्यात येणारी गौरी याच महिन्यात भारतात येत आहे..ते पण आजच..त्यालाही काकूंना काही मदत करावीशी वाटत होती..पण तो काय मदत करणार..ह्याच विचारात असताना.. अचानक प्रमोद शास्त्री यांचा समीरला फोन आला..आज एक महत्वाच्या मीटिंगमुळे ते सकाळी लवकरच ऑफिसला गेले होते व गौरीच्या अचानक येण्याच्या बातमीमुळे ते त्यांची मीटिंग पुढे ढकलू शकले नाही आणि आता त्यांना ऑफिसमधून निघणे ...अजून वाचा

10

गुंतता हृदय हे!! (भाग १०)

ऑफिसच्या काही फॉर्मलिटी पूर्ण करून ती तडक घरी निघाली.. तिला उद्या पासूनच ऑफिसमध्ये रुजू व्हायला सांगितले गेले होते. असो, घरी मिठाई घेऊन आली आणि तिने सुमती काकूंना आनंदाची बातमी दिली.. काकूंनी देवाजवळ मिठाई ठेवून नमस्कार केला..मग गौरीने तिच्या बाबांना फोन करून ही बातमी कळवली.. आज सगळं शास्त्री कुटूंब अगदी आनंदात होतं..सुमती काकूंनी रात्री गोडाधोडाचा पण बेत ठरविला.. अरे हो!! गौरीने समीरला ही आनंदाची बातमी कुठे दिलीये..हेच विचारायचं होतं ना तुम्हाला..पण ती देणार तरी कशी!! त्याचा नंबर कुठे होता तिच्याकडे.. कळलं... तुम्ही काय विचार करताय ते.. अहो, पण तुम्हीच विचार करा..ती काकुंकडे कशी काय मागेल समीरचा नंबर..!! मग काय समीरची ...अजून वाचा

11

गुंतता हृदय हे!! (भाग ११)

काही वेळात दोघेही सुखरूप घरी पोहोचले..शास्त्री कुटूंबाने समीरचे खूप खूप आभार मानले.. गौरीने ही काकूंना घट्ट मिठी मारली आणि घडलेला प्रसंग सांगितला आणि समीर आल्यामुळे तिला खूप धीर आला हे ही तिने सांगितले.. त्यानंतर गौरी आणि समीर दोघेही फ्रेश झाले आणि काकूंनी दोघांना जेवायला वाढले.. समीर जेवून त्याच्या घरी निघून गेला..गौरी पण आराम करायला तिच्या खोलीत आली.. पण तिला झोप कुठे लागत होती..सारखा कालचा आणि आजचा दिवस तिच्या डोळ्यासमोर येत होता.. इथे समीरची हालत काही वेगळी नव्हती..कालच्या प्रसंगामुळे त्याला इतकं तर नक्की कळलं होतं की, गौरीला त्याच्याबद्दल आकर्षण झालयं म्हणून.. पण याआधी ही खूप मुलींना समिरबद्दल अशी भावना वाटली ...अजून वाचा

12

गुंतता हृदय हे!! (भाग १२)

समीर गौरीला म्हणाला, "कुठे गेली होतीस? मी किती टेन्शन मध्ये आलेलो माहीत आहे तुला..फोन का बंद ठेवला होतास? खूप बेल वाजवून पण जेव्हा तू दरवाजा उघडला नाहीस, तेव्हा मनात नको नको ते विचार आले..तुला काही झालं असतं तर मी काय करणार होतो..मी नाही राहू शकत गं तुझ्याशिवाय गौरी..मी रात्रभर खूप विचार केला आणि आज सकाळी तुला हो बोलायचं असं ठरविलं..पण जेव्हा तू दरवाजा नाही उघडलास आणि तुझा फोन ही बंद आला तेव्हा.." असे म्हणून तो क्षणभर थांबला आणि तो त्याच्या गुढघ्यांवर बसला व त्याने गौरीचा हात हातात घेतला आणि तो म्हणाला, "मी माझे पाहिले प्रेम कधीच नाही विसरू शकत..पण ...अजून वाचा

13

गुंतता हृदय हे!! (भाग १३)

आर्या आणि अनिशचे लग्न २ महिन्यांनी ठरलं..दोघांच्याही घरातले खूप खुश होते..जोशी काकू आणि गोडबोले काकू दोघीही लग्नाच्या तयारीला लागल्या.. काकूंना सर्व तयारी आर्याच्या पसंतीनेच करायची होती..खरेदी, दागिने, भेटवस्तू, मानपान!!!..बापरे!! किती गोष्टींची तयारी करायची होती.. त्यांना लग्नात कसलीच कसर सोडायची नव्हती..त्यांच्या लाडक्या आर्याचे जे लग्न होते.. गोडबोले काकूंचे ही तसेच होते..पण त्यांना दगदग होऊ नये म्हणून अनिश आणि त्याच्या बाबांनी सगळ्या लग्नाच्या तयारीची जवाबदारी स्वतःवर घेतली होती.. सर्व धावपळ जरी ते दोघे करीत असले तरी काकूंच्या सल्ल्यानुसार सगळे चालले होते.. काकूंना अनिशचे लग्न खूपच धामधुमीत करायचे होते..पण त्याच्या ह्या अचानक च्या आजारामुळे अनिशला हे लग्न अगदी साधेपणाने आटपायचे होते.. पण ...अजून वाचा

14

गुंतता हृदय हे!! (अंतिम भाग)

समीर आणि गौरी मुबंईला पोहोचले.. शास्त्री काकांनी त्यांना आणायला आधीच गाडी पाठविली होती..त्या गाडीचा ड्राइवर गौरीच्या नावाची पाटी घेऊन होता..दोघेही गाडीत बसले.. समीरने मनात विचारही केला नव्हता की, इतक्या लवकर तो परत मुबंईला येईल.. कारण काहीही असुदेत, पण तो पुन्हा मुबंईत आला होता..हे मात्र खरे.. जिथे त्याच्यासाठी सगळीकडे फक्त आर्याच्या आठवणी भरल्या होत्या.. गौरी अजूनही शांतच होती..तिने गाडीमध्ये हलकेच स्वतःचे डोके समीरच्या खांद्यावर ठेवले..समीरने ही तिला आधार दिला.. काही वेळातच गाडी हॉस्पिटलसमोर येऊन थांबली..ते दोघे गाडीतून खाली उतरले..त्यांचे सामान गाडीतच होते.. ड्रायव्हरला शास्त्री काकांनी आधीच सूचना दिल्याप्रमाणे तो त्या दोघांना हॉस्पिटलमध्ये सोडून त्यांचे सामान घेऊन आर्याच्या घरी ते सामान ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय