गुड मॉर्निंग!! मुंबई!!
मी आहे तुमचा सर्वांचा लाडका RJ अमेय..
सो, चला आजच्या दिवसाची सुरुवात करूया ह्या सुंदर अश्या गाण्याने..
"पाहिले न मी तुला तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले
पाहिले न मी तुला 🎶🎶🎶🎶"
मुबंईमधली सात मजली इमारत..आणि तिथे सहाव्या मजल्यावर राहणारे जोशी कुटूंब...
घरात माणसे ४..सुभाष जोशी, त्यांची पत्नी सुकन्या जोशी, मुलगा ऋग्वेद जोशी आणि मुलगी आर्या जोशी..
सुभाष काका हे बँकेत मॅनेजर आणि सुकन्या काकू ह्या गृहिणी आहेत, तसेच ऋग्वेद ११वीत कॉलेजमध्ये शिकत आहे आणि आर्या एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये कामाला आहे..
दोन स्वतंत्र खोल्या, लिविंगरूम आणि किचन असलेले प्रशस्त घर..
सध्या सकाळ झाली आहे.काका आणि ऋग्वेद आपापल्या कामाला निघून गेले आहेत आणि रेडिओ वर RJ अमेयचा "गुंतता हृदय हे" हा कार्यक्रम सुरू आहे..
काकूंचा अगदी आवडता कार्यक्रम आणि अमेय चा आवाज सुद्धा बरं का..तो ऐकल्याशिवाय ह्या घरची सकाळ होतच नाही..
पण हो, तो ऐकायला फक्त काकू आणि आर्याचं हजर असतात..
म्हणजे काय आहे ना!! आमच्या आर्याचे ऑफिस सकाळी १० वाजताचं. आणि हा कार्यक्रम सकाळी ८ वाजता लागतो..तोपर्यंत काका आणि ऋग्वेद घरातून निघालेले असतात..
असो, आर्या झोपली आहे आणि झोपेतच सध्या रेडिओ वर सुरू असलेल गाणे ऐकत आहे..जणूकाही तिला स्वप्नच पडलं आहे..अमेयच😀
गाणे कोणते??अहो तेच हो ते..मगाशी चालू होते ते..
"मृदु शय्या टोचते स्वप्न नवे लोचनी
पाहिलेस तू तुला आरशात ज्या क्षणी
रूप देखणे बघून नयन हे सुखावले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले
पाहिले न मी तुला 🎶🎶🎶🎶"
"वाह! किती रोमॅंटिक गाणे आहे आणि त्याचबरोबरचा अमेय चा हृदय चिरणारा आवाज!
हा कसा असेल ना दिसायला🤔..
काश तो माझ्यासमोर येईल आणि...😍😍" आर्या स्वप्नचं बघत असते की, अचानक...
"आर्या..अग ये आर्या!!! उठ लवकर बाळ, उशिर होईल नाहीतर ऑफिसला जायला.." काकूंनी आवाज दिला..
"अमेय....?????
आई ग..🤦.. ....हो ग आई, उठतेय..ही आई पण ना, मला स्वप्न ही बघू देत नाही..जाऊदेत आता उठायलाच हवे..नाहीतर late मार्क लागायचा, आणि तो बॉस..तो तर खाऊनच टाकेल मला.." आर्या स्वतःशीच पुटपुटली.
काही वेळानंतर.....
"अग नाश्ता तर कर नीट, काय हे नेहमीचंच तुझं आर्या. घाईघाईत नीट नाश्ता पण नाही करायचा..अग कुठे जातेयस..संपव आधी ते सगळे..आर्या.." काकू म्हणाल्या..
"आई pls मला खूप उशीर झालाय..माझी ट्रेन मिस होईल..चल बाय..हे apple घेऊन जाते..बाय..लव्ह यु आई" आर्या म्हणाली..
काही वेळानंतर..
"रिक्षा......" रिक्षात बसल्यावर, "हे इअरफोन कुठे गेले..हा मिळाले.." आर्या पुटपुटली..
"कितीदा नव्याने तुला आठवावे
डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे..🎶🎶
कितीदा झुरावे तुझ्याचसाठी,
कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी,🎶🎶
कितीदा झुरावे तुझ्याचसाठी,
कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी,🎶🎶
कितीदा सुकून पुन्हा फुलावे...
कितीदा नव्याने तुला आठवावे
डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे...🎶🎶🎶🎶🎶
"वाह!!किती मस्त गाणं.." आर्या मनातच म्हणाली..
तेवढ्यात स्टेशन आले..
इतक्यात अचानक,
"हॅलो फ्रेंड्स, तर कसा वाटला तुम्हाला आजचा एपिसोड..मला नक्की कळवा..आणि अजून एक..मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं त्याप्रमाणे तुमच्यासाठी मला भेटायची एक संधी मी तुम्हाला देत आहे..हा पण..त्यासाठी तुम्हाला मला एक रोमॅंटिक अशी स्टोरी ई-मेल द्वारे लिहून पाठवायची आहे..ज्याची स्टोरी मला सगळ्यात जास्त आवडेल..त्यालाच मला भेटायची संधी मिळेल.. सो bye..take care..उद्या नक्की भेटू.." अमेय म्हणाला.
"ओ मॅडम, पैसे तर द्या..मग ऐका की गाणी..ओ मॅडम..कुठून कुठून भेटतात सकाळी" रिक्षावाला म्हणाला.
आर्या भानावर येत.." अरे हो, सॉरी दादा..हे घ्या तुमचे पैसे". तिने पटकन जीभ बाहेर काढली..
स्निग्धा!!!!!स्निग्धा!!!!!
स्निग्धा ही आर्याची ऑफिस friend..रोज आर्या आणि ती एकत्रच ऑफिस ला जातात..
"आग ये बये, किती तो उशीर, आजपण लेटमार्क लागणार वाटते..तू पण ना, आजपण तो अमेयच असेल ना उशिरा येण्याच कारण, फुकणीच्याला एकदा खवडाच देणार आहे मी" स्निग्धा म्हणाली.
"अग हो, हो, किती रागवशील..चल निघू..बाकीचा राग ट्रेन मध्ये काढ.." आर्या म्हणाली..
दोघी ऑफिसला पोहचतात..
"Hi गर्ल्स, आजपण उशीर, एक काम करा, उद्यापासून येऊच नका, म्हणजे इथवर येण्याचा त्रास वाचेल..नो excuses pls" बॉस म्हणाले.
हे आहेत अस्मिता pvt ltd चे सर्वेसर्वा शेखर प्रधान..
ते कितीही ह्या दोघींना बोलले..तरी त्यांना हे पण माहीत आहे की, ह्या दोघी टॉप ranker employees आहेत कंपनीच्या..
तसेच त्या दोघींना ही ह्याची कल्पना आहे..की, शेवटी त्यांचीच मदत लागते सरांना..😁
Here is come, the dashing, handsome आणि शेखरचा खास employee समीर पटवर्धन..
सगळ्या ऑफिस मधल्या मुली समीर वर मरतात..
अगदी स्निग्धा सुद्धा बरं का!!..पण आपली आर्या त्याच्याकडे डुमकूनही बघत नाही..
बिलकुल नाही..तुम्ही जे समजताय तसे काही होणार नाहीये..म्हणजे आर्या आणि समीर ची लव्ह स्टोरी..वगैरे वगैरे..pls.तसं कसं होईल🤦
तुम्ही एक विसारताय..आपला RJ अमेय..😍
आता तर कुठे सुरुवात आहे..
"Woww किती handsome आहे ग हा!!, त्याची बॉडी बघ ना..हाये.....😍😍" स्निग्धा म्हणाली.
"चूप ग तू..इतका पण काही खास नाहीये तो दिसायला...काय तुम्ही सगळ्या मुली मरता त्याच्यावर मला कळतच नाही" आर्या म्हणाली..
"असुदेत, अटलिस्ट मी ह्याला बघू शकते..हाथ ही लावू शकते..तुझ्या त्या अमेय सारख नाही ..बघावे तेव्हा रेकत असतो रेडीओ वर" स्निग्धा म्हणाली.
"ए आता बस हा, अमेय कुठे मधून आला आणि रेकतो काय ग😠 किती गोड आवाज आहे त्याचा😍😍" आर्या उत्तरली..
"चल आता काम करूयात नाहीतर येईल आपला बॉस कान खायला" आर्या म्हणते आणि मग दोघीही खळखळून हसतात.
रात्री झोपताना.... आर्या मनातल्या मनात बोलत असते आणि काहीतरी लिहीत असते.
"कशी बरं सुरुवात करू, रोमँटिक स्टोरी लिहायला🤔
एक मुलगा आणि मुलगी..नको नको खूपच टिपिकल वाटतंय..मग, हा.....एक राजकुमारी...ईई..काहीतरीच वाटतंय.." आणि बघता बघता सगळ्या रूमभर गोळा करून फेकलेले कागद पडलेले असतात..
तेवढ्यात आई रूममध्ये येते आणि ओरडते,"आर्या काय ही खोलीची अवस्था..झोपायचे सोडून कचरा कसला करतेयस..ऐकतेयस का माझं, आर्या"
आर्या दचकले आणि म्हणते, "बापरे, सॉरी आई, मी उचलते सगळे कागद, अग ऑफिसचे काम करत होती..ते रोमँटिक..." मधेच अडखळत म्हणते, "म्हणजे माझ्या ऑफिस प्रोजेक्ट साठी tagline शोधत होती, सो भानच नाही राहिले"
"ठीक आहे, ते कागद उचलून वेळेवर झोप. गुड नाईट" असे बोलून आई निघून जाते झोपायला.
"हुश्श..बापरे नशीब आईने काही वाचले नाही.." झोपते आता.
दुसऱ्या दिवशी,
"गुडमॉर्निंग मुंबई!!
||गणपती बाप्पा मोरया||
मी तुमचा सर्वांचा लाडका RJ अमेय..तुमचे सर्वांचे स्वागत आहे "गुंतता हृदय हे" च्या नवीन एपिसोड मध्ये..
आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन झालंय..सगळीकडे कसं प्रसन्न वातावरण आहे..कुठे धूप, तर कुठे अगरबत्ती चा सुवास पसरलाय तर कुठे टाळ, घंटीचा नाद घुमतोय..आणि त्यामध्ये हा बरसणारा पाऊस..
मन कसं आठवणींमध्ये हरवून जाते..आणि मग बोलू लागते,
दिस चार झाले मन, पाखरू होऊन
पानपान आर्त आणि झाड बावरून||
सांजवेळी जेव्हा येई आठव आठव
दूर कुठे मंदिरात होई घंटारव
उभा अंगावर राही काटा सरसरून||
नकळत आठवणी जसे विसरले
वाटेवर इथे तसे ठसे उमटले
दूर वेडेपिसे सूर सनईभरून||
झाला जरी शिडकावा धुंद पावसाचा
आता जरी आला इथे ऋतु वसंताचा||
सो guys कसे वाटले गाणं??
आता आपल्या contest बद्दल थोडंस.
कसे चाललय लिखाण, मला भेटायचे आहे की नाही??
सो उचला पेन आणि लिहा रोमॅंटिक स्टोरी..आणि मिळवा चान्स मला म्हणजे तुमच्या सर्वांच्या आवडत्या RJ अमेय ला भेटण्याचा!! परवा शेवटची तारीख आहे तुमच्या स्टोरी submission ची.
सो भेटूया उद्याच्या एपिसोड मध्ये..
Siya, बाय आणि yessssss
||गणपती बाप्पा मोरया||
"Wooww सो रोमॅंटिक, माझी सकाळ तुझ्यापासूनच होते आणि रात्र तुझ्या आठवणींमध्ये जाते, वाह!किती छान बोलतो हा" आर्या पुटपुटते.
"आर्या उठ बघू. आज पहिला दिवस गणपतीचा..आपल्याला दादांकडे जायचंय..तुझे बाबा आणि ऋग्वेद कधीच तयार झालेत..तू पटकन तयार हो..मग निघू आपण." आई म्हणाली.
"हो ग आई, उठतेय मी" आळस देत आर्या उठली.
सगळे जण सुयश जोशी (उर्फ दादा) ह्याच्या घरी म्हणजे आर्याच्या मोठ्या काकांच्या घरी पोहचले..दरवर्षी जोशींचा गणपती दीड दिवसांसाठी दादांच्याच घरी येतो..सगळे जोशी कुटूंब दीड दिवस इथेच असते..गणपती बाप्पाची सेवा करायला..आणि गणपती बाप्पाला निरोप देऊन सगळे आपापल्या घरी परतात.
"कसा दिवस गेला कळलंही नाही..आज गणपती बाप्पांचे विसर्जनही झाले..अगदी भरून आलेलं हो निरोप देताना" काकू काकांना म्हणाल्या..
"हो ग, दिवस कसे जातात समजतच नाही" काका उत्तरले.
"आर्या, अग ए आर्या, थोड्यावेळाने आपल्याला साठेकाकूंबरोबर आमच्या पाककलेच्या क्लासच्या गोडबोले काकूंकडे जायचंय गणपती दर्शनाला. त्यांचा गणपती ५ दिवसांचा असतो.."
काकू म्हणाल्या.
"काय ग आई, आताच तर आलो विसर्जन करून..थांब ना थोडावेळ..नाहीतर तूच जा ना. सांगा ना हो बाबा हिला" आर्या म्हणाली.
"थकली असेल ग ती, राहुदेत तिला घरात, तूच जाऊन ये सुकू." काका म्हणाले.
"अहो, असे काय करताय, आर्या चल तयार हो, लगेच येऊ आपण" काकू म्हणाल्या.
काही वेळानंतर, आर्या, काकू आणि साठे काकू गोडबोले काकूंच्या घरी पोहचल्या.
आर्या तर त्यांचे घर पाहून भारावून गेली. गणपतीची आरास खूपच सुंदर केलेली होती..सगळीकडे खूप प्रसन्न वातावरण होते..
काकूंनी आर्याची ओळख करून दिली..आर्याने फिकट गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता, त्यावर झुमके आणि कपाळावर diamand ची बिंदी लावली होती , तसेच केस एक क्लिप लावून मोकळे सोडले होते, ओठांवर हलकी गुलाबी लिपस्टिक लावली होती. आर्या आज खूपच उठून दिसत होती..
इतक्यात तिथे अनिश ची एन्ट्री झाली. अनिश गोडबोले काकूंचा एकुलता एक मुलगा. त्याने आकाशी रंगाचा सदरा घातला होता..दिसायला देखणा, रुबाबदार..आर्या त्याला बघतच राहिली..त्याची नजर ही आर्या वर खिळून होती..तो तिच्या सोज्वळ रूपावर पाहताच क्षणी फिदा झाला होता.
इतक्यात गोडबोले काकू म्हणाल्या, "हा माझा मुलगा अनिश. रेडिओवर कामाला असतो"
रेडिओ?????????
क्रमशः
(आता पुढे काय होईल..जाणण्यासाठी वाचत राहा "गुंतता हृदय हे" ...माझी कथा आवडल्यास like, share, comment करायला विसरू नका)
©preetisawantdalvi