चाराण्याचं लव्ह बाराण्याचा लोच्या!

(10)
  • 27.3k
  • 1
  • 9.6k

" चार आण्याचं लव्ह .. बारा आण्याचा लोच्या..! "|| एक ||जगातल्या सगळ्या 'राज' लोकांचं 'सिमरन' मंडळींवर प्रेम असतं, तसं आमच्या या राजचंही सिमरनवर प्रेम होतं. होतं म्हणजे काय ती त्याला इतकी आवडायची की.... खूपच! पण पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरेनुसार सिमरन काही केल्या या आमच्या राजला भाव देत नव्हती. मनात प्रेमाची भावना निर्माण होणे तर कोसो दूर! तरीही धाडसी, धडपड्या, प्रचंड चिकाटी असणारा आमचा संयमी आणि धैर्यवान राज... नाराज झालेला नव्हता. त्याला त्याच्या कर्तबगारी वर ठाम विश्वास होता. एक ना एक दिवस आपण सिमरनला आपल्या प्रेमात पाडूच याची त्याला खात्री होती. सात वेळा ग्रामपंचायत निवडणूकीत पडलेला राष्ट्रीय नेता आठव्या वेळीही जसा

नवीन एपिसोड्स : : Every Tuesday

1

चाराण्याचं लव्ह बाराण्याचा लोच्या! - 1

" चार आण्याचं लव्ह .. बारा आण्याचा लोच्या..! "|| एक ||जगातल्या सगळ्या 'राज' लोकांचं 'सिमरन' मंडळींवर प्रेम असतं, तसं या राजचंही सिमरनवर प्रेम होतं. होतं म्हणजे काय ती त्याला इतकी आवडायची की.... खूपच! पण पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरेनुसार सिमरन काही केल्या या आमच्या राजला भाव देत नव्हती. मनात प्रेमाची भावना निर्माण होणे तर कोसो दूर! तरीही धाडसी, धडपड्या, प्रचंड चिकाटी असणारा आमचा संयमी आणि धैर्यवान राज... नाराज झालेला नव्हता. त्याला त्याच्या कर्तबगारी वर ठाम विश्वास होता. एक ना एक दिवस आपण सिमरनला आपल्या प्रेमात पाडूच याची त्याला खात्री होती. सात वेळा ग्रामपंचायत निवडणूकीत पडलेला राष्ट्रीय नेता आठव्या वेळीही जसा ...अजून वाचा

2

चाराण्याचं लव्ह बाराण्याचा लोच्या! - 2

" चार आण्याचं लव्ह, बारा आण्याचा लोच्या!" || भाग - दोन || राज आणि दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते. एकाच वर्गात शिकायचे. एकाच हॉस्टेलमध्ये एकाच रूममध्ये राहायचे. राज जितका अवखळ तितकाच राहूल शांत आणि संयमी होता. दोघांच्या वागण्यात, स्वभावात जमीन अस्मानाचा फरक असला तरी दोघांमधली मैत्री घनिष्ठ होती. राज थोडा वात्रट होता खरा पण तो अगदीच वालंटर नव्हता. म्हणूनच तर राज सिमरनच्या मागे लागलेला असल्याचं ठाऊक असूनही राहूल काहीच प्रतिक्रिया देत नव्हता. सिमरन राहूलची सख्खी धाकटी बहीण होती. " काय यार... आज पुन्हा एकदा तुझ्या बहिणीने थोबाड फोडलं माझं.. " कण्हत कुंथत राज राहूलला सांगू लागला. " त्यात नवीन काय ...अजून वाचा

3

चाराण्याचं लव्ह बाराण्याचा लोच्या! - 3

" चार आण्याचं लव्ह.. बारा आण्याचा लोच्या "|| भाग - तीन ||" लल्लू नहीं, लल्लन हैं... बडेही बदचल्लन हैं! अचकट विचकट हसत तो अंजलीच्या समोर येऊन उभा राहिला. लल्लन. युपी की बिहारच्या कुठल्यातरी गावगुंड लीडरचा हा वंशज. आजोबा पोटापाण्यासाठी महाराष्ट्रात आले. नाही नाही ते धंदे गेले. बापाच्या काळात जम बसला. आणि हे दिवटे तर 'दादा'च होऊन बसलेत. अंजलीच्या कॉलेज मध्ये तिच्याच वर्गात शिकत होता हा लल्लन. शिकणं म्हणजे काय... नुसतं नावालाच. दादागिरी करणे, पोरींची छेड काढणे, सिगारेटी फुंकत, बाईक डूरकावत उंडारणे हेच त्याचे मुख्य धंदे. खिशात बापजाद्यांचा पैसा अन् अंगात तारुण्याची मस्ती. परिणाम व्हायचा तोच झाला. मागेपुढे चार ...अजून वाचा

4

चाराण्याचं लव्ह बाराण्याचा लोच्या! - 4

चार आण्याचं लव्ह, बारा आण्याचा लोच्या || भाग - ४ ||" तुला काय गरज होती त्या नागाला डिवचण्याची? " चिडून बोलली. " मग काय करायला हवं होतं मी ? कुठवर सहन करायला हवा होता मानसिक छळ... आपण मुकाट्याने सहन करत राहतो म्हणून त्यांची हिंमत वाढत जाते... " अंजलीचं प्रत्युत्तर. " हो.. अगं पण थेट हात उचलायचा म्हणजे? "" मग काय पूजा करायला हवी होती का त्या मुर्खाची? "" आजपर्यंत गप्प राहून, दुर्लक्षच केलं होतंस ना तू... मग आज अचानक? "" अगं आजपर्यंत तो नुसता लांबून शिट्ट्या बिट्टया मारायचा. आज थेट हात धरला त्याने माझा... मी आजही दुर्लक्ष केलं असतं तर उद्या उचलून ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय