राजकुमारी अलबेली..

(18)
  • 83.9k
  • 1
  • 33k

एक शेतकरी असतो ..त्याला एक खूप सुंदर मुलगी असते.तिचं नाव त्याने ठेवलेले अलबेली.. अलबेली खूपच सुंदर फुलासारखी कोमल,निळ्या डोळ्यांची,गुलाबी ओठांची,नाजुकशी..एकदम परी सारखी..सर्वांना वाटायची ती खरंच परी आहे की काय ? खरंच ती शेतकऱ्याची मुलगी आहे अस कोणालाच वाटत नसे. शेतकरी तिच्यावर खूप प्रेम करी.तिची आई ती लहान असतानाच वारली त्यामुळे..शेतकरी एकटाच तिला सांभाळी..तिचे खूप लाड करी ..प्रेमाने तो तिला आलू म्हणे.. आलू फार प्रेमळ होती ..ती सर्वांशी खूप नम्र पणे वागे.. तिचा तिच्या बाबांवर फार जीव..आलू घरातली सर्व कामे करी..शेतकरी शेतात जाऊन काम करी ..बाजारातून आलू ला आवडणाऱ्या सर्व गोष्टी आणून देई.दोघे ही खुशीत जीवन जगत होते.

Full Novel

1

राजकुमारी अलबेली..भाग १

एक शेतकरी असतो ..त्याला एक खूप सुंदर मुलगी असते.तिचं नाव त्याने ठेवलेले अलबेली.. अलबेली खूपच सुंदर फुलासारखी कोमल,निळ्या ओठांची,नाजुकशी..एकदम परी सारखी..सर्वांना वाटायची ती खरंच परी आहे की काय ? खरंच ती शेतकऱ्याची मुलगी आहे अस कोणालाच वाटत नसे. शेतकरी तिच्यावर खूप प्रेम करी.तिची आई ती लहान असतानाच वारली त्यामुळे..शेतकरी एकटाच तिला सांभाळी..तिचे खूप लाड करी ..प्रेमाने तो तिला आलू म्हणे.. आलू फार प्रेमळ होती ..ती सर्वांशी खूप नम्र पणे वागे.. तिचा तिच्या बाबांवर फार जीव..आलू घरातली सर्व कामे करी..शेतकरी शेतात जाऊन काम करी ..बाजारातून आलू ला आवडणाऱ्या सर्व गोष्टी आणून देई.दोघे ही खुशीत जीवन जगत होते. आलू च घर ...अजून वाचा

2

राजकुमारी अलबेली .. भाग २

राजकुमार समतल..सर्व विद्यांमध्ये निपुण,कला प्रेमी,न्यायप्रिय,राजबिंडा..सर्व राजकुमारी त्याच्या सोबत लग्न करण्यासाठी आतुर असत..पणं राजकुमाराला कोणातच रस नव्हता ..कारण राजकुमार स्वप्न..राजकुमाराला स्वप्नात एक राजकुमारी दिसत असे..सुंदर.नाजुकशी..आपण विवाह केला तर फक्त तिच्या सोबतच करायचं अस राजकुमाराचे ठरले होते ..त्याने बऱ्याच राज्याच्या राजकुमारी ना पाहिलं होत ..पणं त्याची ती स्वप्नातली राजकुमारी त्याला कुठेच भेटत नव्हती ..त्याने आपल्या स्वप्नातल्या राजकुमारी एक सुंदर स चित्र तयार करून घेतलं.आणि ते घेऊन तो तिचा शोध घेण्यासाठी निघाला..थोडे सैनिक सोबत होते ..राजकुमार नको म्हणत असताना ही ..त्याच्या वडिलांनी त्याच्या सोबत ते सैन्य पाठवल होत ..एका जंगलातून जात असता..राजकुमार आणि सैनिक वाट चुकतात व ..राजकुमार एका दिशेने व सैनिक ...अजून वाचा

3

राजकुमारी अलबेली ... भाग ३ ( अंतिम भाग )

राजकुमार समतल जादूगारा च्या गुहे जवळ येऊन पोहचतो व साधू महाराज नी दिलेली पाणी अंगावर शिंपडतो त्या जादुई पाण्यामुळे सहज गुहेच्या आत मध्ये प्रवेश करतो ..आणि समोर च दृश्य पाहून चकित होतो..कोणाला ही वाटणार नाही ..की या गुहे पलीकडे एक सुंदर राजवाडा आहे ..त्या राजवाडया समोर एक सुंदर शी बाग ..नकळत राजकुमाराचे पाय त्या बागेच्या दिशेने वळतात..अनेक सुंदर सुंदर वेगवेगळ्या प्रकारची फुले त्या बागेत होती.त्या फुलांवर उडणारी इतकी सुंदर फुलपाखरे त्याने कधीच पहिली नव्हती.. निळी ,पिवळी,सोनेरी रंगाची..एका पेक्षा एक सुंदर..हिरवीगार झाडे..त्यावर ..वेगवेगळे पक्षी..फुलांनी फळा नी बहरलेली बाग .. निळे पांढरे मोर ते ही एकत्र नाचताना पाहून तर राजकुमाराचे भान ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय