Rajkumari Albeli - 3 - last part books and stories free download online pdf in Marathi

राजकुमारी अलबेली ... भाग ३ ( अंतिम भाग )

राजकुमार समतल जादूगारा च्या गुहे जवळ येऊन पोहचतो व साधू महाराज नी दिलेली पाणी अंगावर शिंपडतो त्या जादुई पाण्यामुळे तो सहज गुहेच्या आत मध्ये प्रवेश करतो ..आणि समोर च दृश्य पाहून चकित होतो..कोणाला ही वाटणार नाही ..की या गुहे पलीकडे एक सुंदर राजवाडा आहे ..त्या राजवाडया समोर एक सुंदर शी बाग ..नकळत राजकुमाराचे पाय त्या बागेच्या दिशेने वळतात..अनेक सुंदर सुंदर वेगवेगळ्या प्रकारची फुले त्या बागेत होती.त्या फुलांवर उडणारी इतकी सुंदर फुलपाखरे त्याने कधीच पहिली नव्हती.. निळी ,पिवळी,सोनेरी रंगाची..एका पेक्षा एक सुंदर..हिरवीगार झाडे..त्यावर ..वेगवेगळे पक्षी..फुलांनी फळा नी बहरलेली बाग .. निळे पांढरे मोर ते ही एकत्र नाचताना पाहून तर राजकुमाराचे भान हरपून गेले .. सर्व बागेत फिरत होता आणि समोरच मनोहर दृश्य पाहून थबकत होता..काय पहावे आणि काय नाही हे च त्याला कळत नव्हते.. जगलातले सारे सुंदर प्राणी त्या बागेत होते ..पणं सगळे जसे जादूच्या प्रभावा खाली ..सगळे आप आपल्यात व्यस्त ..कोणी कोणाला इजा करत नव्हते की .. कोणा कडे लक्ष देत नव्हते...राजकुमार समतल तर त्या बागेत इतका हरवून गेला होता की आपण इथे कशा साठी आलो आहोत याचा त्याला थोडा वेळ विसरच पडला होता.

फिरता फिरता त्याला बागेत एक सुंदर तळे दिसले तस त्याला साधू महाराज चे शब्द आठवले की तळ्यातल्या पाण्यात जादूगार बुडाला की त्याचं खरं रुप येईल व त्याची जादू कायमची बंद होईल..राजकुमाराला वाटलं हेच ते तळे असावे ..तो थोड खाली वाकला तळ्यात डोकावून पाहू लागला ..पणं ते तळे खूपच सुंदर होते .त्यात कमळाची सुंदर फुले डोलत होती ..रंगबेरंगी मासे पोहत होते ..तसा त्यातून एक मासा उसळी मारून वरती आला .. व राजकुमाराला म्हणाला ..राजकुमार तुम्ही विचार करता ते तळे हे नाही ..ते तर राजवाड्याच्या मध्य भागी आहे ..कृपा करून तुम्ही त्या जादू गाराची जादू चा प्रभाव नष्ट करा व आम्हाला ही मुक्त करा..राजकुमार त्या माशा ला काही विचारणार इतक्यात तो मासा पुन्हा तळ्यात दिसेनासा झाला.

राजकुमार समतल बागेतून बाहेर पडला व ..राजवाड्यात पोहचला ..तो आता अलबेली ला शोधू लागला.


राजकुमार समतल आलबेली ला राजवाड्यात शोधू लागतो ..तो जेव्हा पहिल्या दालनात प्रवेश करतो तेव्हा त्याला त्या दालनात अनेक प्रकारचे हिरे ,मोती,माणिक , पाचू,सोंन्याच्या मोहरा ,दागिने ,अस सर्वत्र पसरलेले दिसत..खरंच कसा आहे हा जादूगार जगातलं सगळं सुंदर याच्या कडे च आहे ..पणं तो इतका दुष्ट आहे त्याला त्याची शिक्षा मिळायलाच हवी.
राजकुमार पुढच्या दालनात जातो तर तिथे अनेक सुंदर सुंदर मुली असतात ..प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या राज्याची राजकुमारी..पणं सगळ्या बंदीवान ..राजकुमाराला त्यांची खूप दया येते तो त्यांना तिथून सोडवण्याच वचन देतो पणं त्या सर्व राजकुमारी न मध्ये त्याला आलबेली कुठेच दिसत नाही.
पुन्हा तो तिला शोधू लागतो ..तेव्हा ती त्याला दिसते ..एका पलांगवर बसलेली ..रडून रडून तिचे डोळे सुजलेले असतात.राजकुमार समतल तर आज पर्यंत तिला फक्त स्वप्नात पाहत आलेला असतो .त्याची स्वप्नं सुंदरी आज त्याच्या समोर असते ..तो तिला एक टक पाहत उभा असतो ..स्वप्नातल्या पेक्षा ही किती सुंदर दिसते .तो त्याच्या च विचारात असतो की आलू च लक्ष त्याच्या कडे जाते..आणि ती घाबरून बोलते ..कृपा करा मला माझ्या बाबांन कडे जायचं आहे ..मला जावू द्या ..तुमचा काही तरी गैरसमज झाला आहे ..मी राजकुमारी नाही..माझे बाबा शेतकरी आहेत ..मला जावू द्या ..अस बोलून ती पुन्हा रडू लागते..तिच्या बोलण्याने आणि रडण्याने राजकुमार भानावर येतो..तिच्या जवळ जात ..तो तिला समजावण्याचा प्रयत्न करू लागतो ..घाबरु नका राजकुमारी..मी तुम्हाला इथून सोडवण्या साठीच आलो आहे मला तुमचे महाराज चित्र सेन ने पाठवल आहे..मी राजकुमार समतल तुमच्या शेजारील राज्याचा राजकुमार आहे राजकुमाराचे बोलणे ऐकून आलू ला धीर येतो पण मी राजकुमारी नाही..आणि माझे बाबा शेतकरी आहेत अस ती त्याला सांगते तेव्हा राजकुमार आलू ला पूर्ण हकीगत कळते .

राजकुमार समतल तिला सांगतो की जादूगार खूप दुष्ट आहे आणि जर आपल्याला व येतील सर्वांना इथून बाहेर पडायचं असेल तर आलू ने ही त्याला मदत करायला हवी ..आलू राजकुमाराला मदत करण्याचं कबुल करते ..राजकुमार तिला सांगतो की तिने जादूगार सोबत लग्न करायला तयार होय चे पणं त्याला एक अट घालायची की राजवाड्याच्या मध्यभागी असलेल्या तळया जवळ च लग्न करायचं ..आलू त्याला तिथे काय आहे विचारते तेव्हा समतल तिला जादूगार चा जादू तिथे कसा नष्ट होतील हे सांगतो..आलू ही आता खुश होते.
तेवढयात जादूगार आलूच्या दालनात येतो आणि समतल पटकन एका खांबा आड लपून बसतो .
जादूगार ला पाहून आता आलू घाबरत नाही व रडत ही नाही ..आणि ती लग्नाला ही तयार होते ..आणि तिची अट ही सांगते ..जादूगार खूपच खुश होतो व तिची अट मान्य करतो. व तयारी साठी निघून जरी .गुहे मध्ये कोणी ही प्रवेश केला की जादूगार ला लगेच समजत असे पण समतल जवळ असलेल्या पाण्या मुळे ..जादूगार ला समतल राजवाड्यात आहे हे कळतच नाही..जादूगार आपल्याच विजयात खुश दंग असतो.

एक राजकुमारी आलू ला तयार होण्यासाठी साठी कपडे आणून देते ..सोनेरी रंगाचा एक मोठा ड्रेस सुंदर सुंदर दागिने एक हिऱ्यांचा मुकुट ..खूपच सुंदर दिसते आलू त्यामध्ये समतल तर तिला पाहतच राहतो ..आलू खूप लाजते समतल तिला असा पाहत आहे हे पाहून .

राजवाड्याच्या मध्य भागी असलेल्या तल्या शेजारी जादूगार ने सर्व तयारी केलेली असते ..आलू तिथे येते जादूगार खूपच खुश होतो..आपण जिंकल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत असतो आणि तो आपले रंगबेरंगी दात काढून हसत असतो..तेवढयात समतल तिथे येतो ..जादूगार जी असे अकटेच लग्न करणार का ? आलेल्या पाहुण्यांचे स्वागत नाही करणार का अस तो जादूगार ला बोलतो ..जादूगार ला कळतच नाही हा राजवाड्यात आला कसा आणि आपल्याला समजलं कसं नाही ? तो खूपच रागात येतो व त्याच्यावर आपल्या जादूने वार करतो तेवढयात समतल त्याच्या कमरेला असलेली ती सोनेरी तलवार काढतो व समोर धरतो त्या तलवारी पुढे जादूगार ची जादू चालत नाही हे पाहून जादूगार खूपच चिडून नव नवीन जादूने समतल ला कैद करण्याचा प्रयत्न करत असतो आणि समतल ही त्याची जादू दर वेळी नाकाम करत त्याला तल्याकडे आणण्याचा प्रयत्न करत असतो ..नेमका जादूगार त्या तल्या जवळ येतो आणि समतल च्या हातातली तलवार खाली पडते..आणि त्याच वेळी जादूगार आपली छडीने समतल वर वार करणार तितक्यात आलू त्याला जोराचा धक्का देऊन तळ्यात पाडते..जादूगार ला काही कळायच्या आतच तो तळ्यात पडतो तस जादूगार ची सरी जादू नष्ट होते ..राजवाडा जावून सर्वत्र खंडर दिसू लागत ..सारे पक्षी प्राणी स्वतंत्र झालेले असतात ..सगळ्या राजकुमारी आनंदाने फुलून गेल्या आता आपण आपल्या घरी जाणार इथून आपण मुक्त झालो म्हणून..सर्वजण आलू व राजकुमाराचे आभार मानतात.समतल व आलू जेव्हा तळया कडे पाहतात तेव्हा त्यातून एक जक्ख म्हातारा माणूस बाहेर येतो आणि तो सारखी आपली जादूची काठी आपटत असतो ..पणं त्या काठीने कोणतीच जादू होत नसते ..हे पाहून आलू व समतल खूप हसतात.
समतल आलू ला घेऊन चित्र सेनच्या राजवाड्यात येतो ..सर्वांना खूप आनंद होतो ..आलू ही आपल्या बाबा ना भेटून खूप आनंदी होते ..राजकुमार आलू ला लग्ना साठी मागणी घालतो ..आलू तर फार खुश होते राजा व शेतकरी ही खूप खुश होऊन त्यांचे लग्न लावून देतात .. व राजकुमार समतल आलू ला घेऊन त्याच्या राज्यात जातात.. वाटेत ते दोघे ही साधू महाराज ला भेटतात त्यांचा आशीर्वाद घेतात.समतल आज खूप खुश असतो त्याची स्वप्नं परी त्याला भेटलेली असते.समाप्त

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED