राजकुमारी अलबेली .. भाग २ vidya,s world द्वारा बाल कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

राजकुमारी अलबेली .. भाग २

राजकुमार समतल..सर्व विद्यांमध्ये निपुण,कला प्रेमी,न्यायप्रिय,राजबिंडा..सर्व राजकुमारी त्याच्या सोबत लग्न करण्यासाठी आतुर असत..पणं राजकुमाराला कोणातच रस नव्हता ..कारण राजकुमार स्वप्न..राजकुमाराला रोज स्वप्नात एक राजकुमारी दिसत असे..सुंदर.नाजुकशी..आपण विवाह केला तर फक्त तिच्या सोबतच करायचं अस राजकुमाराचे ठरले होते ..त्याने बऱ्याच राज्याच्या राजकुमारी ना पाहिलं होत ..पणं त्याची ती स्वप्नातली राजकुमारी त्याला कुठेच भेटत नव्हती ..त्याने आपल्या स्वप्नातल्या राजकुमारी एक सुंदर स चित्र तयार करून घेतलं.आणि ते घेऊन तो तिचा शोध घेण्यासाठी निघाला..थोडे सैनिक सोबत होते ..राजकुमार नको म्हणत असताना ही ..त्याच्या वडिलांनी त्याच्या सोबत ते सैन्य पाठवल होत ..एका जंगलातून जात असता..राजकुमार आणि सैनिक वाट चुकतात व ..राजकुमार एका दिशेने व सैनिक एका दिशेने जातात..राजकुमार बराच वेळ फिरून थकला होता..त्याने थोडा वेळ विश्राम केला ..आणि पुढील प्रवासाला निघाला .वाटेतच त्याला एक साधू दिसले ..त्याने त्यांना नमस्कार केला..साधूने राजकुमाराला चित्रसेन च्या राज्यात जायला सांगितलं..तिथे गेल्यावर तुझा शोध पूर्ण होईल अस सांगितल्या मुळे राजकुमार खुश झाला ..त्याने पुन्हा साधू ना नमस्कार केला व त्यांचे आभार मानून तो . चित्रसेन च्या राजवाड्याच्या दिशेने निघाला.
शेतकरी म्हणजेच चित्रसेन चा मित्र जेव्हा राजवाड्यात जावून परत आला त्याचं दिवशी ..जादूगार शन.. अलबेली ला जादू ने आपल्या सोबत घेऊन गेला.. व शेतकरी काहीच करू शकला नाही..तो धावतच पुन्हा चित्रसेन कडे गेला . व त्याला सर्व हकीगत सांगितली ..दोघे ही खुप विचार करू लागले की आलू ला जादुगरचा ताब्यातून कसे वाचवायचे ..जादूगार पुढे त्यांचे तर काहीच चालणार नव्हते.
तेव्हाच राजकुमार समतल तिथे येऊन पोहचतो.राजा आणि त्याच्या मित्राला दुखी पाहून तो त्यांना कारण विचारतो तेव्हा राजा त्याला सर्व हकीगत सांगतो ..राजकुमार त्यांना मदत करण्याचं वचन देतो .. चित्रसेन जेव्हा राजकुमार ला त्याच्या येण्याचं कारण विचारतो तेव्हा राजकुमार स्वप्नातल्या राजकुमारी च चित्र त्यांना दाखवतो .. व हकीगत सांगतो ..चित्र पाहून शेतकरी चकित होतो ..कारण ते चित्र अलबेलीच असत ..राजकुमाराला कळत की चित्रासेन ची जादूगार ने नेलेली मुलगीच आपली स्वप्नातली राजकुमारी आहे ..आणि आज वर ती आपल्या ला भेटली नाही कारण आपण तिला राजवाड्यात शोधत होतो पण ती तर शेतकऱ्या जवळ राहत होती ..झोपडी मध्ये ..आता त्याला कळत की साधू ने त्याला चित्रासैन कडे जायला का सांगितलं.
राजकुमार सर्वांचं निरोप व आशीर्वाद घेऊन राजकुमारी आलू ला वाचवण्या साठी निघतो.


राजकुमार समतल सर्वांचा निरोप व आशीर्वाद घेवून पुन्हा त्याचं जंगलाच्या दिशेने जातो जिथे त्याला साधू भेटलेला असतो .त्याला खात्री असते साधू महाराज आपल्याला मार्ग दाखवतील..तो साधू महाराज जवळ पोहचतो...साधू त्याला पाहून स्मित हास्य करतात ..जस त्यांना माहीतच असत की राजकुमार समतल येणारच ..राजकुमार त्यांना नमस्कार करतो ..त्यांना माझं मार्गदर्शन करावे अशी विनंती करतो.
साधू महाराज त्याला सांगतो की जादूगार शन खूप दुष्ट आहे ..त्याला युद्ध करून नाही तर बुद्धीने हरवायला हवं ..वाईट किती ही शक्ती शाली असल तरी विजय नेहमी चांगल्याचा च होतो.

साधू महाराज त्याला शन बद्दल माहिती सांगतो ..की तो एका मोठ्या गुहे मध्ये राहतो ..वरून गुहा दिसत असली तरी आत मध्ये एक मोठा राजवाडा आहे ..त्याच्या मधोमध एक सोनेरी तळ आहे ..तू जेव्हा जादूगार ला त्या तळ्यातल्या पाण्यात बुडवशिल..तेव्हा त्याचं खरं रूप पुन्हा येईल तो एक वृद्ध माणूस बनेल व त्याची जादू कायमच बंद होईल.त्याच्या जवळ असणारी जादू ची छडी काम करणार नाही...जादूगार खूप दुष्ट आहे..त्यामुळे तू असाच त्याचा सामना करू शकत नाहीस ..त्या साठी तुला जंगलाच्या मध्यभागी असलेल्या झाडा खाली पुरलेली एक तलवार आणावी लागेल ..ती एक जादुई तलवार आहे ..तलवारी पुढे जादूगार चा जादू चालणार नाही..राजकुमार समतल ..साधू चा निरोप घेऊन तलवार आणण्यासाठी जंगलाच्या मध्यभागी असलेल्या झाडाकडे जाण्यासाठी निघतो ..बरेच अंतर चालून चालून तो थकून जातो ..सोबत त्याच्या त्याचा घोडा ही नसतो ..तो थोडा वेळ तिथेच एका झाडाखाली विश्राम करतो..तो थोडा विश्राम करून पुन्हा चालू लागतो ..पणं कोणत झाड आणि कोणत्या झाडाखाली तलवार आहे हे मात्र त्याला कळत नाही ..तो सर्व बाजूंना शोध घेतो ..तिथे एक मोठं झाड असत ..त्याचं खोड खूप मोठं आणि जुन असत ..त्याच्या मुळ्या दोन्ही बाजूने वर आलेल्या असतात.. व एका बाजूच्या मुळी वर एक भला मोठा दगड असतो ..त्याला वाटत हेच झाड असेल ..तो दगड बाजूला सरण्याचा साठी खाली वाकतो की झाड बोलू लागते ..कोण आहेस तू ? इथे का आलास मला त्रास देय.. ला ..राजकुमार समतल प्रथम खूप घाबरतो पणं नंतर तो सर्व कहाणी झाडाला सांगतो व त्याला विनती करतो की त्याला ती तलवार घेऊ द्यावी..झाड त्याचे सर्व बोलणे ऐकुन घेते व ..त्याला तलवार देण्याचे कबुल करते पणं ..त्या आधी झाड त्याला प्रश्न विचारते .. जर तू माझ्या प्रश्नांची उत्तर माझं समाधान होईल अशी दिलास तर तू तलवार घेऊन जावू शकतो ..राजकुमार समतल झाडाचे म्हणणे ऐकतो.
झाड त्याला प्रश्न विचारते की जगात सर्वात जास्त ममता कोणा जवळ असते ? राजकुमार एका क्षणात उत्तर देतो .. माते जवळ.
झाड पुन्हा त्याला दुसरा प्रश्न विचारते ..जगात सर्वात वेगवान काय आहे ? ..समतल थोडा विचार करतो आणि उत्तर देतो की जगात सर्वात जास्त वेगवान माणसाचं मन आहे .
झाड पुन्हा त्याला प्रश्न विचारत की तिरस्काराचा अंत कशाने होतो ? ..राजकुमार पुन्हा विचार करत असतो ..आणि उत्तर देतो की प्रेमाने तिरस्कार चा अंत होतो.
झाड खुश होते आता शेवट चा प्रश्न म्हणून पुन्हा झाड राजकुमाराला प्रश्न विचारते...अस काय आहे हे आपल्याला मुळा पासून टोका पर्यंत उपयोग पडत ?
या प्रश्न ना ने राजकुमार समतल गोंधळतो ..तो विचार करू लागतो ..तो सर्वत्र पाहतो त्याला हिरवी गार झाडे दिसतात.मग तो झाडा ला त्याचं उत्तर देतो की ..झाडे ..झाडेच आपल्याला मुळा पासून टोकापर्यंत उपयोगी असतात ..त्याचं उत्तर ऐकून झाड खूप खुश होत ..ते राजकुमाराला तलवार नेण्याची परवानगी देत ..राजकुमार झाडा खाली असलेला दगड बाजूला करतो ..तिथे त्याला एक सोनेरी चमचमती तलवार दिसते तो ती उचलतो .. व खुश होवून ती तलवार घेवून साधू महाराज जवळ येतो .साधू महाराज राजकुमार समतल तलवार घेऊन आलेला पाहून खुश होतात .. व ..राजकुमाराला आपल्या जवळ असणारे जादुई पाणी देतात ते पाणी अंगावर शिंपडले की तू गुहेतून आत प्रवेश करशील व तुला कोणी पाहू शकणार नाही अस सांगतात.राजकुमार समतल साधू महाराज ला नमस्कार करतो व जादूगार शन च्या गुहे च्या दिशेने प्रवास सुरू करतो.

क्रमशः