तू ही रे माझा मितवा

(562)
  • 476.3k
  • 49
  • 227.1k

“इटर्निया बिजनेस सेंटर” नाव असलेले क्रोम प्लेटेड अक्षरे सकाळच्या कोवळ्या उन्हाने झळाळून निघाली होती. धावत पळत ‘ती’ तळमजल्याच्या लिफ्टजवळ आली. 3rd floor –“दि शोकेस मिडिया प्रा.लि.” ह्या नावावरून तिने हलकेच हात फिरवला, एक स्मित हास्य तिच्या चेहऱ्यावर पसरलं आणि तिने लिफ्ट कॉल केली,लिफ्टमधे शिरल्यावर जरा केस एकसारखे केले, लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर आल्यावर ती घाईघाईने शोकेस मिडियाच्या ऑफिसमध्ये गेली, रिसेप्शनला ऑफर लेटर दाखवून तिने जुजबी माहिती घेतली.रिसेप्शनिस्टने उजव्या बाजूला हात दाखवत एका बोर्डकडे इशारा करत म्हटलं-“ मॅम तुम्हाला ऑलरेडी उशीर झालाय, ह्या बाजूला कॉन्फरन्स रूम आहे आणि induction lecture ऑलरेडी सुरु झालंय, your senior Mr. Arush Jadhav is very strict about the

Full Novel

1

तू_ही_रे_माझा_मितवा... - 1

#भाग_१“इटर्निया बिजनेस सेंटर” नाव असलेले क्रोम प्लेटेड अक्षरे सकाळच्या कोवळ्या उन्हाने झळाळून निघाली होती. धावत पळत ‘ती’ तळमजल्याच्या आली. 3rd floor –“दि शोकेस मिडिया प्रा.लि.” ह्या नावावरून तिने हलकेच हात फिरवला, एक स्मित हास्य तिच्या चेहऱ्यावर पसरलं आणि तिने लिफ्ट कॉल केली,लिफ्टमधे शिरल्यावर जरा केस एकसारखे केले, लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर आल्यावर ती घाईघाईने शोकेस मिडियाच्या ऑफिसमध्ये गेली, रिसेप्शनला ऑफर लेटर दाखवून तिने जुजबी माहिती घेतली.रिसेप्शनिस्टने उजव्या बाजूला हात दाखवत एका बोर्डकडे इशारा करत म्हटलं-“ मॅम तुम्हाला ऑलरेडी उशीर झालाय, ह्या बाजूला कॉन्फरन्स रूम आहे आणि induction lecture ऑलरेडी सुरु झालंय, your senior Mr. Arush Jadhav is very strict about the ...अजून वाचा

2

तू_ही_रे_माझा_मितवा... - 2

#भाग_२रूमचा दरवाजा सरावाने धाडकन उघडत ऋतुजा आत आली आणि बेडवर पर्स फेकत ती तनुच्या गळ्यात पडली. तिच्या रुमी आणि प्रिया आवक होऊन एकमेकांकडे बघत होत्या.तिच्या डोक्यावरून हात फिरवत तनु म्हणाली-“ये ऋतू काय झालं? जॉबच्या पहिल्याच दिवशी अशी का वैतागली आहेस?”तिच्यापासून बाजूला होत बेडवर बसत वैतागून ती म्हणाली-“यार तने बघ ना पहिल्याच दिवशी एका अत्यंत खडूस,स्टुपिड,मूर्ख आणि बेअक्कल मुलाशी पंगा झाला..”तनु आणि प्रिया दोघीही तिच्या ह्या वाक्यावर हसल्या.तिच्या डोक्यावर टपली मारत प्रिया म्हणाली-‘ऋत्या आता कॉलेज संपल ..हे नवीन लाइफ आहे,प्रोफेशनल लाइफ..! पंगे घ्यायचे दिवस संपले आता. Be matured ...चल आता फ्रेश हो,मी मस्त कॉफी करते ...मग तुझं फर्स्ट डे पुराण ...अजून वाचा

3

तू_ही_रे_माझा_मितवा... - 3

#तू_ही_रे_माझा_मितवा...????#भाग_३आज तनु आणि प्रियाने कामानिमित्त रात्री उशिरा येण्याची परवानगी घेतली असल्याने ऋतू एकटीच होती रूमवर. फ्रेश ती बाल्कनीत कॉफी घेऊन बसली.रेवाच्या वाक्याने तिचं मन दुखावलं गेलं होतं,डोळे पाणावले होते. तनु आणि प्रिया कामात असल्याने त्यांना फोन करायचा प्रश्नच नव्हता. मनातलं सांगावं इतकं जवळ आतापर्यंत बाकी इतर मित्रमैत्रिणी असं कुणीच नव्हतं...रूममधली शांतता अंगावर येत होती. खालून फक्त काही लहान मुलांच्या खेळण्याचा आवाज शांततेवर ओरखडा पाडत होता, एरवी दंगामस्ती करत ही कातरवेळ कशी निघून जाते ते कळतही नसे पण आज जणू संध्याकाळ अंगावर येत होती. खोल खोल काहीतरी दुखावलं आहे आणि नेमकं सल काय आहे हे न कळल्याने अजूनच तिचे डोळे भरून येत ...अजून वाचा

4

तू_ही_रे_माझा_मितवा... - 4

ऋतूला रात्री उशिरा जाग आली,अजूनही थकवा जाणवत असला तरी ताप उतरल्यामुळे जरा हुशारी आली होती.तिची चाहूल लागताच शेजारी प्रिया आणि तनु लगेच उठल्या. तनुने तिला व्यवस्थितपणे भिंतीला टेकवून बसवलं, तिचं ब्लॅंकेट सारखं केलं.“You Ok?” तिच्या डोक्यावरून हात फिरवत प्रिया म्हणाली.मानेनेच होकार देत ती भिंतीला मागे टेकून बसली.“हे बघ आता आराम करायचा हं..दोन दिवस सुट्टी टाकायला सांगितली आहे डॉक्टर काकांनी.” तिला समजावणीच्या सुरात तनु म्हणाली.“दोन दिवस?..अजिबात गरज नाही.I am absolutely ok.आणि हो प्रिया, माझ्या घरी सांगितलं नाही ना? ते उगाच दोन दिवस तिकडे बोलावतील आणि मग पुन्हा लग्न,स्थळं,मुलं.. उगाचच कटकट,अबोला होता तेच ठीक होतं असं वाटतंय” ती वैतागत म्हणाली.“नाही ग ...अजून वाचा

5

तू_ही_रे_माझा_मितवा... - 5

लॅचचा जरासा आवाज झाला. अभय रुममध्ये आला तेव्हा अंधार होता.सवयीने त्याचा हात भिंतीवर चाचपडला आणि त्याने बटन दाबलं.प्रकाश तसं त्याने समोर पाहिलं रायटिंग टेबलवर डोकं ठेवून वेद झोपला होता.शेजारी लॅपटॉप आणि बियरच्या दोन रिकाम्या बॉटल.‘ ये रायटर..उठं’ त्याच्या खांद्याला धरून गदागदा हलवत अभय म्हणाला.“ये...भाव काय विषय आहे...हळू की जरा” डोळे उघडायचा प्रयत्न करत वेद म्हणाला.“साल्या दोन बॉटल उडवल्या तू? तुला माहितीय ना बियरसारखा छपरी आयटम पण चढतो तुला...कशाला रिस्क घेतो..काय आज एकदम ‘दारू पीके शायरी’ वैगरे मूड आहे का ?” फ्रेश होत अभय म्हणाला.“अभ्या...साल्या तुझी सेकंड शिफ्ट म्हणजे माझ्या डोक्याला त्रास असतो...मस्त झोपलो होतो..without any tension.. उठवायलाच हवं होतं का?” जडावलेल्या ...अजून वाचा

6

तू_ही_रे_माझा_मितवा... - 6

आजूबाजूला असणारं भान हरपायला भाग पडणारं वातावरण, समोर,अगदी समोर असणारा वेद,त्याच्या मागे असणारा खळाळत्या पडदा आणि मागच्या दगडाला पाठ टेकून उभी असलेली ती; आता मात्र कमालीची अस्वस्थ झाली होती. नकळत का होईना आपण वेदला आपल्या भावनांची जाणीव तर करून दिली नाही ना? ह्या विचाराने तिने त्याच्याकडे बघायचं टाळलं.ती बाजूने निघून जाण्याचा प्रयत्न करणार तसं वेदने दोन्ही हात तिच्या आजूबाजूने मागच्या भिंतीवर टेकवले, नजर अजून तिच्यावरच रोखलेली होती.तिला खरंतर वेदने असं काही करणं अगदीच अनपेक्षित होतं.तिने नाईलाजाने त्याच्या नजरेला नजर भिडवली.“हे बघ तू म्हणते तसं जर तू डिंपल कपाडिया बद्दल बोलत असशील तर मला काहीच प्रॉब्लेम नाही,पण जर प्रॉब्लेम माझ्या ...अजून वाचा

7

तू_ही_रे_माझा_मितवा... - 7

#भाग_७“खडूस!! नेहमीप्रमाणे लव्ह यु सोडून सगळं बोलला. जा! मी ही बोलणार नाही,पाहू कुणाचा नाईलाज होतो न कोण अगोदर बोलतं हिशोब मांडूया म्हणे.खडूसेस्ट व्यक्ती.” नाकावरचा लटका राग सांभाळत ती उठली आणि गाडीकडे निघाली.गाडी पुण्याच्या दिशेने निघाली. ऋतू वेद्च्या समांतर बाजूच्या खिडकीजवळ होती.वेद्शी नजरा नजर होणार नाही याची मुद्दाम काळजी घेत ती हेडफोन कानात टाकून बाहेर बघत होती.जरावेळाने तिने डोळे मिटले. मिटलेल्या पापण्यांच्या आड सुद्धा वेद होता! एक गोड हसू ओठांवर तरळलं.धबधब्याजवळचे ते अलवार क्षण, चंद्राच्या,समुद्राच्या गप्पात भिजलेले क्षण आणि डोळ्यांवर हळुवार टेकलेले त्याचे ओठ,हे सगळं एखाद्या गोड स्वप्नासारखं मनात विरघळत होतं.”हे दोन दिवस कुठेतरी लपवून,ठेवावे अगदी त्या खडूसपासून सुद्धा!”स्वतःला बजावत होती.विचारांच्या ...अजून वाचा

8

तू_ही_रे_माझा_मितवा... - 8

#तू_ही_रे_माझा_मितवा...????#भाग_८“ऋत्या हे स्वतःवर उपकार केल्यासारखं काय एवढंस जेवलीस गं आणि हजारवेळा फोन चेक केलास तरी काही बदल होणार आता, तो तुझा मेसेज ही वाचणार नाही की स्वतःहून तुला फोन करणार नाही,त्यापेक्षा तू झोप बरं!” प्रिया ऋतूची अस्वस्थता जाणून होती.“प्रियु अजूनही फोन बंद येतोय गं,खूप काळजी वाटतेय.” रडवेली होत ती म्हणाली.“नको काळजी करू उद्या त्याला सरळ सॉरी म्हण आणि काही प्लॅन नको करायला आता, वाट पाहूया,तो जेव्हा बोलेले तेव्हा.” तनुसुद्धा तिला सल्ला देऊन आपण चूक केली ह्या विचारात होती.“झोपा तुम्ही दोघीही,मी जरावेळ गॅलरीत बसते,बघते फोन लागतो का ते.”ऋतू तिच्या आवडत्या खुर्चीवर विसावली.समोर वाऱ्याने हळुवार हलणाऱ्या गुलबक्षीच्या फुलांकडे बघून तिच्या डोळ्यात ...अजून वाचा

9

तू_ही_रे_माझा_मितवा... - 9

#तू_ही_रे_माझा_मितवा...????#भाग_९“हेलो,तनु sorry त्रास देतोय थोडा, ऋतू उठलीय का? फोन घेत नाहीये आणि मेसेजला रिप्लाय पण नाहीये..” खरंतर वेद घाईगडबडीच्या प्रवासाने आणि जागरणाने पार थकून गेला होता पण विकेंडमुळे सगळं निवांत होतं,तो जरा उशिराच उठला होता,त्यात ऋतू फोन उचलत नाहीये म्हणून त्याने तनुला फोन केला.“अरे,हो ते काय झालं सकाळीच तिच्या घरून फोन आलेला,लागलीच निघून ये म्हणून,मग ती गेली इंदापूरला,एव्हाना पोहोचली असेल.काहीतरी प्रॉब्लेम आहे एवढच म्हणाली.”“प्रॉब्लेम? काय..? तुला तर माहिती असेलच ना?” मनात काहीबाही शंका यायला लागल्याने तो जरा गोंधळला.“अरे म्हणजे खात्रीने नाही सांगू शकत काय ते,खरतरं ती घरच्यांबद्दल जास्त बोलत नाही. घरचे प्रॉब्लेम शेयर करायला नाही आवडत तिला.ती आल्यावर तिलाच विचार. ...अजून वाचा

10

तू_ही_रे_माझा_मितवा... - 10

#तू_ही_रे_माझा_मितवा...????#भाग_१०“वेद,तू असाच मूर्खपणा करणार असशील तर मी ठेऊ का फोन?” ती लटक्या रागाने म्हणाली.“फोन ठेवायचा विषयच नाही,रात्रभर फोन नाहीये तू आज,बोलत रहायचंय” तिचा हा नेहमीचा अधिकारवाणीचा स्वर त्याला खूप प्रिय होता,कुठलीही आर्जवे नाही,नेहमी आवाजात हुकुमत आणि ह्याच तिच्या मनस्वी रूपाने त्याला प्रेमात पाडलं होतं.“अजिबात नाही, आज एका दिवसात खूप मानसिक चढ उतार झालेत,डोळे आपोआप मिटतायेत माझे” ती चटकन बोलून गेली.“ये वेडाबाई मग अगोदर सांगायचं ना,ओके ठीक आहे.झोप तू आता.आपण असंही उद्या भेटणार आहोत ना रात्री.” “उद्या कसं काय?मला यायला उशीर होईल वेद.”“होऊ दे,मी वाट बघेन.”“अजिबात नाही हा वेद,ऑफिसला उशीर होतो रे.”“ये यार अस नाही.”तो चिडक्या स्वरात म्हणाला.“वेद तुला ऐकावं लागेल आणि ...अजून वाचा

11

तू ही रे माझा मितवा - 11

#तू_ही_रे_माझा_मितवा...???? #भाग_११आज ऑफिसमधून येऊन वेदला थोडाच वेळ झाला होता तेवढ्यात ऋतूचा फोन आला.“वेद,एक मदत हवी होती.” “बोल ना”“एक माहिती हवी होती,अभय C&S मध्ये आहे ना जॉबला?मला असं तू बोललेलं आठवतंय”“हो, मी मागे म्हटलं होतं की तुला.का ग?”“अरे रीमाताईने इंटरव्ह्यू दिला होता C&S मध्ये for Quality Control section ,उद्या बोलावलं आहे final discussion साठी, कंपनी विषयी थोडी माहिती हवी होती,means कंपनीचं वातावरण,ऑफर ह्यायला हवी की नाही थोडं guidance sort of you know.कंपनी पिरंगुटला आहे म्हणून थोडी काळजी वाटतेय,तिचं घर खराडीला आहे,relocate करायचं म्हणजे sure असायला हवं ना. ”“ohh ठीक आहे,नो ...अजून वाचा

12

तू ही रे माझा मितवा - 12

#तू_ही_रे_माझा_मितवा ????#भाग_12#VidaMar रिसॉर्ट ” ह्या प्रायव्हेट बिच प्रॉपर्टी समोर गाडी थांबली. एकच गलका करत सगळे बाहेर आहे.दोघे तिघे पहिल्यांदाच गोव्याला आल्याने अगदीच हरखून गेले होते.खुश होते. बागा आणि कलंगुटच्या मध्ये कुठेतरी असणारी प्रशस्त प्रॉपर्टी.समोर तीनचार टप्प्यात असलेली विस्तीर्ण बाग, पुढे लांबच लांब पसरलेला पांढऱ्या शुभ्र वाळूचा किनारा,शाळकरी पोरांच्या शिस्तीने ओळीत मांडलेल्या shack, थोडं बाजूला पाच ते सहा वेताचे अँटिक टेबल आणि सोफा आणि निळाशार अथांग सागर..शांतता असल्याने समुद्राची गाज हलकीशी का असेना पण ऐकू येत होती. प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्याने अगदी तुरळक लोक तिथे होते.“वेलकम टू VidaMar” गोरा रंग,बरगंडी कलर केलेल्या केसांचा छोटा बन,उजव्या भुवईवर असलेल पिअरसिंग,छोट्या चणीच्या एका मुलाने हसत सगळ्याचं स्वागत ...अजून वाचा

13

तू ही रे माझा मितवा - 13

#तू_ही_रे_माझा_मितवा ?????#भाग_13गोवा म्हणजे फ्रीडम,गोवा म्हणजे सुशेगात भटकंती आणि गोवा म्हणजे रोजच्या धकाधकीच्या आयुष्याला दिलेलं एक रॉ कीस..!सगळ्यांसाठी गोव्यातला दिवस देखील स्कूटीवरून मनमुराद भटकून,पबमध्ये थिरकून मजा मस्ती करण्यात गेला.नाश्ता आणि जेवायच्या वेळेला रेवाने ऋतुजाच्या लक्षात येईल बरोबर अश्या पद्धतीने वेदला काय खायचं,काय नाही ह्याबद्दल वॉर्न केलं.ऋतूने ह्यावेळी दुर्लक्ष केलं तिला ह्या रंगीत वातावरणात काहीही किल्मिष नको होती.रात्र झाली तशी क्लोजग्रुपमध्ये असणाऱ्यांनी त्यांचे वेगवेगळे प्लान्स बनवले होते. जरा फ्रेश होऊन,चेंजकरून सगळे हॉटेलच्या रेस्ट्रोबारमध्ये भेटणार होते.ऋतू आणि सौम्यादेखील त्यांच्या रुममध्ये आल्या. शॉवर घेऊन ऋतू अगदी फ्रेश झाली होती.हेयर ड्रायरने केस वाळवत असताना कालची संध्याकाळ आठवून तिच्या ओठंवर हसू उमललं.सौम्याच्या नजरेतून ते सुटलं ...अजून वाचा

14

तू ही रे माझा मितवा - 14

#तू_ही_रे_माझा_मितवा...#भाग_१४“#कबीर?” तिने गोंधळून विचारलं आणि झटक्यात पेपर स्प्रे काढला आणि दुसऱ्या हाताने घाईगडबडीत मोबाईल स्वीचऑन केला.“Hey Chill..!! Come Wait..! Listen..!!” तो अगदी शांतपणे तिला समजवायचा प्रयत्न करत म्हणाला आणि तिच्या हातातील पेपर स्प्रे बघत त्याने सावध पवित्रा घेतला.तसा तो अजिबात घाबरला नव्हता,त्याला त्या परिस्थितीत तिने घेतलेल्या ह्या सावधानतेचं कौतुकच वाटलं. आत्ता समुद्रातून सचैल न्हाऊन एखादी सुंदर जलपरी समोर उभी आहे असा त्याला भास झाला,दृष्ट लागण्यासारखी ती सुंदर दिसत होती. “तिथेच थांब...पुढे येऊ नको हा” तिने त्याच्या दिशेने तो स्प्रे पकडला. ती सावध होती पण त्याच्या वागण्यात तिला एक आश्वासकपणा ही जाणवत होता.“अरे...कमाल आहे, ऐक तर...! see my card at least..”त्याने वालेटमधून ...अजून वाचा

15

तू ही रे माझा मितवा - 15

#तू_ही_रे_माझा_मितवा...#भाग_१५झपझप पावलं टाकत ऋतू रेवाच्या रूमकडे निघाली,निरव शांततेत पावलांची चाहूल लागून रेवा सावरली,बेडवर वेदच्या शेजारी बसत त्याला तिने फक्त पलीकडच्या कुशीवर वळवण्याचा प्रयत्न केला. ऋतुजा आत आली तेव्हा ती त्याच्यापासून वेगळी होत होती. ऋतुजाला पाहून तिने उगाच तिच्या स्पेगटीचा बेल्ट ठीक केला. ऋतू तिच्यासमोर उभी होती,तिच्या नजरेत प्रचंड राग होता.रेवाने ऋतूकडे बघितलं,एक स्त्रीसुलभ असूया तिला तिच्या रुपाकडे बघून वाटली.‘वेद भानावर असता आणि यांचं असं खाजगीत भेटणं झालं असतं तर वेदची नजर क्षणभरही हिच्यावरून ढळली नसती..कदाचित त्याचा स्वतःवर ताबा ही राहिला नसता..ही इतकी सुंदर दिसतेय’ तिच्या मनात काट्यासारख्या खुपणाऱ्या ह्या विचारला तिने लागलीच दूर केलं.“रेवा...तू मूर्ख तर आहेसच पण तुझा आणि त्या जोकर साक्षातचा नीचपणा ...अजून वाचा

16

तू ही रे माझा मितवा - 16

“आत्ता?..आत्ताच बोलायचंय..? ओके चल बोल..मी चुकलोय मला शिक्षा हवीच...बोल.”“ वेद मला तुला हर्ट नाही करायचंय पण काही बोलणं फार गरजेचं आहे.” “ऐकतोय...” त्याच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती.“वेद मला पूर्ण कल्पना आहे की रेवा आणि जय तुझे खास फ्रेंड्स आहेत पण त्यांना मी नकोय तुझ्या आयुष्यात.रेवाला वाटतंय की तुझं माझ्याप्रती प्रेम निव्वळ आकर्षण आहे आणि तिचं तुझ्यावर प्रेम आहे ते मिळवण्यासाठी जय काहीही मूर्खपणा करत असतो.I am just fed up by all this.त्यांना आपल्या नात्याची intensity कळत नाहीये रे. वेद हा माझा हट्ट समज,अट समज, बालीशपणा समज की अजून काही..आता तुझ्या आयुष्यात एकतर त्या दोघांशी तुझी मैत्री कायम असेल किंवा ...अजून वाचा

17

तू ही रे माझा मितवा - 17

#तू_ही_रे_माझा_मितवा ???#भाग_१७"सॅम वेदला कुठे बघितलं का,फोन उचलत नाहीये तो ?” ती तिच्या bags घेऊन रिसेप्शनला आली.“अरे त्या रेवाला घेऊन माझ्या फमिली डॉक्टरकडे गेलो होतो.वेद ही तिथेच आहे.डॉक म्हणाले की एकदम ओके आहे पण तीच म्हणतेय ठीक वाटत नाहीये,विकनेस वाटतोय.मग ते दोघे थांबलेय.मे बी ड्रीप लावणार असतील.I don’t know. पण ह्या bag घेऊन तू कुठे निघालीस.?”“ मी पुण्याला परत जातेय,मला आता काही formality कराव्या लागतील का?”“नाही,जय आणि वेद बघतील काय ते जातांना, पण तू का जातेय,आवडलं नाही का रिसोर्ट?”“रिसोर्ट खूप भारी आहे,in-fact मी सोशल मिडीयावर रेकमेंडसुद्धा करेन, मला आता फक्त without any reason घरी जावसं वाटतंय.”“ओके पण जाणार कशी?”“एका फ्रेंडची ...अजून वाचा

18

तू ही रे माझा मितवा - 18

#तू_ही_रे_माझा_मितवा ???#भाग_१८"आणि तूला काय आवडतं आयुष्यात?” तिचाच प्रश्न त्याने तिला परत केला.“मी माझ्या कामात अगदी परफेक्ट असते,शेंडेफळ असल्याने आणि ताईच्या लाडाने बिघडलेली,मनाला येईल तसं वागते. लोकं म्हणतात बालिश आहे..असेलही,who cares,सतत experimental रहायला ,movie, party असं मस्त एन्जॉय करायला आवडतं,fashion ,मेकअप अजून सांगू गुलबक्षीचे फुलं,कवेत मावणार नाही एवढी स्वप्न आणि चंद्र,चांदण्या बघत केलेली एखादी dream नाईट आउट,चंद्राच्या प्रेमात वेडी आहे आणि आता वेद भेटल्यापासून दिवस रात्र वेद आणि वेद...That’s me !!” बोलतांना वेद्चा विषय आल्यावर ती एकदम थांबली. “Interesting yaar आणि वेद कसायं?” त्याने तोच धागा पकडला.“वेदबद्दल काय सांगू? तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर chapter आहे,काळजाचा बुकमार्क करून ठेवावा असा chapter.हसला ...अजून वाचा

19

तू ही रे माझा मितवा - 19

#तू_ही_रे_माझा_मितवा#भाग_19कधी हिरवीपिवळी माळरानं,कधी सिमेंटचं जंगल,कधी वाहनांच्या गराड्यात तर कुठे मोकळा रस्ता,कधी ट्राफिक जॅमचा वैताग, घड्याळाचे काटे पुढे सरकत होते,रस्ता पडत होता.उन्हं कलायला सुरुवात झाली होती.“तुझी हरकत नसेल तर एक काम करायचं होतं?” कबीर म्हणाला.“काय?” “पुढे अर्धा तासावर सयगाव आहे ना तिथे मावशीचं फार्महाउस आहे, काही समान ठेवायचंय actually जातांनाच ठेवायचं होतं पण तेव्हा कंटाळा केला ,if you permit.जास्त वेळ लागणार नाही प्रॉमिस.” “ माझी परमिशन का घेतोय? गाडी तुझी,लिफ्ट तू मला दिलीय, as you wish..” “अरे एकदम मस्त फार्महाऊस आहे आणि तिथला केयर टेकर ‘टिकटॉक’ त्याने बनवलेला चहा म्हणजे एकदम भन्नाट! फ्रेश होऊ,चहा घेऊ आणि लगेच निघू.” “टिकटॉक? असंही नाव असतं?” तिला हसू ...अजून वाचा

20

तू ही रे माझा मितवा - 20

#तू_ही_रे_माझा_मितवा#भाग_२०औंधच्या एका टुमदार बंगल्यासमोर गाडी थांबली.कबीरच्या गाडीचा आवाज ऐकून वॉचमनने गेट उघडलं.त्याने गाडी आत लावली.डीक्कीतून bag काढली आणि ऋतुजाने केलेलं सीट व्यवस्थित लावत असतांना त्याचं लक्ष खाली legmatवर पडलेल्या एका वस्तूकडे गेलं.ऋतुजाचं अँकलेट होतं.त्याच्या चेहऱ्यावर हलकसं स्माईल पसरलं त्याने ते खिशात टाकलं आणि तो पुढे जाणार तोच वॉचमन म्हणाला –“कबीर भाऊ ही bag खाली पडली होती.” त्याच्या हातात एक हार्टशेप छोटी गुलाबी bag होती. “ माझीच आहे.” त्याने ती ओढून घेतली. त्या गुलाबी bagकडे पाहून वॉचमनने पुन्हा कबीरकडे पाहिलं. अपेक्षेप्रमाणे आई बाबा झोपले होते,कबीर तडक रुममध्ये गेला. शॉवर घेऊन बेडवर पडेपर्यंत त्या क्षणाची हजारवर आवर्तनं त्याच्या मनात चालू होती आणि स्वतःचा रागही येत ...अजून वाचा

21

तू ही रे माझा मितवा - 21

#तू_ही_रे_माझा_मितवा... #भाग_२१तिने तिरमिरीत वेद्चा नंबर डायल पण वैतागून लगेच कट केला.“काय विचारू त्याला? तुझ्या रूमवरून माझ्यापर्यंत पोहचलेले हे पेजेस कसले? आपल्यात जे कधी झालं नाही ते का आहे त्यात?” विचार करून ती वैतागली. “मे बी त्याच्या त्या रिसोर्टच्या प्रोजेक्टचा पुढचं स्क्रिप्ट असेल काही किंवा तो आता काम करत असलेला प्रोजेक्टचा भाग असेल किंवा त्याच्या डायरीची पानं असतील निशांत नावाने लिहित असेल,मे बी ...stop it yaar मी काय काय विचार करतेय..आणि ही सोनाली म्हणजे मीच ना? काल अभय पण सोनाली असंच म्हणाला,वेद काही लपवतोय का? आणि तू ? तू पण कबीरसोबत आलीस ते लपवलंच आहे ना त्याच्यापासून? ...अजून वाचा

22

तू ही रे माझा मितवा - 22

Shallow people demand variety-but I have been writing the same story through out my life, every time trying to nearer the aching nerve.-----Strindberg। {पिंगळावेळ जी.ए.कुलकर्णी}#तू_ही_रे_माझा_मितवा... #भाग_२२ (#कबीर) कबीर निघून गेला आणि जातांना ऋतूला अगदी सैरभैर करून गेला. जड पावलांनी ती वर आली स्वतःचं काहीतरी हरवून आल्यासारखी,विझल्यासारखी झाली होती. ‘आज पुन्हा हिचं काहीतरी बिनसलंय’ तनु हळूच प्रियाला म्हणाली. जेवतांना आज दंगामस्ती,गाणी ,चिडवण काहीच नव्हतं. त्या शांततेत एकमेकांना वस्तू पास करत होत्या. जेवण आटोपल्यावर त्यांनी आपापली कामं देखील अगदी निमुटपणे आवरली कुठेही नेहमीसारखा आरडाओरडा नाही. “प्रियु tab कबीरच्या गाडीत ...अजून वाचा

23

तू ही रे माझा मितवा - 23

#तू_ही_रे_माझा_मितवा... . (#वेद)“ऋतू फक्त पाचच मिनिट, शॉवर घेतो & कॉफी मी बनवतो आज.तू बस जरा” त्याने bag ठेवली आणि बाथरूमकडे गेला. ती हॉलमध्येच बसून होती. आतून कडी सरकवल्याचा आवाज आला.पाठोपाठ त्याने आवाज दिला.-“ऋतू...तेवढा laptop चार्गिंगला लाव ना.”“ओके..” त्याची bag समोरच टेबलावर होती. तिने चार्जर, laptop काढला, तो काढतांना अनावधानाने त्याची डायरी खाली पडली. तिने ती उचलली. ज्या पानावर ती डायरी उघडली होती तिथे सुंदर चारोळी होती ...तिच्या चेहऱ्यावर गोड स्माईल पसरलं. उत्सुकता म्हणून तिला ज्यादिवशी त्याने पहिल्यांदा पाहिलं तो जॉबचा पहिला दिवस, त्याने गोव्याला सांगितल्याप्रमाणे “cafune” शब्द, त्याच्या फिलिंग्ज वाचावं असं तिला उगाचच वाटलं ....हे ...अजून वाचा

24

तू ही रे माझा मितवा - 24

#तू_ही_रे_माझा_मितवा... #भाग_२४ (#ऋतू)“वेद आजच्या भेटीचं कारण फक्त तू लिहलेलं मितवा काय आहे हे जाणून घेणं एवढंच नाहीये तर मला एका अनोळखी वाटेवर भेटलेल्या मितवाविषयी...rather एका ‘सहेलाविषयी तुला सांगायचं आहे.”“तुला भेटलेला मितवा? I am not getting it,केव्हा? कुठे?” जेवढा धक्का त्याला ऋतूच्या हातात मितवाचे कागद बघून लागला नाही त्याच्या जणू चौपट धक्का ‘कुणी मितवा’ तिला भेटला ह्या विचाराने लागला.“खरतरं तुझ्या ह्या गोष्टीला..माफ कर आपल्या ह्या तू लिहलेल्या लव्हस्टोरीला तू ‘मितवा’ का नाव दिलं मला माहित नाहीत नाही, मला हे ही माहित नाही की तू मितवाची काय व्याख्या केली पण माझ्यासाठी ...अजून वाचा

25

तू ही रे माझा मितवा - 25

#तू_ही_रे_माझा_मितवा... #भाग_२५ {This a work of fiction. Names, characters, businesses, places, events, locales, and incidents are either the products of the author’s imagination or used in a fictitious manner. Any resemblance to actual persons, living or dead, or actual events is purely coincidental.}कोण बरोबर कोण जास्त बरोबर ...!फक्त प्रश्नचिन्ह!ह्या प्रश्नचिन्हाला थोडाही आवाज असता तर तो झाडावरून अलगद पडणाऱ्या फुलाच्या वेदनेचाच असता, इतकी नाजूक वेदना दोन्ही काळजात होती. कोण बरोबर? कोण जास्त बरोबर? त्याचे ही डोळे भरून आले होते,त्याने सावरलं. ती अजूनही रडत होती पण आज तो तिला अगदी सहज,प्रेमाने “stop crying”म्हणू शकत नव्हता,पण तिचं असं कोलमडून ...अजून वाचा

26

तू ही रे माझा मितवा - 26

#तू_ही_रे_माझा_मितवा... #भाग_२६{This is work of fiction. Names, characters, businesses, places, events, locales, and incidents are either the products of the author’s imagination or used in a fictitious manner. Any resemblance to actual persons, living or dead, or actual events is purely coincidental.}“बाळा,तुला सवय नाहीये मुंबईच्या fast लाईफची,पुन्हा विचार कर,सोडून दे हा प्रोजेक्ट,आहे ते काम ठीक आहे ”प्रोजेक्टसाठी तिचं सिलेक्शन झालं होतं आणि त्यासाठी सहा महिने मुंबईला राहणं भाग होतं.आईच्या बोलण्यातली काळजी तिला जाणवत होती, कळून येत होती.“नको काळजी करू राहील ती व्यवस्थित,she is strong girl,हो ना बेटा?” बाबादेखील स्वतःलाच दिलासा देत असल्यासारखे बोलले.“आई ...अजून वाचा

27

तू ही रे माझा मितवा - 27

#तू_ही_रे_माझा_मितवा... #भाग_27{This is work of fiction. Names, characters, businesses, places, events, locales, and incidents are either the products of the author’s imagination or used in a fictitious manner. Any resemblance to actual persons, living or dead, or actual events is purely coincidental.} नवीन कामाचा पहिला दिवस!आज बऱ्याच दिवसांनी पुन्हा काहीतरी हटके काम करायची नवी उमेद तिच्यात जागत होती.तिला आवडणारा सॉलिड टीलकलरचा फॉर्मल पेन्सिल वनपीस तिला खुलून दिसत तर होताच पण चेहऱ्यावर झळकणारा आत्मविश्वाससुद्धा तिच्या अटायरचाच भाग झाला होता. दाट केसांची ट्विसटेड पोनीटेल आणि जरासा मेकअप आणि डोळ्यातलं काजळ.आरश्यात स्वतःला पाहून तिने आनंदात डोळे मिचकावले ...अजून वाचा

28

तू ही रे माझा मितवा - 28

#तू_ही_रे_माझा_मितवा... #भाग_28 {This is a of fiction. Names, characters, businesses, places, events, locales, and incidents are either the products of the author’s imagination or used in a fictitious manner. Any resemblance to actual persons, living or dead, or actual events is purely coincidental.}“वेद किती दिवस झाले ऋतूला मुंबईला जाऊन पण तू एकदाही तिला फोन केला नाहीये.ती ठीक नाहीये वेद. खरंच तू सगळं संपवलंय तुझ्या बाजूने?”ऋतूचा विषय वेदने बंदच केल्यासारखा होता पण अभयला ही घुसमट सहन होत नव्हती. “अभय तुला जरा जास्त माहिती असते तिच्याविषयी असं नाही वाटत तुला? अरे हो, होणारा जीजू आहेस ना तिचा, सो ...अजून वाचा

29

तू ही रे माझा मितवा - 29

#तू_ही_रे_माझा_मितवा... #भाग_२९ {This is a work of Names, characters, businesses, places, events, locales, and incidents are either the products of the author’s imagination or used in a fictitious manner. Any resemblance to actual persons, living or dead, or actual events is purely coincidental.}रिशीला पहिला ड्राफ्ट सबमिट करतांना,ऋतूला प्रचंड टेन्शन आलं होतं.तिने ऑफिसला आल्यावर सगळ्यात अगोदर,भीतभीतच त्याच्या हातात तो रिपोर्ट दिला. त्याने तो ठेवून घेतला आणि लंचब्रेकनंतर डिस्कस करायला बोलावलं. लंचब्रेकपर्यंत तिच्या मनाची घालमेल चालू होती. ब्रेकनंतर दोन तास झाले तरी त्याने तिला डिस्कशनसाठी बोलवलं नाही म्हणून ती स्वतः त्याच्याकडे गेली. सर,मॅडम बोलायचा इथे प्रघात नसल्याने तिला सिनियरला सरळ ...अजून वाचा

30

तू ही रे माझा मितवा - 30

#तू_ही_रे_माझा_मितवा... #भाग_३०{This is work of fiction. Names, characters, businesses, places, events, locales, and incidents are either the products of the author’s imagination or used in a fictitious manner. Any resemblance to actual persons, living or dead, or actual events is purely coincidental.}मरीन ड्राईव्हचं जिवंत वातावरण,संध्याकाळ,ट्राफिकच्या आवाजात मिसळू पाहणारी समुद्राची गाज.बराच वेळ ती काहीच बोलली नाही.मग अथांग पसरलेल्या समुद्रावरून जराही नजर न वळवता ती म्हणाली-“त्याला समुद्र खूप आवडतो,समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर जीव ओवाळून टाकायला येतात असं तो म्हणायचा.’cafune’,त्याचा आवडता शब्द,तुझ्या हातावरच्या मेहंदीची ग्यारेंटी देतो पण लिपस्टिकची नाही असं बिनधास्त बोलायचा...त्याच्या गालावरच्या डिंपलने मला एका गोड ...अजून वाचा

31

तू ही रे माझा मितवा - 31

#तू_ही_रे_माझा_मितवा... #भाग_३१{This is work of fiction. Names, characters, businesses, places, events, locales, and incidents are either the products of the author’s imagination or used in a fictitious manner. Any resemblance to actual persons, living or dead, or actual events is purely coincidental.} रीमा तिच्या त्या लेटर्समध्ये गुंतून गेली .तिला खरंच वाटत नव्हतं तिची हट्टी, वेडी ऋतू इतका सॉरटेड विचार केव्हापासून करायला लागली ते?उत्सुकतेने तिने पुढे वाचायला सुरुवात केली-Date/day-- तुला मिस करतेय त्यातला random कुठलाही.कबीर,आज स्टोरीबोर्ड बनवतांना मला एक कॉन्सेप्ट अडला -‘twilight mind’. रिशीला त्याचा अपेक्षित असलेला अर्थ विचारला,तर त्याने खूप सोप्या शब्दांत समजावलं-'एखादवेळी मनाची अशी ...अजून वाचा

32

तू ही रे माझा मितवा - 32

#तू_ही_रे_माझा_मितवा... #भाग_३२{This is work of fiction. Names, characters, businesses, places, events, locales, and incidents are either the products of the author’s imagination or used in a fictitious manner. Any resemblance to actual persons, living or dead, or actual events is purely coincidental.}रीमाने मोबाईल बाजूला ठेवला. तिला अगदी गहिवरून आलं.मोनाच्या खांद्यावर डोकं ठेवून कितीतरी वेळ ती रडत राहिली.जरावेळाने स्वतःला सावरत ती शांत झाली.“ताई,प्लीज आपण कबीरला contact करूया का? एका दिवसात त्याचा सगळा ठावठिकाणा काढते बघ.शेवटचे दोन विक राहिलेय त्यात लास्ट विक पूर्ण प्रोजेक्ट साईटवर जाणार आहे आणि मॅडमने तो इंटर्नशिपचा फॉर्म देखील भरलाय” मोनाची बेचैनी आवाजात ...अजून वाचा

33

तू ही रे माझा मितवा - 33

#तू_ही_रे_माझा_मितवा... #भाग_३३ {This a work of fiction. Names, characters, businesses, places, events, locales, and incidents are either the products of the author’s imagination or used in a fictitious manner. Any resemblance to actual persons, living or dead, or actual events is purely coincidental.}डेटासीसच्या हॅपनिंग कॅफेटेरियात जिथे मुलं कॉफीसाठी कमी आणि एक से एक सुंदर मुली बघत टाईमपास करायला यायचे तिथे एका हातात कॉफीमग आणि डोकं मोबाईलच्या मिटिंग शेड्युलरमध्ये अश्या पोझिशनमध्ये कबीर होता, तर तो नजरेच्या टप्प्यात येईल अश्या ठिकाणी बसण्यासाठी काही मुली धडपडत होत्या.“Prasanna we have to address some of the client side issues ...अजून वाचा

34

तू ही रे माझा मितवा - 34

#तू_ही_रे_माझा_मितवा... #भाग_३४ {This a work of fiction. Names, characters, businesses, places, events, locales, and incidents are either the products of the author’s imagination or used in a fictitious manner. Any resemblance to actual persons, living or dead, or actual events is purely coincidental.}#तिच्यासमोर तो! ती स्वतःपासून वेगळी होऊन स्वतःकडेच अनोळखी नजरेने बघतेय,अजूनही समोर कबीर आहे ,हे मन स्वीकारत नाहीये -‘हे स्वप्नयं..हे खरं नाहीये! “तू माझ्या डायरीच्या पानांत होतास कबीर,तू तिथेच असायला हवं होतं.तुझं हे असं अचानक समोर येणं मी जमेस धरलंच नव्हतं कधी. आता मी काय करू? मी तुझ्या नकळत तुझ्यात स्वतःला मिसळून घेतलंय हे तुला ...अजून वाचा

35

तू ही रे माझा मितवा - 35

#तू_ही_रे_माझा_मितवा... #भाग_३५#Countdown_begins-- {This a work of fiction. Names, characters, businesses, places, events, locales, and incidents are either the products of the author’s imagination or used in a fictitious manner. Any resemblance to actual persons, living or dead, or actual events is purely coincidental.} नदीकडून येणारा थंड वारा,त्यात कुठल्याश्या रान फुलांचा मिसळलेला सुवास,रिसोर्टचे शांतपणे झगमगणारे दिवे आणि वर आकाशातले दिवे. मघाशी केलेल्या वेंधळेपणासाठी स्वतःची मनातच खरडपट्टी काढत ती शांतपणे त्याच्यासोबत चालत होती.बराचवेळ कुणीही बोललं नाही.चालत चालत ते वॉकवेच्या सुरवातीला पोहचले देखील,तरीही दोघे गप्पच.आता जरा अंतरावर तिच्या टीमची कॅम्पफायरची तयारी चाललेली दिसत होती.बसुया ...अजून वाचा

36

तू ही रे माझा मितवा - 36

#तू_ही_रे_माझा_मितवा... #भाग_३६ #Count begins-तुम नाराज हो!{This is a work of fiction. Names, characters, businesses, places, events, locales, and incidents are either the products of the author’s imagination or used in a fictitious manner. Any resemblance to actual persons, living or dead, or actual events is purely coincidental.} “काय झालं कुठे हरवलीस?”त्याच्या बोलण्यावर तिचा शून्य प्रतिसाद पाहून तो म्हणाला.“निघायचं? तुलाही उशीर होत असेल.” ती पडलेल्या आवाजात म्हणाली.“हो,उशीर तर होतोय.आज तब्बल ४ चार शाळांना भेट द्यायचीय.तुझी हरकत नसेल तर चार पाच वाजता भेटूया भांडण कंटिन्यू करायला?”ती विस्मयाने बघत राहिली,ती निघून जाणार हे तिने गृहीत धरलेलं होतं.“तू ...अजून वाचा

37

तू ही रे माझा मितवा - 37

#तू_ही_रे_माझा_मितवा... #भाग_३७ #सेकंड_लास्ट- किस इज स्टील अ किस इन कॅसाब्लॅंका...!-a kiss is still a kiss in Casablanca{This is a work of fiction. Names, characters, businesses, places, events, locales, and incidents are either the products of the author’s imagination or used in a fictitious manner. Any resemblance to actual persons, living or dead, or actual events is purely coincidental.} “रिमा ही जरा वेडीय का? वेदसोबत ब्रेकअप झालं म्हणजे आयुष्यात कमिटमेंट देऊच शकणार नाही असं काही असतं का? ही का सगळी सिच्युएशन कॉम्प्लेक्स ...अजून वाचा

38

तू ही रे माझा मितवा - 38 - अंतिम भाग

#तू_ही_रे_माझा_मितवा. अंतिम भाग -ला व्हिए एन रोझ!!{This is a work of fiction. Names, characters, businesses, events, locales, and incidents are either the products of the author’s imagination or used in a fictitious manner. Any resemblance to actual persons, living or dead, or actual events is purely coincidental.} तू_ही_रे_माझा_मितवा... #भाग_3८ “चला मॅडम खूप उशीर झालाय..” लॅच उघडत मोना म्हणाली.“मोना...मी गुड नाईट म्हणून येते.” ती लाजत म्हणाली.“कुणाला?” मोनाने जाणूनबुजून चिडवलं.“.....त्याला,रूम नंबर ४५ ” त्याच्या रूमकडे इशारा करत ती म्हणाली आणि गालात हसली.“ओह्ह फायनली...ओह्ह ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय