सोराब नि रुस्तुम

(47)
  • 28k
  • 30
  • 11.9k

कोण राहते त्या घरात? त्या जुन्या पडक्या घरात? त्या भयाण घरात? पहाटेच्या वेळेस पाखरांची किलबिल सुरू होते व त्या घरातून मंगल वेदमंत्र कानांवर येतात. कोण म्हणते ते मंत्र? तेथे भूत तर नाही ना राहत? कोणी ब्रह्मसमंध तर नाही ना? कोण आहे त्या घरात? त्या घरात वेदमूर्ती वामनभटजी राहातात. विद्वान आहेत हो. दशग्रंथी आहेत. वेद म्हणजे त्यांच्या हातचा मळ. सारा ऋग्वेद त्यांच्या ओठांवर जसा खेळतो आहे. वेद म्हणजे त्यांची करमणूक, त्यांचा आनंद. शहरातील लोकांच्या तोंडी बोलपटांतील गोड गाणी असतात. वामनभटजींच्या तोंडी वेदमंत्र असत.

Full Novel

1

सोराब नि रुस्तुम - 1

कोण राहते त्या घरात? त्या जुन्या पडक्या घरात? त्या भयाण घरात? पहाटेच्या वेळेस पाखरांची किलबिल सुरू होते व त्या मंगल वेदमंत्र कानांवर येतात. कोण म्हणते ते मंत्र? तेथे भूत तर नाही ना राहत? कोणी ब्रह्मसमंध तर नाही ना? कोण आहे त्या घरात? त्या घरात वेदमूर्ती वामनभटजी राहातात. विद्वान आहेत हो. दशग्रंथी आहेत. वेद म्हणजे त्यांच्या हातचा मळ. सारा ऋग्वेद त्यांच्या ओठांवर जसा खेळतो आहे. वेद म्हणजे त्यांची करमणूक, त्यांचा आनंद. शहरातील लोकांच्या तोंडी बोलपटांतील गोड गाणी असतात. वामनभटजींच्या तोंडी वेदमंत्र असत. ...अजून वाचा

2

सोराब नि रुस्तुम - 2

फार वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. दूर दूर असलेल्या एका देशातील ही गोष्ट आहे. एक होता शेतकरी. त्याचे नाव होते खंडूची बायको होती. तिचे नाव चंडी. चंडी नावाप्रमाणेच खरोखर होती. जणू त्राटिकेचा अवतार. ती सदा संतापलेली असायची. डोळे तारवटलेले, कपाळाला सतराशे आठ्या. घरात अक्षयी तिची आदळआपट चालायची. खंडूला वाईट वाटे परंतु काय करणार? घर सोडून जावे असे त्याला वाटे परंतु तेही बरोबर नाही असे त्याची सदसद्विवेकबुद्धी सांगे. ‘तुझी गाठ पडली आहे खरी अशा बायकोशी. आता भिऊन पळू नकोस. सहन कर सारे.’ असे सदसद्विवेकबुद्धी म्हणे. ...अजून वाचा

3

सोराब नि रुस्तुम - 3

फार प्राचीन काळची गोष्ट आहे. तशा गोष्टी आता घडत नाहीत परंतु त्या ऐकाव्याशा तर वाटतात कारण त्या गोष्टींतील चिरंजीव असतात. असे अधीर नका होऊ. आता सागंतोच. एका गावात एक सावकार होता. खूप धनदौलत त्याने मिळविली. बरे वाईट करून मिळविली. जिकडे तिकडे त्याची शेती. जिकडे तिकडे त्याच्या बागा. त्याचा वाडा चिरेबंदी, केवढा मोठा चौसोपी होता. जणू किल्लाच. घराला एक तळघर होते. त्यात अपार संपत्ती साठवलेली होती. ...अजून वाचा

4

सोराब नि रुस्तुम - 4

इराण देशाच्या इतिहासातील ही करुणगंभीर कथा आहे. या कथेवर महाकवींनी महाकाव्ये लिहिली आहेत. करुण व वीर रसाने भरलेली ही रुस्तुम इराणच्या राजाच्या पदरी होता. रुस्तुम हा महान योद्धा होता. त्याच्यासारखआ वीर झाला नाही. तो बलभीम होता. लोक कौतुकाने म्हणायचे, ‘रुस्तुम मुठीने पर्वताचे चूर्ण करील, रविचंद्र धरून आणील.’ खरोखरच त्याची शक्ती अचाट होती. सिंहाला तो धरून ठेवी. एक थप्पड मारून त्याची गोगलगाय बनवी. माजलेल्या हत्तीला तो ची ची करीत पळवून लावी. रुस्तुम इराणचे भूषण होता. ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय