महाराष्ट्र TO कर्नाटक

(2)
  • 27.3k
  • 0
  • 13.2k

लोणावळा...., ३ जून २०१९, वेळ : सकाळी ८:२१ "अजून लोणावळा किती लांब आहे ?" मी काजलच्या बाजूला सरकत म्हणालो, "बस इथून ! एक तासांवर ....." सरोज म्हणाला, आम्ही सहा जण पिकनिक करिता मुंबईहून लोणावळ्याचा प्रवास करीत होतो. दोन मैत्रिणी देव्यश्री आणि काजल, मी आणि माझे सवंगडी सरोज, तनोज, केशव. आमची गाडी खंडाळा घाटात होती. आजूबाजूची झाडे अति वेगाने मागे जात होती. घाटातून मला भरगच्च इमारती, बाजार, सर्व काही अगदी पाहण्यालायक होते. "लेखक महाशय तुझे लेखन कसे सुरू आहे ?"ती मला म्हणाली, "बस ! सगळं काही तुमच्या कृपेने व्यवस्थित सुरू आहे. तुझ्याबद्दल काही सांगा" "मी सध्या आता लग्नाच्या बंधणात अडकणार आणि काय ?" "म्हणजे तुझे लग्न का ?" ती हताश झाली. "मी तयार नाही, माझ्या घरचे स्थळ शोधत आहेत" "चांगली बातमी आहे" "चांगलं काय आहे ?लग्नासाठी मला जॉब सोडावा लागणार आहे" मी विचारातच पडलो. लग्नाचा आणि कामाचा काय संबंध ? आधीच बेरोजगार वाऱ्यासारखा पेटलेला आहे आणि त्यात काम सोडावे म्हणजे वेडेपणा नाही का ?

नवीन एपिसोड्स : : Every Monday, Wednesday & Friday

1

महाराष्ट्र TO कर्नाटक - भाग १

लोणावळा...., ३ जून २०१९,वेळ : सकाळी ८:२१"अजून लोणावळा किती लांब आहे ?" मी काजलच्या बाजूला सरकत म्हणालो, "बस इथून एक तासांवर ....." सरोज म्हणाला, आम्ही सहा जण पिकनिक करिता मुंबईहून लोणावळ्याचा प्रवास करीत होतो. दोन मैत्रिणी देव्यश्री आणि काजल, मी आणि माझे सवंगडी सरोज, तनोज, केशव. आमची गाडी खंडाळा घाटात होती. आजूबाजूची झाडे अति वेगाने मागे जात होती. घाटातून मला भरगच्च इमारती, बाजार, सर्व काही अगदी पाहण्यालायक होते."लेखक महाशय तुझे लेखन कसे सुरू आहे ?"ती मला म्हणाली,"बस ! सगळं काही तुमच्या कृपेने व्यवस्थित सुरू आहे. तुझ्याबद्दल काही सांगा""मी सध्या आता लग्नाच्या बंधणात अडकणार आणि काय ?""म्हणजे तुझे लग्न का ...अजून वाचा

2

महाराष्ट्र TO कर्नाटक - भाग २

माझ्यासोबत आज कोणीही नव्हते. मी प्राध्यापकांच्या शेजारी असलेल्या ग्रंथालयात वाचन करत बसलो होतो. बाजूला तीन पुस्तके एकावर एक थप्पी ठेवले होते. माझं वाचन सलग तीन तास सुरू होते. तीन लेक्चर आज वाया घालविले होते. ग्रंथालयात माझ्याशिवाय कोणीही नव्हते. मी एकटाच होतो. तसेही इतक्या सकाळी कोणी ग्रंथालयात फिरकत देखील नाही. समोर मॅडम बसले होते. ते पेपरात मग्न होते. चार मुले आत शिरली होती. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून मला असे वाटत नव्हते की ही मुले अभ्यास करण्याकरिता इथे आली असावे. माझ्यापासून ते पुष्कळ लांब बसले होते. नावाला पुढ्यात पुस्तक होते. त्यांच्या आपापसात बाता सुरू झाल्या. त्यांच्या बातांचा आणि माझा काही संबंध नव्हता ...अजून वाचा

3

महाराष्ट्र TO कर्नाटक - भाग ३

संध्याकाळची वेळ होती. मी बेडरूममध्ये बसून संगणकावर माझं खाजगी काम करत होतो. बेडरूमच्या दरवाजाला कडी लावली होती. कामात व्यस्त मला रियाचा फोन आला. आता कोणते काम निघाले ? "नमस्कार ! मी काय सेवा करू तुमची ?" काही क्षणापूर्ती मला जणू मी कष्टमर केअरमध्ये कार्यरत असल्यासारखे भासवले.मी जेमतेम वीस मिनिटे तिच्याशी गप्पा मारीत होतो अचानक माझ्या बेडरूमच्या दरवाजावर धाडsss धाड असे ढोकले. तिला निरोप देत मी पटकन फोन ठेवला. दरवाजा उघडला. 'मिस्टर फादर' होते, ते कंबरेला टॉवेल गुंडाळून होते. हे ऑफिसहून केव्हा आले ? मला देखील समजले नाही."काही काम....?""काम आहे थोडं बोलूया आपण ! चालेल ना तुला ?" ते बेडवर ...अजून वाचा

4

महाराष्ट्र TO कर्नाटक - भाग ४

दोन महिन्यानंतर.......... सकाळी साडे सातच्या दरम्यान... मला रियाचा फोन आला होता. मी उचलू शकलो नाही. दिवस रात्र एक करून कादंबरीला विराम दिला. संपूर्ण लिहून झाली."माधव....! चल उठ रे...! नऊ वाजले आहेत" मॉम धक्के मारून उठवत होती. ती मला वारंवार कॉलेजला जाण्याचे सांगत होती. आज माझी तशी मनस्थितीही नव्हती. त्यात मला फादरचे मित्र रतन ह्यांनी मला प्रकाशकांचा फोन नंबर दिला होता.त्यांना मी फोन लावून आज येतो असे सांगितले.त्यांनी मला सकाळी अकाराची वेळ दिली होती.माझ्या फोनवर पत्ता सेंड केला. साधारण दहा मिनिटात मी ताजा तवाना झालो. मॉमने मला नाश्ता म्हणून डोसा केला होता. पिवळ्या रंगाचे शर्ट व काळी पॅन्ट घातली."मॉम मला ...अजून वाचा

5

महाराष्ट्र TO कर्नाटक - भाग ५

"तुझं काम कुठपर्यँत आलं आहे ?" समनने मला विचारलं,"काम झालं फक्त प्रदर्शित व्हायचे बाकी आहे""मग तर झालंच ना ! स्वप्न पण पूर्ण व्हायला काहीसे दिवस बाकी आहे""पण तुझ्या दोन वर्षाच्या जीवनपटावर मी काही लिहीन असे कधी वाटले नव्हते आणि मी लिहिलेली कथा आवडेल का ?""अरे का नाही आवडणार?"त्याला स्वतः वर हसू येत होते. मला त्याच्यावर हसू बिलकुल आले नाही."तू पराक्रम केलास हे ठीक आहे पण मला कौतुक ह्या गोष्टीचे वाटते. की तू मला न लाजता आणि जसा आहे तसा जीवनपट सांगितलंस""अरे लाज कसली ? होतं मला ते व्यसन. माझं मेंदू त्या गोष्टींच्या दिशेने जास्त विचार करू लागलं होतं""असो तू ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय