Maharashtra To Karnataka - 5 books and stories free download online pdf in Marathi

महाराष्ट्र TO कर्नाटक - भाग ५

"तुझं काम कुठपर्यँत आलं आहे ?" समनने मला विचारलं,
"काम झालं फक्त प्रदर्शित व्हायचे बाकी आहे"
"मग तर झालंच ना ! तुझं स्वप्न पण पूर्ण व्हायला काहीसे दिवस बाकी आहे"
"पण तुझ्या दोन वर्षाच्या जीवनपटावर मी काही लिहीन असे कधी वाटले नव्हते आणि मी लिहिलेली कथा आवडेल का ?"
"अरे का नाही आवडणार?"
त्याला स्वतः वर हसू येत होते.
मला त्याच्यावर हसू बिलकुल आले नाही.
"तू पराक्रम केलास हे ठीक आहे पण मला कौतुक ह्या गोष्टीचे वाटते. की तू मला न लाजता आणि जसा आहे तसा जीवनपट सांगितलंस"
"अरे लाज कसली ? होतं मला ते व्यसन. माझं मेंदू त्या गोष्टींच्या दिशेने जास्त विचार करू लागलं होतं"
"असो तू आता एकदम बिनधास्त आहेस."
"मला माझं लहानपणीचे स्वप्न पूर्ण करायचे आहे 'उत्तम गायक ' " तो हात जोडत म्हणाला,
"यशस्वी हो मदत लागली तर मला जरी बोलावलेस तरी मी अहोरात्र तुला मदत करायला येईन"
"बाय द वे ! मी आता माझा स्वतः चा अल्बम काढण्याच्या शोधात आहे. गाणे, हिरोईन, वगैरे सगळं झालं आहे फक्त निर्मात्याचा अजून मला काही फोन आलेला नाही"
"धीर धर येईल चांगल्या गोष्टीसाठी वेळ लागतो"

पंधरा दिवसांनी मला शिवराम सरांचा फोन आला. "कादंबरी छापून तयार आहे आता उद्धघाटन कधी करूया लेखक महाशय ?"
मी चक्रावून गेलो. मला हे लेखक महाशय म्हणाले.
"सर मी म्हणत होतो की तुम्हाला जे वाटेल ते करा "
"तसं नाही तू जर नको म्हणालास तरी हरकत नाही आपण नको करूया त्यात काही गैर नाही"
हे माझ्या मनासारखे झाले. उगाच हा उद्धघाटन सोहळा कशाला ?
"बरं मग आपण उद्धघाटन न करता थेट प्रकाशित करूया"
"तू जसं म्हणशील तसं" ! मी तुला दोन प्रति तुझ्या पत्यावर पाठवतो"
त्यांनी फोन ठेवून दिला. कदाचित त्यांना राग तर आला नसावा ना ? मी पुन्हा फोन लावून माफी मागावी ? पण दोन दिवसानंतर पोस्टमन माझ्या दारावर अवतरला. त्याने 'इनवोल्प' मॉमच्या हाती दिले.
त्या दिवशी मला घरी जायला फार उशीर झाला होता. अगदी नऊ वाजून गेले होते. घरच्यांची मला कोणती चिंता नव्हती. पण मॉम नुसती फोनवर फोन करतंच होती. अखेर मी इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो होतो तेव्हा 'मिस्टर फादरचा' फोन आला.
'बस मी पोहोचलो घरी !" मी म्हणत फोन ठेवला.
घराच्या बाहेर मॉमचा तारस्वरात भांडण्याचा आवाज येत आहे. महाभारतात ज्या लढाया झाल्या त्या कदाचीत इथेसुद्धा होत आहेत की काय ?
"अं ग, का भांडत आहेस गं ? तुझा बाहेर आवाज येत आहे"
"ह्या तुझ्या बाबाला चमचमीत जेवण हवं आहे त्याला बाहेर घेऊन जा" ती मोठ्या आवाजात म्हणाली,
"हो हो मी जरा ताजा तवाना होतो मग मी त्यांना बाहेर घेऊन जातो"
"तू पण जा तू पण इथे आज जेवायला थांबू नकोस"
अंगात देवाचे वारे आल्यासारखी भांडत होती. काय सांगावं हिला ? काही मिनिटात मी ताजा तवाना झालो.
"तुम्ही कपडे घाला ! निघुया"
"कशाला बाहेर ? बाहेरचे जास्त खायचे नसते, घरी बनवा"
"मी आता काही बनवणार नाही ! आम्हाला पण थोडं मोकळं बसू द्या"
"मिस्टर आपण बाहेर जाऊ तिला त्रास नका देऊ"
त्यांनी सादे शर्ट पॅन्ट घातली. आम्ही बाहेर पडलो. त्या दरम्यान फोन भुणभुण करत होता पण मी लक्षच दिले नाही. कोणाचा असेल तो मला नंतर फोन करेल. सात ते आठ मिनिटात प्रशांत हॉटेलमध्ये प्रवेश केला. मध्यम वर्गीय हॉटेल.
"तुम्हाला जे आवडेल ते मागवा !" मी म्हणालो,
माझा पुन्हा फोन भुणभुण करू लागला. असे वाटू लागले की बंद करावा. अनोळखी फोन मी कट करत टेबलावर ठेवला.
"तू एक काम कर मेनू घेऊन ये त्या काउंटरवरून"
मी उठून काउंटरवर अवतरलो.
"मला मेनू द्या"
त्याने आम्ही बसलेल्या टेबलावर पाहिले. त्याला रिता दिसताच त्याने डायरीसारखे मेनु दिले.
"थॅक्यू सो मच" आभार मानत टेबल गाठला.
"ही रिया तुला सारखी फोन करत आहे. दोन वेळा फोन येऊन गेला आहे आणि तिने 'लव्हर व्हॉट आर यु डुईंग' असा मेसेज का केला ? ह्या व्यतिरिक्त तिच्या नावाला दोन 'दिल' का बरे ठेवले आहेस" त्यांच्या हातात मोबाईल होता.
"ती माझी कॉलेज फ्रेंड आहे डोन्ट व्हॅरी हे घ्या मेनू" मी मेनू त्यांच्या हातात दिलं.
त्यांचे डोळे मलाच पाहत होते. आता त्यांच्या मनात कोणते प्रश्न उदभवले असावे ? वेटर आमच्याजवळ आला. तरी त्यांचे भान नव्हते.
"फादर ....! वेटर" मी म्हणालो,
"दोन पनीर टिक्का आणि रोटी" फादर म्हणाले,
त्यांनी हाताची घडी मारली.
"ह्या बाबतीत मला शोध घ्यायला हवा कारण आताची तुम्ही पोरं म्हणजे फाय जी"
"तुम्ही समजत आहात तसं काही नाही"
"मग कसं आहे तुम्ही ऑफिसला आलात तेव्हाच मला काहीतरी संशयास्पद वाटलं पण मी काही बोललो नाही. काही लपडं वगैरे तर नाही ना ?"
तिचा पुन्हा फोन आला.
"मी तुला नंतर फोन करतो" फोन ठेवला.
"असलं की सांगतो ना नका एवढी चिंता करू"

वेटर एका मोठ्या डिशमधून दोन बाउलमधून पनीर टिक्का आणि वेगवेगळ्या डिश मधून चार रोटी घेऊन आला.
"मला हल्लीच्या पिढीवर विश्वास नाही रे तुम्ही प्रेम करायच्या ऐवजी साली भलती सुलती लपडी करता आणि मग आम्हाला निस्तरायला लावता"
"मिस्टर फादर मी खूप सद्गुणी मुलगा आहे तुम्हाला माझ्यासारखा पुढच्या सात जन्मात शोधून सापडणार नाही"
"तसाच राहा, कोणत्या लपड्यात फसू नको आणि अभ्यास सुरू आहे ना ?"
"डोन्ट व्हॅरी उत्तीर्ण होण्यापूरता मी करेन, तुमच्या करिता थंड पाण्याची बॉटल मागवू का ?"
"नको नको काही आवश्यकता नाही ! तुला ज्या देवदूत व्यक्तीने तुझ्या कादंबरी करता सहकार्य केले त्यांचे आभार मानले का ?"
"तसे मी त्यांना धन्यवाद म्हणालो"
"असं नाही त्यांचे कौतुक करणारं मेसेज लिही ज्याने करून त्यांनाही बरं वाटेल"
"बरं नक्की लिहीतो"
रियाचा पण फोन पुन्हा नाही त्या वेळेस आला. नाही नाही तिची ह्यात काय चूक ? ती 'ओपन माइंड' मुलगी आहे.
मी इथे मिस्टर फादर सोबत आज डिनरला येणार हे तिला थोडी माहीत.
शिवराम सरांचे आभार मानण्याचे राहून गेले. मी त्यांना मेसेज करत होतो तो असा....

गुरुवर्य शिवराम सर,
क्षमस्व असावी ! कादंबरी प्रकाशित केल्यानंतर मी तुमचे आभार मानायचे राहूनच गेले. मला तुमचेही खूप कौतुक वाटते तुम्ही माझ्यासाठी खूप श्रम घेतले. खरं तर तुमच्यासारखी माणसे हल्ली फार क्वचित मिळतात तुम्ही माझ्यासाठी वेळोवेळी धाव घेतलात त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो.

आपला शिष्य
"माधव राणे"

मी त्यांच्या मोबाईलवर भला मोठा संदेश सोडला. साडे दहा वाजले होते. माझ्या वर्गात वाऱ्यासारखी कादंबरीची चर्चा झाली होती. माझ्या बॅगेत दोन प्रत होत्या एक रियासाठी नि एक समनसाठी. मग उर्वरित सवंगडी काय करतील ? स्टडी रूममध्ये दोघांना बोलावून घेतले. रियाला यायला वेळ होता पण समन बाहेर असल्याकारणाने तो पटकन आला.
"बडी....! अभिनंदन खूप मोठा लेखक व्हावे हीच माझी इच्छा" त्याने मला हस्तांदोलन केले,
"आभारी आहे....तुझी माझ्यापेक्षा खूप मोठी प्रगती होवो हीच माझी इच्छा"
"मी सुद्धा माझ्या कामात आता पूर्ण व्यस्त आहे सध्या अल्बमचे काम जोरदार सुरू आहे"
"फारच सुंदर ! ते तुझ्या चेहऱ्यावर मला दिसत आहे"
रिया आली. ती दमली होती. ट्रेनचा प्रवास कदाचित महागात पडलेला दिसतोय.
"अभिनंदन !" हात हाती दिला.
"थोडी शांत हो !"
काही मिनिटे ती डोळे मिटून राहिली. समन निरोप घेत निघून गेला.
"रिया ! हे घे पुस्तक ! पण एक फक्त लक्ष्यात ठेव हे तुला पुस्तक दिलं आहे हे कोणाला कळू देऊ नकोस कारण माझ्याकडच्या प्रत संपल्या." मी तिला बजावत म्हणालो
"काळजी करू नकोस"
शिवराम सरांचा मला काही प्रतिसाद नाही.
"मी दोन मिनिटं फोनवर बोलून आलो."
तातडीने बाहेर येताच त्यांना फोन केला. देवाच्या कृपेने त्यांनी उचलला. मी आभार प्रदर्शन करू लागलो.
'तुझे श्रम पाहून मला खूप म्हणजे खूप गहिवरून आले. तुझ्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ! आणखी काही मदत लागली तर मला सांग"
मी थोडासा उत्साही झालो. त्यांच्या चार मधुर शब्दाने माझ्या डोक्यावरचा ताण निघून गेला. माधव आपलं काय नशीब म्हणावे, ह्या जगात अशी फार माणसे कमी मिळतात आणि त्यात मला असे माणसे मिळाली. मी खूप भाग्यवान आहे.
"मराठी भाषा आहे...!" ती विचारात पडली,
"मग मी काय करू ?"
"मला बोलता येते वाचता येत नाही"
"हळूहळू होईल सवय"
"एक काम कर ना मला तोंडी सांग"
माझ्या भुवया वरच्या दिशेने ताणल्या.
"एवढं पुस्तक तोंडी सांगू ? वेड वगैरे तर नाही ना लागलंय ?"
"अरे मला समजून घे ना लव्हली ! आता मला मराठी एवढं वाचता येणार आहे का ?"
"मला वेळ मिळाला की सांगतो" मी सुस्कारा सोडत म्हणालो,
"नो नो रिलीज झाली आहे ! आता सांगायला हरकत नाही" ती नकारार्थी मान हलवत म्हणाली,
"बरं मी सांगतो"
आमच्यात क्षणभर शांतता पसरली आहे.
"मॉडेलिंग बद्दल तू मला काही सांगू शकतो का?"
"जास्त काही मला कळत नाही पण सहकार्य करू शकतो."
"मला यार मॉडेलिंग करायचं आहे पण काहीच कळत नाही. मी मुंबईत क्लास वगैरे शोधले आहेत त्यात मला एक 'दादरला अकॅडमी सापडली आहे. चौकशी करूया"
माझ्यामते तर हा सगळा थापड पसारा आहे. साला मॉडेलिंग च्या नावाखाली पैशांची उधळपट्टी आहे. पण हिला कोण सांगेल. ?
"आपण चौकशी करू ! जर काहीच जमलं नाही तर ?"
"काय ?"
"लग्न कर दोन चार पोरं काढ आरामात जीवन जग" मी थट्टेत म्हणालो,
"फकssss" हाताची पाच बोटे गडप करत मधले बोट उंचावून दर्शवले.
"साला आम्हाला काय तुम्ही खेळणं समजलात की काय"
"मी असं कुठे म्हणालो."
तिने माझ्या पाठीत इतक्या मोठ्याने गुद्दे मारले की समोर बसलेले प्युन आमच्यावर भडकले. 'अरे मारामारी काय करताय चालते व्हा आधी' बसलेल्या तरुण तरुणीच्या नजरा आमच्यावर पडल्या. कदाचित माझ्या अब्रूचे पंचनामा झाला असावा. शरमेने मी मान खाली घातली.
'मॉडेलिंग'ssssss बऱ्याच तरुणी मॉडेलिंग का निवडतात ? काही समजत नाही. असंही ती मॉडेल आहेच ना मग साला क्लास कशाला हवा ? हिला योग्य मार्गदर्शन व्हायला हवे ? पण ही माझं थोडी ऐकणार आहे. जाऊ दे ! तिची निवड तिला आयुष्यात पुढे नेवो. मी मनातल्या मनात हात जोडले.
ग्रांट रोड,
'केम्स कॉर्नर' सिग्नल पासून उजवीकडे आम्ही वळलो. हा पत्ता हिला कोणी सांगितला देव जाणे एवढी विचारपोस मी केली नाही. जे होईल ते चांगलं होsssss.
आम्ही एका चार मजली इमारतीत शिरकाव केला. लाकडी पायऱ्या असल्या कारणामुळे टक टक आवाज कानी पडत होता.
"तू सगळं विचार ! मला ह्यांच्याशी बोलता येणार नाही"
"मला मॉडेलिंगमधले काहीच कळत नाही"
"तू लेखक आहेस तुझ्याकडे कसं बोलावं कुठे बोलावं ! ह्या गोष्टींचे तरी ज्ञान आहे ना ! चल तेवढी मदत कर मला"
आम्ही पहिल्या माळ्यावर पोहोचलो. मला ही सामान्य घरे वाटत होती. एक लोखंडी 'द्वार' होते. तिथे आम्ही पोहोचलो. दरवाजा ढकलत आत शिरलो.
'रिसेप्शन' समोरच होते.
"आम्हाला 'मॉडेलिंग'साठी ऍडमिशनची चौकशी करायची आहे.
"नाव सांगा.....!"
ती रिसेप्शनवाली तरुणी माझ्याकडे पाहून पेन हातात धरला.
"माधव राणे" मी स्वतःचे नाव सांगितले.
"इथून दुसरी रूम" रिसेप्शनवर असलेल्या तरुणीने डाव्या बाजूला निर्देश करत म्हटले.
"आभारी आहे !"
मी दर्शविलेल्या त्या रूमजवळ पोहोचलो.
दरवाजावर टकटक करत मी आत ढकलला. एक 'सड पातळ' जवळपास तीस वर्षीय असावा, तरुण बसला होता. फॉर्मल कपडे घालून.
"सर....!" मी त्यांना हाक मारत लक्ष वेधून घेतले.
आम्ही आत गेलो. दोन्ही खुर्च्या रिक्त होत्या त्यावर आम्ही बसलो.
"मॉडेलिंगच्या ऍडमिशनची माहिती हवी आहे"
"बरं सांगतो! ह्या पूर्वी कुठे मॉडेलिंग केली आहे का ? नाही म्हटलं कुठे क्लास वगैरे केले होते का ?"
"नाही फ्रेशर आहोत"
"बरं...."
"मॉडेलिंगसाठी मर्यादा काय आहे ? आणि किमान खर्च किती एवढी आम्हाला माहिती द्या"
"बरं.!"
"कोणाला करायचे आहे 'मॉडेलिंग' ?"
"हिला...!"
"ओके..."
"मॉडेलिंगसाठी हिची उंची कमीत कमी पाच पॉइंट सात असायला हवी. आणि खर्च कमीत कमी दोन ते अडीच लाख"
मी रियाकडे पाहिले. भुवया उडवले.
"मग ह्यात करियरचे कसे काय ?"
"मग नंतर आम्ही इथून जाहिरातिसाठी, मग रॅम्पसाठी पाठवतो."
"मला तुमच्या इथून यशस्वी झालेल्या मुलींची अथवा मुलांची काही माहिती मिळेल का ?"
"हे पाहा आमच्या इथे एवढे जण आज लाखोमध्ये एका जाहिरातीचे पैसे घेतात"
त्यांनी उजव्या हाताला पेन भिंतीवर चिटकविलेल्या फोटोकडे फिरवत म्हणाले.
ह्यांना मी कधी जाहिरातमध्ये पाहिलेही नाही. मग अशा कोणत्या जाहिरातमध्ये हे काम करतात ?
"फिज थोडी जास्त वाटत आहे ?"
"आम्ही मुलांचे भवितव्य पाहतो म्हणून आम्ही फार कमी फिज लावली आहे असे आम्हाला वाटते. हवं तर तुम्ही बाहेर फी ची विचारपुस करू शकता"
"सर आम्ही विचार करतो मग तुम्हाला कळवतो"
"ठीक आहे"
मला तर हे काही अजब वाटत आहे. साला लाखो पैसे भरल्यावर जर कोणत्या जाहिराती किंवा इतर गोष्टींमध्ये बुलावा जर आला नाही तर ? पैशाची माती. आम्ही बाहेर पडलो.
"इतकीही दुःखी होऊ नकोस रिल्याक्स !" मी तिच्या पाठीत थोपटत म्हणालो.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED