महाराष्ट्र TO कर्नाटक - भाग २ Ajay Narsale द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

महाराष्ट्र TO कर्नाटक - भाग २

माझ्यासोबत आज कोणीही नव्हते. मी प्राध्यापकांच्या शेजारी असलेल्या ग्रंथालयात वाचन करत बसलो होतो. बाजूला तीन पुस्तके एकावर एक थप्पी मारून ठेवले होते. माझं वाचन सलग तीन तास सुरू होते. तीन लेक्चर आज वाया घालविले होते. ग्रंथालयात माझ्याशिवाय कोणीही नव्हते. मी एकटाच होतो. तसेही इतक्या सकाळी कोणी ग्रंथालयात फिरकत देखील नाही. समोर मॅडम बसले होते. ते पेपरात मग्न होते. चार मुले आत शिरली होती. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून मला असे वाटत नव्हते की ही मुले अभ्यास करण्याकरिता इथे आली असावे. माझ्यापासून ते पुष्कळ लांब बसले होते. नावाला पुढ्यात पुस्तक होते. त्यांच्या आपापसात बाता सुरू झाल्या. त्यांच्या बातांचा आणि माझा काही संबंध नव्हता परंतु आवाज फार वाढत असल्याकारणाने. त्यांना मॅडमनी चेतावणी दिली.
नऊ वाजून पंधरा मिनिटांनी मला रियाचा फोन आला. पण मी उचलला नाही संदेश पाठवून ग्रंथालयात यायला सांगितले. ती आली तीन लेक्चरला उपस्थिती लावून आली. माझ्या पुढ्यात बसली. पंख्याच्या दिशेने मान वर करत हवा घेत होती.
"फोन उचलायला काही त्रास होता का ?"
"आय एम सॉरी ! मी वाचनात व्यस्त होतो." मी पुस्तक बंद करीत म्हणालो,
"लेक्चरला काय शिकवलं ?"
"ते मला कसं माहिती असेल ? मी नाही सांगू शकत. तुला लेक्चरला यायला काय झालं?" ती चेहऱ्याकडे पाहतच राहिली.
"व्हेरी नाईस ! लेक्चर इतकाही महत्वाचा नव्हता की मी हे वाचन सोडून लेक्चरला यावं आणि तसंही काय शिकवलं असेल तर मी ते तुझ्या भरवशावर आहेच."
आमच्या बाता सुरू झाल्या. स्वर हळू होता. आमच्यापासून लांब बसलेले तरुण अधूनमधून रियावर नजर टाकीत होते. ते आम्हाला अशा दृष्टीने पाहत होते की जणू हे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असावे. रियाचं सौन्दर्य खूप आकर्षित होते. पाहताक्षणी तिला पसंत करेल. परंतु ती कोणाला नजरेत घेत नव्हती. सहसा कोणाशी बोलायचे म्हटले तर ती हजार वेळा विचार करी.
"आता लेक्चरला काय शिकवले ?" मी तिच्या हाताला पेन्सिल टोचली.
"फुकट शिकवत नाही कोणाला ! त्याचे मी पैसे मोजते."
कदाचित तिने मला त्रास द्यायचा ठरविला होता.
"बरं किती पैसे ?"
"पाचशे"
"सामान्य माणसाकडून पैसे घ्यायला तुला लाज नाही वाटत ?"
"तू कुठे सामान्य आहेस ? सामान्य तर त्यांना म्हणावे ज्यांच्याकडे धन दौलत नाही"
"असो ! नो जोक प्लिज हेल्प मी" मी विषय आलटला.
"ओके मी नाही घेत पैसे तुझ्याकडून डरपोक ! आणि ही एवढी पुस्तके कशाकरता ? तू पी एच डी करतोय का ?"
"ह्यांची आवड आहे मला" मी पुस्तकांच्या थप्पीवर हात ठेवून चेहऱ्यावर हसू आलं.
सकाळी लेक्चरमध्ये जे काही शिकवलं गेलं होतं ते रिया मला अगदी मनापासून शिकवीत होती. मीसुद्धा अगदी माझे मन तिच्या शब्दांकडे रोखून धरले होते. ग्रंथालयात तरुण-तरुणींची ये जा सुरू होती. माझ्या परिचयाचीसुद्धा होती. तिचा ध्वनी बदलला.
"पहिलं पाणी घे" समोरची बॉटल सरकवत म्हणालो,
ती दोन घोटभर पाणी प्यायली. बेलचा कर्कशsssss आवाज कानी पडला. ही वेळ माझ्या खाजगी लेक्चरची होती.
" माझ्या लेक्चरची वेळ झाली आहे मी जाऊन येतो तोवर तू इथेच बसून राहा" मी उठून बाहेर रवाना झालो. ग्रंथालयात येणाऱ्या मुलांची मला कमाल वाटे. नेमके काय करायला येतात हे ? तेच समजत नाही. पाच मिनिटे उशीर झालेला आहे. शाश्वती नाही की वर्गात बसायची परवानगी देतील. मी रूम नंबर 'दोनशे आठ' वर्गात शिरलो. मॅडम फळ्यावर शिकवत होते. वर्गात चार मुली आणि दोन मुले.
" आत येऊ का ?" मी मॅडमकडे पाहत म्हणालो,
त्यांनी शिकवायचे थांबविले. वर्ग मला पाहत होता.
"नको येऊ ! ही काय वेळ आहे का तुझी यायची ? तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही येणार का ?" त्या भडक आवाजात म्हणाल्या,
"फक्त पाच मिनिटे उशीर झालाय"
"नको येऊ"
मी मागे फिरलो. वर्ग मला पाहून हसत होता. मॅडमना मनोमन शिव्या हासडत होतो. ह्या मॅडमपेक्षा मला इतर मॅडम बरे. ह्यांच्या लेक्चरला न बसावे असा मनोमन निर्णय घेत मी शांत होण्याचा प्रयत्न केला.
रियाचा मेसेज आला होता.'लेक्चर संपला की कॅन्टीगमध्ये ये' ती उपहारगृहात बसली होती. उपहारगृहात पोहोचलो. मॅडम मला जरा विचित्रच बोलले. असो... मी विषयावर पाणी सोडले. रियाने एक बाकडा अडवून ठेवला होता. ती मोबाईलवर मग्न होती.
"ओके ! मोबाईल बंद करून ऑर्डर सोड" मी तिचा मोबाईल हिसकावत म्हणालो,
"अरे तू लेक्चरला गेला होतास ना ?"
"तो लेक्चर गेला भाड मध्ये ! मला तिने सरळ हाकलून लावलं"
"काय ?" ती हसायला लागली.
"तुला बाहेर काढलं ! हा सिन बघण्यासारखा होता" तिचे हसणे वाढू लागले होते.
"मी ह्यापुढे तिच्या लेक्चरला जाणारच नाही. च्यायला माझी हकालपट्टी केली आणि ही दुसरी वेळ आहे."
हसत हसत तिने ऑर्डर सोडली.
"दोन मसाला डोसा"
"एकच ! मला फक्त कोल्डिंग"
आमच्यात शांतता पसरलेली होती. ती माझ्याकडे एक टक पाहत होती. मी माझ्या विचारात. पाच मिनिटात डोसा टेबलावर येऊन पोहोचला.
" काय झालं ?" ती डोसाचा तुकडा मोडत म्हणाली,
"सध्या माझी काय प्रकृती व्यवस्थित दिसत नाही"
"आता तुला काय झालं ? लेक्चर बाबतीत असं झेलावं लागतं"
"त्यांनी तर माझा सगळ्यांसमोर अब्रूचा पंचनामा करून टाकला असं वाटायला लागलंय मला."
बेलचा कर्कशsssss आवाज हलकासा कानी पडला. दहा मिनिटात डोसा खाऊन झाला. मी बिल चुकतं करत महाविद्यालयाच्या बाहेर लांब लचक कथाड्यावर जाऊन बसलो. तिने माझ्या उजव्या हाताला पकडून खांद्यावर डोके ठेवून डोळे मिटले होते. वर्ग मित्र मला फोन लावून भेटायला आले होते. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. दोन मुले होती.
"एवढं मनाला लावून घेऊ नकोस, त्यांची सवयच आहे म्हटल्यावर...." तो अर्धवट थांबला.
"उद्यापासून मी लेक्चरला येणार नाही. असं समजा की तो लेक्चर मला आहेच नाही" मी त्यांना बजावत म्हणालो.
त्यांनाही मॅडमचा तिटकारा आला होता. मोठं मोठ्याने ते शिवीगाळ करीत होते. पण ऐकायला आसपास मराठी विभागातले कोणीही नव्हते. नाहीतर त्यांच्याजवळ खबर पोहोचायला जास्त अवधी लागला नसता.
ते निघून गेले.
"तू अशा मॅडमना घाबरतो का ?"
"हहहह.... मी अशा आजवर मॅडम पाहत आलोय पण असला फालतू परिणाम मी डोक्यावर करून घेत नाही उद्यापासून मी हिचे लेक्चर बंद केले आहेत त्यामुळे मला खूप शांतता वाटेल"
"ती भरपूर चिडचिडी आहे कदाचित मला वाटते की त्यांना मनोरुग्ण रुग्णालयात उपचार करून घ्यायला हवे"
"कदाचित वैद्याला वेड लागेल"
तिचा फोन वाजला.
"अम्मा मातडू 'ती क्षणभर ऐकत राहिली' " ननगे इवंतू बरलू समयाविदे निनू होगी... बाय बाय...."
बाय बाय वगळता तिचे कन्नड बोलणे मला काहीच समजले नाही.
अकरा वाजले. फिलॉसॉफीच्या लेक्चर होता. त्या लेक्चरला बसण्याची मनस्थिती नव्हती. त्यापेक्षा मी कोणत्यातरी पुस्तकात गढून जातो.
"तू लेक्चरला जात आहेस ?"
"नो...."
मी तिला न घेता लायब्ररीत शिरलो.
"मी पाच मिनिटात पुस्तक घेऊन येतो"
तिने माझ्यावर चिडका कटाक्ष टाकला. मी लायब्ररीत शिरलो. शेक्सपिअर चे 'रोमियो अँड जुलिएट' ह्या पुस्तकासाठी मी ग्रंथालयात प्रकटलो.मॅडमकडून पुस्तकाचा कोड घेत रॅक जवळ पोहोचलो, रॅक मध्ये इतकी धूळ होती की सगळी पुस्तके मला काळ्या रंगाची दिसत होती. एक एक रॅक सोडत बारकाईने पाहत होतो. दहा पाऊलावर दोन प्युन होते.आपापसात संवाद साधत होते. त्यांना हाक मारत बोलावून घेतले.
"हा कोड आहे जरा शोधून द्या !"
पुस्तके इकडे तिकडे करीत होते.
"हे बुक दुसऱ्यांच्या नावावर आहे मिळू शकत नाही दुसरं बोल....!"
"दुसरं नको आहे"
नशीब फुटकं. मी लायब्ररी सोडली.