आत्महत्येस कारण की...

(14)
  • 39.5k
  • 1
  • 22.8k

मिताली रडत रडत भांडी घासत होती. आज पुन्हा तीचे आणि तन्मय चे भांडण झाले होते. तन्मय ऑफिस ला निघून गेला. सासरे पेपर वाचत बसले होते. सासूबाई त्यांची आवडती सिरीयल बघत बसल्या होत्या. मिताली रडत रडत आपली कामे आवरत होती. तन्मय चे आणि तीचे दर दोन दिवसांनी भांडण होत होते. बहुतेक वेळा भांडणाचं कारण सासूबाई होत्या. त्यांना तीने केलेले काहीच पसंत पडत नव्हते. मिताली खूप प्रयत्न करायची त्यांना खूष ठेवण्याचा. पण त्या काही खूष व्हायच्या नाही त. झोपलेल्या ला जागं करता येत पण झोपेचे सोंग घेतलेल्या माणसाला कसे जागे करणार. सासूबाई तन्मय ला मिताली कशी कामचुकार आहे. हे त्या नेहमी दाखवून देत असत. आज त्यांनी मिताली ने आपल्याला थंड चहा दिला म्हणून कांगावा केला. त्यावरून त्या दोघांचे भांडण झाले. खरतर मिताली ने सासूबाई ना गरमागरम चहाच दिला होता. तो चहा तसाच ठेवून त्या पेपर वाचत बसल्या. तो पर्यंत तो चहा थंड झाला.तो थंड झालेला चहा त्यांनी तन्मय ला दाखवला. मग तन्मय पण नेहमीप्रमाणे मिताली ला जाब विचारण्यासाठी गेला.

Full Novel

1

आत्महत्येस कारण की.... - 1

मिताली रडत रडत भांडी घासत होती. आज पुन्हा तीचे आणि तन्मय चे भांडण झाले होते. तन्मय ऑफिस ला निघून सासरे पेपर वाचत बसले होते. सासूबाई त्यांची आवडती सिरीयल बघत बसल्या होत्या. मिताली रडत रडत आपली कामे आवरत होती. तन्मय चे आणि तीचे दर दोन दिवसांनी भांडण होत होते. बहुतेक वेळा भांडणाचं कारण सासूबाई होत्या. त्यांना तीने केलेले काहीच पसंत पडत नव्हते. मिताली खूप प्रयत्न करायची त्यांना खूष ठेवण्याचा. पण त्या काही खूष व्हायच्या नाही त. झोपलेल्या ला जागं करता येत पण झोपेचे सोंग घेतलेल्या माणसाला कसे जागे करणार. सासूबाई तन्मय ला मिताली कशी कामचुकार आहे. हे त्या नेहमी दाखवून ...अजून वाचा

2

आत्महत्येस कारण की.... - 2

भाग २ सासूबाईंना खूष ठेवण्याचा सतत प्रयत्न करत असायची.पण त्या सतत तीच्या चूका काढून तन्मय ला तुझी बायको कीती आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न करत असायच्या.त्यामुळे मिताली आणि तन्मय मध्ये सतत भांडणे होवू लागली. मिताली बरोबरचा त्याचा अबोला वाढला. मिताली ने खूपदा त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.पण तन्मय ला वाटायचे की ती त्याला भडकवत आहे.मिताली आणि तन्मयय चे लव मॅरेज होते. दोघे एकाच ऑफिस मधे कामाला होते. तन्मय ला मिताली बघताक्षणी आवडली होती.‌मिताली दिसायला सुंदर होती . मिताली ला‌पण तन्मय आवडला होता . तन्मय सुद्धा दिसायला खूप सुंदर होता. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघेही सूजाण होते . दोघांनीही आपापल्या ...अजून वाचा

3

आत्महत्येस कारण की.... - 3

मिताली ने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तन्मय ला काहीच सुचत नव्हते. त्याने मिताली च्या आई बाबांना फोन केला. मिताली आई ला त्याने थोडक्यात सांगितले. आईला मिताली बद्दल ऐकून शॉक च बसला . तिने बाबांना सांगितले. दोघेपण हॉस्पिटलमध्ये पोहचले. तन्मय राव हे असे कसे झाले. तन्मय ला काय बोलावे सुचेना त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मिताली च्या आई बाबांना त्याने सांगितले की निशा सिरीयस आहे. तन्मय चा मित्र जय पण आला. "जय अरे काय होवून बसलं रे हे. मिताली वाचेल ना." जय तन्मय ला बोलला सगळे ठीक होईल तन्मय ."तन्मय ला आपली चूक लक्षात आली होती.पण आता खूप उशीर झाला ...अजून वाचा

4

आत्महत्येस कारण की.... - 4

भाग ४ जेव्हा बाबांना हे समजले तेव्हा त्यांना फार वाईट वाटले.मिताली च्या आईला म्हणाले, "अगं, तू मला एकदा सांगायचे होते. जेव्हा तीला आपल्या आधाराची गरज होती. तेव्हा च जर आपण तिच्या पाठीशी उभे नाही राहणार तर कधी राहणार. आपल्या मुलीचे लग्न झाले म्हणून ती इतकी परकी झाली का आपल्याला.समाज काय बोलेल याचा विचार करून तू गप्प बसतील, तिच्या जीवा पेक्षा जास्त आहे का तूला समाज . आता जर मिताली ला काही झाले ना? तर तोच समाज तुला टोचून बोलेल की, "माहिती होत तरी त्याच्यावर काही मार्ग काढला नाही. किती मानसिक त्रास सहन केला असेल माझ्या मिताली ने. किती ...अजून वाचा

5

आत्महत्येस कारण की.... - 5 - अंतिम

मिताली सुलभा च्या बोलण्याचा विचार करत होती. तिच्या बोलण्याने मिताली मध्ये एक प्रकारची पॉझिटिव्हीटी आली. मितालीआता आपल्या आयुष्याकडे वेगळ्या पाहू लागली. मिताली ने स्वत शीच एक खूणगाठ बांधली. इतक्यात तन्मय तिला भेटायला आला. त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्ताप दिसत होता.कशी आहेस मिताली? कशी दिसतेय? आज मी या अवस्थेत आहे याला कुठे ना कुठे तू पण जबाबदार आहेस. मिताली माझं चुकलं. उद्या डॉक्टर तुला डिस्चार्ज देतील मग आपण आपल्या घरी जाऊ . घरी गेल्यावर तुला बरे वाटेल. कोणत्या घरी कोणाच्या घरी? इतक्यात मिताली ची आई पण आली. तिने मिताली आणि तन्मय चे बोलणे ऐकले होते. ती तन्मय ला म्हणाली, " जावयबापू थोडे ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय