Aatmahatyes kaaran ki... - 5 - Last part books and stories free download online pdf in Marathi

आत्महत्येस कारण की.... - 5 - अंतिम

मिताली सुलभा च्या बोलण्याचा विचार करत होती. तिच्या बोलण्याने मिताली मध्ये एक प्रकारची पॉझिटिव्हीटी आली. मितालीआता आपल्या आयुष्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहू लागली. मिताली ने स्वत शीच एक खूणगाठ बांधली. इतक्यात तन्मय तिला भेटायला आला. त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्ताप दिसत होता.कशी आहेस मिताली? कशी दिसतेय? आज मी या अवस्थेत आहे याला कुठे ना कुठे तू पण जबाबदार आहेस.
मिताली माझं चुकलं. उद्या डॉक्टर तुला डिस्चार्ज देतील मग आपण आपल्या घरी जाऊ . घरी गेल्यावर तुला बरे वाटेल. कोणत्या घरी कोणाच्या घरी? इतक्यात मिताली ची आई पण आली.
तिने मिताली आणि तन्मय चे बोलणे ऐकले होते. ती तन्मय ला म्हणाली, " जावयबापू थोडे दिवस मी मिताली ला आमच्या घरी घेऊन जाते. " मिताली ने एकदा शांत पणे आईकडे बघितले. ही माझी च आई आहे ना असा प्रश्न तिला पडला.
आई आणि तन्मय मी माझे काय ते बघेन तुम्ही दोघेही काळजी करू नका. तुम्हा दोघांना माझी किती काळजी आहे ते मल चांगलेेच कळले आहे. माझ्या कडे माझी सेव्हिंग आहे मी कुठे राहायचे ते माझे मी बघेन.
माझे माहेरचे घर हे माझ्या आईचे आहे आणि सासरचे घर हे तूझ्या आईचे आहे. लग्न झाले तेव्हा माहेरच्या घरचा हक्क संपला आणि सासरच्या घरावर तुझ्या आईने कधी कधी च मला हक्क सांगू दिला नाही. दोन दोन घर असून सुद्धा मी बेघरच आहे. त्यामुळे आता मी या दोन्ही पैकी कोणत्याच घरात राहायला येणार नाही आहे. मी माझ्या एका मैत्रिणीला सांगून भाड्याने एक घर बघितले आहे तिथेच मी रहायला जाणार आहे.


तन्मय मी माझा निर्णय झाला आहे. मी आता यापुढे तुझ्या सोबत नाही राहू शकणार. डिव्होर्स चे पेपर लवकर च मी तुला पाठवून देईल . मिताली प्लीज असे नको वागूस . अनय मी तुला किती दा बोलले प्लीज तन्मय माझे ऐकून घे. पण तु ऐकले का❓ एक विनंती होती मिताली, प्लीज तू ही केस मागे घे. आईला त्रास होतोय जेलच्या वातावरणाचा. अजिबात नाही घेणार. माझा मानसिक त्रास तुला दिसला नाही तन्मय प्लीज तू जा इथून.

दुसऱ्या दिवशी तिला डिस्चार्ज मिळाला. मितालीआपल्या भाड्याच्या घरी गेली. सोबत तिचे बाबा आले होते. मग दोघांनी जाऊन गरजेपुरते सामान घेतले. मिताली ने आपल्या जुन्या ऑफिस च्या बाॅसला कामा साठी विनंती केली. बाॅस खूप चांगल्या होत्या खरतर मिताली ने जेव्हा जॉब सोडायचा निर्णय घेतला होता तेच त्यांना आवडले नव्हते. मिताली सारखी हुशार आणि कामसू मुलगी त्यांना हवीच होती. त्यांनी मिताली ला सांगितले की, पुढच्या महिन्याच्या १ तारखेपासून तू जाॅईन करु शकतेस.
बाबा दोन दिवस मिताली बरोबर राहिले. जेव्हा त्यांना खात्री झाली की, मिताली खरोखरच आपल्या करिअर कडे फोकस करण्यासाठी तयार आहे. तेव्हा ते घरी गेले . पुढच्या च महिन्यात मिताली ने ऑफिस जाॅईन केले. आता ती आणि तन्मय रोजच एकमेकांसमोर येऊ लागली. पण मिताली तन्मय चे तोंड सुद्धा पाहत नव्हती. तन्मय ने विनंती केल्यामुळे मिताली ने केस मागे घेतली होती. त्या मुळे तन्मय ची आई जेलमधून सुटली होती. तन्मय डिव्होर्स पेपर साईन करत नव्हता. तन्मय आतून तुटत चालला होता. त्याला खूप पश्चात्ताप झाला होता. मिताली ने परत यावे म्हणून तो खूप प्रयत्न करत होता.
१ वर्षानंतर
मिताली ला प्रमोशन मिळाले होते त्यासाठी मिताली ने सगळ्या ऑफिस मधल्या लोकांना पार्टी दिली होती.तन्मय ला पण तिने बोलावले होते. तन्मय ला असे वाटत होते की, मिताली ला माझ्या बद्दल कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर वाटत असेल. तीला आता त्याची किव यायला लागली होती. त्याने मिताली ला एकदा त्याचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी विनंती केली. प्लीज मिताली एकदा माझं म्हणणं ऐकून घे. प्लीज एकदा त्यानंतर मी कधी च तुला नाही भेटणार. मी विचार करून सांगेन.
मिताली मग सुलभा ला फोन केला. तिला काय वाटते ते विचारले. सुलभा म्हणाली की, "एकदा भेटून घे त्याला. त्याच्या मनात काय आहे ते पण ऐक आणि तुझ्या मनात काय आहे ते पण सांग. " ठिक आहे. दुसऱ्या दिवशी ऑफिस सुटल्यावर बोलू असे सांगितले. त्याप्रमाणे दोघे ऑफिस सुटल्यावर भेटले. "हाय ,मिताली कशी आहेस?" मी ठीक आहे तन्मय . मला वाटतं आपण मुद्द्याच बोलूया का? तुला काय बोलायचे आहे ते मोकळ्या मनाने बोल.
" मिताली मी खरंच तुझा खूप मोठा अपराधी आहे. माझी खूप मोठी चूक झाली . मी तुझं काहीच ऐकून घेतलं नाही. पण त्या दिवशी मला माझी चूक समजली मी खूप चुकीचा वागलो तुझ्याशी .,त्याचा मला खूप पश्चात्ताप झाला होता मी त्या दिवशी तुझी माफी मागायला आलो होतो. पण ...तू त्या दिवशी ....
प्लिज मला माफ कर निशा. प्लीज मला माफ कर." मिताली ने तन्मय च बोलणं शांतपणे ऐकून घेतलं.
मिताली तन्मय ल म्हणाली," माझं तुझ्यावर खूप प्रेम होत तन्मय. किती स्वप्नं घेवून मी त्या घरात आले होते. तुम्हाला आपलं स करण्याचा मी खूप प्रयत्न केला. तुझ्या आई बाबांना मी माझेच आई बाबा समजत होते. मी खरंच अगदी मनापासून प्रयत्न करत होते. पण हळूहळू तुझ्या आईने माझ्या चुका काढायला सुरवात केली. मी त्यांचा मनासारखे वागण्याचा प्रयत्न करत होते त्या घरात अॅगजेस्ट करण्याचा प्रयत्न करत होते. पण हळूहळू माझी पण सहनशीलता संपली. तुझ्या आईला कदाचित तुझे माझ्या भोवती फिरणे आवडत नव्हते.
त्यांना इनसिक्यूर वाटत होते . तूला अनेकदा मी सांगण्याचा प्रयत्न केला .पण तू एकदा सूद्धा माझे ऐकून घेतले नाही. मी खूप एकटी पडत गेले. तन्मयपरत तेच सगळे काढून फक्त त्रास होतोय. आपली बाजू मांडायला मिळाली नाही आणि ती कुणी ऐकून ही घेतली नाही तर किती त्रास होतो हे मी अनुभवले आहे त्यामुळे तूला ही संधी दिली.
मी तुला माफ केलं . तू डिव्होर्स पेपर वर सही करून टाक आणि मोकळा हो . आपले नाते त्याच दिवशी संपले होते ज्या दिवशी तू माझी काहीही चूक नसताना माझ्यावर हात उचलला होतास. परत आपले नाते आता पहिल्यासारखे नाही होऊ शकत. मी निघते. असं बोलून निशा चालू लागली. तिच्या पाठमोऱ्या आकृती कडे अनय हताशपणे बघत होता.
मिताली ने सुलभा ला फोन केला .तीच आणि तन्मय च जे बोलणं झालं ते तिने सुलभा ला सांगितले. मिताली च्या निर्णयावरच ठाम होती.

अचानक उठून कोणी आत्महत्या करत नसत . त्यामागे बऱ्याच दिवसांपासून होणारी मानसिक कुचंबणा कारणीभूत असते. नशिबाने मिताली वाचली.पण नशीब दरवेळी साथ देईलच असं नाही. त्मयामुळे कोणताही निर्णय घेताना विचार करून घेणे गरजेचे आहे. जीवन पुन्हा पुन्हा मिळणार नाही. आपल आयुष्य आपण जगायचं आहे ते कोणासाठी वाया घालवायचे नाही. तीने निर्णय योग्य वाटतो कारण बहुतेक वेळा स्त्री ला गृहीत धरलं जातं ती आपल्या संसारासाठी खूपदा आपल्या आवडीला ,छंदाला मुरड घालून सासर वाचवण्याचा प्रयत्न करत असते पण तिचे प्रयत्न कोणाला दिसून येत नाहीत किव्हा दिसले तरी त्याकडे कानाडोळा केला जातो.

मिताली ने घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला? तुमच्यामते तिने काय निर्णय घ्यायला पाहिजे होता.तुम्हाला ही कथामालिका कशी वाटली नक्की सांगा. तुमचे अभिप्राय माझ्या साठी खूप महत्त्वाचे आहेत.



इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED