Aatmahatyes kaaran ki...- 1 books and stories free download online pdf in Marathi

आत्महत्येस कारण की.... - 1

मिताली रडत रडत भांडी घासत होती. आज पुन्हा तीचे आणि तन्मय चे भांडण झाले होते.
तन्मय ऑफिस ला निघून गेला. सासरे पेपर वाचत बसले होते. सासूबाई त्यांची आवडती सिरीयल बघत बसल्या होत्या. मिताली रडत रडत आपली कामे आवरत होती.
तन्मय चे आणि तीचे दर दोन दिवसांनी भांडण होत होते. बहुतेक वेळा भांडणाचं कारण सासूबाई होत्या. त्यांना तीने केलेले काहीच पसंत पडत नव्हते. मिताली खूप प्रयत्न करायची त्यांना खूष ठेवण्याचा. पण त्या काही खूष व्हायच्या नाही त. झोपलेल्या ला जागं करता येत पण झोपेचे सोंग घेतलेल्या माणसाला कसे जागे करणार.
सासूबाई तन्मय ला मिताली कशी कामचुकार आहे. हे त्या नेहमी दाखवून देत असत. आज त्यांनी मिताली ने आपल्याला थंड चहा दिला म्हणून कांगावा केला.
त्यावरून त्या दोघांचे भांडण झाले. खरतर मिताली ने सासूबाई ना गरमागरम चहाच दिला होता. तो चहा तसाच ठेवून त्या पेपर वाचत बसल्या. तो पर्यंत तो चहा थंड झाला.तो थंड झालेला चहा त्यांनी तन्मय ला दाखवला. मग तन्मय पण नेहमीप्रमाणे मिताली ला जाब विचारण्यासाठी गेला.

तन्मय, " मिताली तू आईला थंड चहा दिलास. "

मिताली, " मी त्यांना गरमच चहा दिला होता. पण त्यांनी तुला तो थंड झाल्यावर दाखवला. "

तन्मय, " म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की, आईने मुद्दाम असे केले. "
इतके दिवस मिताली सगळे गुपचुप सहन करत होती. तिची चूक नसताना पण ऐकून घेत होती. पण आता तिची सहनशक्ती संपली होती. ती तन्मय ला म्हणाली, " हो, त्या मुद्दाम असे करत आहेत. "
इतक्यात तीच्या सासूबाई तिथे आल्या ज्या इतका वेळ त्यांचे बोलणे ऐकत होत्या. त्या मिताली ला म्हणाल्या, " हो गं बाई. तू अगदी सत्याची मुर्ती आहेस ना. मीच खोटे बोलत होते. इतकी वर्षे मी राबराब राबले. म्हटलं आता सून आली आहे तर तिच्या हातचं गरमागरम खायला मिळेल. जरा जीवाला आराम मिळेल. पण नाही. एवढं कुठलं आमचं नशीब. असे म्हणून त्या रडू लागल्या. " त्यांना रडताना बघून तन्मय चा जीव कासावीस झाला. माझ्या बायको कडुन खूप मोठी चूक झाली आहे असेच त्याला वाटायला लागले.. मागचा पुढचा कसलाच विचार न करता. तन्मय ने मिताली च्या कानाखाली मारली. अचानक त्याच्या अशा वागण्यामुळे मिताली पण भांबावून गेली. तन्मय तसाच ऑफिस ला निघून गेला. आपण आपल्या बायकोवर हात उचलला . याच्याबद्दल त्याला अजिबात वाईट वाटले नाही. तो ऑफिस ला निघून गेल्यावर सासूबाई टिव्ह बघायला गेल्या. त्यांची आवडती सिरीयल लागली होती ती बघत बसल्या. सासरे पेपर वाचत बसले. ते सगळे बघत होते. पण एका शब्दाने पण सासूबाई ना बोलत नव्हते. मिताली रडत रडत आपली कामे आवरत होती. इतकं करून सुद्धा सगळे तिच्या कामाला नावच ठेवत होते. मिताली च्या रडण्याचा कोणावरही परीणाम होत नव्हता. काही झाले च नाही असं ते वागत होत.
मिताली च्या लग्नाला एक वर्ष पण पूर्ण झाले नव्हते. सासूबाई तीचा एवढा राग का करत होत्या तिला कळेनासे झाले होते. त्या सतत तीला छोट्या मोठ्या गोष्टी वरून टोकत बसायच्या. सारख्या सारख्या तीच्या चुका काढत असायच्या. तन्मय ला तुझी बायको किती बावळट आहे हे दाखवून द्यायचा. त्यामुळे मिताली आणि संजय मध्ये सतत भांडण होत.. मिताली बरोबर त्याचा अबोला वाढला. मिताली ने खूप वेळा त्याला समजावून सांगायचे प्रयत्न करायची. पण तो काही ऐकूनच घेण्याचा प्रयत्न पण नाही करायचा.
आपल्या बायको ने माझ्या आईवडीलांना दुखावले आहे. मिताली ला एकट पडल्या सारखे वाटत होते.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED