आत्महत्येस कारण की.... - 2 Shalaka Bhojane द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आत्महत्येस कारण की.... - 2

भाग २ सासूबाईंना खूष ठेवण्याचा सतत प्रयत्न करत असायची.पण त्या सतत तीच्या चूका काढून तन्मय ला तुझी बायको कीती बावळट आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न करत असायच्या.त्यामुळे मिताली आणि तन्मय मध्ये सतत भांडणे होवू लागली. मिताली बरोबरचा त्याचा अबोला वाढला. मिताली ने खूपदा त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.पण तन्मय ला वाटायचे की ती त्याला भडकवत आहे.मिताली आणि तन्मयय चे लव मॅरेज होते. दोघे एकाच ऑफिस मधे कामाला होते. तन्मय ला मिताली बघताक्षणी आवडली होती.‌मिताली दिसायला सुंदर होती . मिताली ला‌पण तन्मय आवडला होता . तन्मय सुद्धा दिसायला खूप सुंदर होता. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघेही सूजाण होते . दोघांनीही आपापल्या घरी सांगितले आणि घरच्यांनी ही काही आड काठी न आणता ‌त्यांच्या लग्नाचा बार उडवून दिला.
सुरवातीचे दिवस खूप छान चालले होते. मितालीला‌ आपल्या भाग्याचा हेवा वाटत होता. दोघेही एकत्र कामाला जात येत. दोघेपण खूप खूष होते. पण दोनतीन महिन्यांनी सासूबाईंनची कुरबूर सूरु झाली. सून आली तरी आमची कामं काही सुटत नाही.घरची कामं करून मी कशी थकते हे सारख्या त्या तन्मय ला सांगत . त्यावर मिताली म्हणाली की ,आपण कामवाली बाई ठेवू तर ते पण त्यांना मंजूर नव्हते. शेवटी हो नाही करत अनय च्या म्हणण्यानुसार मिताली ने नोकरी सोडली.तरीही सासूबाईं काही खूष झाल्या नाहीत. तिला काही ना काही टोमणे मारत असत. पण तन्मय आला की वेगळ्याच वागत त्यामुळे तन्मय ला ती काही सांगायला गेली की त्याला काही ते खरे वाटत नसे.मिताली ने तिच्या ‌आईशी ही या विषयावर बोलण्याचा प्रयत्न केला पण आईने तिला सांगितले की,तू तुझ्या आवडीने तन्मय शी लग्न केलं आहे स. त्यामुळे आता हे सगळं स्विकार कर आणि तिथेच खूष रहा.
काय करावे ‌यावर कसा मार्ग काढावा‌ मितालीला काही च कळत नव्हते तन्मय ला सांगायला जावे तर तो काही ऐकूनच घेत नव्हता . ज्या माणसासाठी तिने आपले माहेर सोडले, आपला जॉब सोडला तोच तिला समजून घेत नव्हता तर बाकीचे कसे घेतील? मिताली ची आतल्या आत खूप घुसमट होत होती. बाहेरून दिसायला खूप छान वाटत होते. मिताली खूप सुखी आहे असेच बघणाऱ्याला वाटत होते. पण मिताली चे दुःख मिताली ला च माहीत. पण कितीही भांडण झाली तरी तन्मय ने कधीच तिच्यावर हात उचलला नव्हता. मिताली च्या मनाला खूप यातना होत होत्या. मिताली ने काहीतरी मनाशी ठरवलं आणि ती सासूबाई आणि सासऱ्याच्या खोलीत गेली . तिथे सासाऱ्यांच्या झोपेच्या गोळ्यांची बाटलीतून थोड्या गोळ्या तिने काढून घेतल्या आणि ती किचन मधे आली तिचे हात थरथरत होते. पण आज जे तन्मय जे वागला होता त्याने तिच्या स्वाभिमानाला ठेच पोहचली होती. इतकं शिक्षण घेवून आपण घरातली कामं करत बसलोय आणि नवऱ्याचा मार खात आहोत. ह्या साठी का आपल्या आईबाबांनी आपल्याला शिकवलं असे अनेक विचार तिच्या मनात आले. आणि तिने मागचा पुढचा काहीही विचार ना करता त्या गोळ्या खाल्ल्या.
तन्मय आज खूप उपसेट आहे हे त्याच्या ऑफिस मधील मित्राने म्हणजेच जय ने ओळखले. टिफीन खाता खाता जय ने तन्मय ला विचारलें की , "काय झाले आहे. "तन्मय ने पण त्याला सगळा प्रकार थोडक्यात सांगितला. जय ने तन्मय ला समजावले की, "घर संसार म्हटल्यावर हे सगळं होणारच. ती तुझ्यासाठी त्या घरात आली आहे. तिला पण तू समजुन घेतले पाहिजे." जय च्या बोलल्यामुळे तन्मय ला पण त्याची चूक समजली.घरी जाताना मिताली साठी काहीतरी तिच्या आवडीचे घेवून जायचे तन्मय ने ठरवले.
संध्याकाळी निघतांना तन्मय ने निशा च्या ‌आवडिचे चॉकलेट आईस्क्रीम घेतले. तन्मय ला जाणवले की खूप दिवस झाले आपण मिताली ला घेऊन कुठे फिरायला पण नाही नेले. रात्री चे साडेसात वाजले तरी मिताली अजून तिच्या खोलीत च होती. सासूबाईंनी पण तिला उठवले नाही की तिच्या खोलीत जाऊन बघितले नाही. त्यांना एक बहाणाच मिळाला होता.तन्मय ला मिताली विरूद्ध भडकवण्याचा. टि.व्ही . चालू होता पण त्यांचे लक्ष सारखे दारातच लागले होते. कधी एकदा तन्मय येईल आणि कधी एकदा मिताली ची तक्रार करेन असे त्यांना झाले होते.
तन्मय ला राहून राहून खूप वाईट वाटत होते. आपण मिताली वर असा हात उचलायला नको होता; असे त्याला वाटत होते. मिताली ची माफी मागायची आणि तिला घेऊन चार दिवस कुठेतरी जाऊन येऊया असे त्याने ठरवले. त्याच विचारात तो घरी आला. घरी आल्या आल्या आईने मिताली अजून उठली नाही आहे हे सांगितले . आम्हाला ‌अजून चहा पण नाही दिला".‌मग तु का नाही केलास चहा तिची तब्येत ठीक नसेल.ती नव्हती तेव्हा तू सर्व कामे करायची स ना?मग आता फक्त चहा करायला काही हरकत नाही की." असे म्हणून तन्मय त्यांच्या खोलीत गेला. मिताली झोपली होती .तो तिच्या जवळ गेला तिच्या डोक्यावरून त्याने प्रेमाने हात फिरवला. तो मिताली ला उठवू लागला. पण मििताली काही उठली ‌नाही. जोरजोरात तिला हलवू लागला पण मििताली काही उठली नाही. आता त्याला भिती वाटू लागली. इतक्यात त्याची नजर बाजूलाच असणाऱ्या टेबलावर गेली. तिथे त्याच्या बाबांच्या झोपेच्या गोळ्यांची बाटली होती, त्याने ती बाटली उघडून बघितली तर ती रिकामी होती. त्याने लगेच बाबांना हाक मारली. बाबा आणि आई लगेच आतमध्ये आले.तन्मय ने त्यांना विचारले की, बाटली त किती गोळ्या शिल्लक होत्या बाबा म्हणाले सात आठ गोळ्याच शिल्लक राहिल्या होत्या.
तन्मय धावतच बिल्डिंग च्या बाजूला च असणाऱ्या क्लिनिक मध्ये गेला मिताली ने बहुतेक झोपेच्या गोळ्या घेतल्या चे सांगितले. डॉक्टरांनी पटकन ॲम्ब्यूलन्स बोलवायला सांगितली. डॉक्टरांनी मिताली ला तपासले मिताली चा श्वास चालू होता पण तो मंद होता. थोड्याच वेळात ॲम्ब्यूलन्स आली आणि मिताली ला घेऊन अनय हॉस्पिटल ला पोहचला. पण पोलीस केस असल्यामुळें डॉक्टरांनी पोलिसांना बोलावले.डॉक्टरांनी मिताली ला आय. सी. यू. मध्ये नेले.

मिताली वाचेल का ❓हे पाहुया पुढील भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला. हे आपल्या प्रतिक्रिये द्वारे कळवायला विसरु नका. तुमच्या समिक्षा माझ्या साठी अनमोल आहेत.