डॉक्टर सुरेंद्र हे सरकारी डॉक्टर असल्यामुळे भानपूर नावाच्या गावात त्यांची बदली झाली होती,त्यामुळे ते व त्यांची पत्नी सुधा हे दोघे सरकारी संस्थेने ने दिलेल्या एका बंगल्यात राहायला आले. बंगल्यासमोर डॉ. सुरेंद्र यांची रिक्षा थांबली,डॉ. व त्यांची पत्नी सुधा सामान घेऊन खाली उतरले,खाली उतरल्या उतरल्या सुधाची नजर बंगल्याच्या नावकडे गेली, 'चाहूल' असं बंगल्याचं नाव होतं, त्याकडे बघून सुधा म्हणाली, " नाव जरा विचित्रच वाटते, नाही!" डॉ सुरेंद्र नी एकदा तिच्याकडे आणि एकदा घराच्या नावाकडे बघितलं आणि रिक्षाला पैसे चुकते करून चलाss असं हाताने चलण्याची खूण करून म्हंटल. सुधाने घराचं फाटक उघडलं तसे त्या फाटकाने मोठयाने करकर आवाज केला. थोडं दचकतच सुधा सुरेंद्र बंगल्यात शिरले, आत शिरल्या शिरल्या बंगल्याच्या उजव्या बाजूला मोठ्ठा झोपाळा होता,तो बघून सुधाला आनंद झाला. तिने सुरेंद्र ला म्हंटल, "किती छान झोपाळा आहे ! खूप मोठा!" "कमाल आहे तू सुधा! अजूनही लहानमुलींसारखा आनंद होतो तुला झोका बघून ", डॉ सुरेंद्र हसत म्हणाले.

Full Novel

1

झोका - भाग 1

डॉक्टर सुरेंद्र हे सरकारी डॉक्टर असल्यामुळे भानपूर नावाच्या गावात त्यांची बदली झाली होती,त्यामुळे ते व त्यांची पत्नी सुधा हे सरकारी संस्थेने ने दिलेल्या एका बंगल्यात राहायला आले.बंगल्यासमोर डॉ. सुरेंद्र यांची रिक्षा थांबली,डॉ. व त्यांची पत्नी सुधा सामान घेऊन खाली उतरले,खाली उतरल्या उतरल्या सुधाची नजर बंगल्याच्या नावकडे गेली, 'चाहूल' असं बंगल्याचं नाव होतं, त्याकडे बघून सुधा म्हणाली, नाव जरा विचित्रच वाटते, नाही! डॉ सुरेंद्र नी एकदा तिच्याकडे आणि एकदा घराच्या नावाकडे बघितलं आणि रिक्षाला पैसे चुकते करून चलाss असं हाताने चलण्याची खूण करून म्हंटल.सुधाने घराचं फाटक उघडलं तसे त्या फाटकाने मोठयाने करकर आवाज केला. थोडं दचकतच सुधा सुरेंद्र बंगल्यात शिरले, आत ...अजून वाचा

2

झोका - भाग 2

झोका एका लयीत कर्रर्रर्रर कर्रर्रर्रर्र आवाज करत मागे पुढे हलत होता,जसं काही कोणी त्यावर बसून झोके घेतेय,पण झोक्यावर तर दिसत नव्हतं, ते विचित्र दृश्य बघून सुधाला दरदरून घाम फुटला, झोक्याने आता वेग घेतला होता,जोरजोरात झोका मागे-पुढे हलत होता.कुssssssकूsss दुरून कोल्ह्याचं रडणं ऐकू येत होतं,रात्रीच्या त्या निरव शांततेत ते रडणं भीषण वाटत होतं.तेवढयात अचानक एक काळी मांजर सुधा ज्या खिडकीत उभी होती त्या खिडकीत येऊन बसली,आणि चित्रविचित्र आवाज काढू लागली,ती मांजर एकटक सुधाकडेच बघत होती,सुधाला तिची किळस आली तिने लगेच खिडकी लावून घेतली.सुधा बेडरूम मध्ये आली तर सुरेंद्र झोपेतच होता,उद्या ह्याला सकाळीच दवाखान्यात जायचंय तेव्हा आत्ता उठवण्यापेक्षा उद्या सकाळीच सगळं ...अजून वाचा

3

झोका - भाग 3

पुन्हा एकदा फाटक वाजलं. "कोण आलं पहा बरं गुंजा! ",सुधा म्हणाली"हा बगते!",असं म्हणून गुंजा बाहेर आली, फाटकाजवळ खंडू उभा त्याच्याजवळ जाऊन गुंजा म्हणाली," इकडं कशे आलं धनी, काई काम हाय काय?"तिच्या कानाजवळ तोंड नेऊन खंडू तिच्या कानात काहीतरी पुटपुटला, ते ऐकून तिने झोक्याकडे विस्फारल्या नजरेने बघत तोंडाला हात लावला,"या बया! खरं सांगतासा की काय?""सोळा आने खरं हाय! हे घे ",असं म्हणून त्याने एक पिशवी तिच्या हातात दिली."हे काय हाय?",गुंजा"हे मंतारलेलं पीठ हाय", असं म्हणून त्याने परत एकदा तिच्या कानात काहीतरी सांगितलं आणि वापस जाताना तो म्हणाला," ध्यान ठिउन करजो बरं मी जे सांगतलं ते"गुंजा एकदा झोक्याकडे आणि एकदा पिशवी ...अजून वाचा

4

झोका - भाग 4

सुधाने फोन उचलला. "हॅलो",सुधा"हॅलो सुधा नीट ऐक, आज रात्री मला इथेच राहावं लागेल, इमर्जन्सी केस आहे त्यामुळे मी उद्या येईल घरी. रात्री सोबतीला गुंजाला बोलावून घे, मी खंडूला सांगून ठेवतो.जास्त विचार न करता लवकर झोपून जा,उद्या सकाळी येतोच मी लवकर,ठीक आहे!",सुरेंद्रसुधा ला क्षणभर काही सुचलंच नाही काय बोलावं ते."अगं सुधा! ऐकतेय न! तुझ्याशी बोलतोय मी!",सुरेंद्र"अं हो हो, ठीक आहे",सुधा पलीकडून फोन ठेवल्याचा आवाज आला."काय झालं वैणीसायेब? कोनाचा व्हता फोन?",गुंजा"अगं डॉक्टरांचा, ते आज रात्री येऊ शकणार नाहीत घरी, इमर्जन्सी आहे हॉस्पिटलमध्ये, तू येशील का सोबतीला माझ्या आज रात्री",सुधा "बापरे! रातीला! तसं भेव वाटते मले पन तुमच्या संगतीला येतो, आज रातभर ...अजून वाचा

5

झोका - 5 - (अंतिम)

खंडूचा मोठ्ठा आवाज ऐकून पळतच गुंजा बाहेर आली आणि त्यामागून सुधाही आली. त्यांनी बघितलं तर खंडू दहा फुटावर उताणा होता. गुंजा धावतच त्याच्या जवळ गेली. त्याने कमरेला हात लावला होता,त्याच्या हाताचे कोपरे खरचटले होते."काय झालं धनी, अशे कशे पडले तुमी हितं",गुंजा त्याला उठण्यासाठी आधार देत म्हणाली.पण खंडू काही बोलण्याच्या अवस्थेत नव्हता. सुधाने आतून पटकन त्याला पाणी आणून दिले. त्याने थोडं पाणी पिलं आणि व्हरांड्यात येऊन भिंतीला टेकून तो बसून राहिला. इतक्यात सुधा,गुंजा आणि खंडू चे लक्ष झोक्याभोवती पसरवल्या पिठाकडे गेलं, त्या पिठावर पावलं उमटत होते, जसजसे पिठावर पावलं उमटत होते तसतसे ते पीठ काळे ठिक्कर पडत होते. ते पावलं ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय