इकडे आड तिकडे विहीर शब्दशः(अक्षरशः) अर्थ: ह्या बाजूला आड आहे आणि त्याबाजूला बघितलं तर विहीर आहे त्यामुळे कुठे जावं कळत नाही,दोन्ही बाजूला जायला रस्ता नाही. गर्भितार्थ(लाक्षणिक अर्थ): चहूबाजुनी अडचणी आल्याने कोणता निर्णय घ्यावा हे न कळणे कुठला उपाय करावा हे न कळण्याची परिस्थिती निर्माण होणे. द्विधा मनस्थिती होणे कोणता निर्णय घ्यावा हे न कळणे.वरील म्हणीवर आधारित कथा: कथा क्रमांक एकरजत आणि पालवी चं लग्न झालं. दोघे एकाच कंपनीत काम करत असल्याने त्यांचं लव्ह मॅरेज झालं असंही म्हणता येईल.दोघांच्या घरून काही विरोध नव्हता पण रजत च्या आईला नोकरी न करणारी सून हवी होती परंतु रजत पुढे त्यांचं काही चाललं नाही. "रजत

1

आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट

कृतिका चे लग्न होऊन जेमतेम दोन महिने झाले होते.तिच्या सासरी महालक्ष्मी चा सण होता. सगळे जण तयारीला लागले होते. सासरी तिचे सास, सासरे, पती आणि तिच्याच वयाची नणंद असे सगळे होते.सासूबाई कृतिकाला हाताशी घेऊन जय्यत तयारीला लागल्या."सूनबाई जरा ते लॉफ्ट वरचे पुरण यंत्र काढून दे बरं",कृतिकाच्या सासूबाई"हो सासूबाई",कृतीकाखरं तर पुरण यंत्र घरच्या एखाद्या पुरुषाने काढून दिलं असतं तरी चाललं असतं पण सासूबाईंना कृतिकाच्याच कडून सगळे कामं करून घ्यायचे होते.कृतिकाने स्टूल वर चढून पुरण यंत्र काढून दिलं"सूनबाई ह्या भाज्या चिरून दे""हो सासूबाई""सूनबाई हे लसूण निवडून दे""हो सासूबाई""सूनबाई हे पुरण यंत्रातून काढून दे""सूनबाई ही डाळ वाटून दे""सूनबाई हे वडे तळून घे"अश्या ...अजून वाचा

2

आगीतून फुफाट्यात

अर्थ: एका संकटातून सुटका होत नाही तोवर दुसऱ्या संकटात सापडणे.शैलजा आज बऱ्याच दिवसांनी मोकळी हसत होती. शरद शी लग्न तर घटस्फोट घेतल्यावरही काही महिने ती उदासच दिसायची. शरद आणि शैलजा चे लव्ह मॅरेज. एकाच मेडिकल कॉलेजमध्ये ते शिकले आणि एकाच हॉस्पिटलमध्ये ते प्रॅक्टिस करत असत. शैलजा स्त्रीरोगतज्ज्ञ होती तर शरद बालरोगतज्ज्ञ होता. एकमेकांना पूरक असे त्यांचे व्यवसाय असल्याने आणि एकंदरीत दोघांना आपले स्वभाव जुळतात असं वाटल्याने दोघांनी लग्न करण्याचा निर्णय केला आणि एका शुभ मुहूर्तावर ते दोघे विवाहबद्ध झाले.लग्न झाल्यावर शैलजाला शरद च्या वागण्यात कमालीचा फरक जाणवू लागला.आधी तिच्या कामाची प्रशंसा करणारा शरद तिच्या वाढत्या प्रॅक्टिस वर जळू लागला.शरद ...अजून वाचा

3

असतील शिते तर जमतील भुते

अक्षरशः(शब्दशः) अर्थ: जिथे अन्नाचे कण पडलेले असतात ते खाण्याच्या मोहाने भुतं तिथे येऊन जमा होतात. गर्भितार्थ(लाक्षणिक अर्थ): जिथे काही होण्याची शक्यता वाटते तिथे लोभी लोकं आपोआप गोळा होतात. एका गावात एक प्रसिध्द वकील राहत असत. प्रल्हाद पंत म्हणून ते गावात ओळखल्या जात. बायकोच्या पश्चात ते एकटेच आपल्या घरी राहत असत. त्यांना दोन अपत्ये होते. मोठी मुलगी तिच्या नवऱ्याची नोकरी परदेशी असल्याने परदेशी स्थायिक झाली होती. आणि धाकटा मुलगा हा शिक्षण घेण्यासाठी शहरात राहत असे. शहरात शिक्षण घेतल्यावर आहे ते शिक्षण अपुरं आहे असं त्याला वाटल्याने तो वर्षभर उच्चशिक्षणासाठी परदेशी गेला. त्यामुळे प्रल्हादपंतांना नोकरांच्या भरवश्यावर गावी असलेल्या घरात एकटंच राहावं ...अजून वाचा

4

म्हणींच्या कथा - इकडे आड तिकडे विहीर

इकडे आड तिकडे विहीर शब्दशः(अक्षरशः) अर्थ: ह्या बाजूला आड आहे आणि त्याबाजूला बघितलं तर विहीर आहे त्यामुळे कुठे जावं नाही,दोन्ही बाजूला जायला रस्ता नाही. गर्भितार्थ(लाक्षणिक अर्थ): चहूबाजुनी अडचणी आल्याने कोणता निर्णय घ्यावा हे न कळणे कुठला उपाय करावा हे न कळण्याची परिस्थिती निर्माण होणे. द्विधा मनस्थिती होणे कोणता निर्णय घ्यावा हे न कळणे.वरील म्हणीवर आधारित कथा: कथा क्रमांक एकरजत आणि पालवी चं लग्न झालं. दोघे एकाच कंपनीत काम करत असल्याने त्यांचं लव्ह मॅरेज झालं असंही म्हणता येईल.दोघांच्या घरून काही विरोध नव्हता पण रजत च्या आईला नोकरी न करणारी सून हवी होती परंतु रजत पुढे त्यांचं काही चाललं नाही. रजत ...अजून वाचा

5

थेंबे थेंबे तळे साचे

अर्थ:- थेंब थेंब साठत गेला की हळूहळू एक दिवस त्यातून तळे निर्माण होईल एवढं पाणी साठते. थोडं थोडं साठवत की एकदिवस त्याचा मोठा संचय होतो मग ते पाणी असो पैसे असो वस्तू असो किंवा आणखी काही त्यावर आधारित कथा:- एका गावी दोन मित्र राहत होते राम आणि श्याम. ते फक्त एकमेकांचे मित्र नसून शेजारी सुद्धा होते. ते सोबतच शाळेत जायचे सोबतच खेळायचे अगदी जीवश्च कंठश्च मित्र होते ते. त्या दोघांचे वडील त्यांना शाळेत जाताना रोज गोळ्या बिस्किटं खाण्यासाठी किंवा पेन पेन्सिल आणण्यासाठी पाच रुपये द्यायचे. शाम रोजच्या रोज ते पाच रुपये खर्च करून टाकायचा पण राम मात्र त्यातील तीन ...अजून वाचा

6

तेल गेलं तूप गेलं हाती राहिलं धुपाटण

तेल गेलं तूप गेलं हाती राहिलं धुपाटणे शब्दशः(अक्षरशः)अर्थ:- धुपाटणं म्हणजे ज्यात आपण धूप लावतो त्यात खाली आणि वर दोन्ही धूप लावायला जागा असते आणि मध्येत धरायला हँडल असते. तर असं धुपाटणं घेऊन एक माणूस किराणा दुकानात जातो आणि तेल मागतो तेल घ्यायला तो धुपाटणं पुढे करतो मग तूप मागतो आणि तूप घ्यायला तेच धुपाटणं उलटं करतो आणि आणि तूप घेतो. जेव्हा त्याला कळते की तूप घेण्याच्या नादात तेल सांडलं आहे तेव्हा ते बघायला तो पुन्हा धुपाटणं उलटं करतो त्यामुळे तूपही सांडते आणि अश्याप्रकारे तेलही जाते तूपही जाते आणि हाती राहते धुपाटणे.गर्भितार्थ(लाक्षणिक अर्थ):- दोन्ही बाजूने नुकसान होऊन हाती काहीच न ...अजून वाचा

7

उथळ पाण्याला खळखळाट फार

एका जंगलात एकमेकांजवळ दोन वृक्ष वाढलेले होते. एक झाड होतं उंचच उंच खजुराचे तर दुसरे झाड होते घेरदार,डेरेदार बेल त्याच जंगला जवळ एक गाव वसलेलं होतं. त्याचे नाव होते सज्जनपूर. सज्जन पूर मध्ये दोन पंडित राहत असत. एकाचे नाव होते कृष्णकांत तर दुसऱ्याचे नाव होते रमाकांत.कृष्णकांत रोड उंच आणि शिडशिडीत देहाचा होता तर रमाकांत हा जरा स्थूल देहाचा होता.रमाकांत च्या हाताखाली चार आणि कृष्णकांत च्या हाताखाली चार असे एकूण आठ शिष्य त्यांच्या आश्रमात शिकायचे. रमाकांत ची गालातल्या गालात हसण्याची लकब होती तर कृष्णकांत ची नाकात बोलायची लकब होती. रमाकांत पन्नास वर्षांचा होता तर कृष्णकांत साठीचा होता.रमाकांत अत्यंत संयमी,नम्र आणि ...अजून वाचा

8

घरोघरी मातीच्या चुली पळसाला पाने तीन

शब्दशः(अक्षरशः) अर्थ:- सगळीकडे मातीच्याच चुली असतात कोणाकडे लाकडाची कोणाकडे लोखंडाची असे नसते. किंवा कुठेही गेलं तरी पळसाला तीनच पानं लाक्षणिक अर्थ(गर्भितार्थ):- इथून तिथून सगळीकडची परिस्थिती सारखीच असते आणि मानवी स्वभाव थोडया फार फरकाने सारखाच असतो. त्यावर आधारित कथा:- या उन्हाळाच्या सुट्टीत रमा आत्याच्या मुलाचं लग्न होतं त्यामुळे सगळे पाहुणे गावी तिच्या घरी जमले होते. रमा आत्या मोठी आणि शामा आत्या धाकटी अश्या मला दोन आत्या आहेत. आणि रमेश काका माझे धाकटे काका आहेत. रमेश काकांना एकच मुलगी आहे नीता तिचं नाव ती साधारण माझ्याच वयाची आहे. रमा आत्याकडेचे हे शेवटचेच कार्य कारण राकेश चे लग्न झाले होते त्याला तर ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय