सर येते आणिक जाते

(13)
  • 42.8k
  • 0
  • 21.1k

प्रथमा ही आजच्या पीढ़ीतिल मॉडर्न , नव्या विचारांची आणि टेक्नोलॉजी सोबत चालणारी आणि स्वतःला नेहमी अद्ययावत ठेवणारी मुलगी होती... स्वतःविषयी तसेच स्वतःच्या जमेच्या बाजूंविषयी कमालीचा आत्मविश्वास बाळगणारी आणि स्वतःच्या कमकुवत बाजूंना मजबूत करण्याचा सतत प्रयत्न करत राहणारी... विषय वेगळा, महितीमधील नसेल तर चिकाटीने तो आत्मसात करणारी, त्यासाठी वाटेल ती धडपड करणारी स्वतःला माहिती असलेल्या गोष्टी इतरांना समजून घेण्यास मदत करणारी, सर्वांच्यात मिळून मिसळून राहणारी, पण तरीही कधीतरी एकांतात हरवून जाणारी, स्वतःचा सहवास आणि त्याचा वेगळा अनुभव उपभोगणारी, जगणारी अशी ती होती.

1

सर येते आणिक जाते - 1

प्रथमा ही आजच्या पीढ़ीतिल मॉडर्न , नव्या विचारांची आणि टेक्नोलॉजी सोबत चालणारी आणि स्वतःला नेहमी अद्ययावत ठेवणारी मुलगी होती...स्वतःविषयी स्वतःच्या जमेच्या बाजूंविषयी कमालीचा आत्मविश्वास बाळगणारी आणि स्वतःच्या कमकुवत बाजूंना मजबूत करण्याचा सतत प्रयत्न करत राहणारी...विषय वेगळा, महितीमधील नसेल तर चिकाटीने तो आत्मसात करणारी, त्यासाठी वाटेल ती धडपड करणारीस्वतःला माहिती असलेल्या गोष्टी इतरांना समजून घेण्यास मदत करणारी, सर्वांच्यात मिळून मिसळून राहणारी, पण तरीही कधीतरी एकांतात हरवून जाणारी, स्वतः ...अजून वाचा

2

सर येते आणिक जाते - 2

आता प्रथमा नवीन ऑफिसमध्ये चांगलीच रुळली होती. नवीन दैनंदिनी, वातावरण याची तिला बऱ्यापैकी सवय झाली होती. धरा आणि ती काही दिवसांतच खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या. ऑफिसमध्ये जवळ जवळ आठ तास त्या एकत्र घालवत होत्या. त्यामुळे साहजिकच त्यांना नवीन ऑफिसमधील नाविन्य आता कमी जाणवत होते.त्यांच्या ट्रेनिंगचा शेवटचा टप्पा चालू होता. आज उद्यात बहुधा सगळ्यांचे प्लेसमेंट होणार होते. प्रथमा आणि धराला आपण दोघींनी एकाच प्रोजेक्टमध्ये जावे असे वाटत होते. त्यासाठी त्या दोघीही हाताची दोन बोटे क्रॉस करून(फिंगर ...अजून वाचा

3

सर येते आणिक जाते - 3

प्रथमाचे नवीन ऑफिस मधील ट्रेनिंग आणि सिलेक्शनचे सुरवातीचे दिवस अतिशय छान गेले होते. आता नवीन प्रोजेक्ट, ज्यात तिचे सिलेक्शन होते तेथील दिवसही छान जातील अशी तिला खात्री होती. फार क्वचितच केव्हा तरी नकारात्मक विचार तिच्या डोक्यात येत असत. अन्यथा प्रत्येक गोष्टीचा सकारात्मक विचार करून त्याचे फक्त सकारात्मक पैलू बघण्यात तिला रस असे.आज वीकएंडची सुरुवात झाल्यामुळे, प्रथमा व तिची आई मनसोक्त गप्पा मारत बसल्या होत्या. तिच्या आईचे विचार तिला नेहमीच प्रोत्साहित करत असत. तिची आई तिला नेहमी सांगायची की "आयुष्यातील प्रत्येक उतार-चढाव हा आपल्या आंतरिक शक्तीच्या बळावरच सर करता येतो. आणि ते ज्याचे त्याने करायचे असते. ते करण्यासाठी स्वतःला इतके ...अजून वाचा

4

सर येते आणिक जाते - 4

प्रथमाचा कॉलेजचा आख्खा ग्रूप मस्त तयारी करून संपूर्ण दिवस मजा मस्ती करण्याच्या दृष्टीने सज्ज होऊन तिला सहलीला सोबत घेऊन तिच्या घराबाहेर गाडी घेऊन तिची वाट पाहत थांबला होता. समन्वयीने प्रथमाला कॉल केला. प्रथमा वेळेची किती पक्की होती हे सर्वांना माहित होते. त्यामुळे दुसऱ्याच रिंगला प्रथमाने फोन उचलला आणि पुढच्या दोन मिनिटांत ती आणि तिची आई गेटपशी उभ्या होत्या.प्रथमाने सगळ्यांना हाय केले. तितक्यात समन्वयीने गाडीचा दरवाजा आतून उघडला. प्रथमाने आपला बॅगपॅक गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवून डिक्की बंद केली आणि मधल्या सीटवर, समन्वयीच्या शेजारी येऊन बसली. प्रथमाची आई तिला सी ऑफ करण्यासाठी घराच्या गेटपाशी उभी होती. आईला बाय करून प्रथमा डिटॉक्स, रिजुविनेट ...अजून वाचा

5

सर येते आणिक जाते - 5

ट्रेकिंग इन्स्ट्रक्टर त्यांना मार्गदर्शन करत होते. ते जे जे आणि जसे जसे सूचना करत होते त्याप्रमाणे सर्वजण त्या इन्स्ट्रक्शनस्, प्रत्येक बारीक सूचना लक्ष देऊन ऐकत आणि फॉलो करत होते. ट्रेक सुरू करण्यापूर्वीच इन्स्ट्रक्टरने सर्वांना चढाई संदर्भात सर्व प्रकारची पूर्वकल्पना दिली होती. या ट्रेकमध्ये साधारण किती वेळ लागेल, किती कठीण गोष्टी आणि अडथळ्यांचा सामना करावा लागेल, आपली स्ट्रेंथ, इच्छाशक्ती कुठे कुठे पणाला लागू शकेल, तसेच कोणाला त्रास झाला किंवा काही इमर्जन्सी निर्माण झाली तर फर्स्ट एड टीमला त्वरित संपर्क कसा करायचा आणि इन्स्ट्रक्टर पर्यंत गोष्टी सप्लाय चेन द्वारे शक्य तितक्या वेगाने कशा पोहोचवायच्या वगैरे वगैरे...सर्वांना एक चढाईचा नकाशा बनवून देण्यात ...अजून वाचा

6

सर येते आणिक जाते - 6

सहल अगदीच छान आणि एकंदरीत ठरविल्याप्रमाणे पार पडली होती. प्रथमाचा कामाचा क्षीण या सहलीमुळे कुठल्या कुठे पळून गेला होता. ती नव्या जोमाने नवीन ऑफिसच्या आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सज्ज होणार होती.घरी येऊन आईला सहलीबद्दल संपूर्ण माहिती दिली. आईलाही प्रथमाचा उत्साहाने द्विगुणित झालेला चेहरा ती वर्णन करत होती त्याहीपेक्षा खूप काही जास्त सांगून गेला.प्रथमा जेवण वगैरे आटोपून आपल्या खोलीत आली. आल्यापासून तिने बॅग जशीच्या तशी, फक्त खोलीत नेऊन टाकली होती, कशालाही हात देखील लावला नव्हता. नाही म्हंणले तरी दिवसभरा नंतरचा थोडा थकवा, मरगळ होताच. त्यामुळे तिला आता प्रचंड झोप येत होती.ती बेडवर आडवी होण्याच्या तयारीत असतानाच तिचा फोन व्हायब्रेट व्हायला ...अजून वाचा

7

सर येते आणिक जाते - 7

प्रथमाचे मन तिच्या आईला तिच्या पेक्षा जास्त समजत होते आणि यावेळेस ही समजले होते असे म्हंटले तर वावगे ठरणार सहलीवरून आल्यापासूनच प्रथमा सर्व प्रवासाबद्दल, तेथील एकंदरीत ॲक्टिव्हिटीज बद्दल, तसेच समोर आलेल्या नाना प्रकारच्या आव्हानांबद्दल, आणि तिला समृध्द करण्याच्या प्रवासात मोलाचा हातभार लावण्याच्या कामी आलेल्या या स्वर्णीम अनुभवाबद्दल आईला भरभरून सांगत होती. प्रथमा बोलताना आपली टीम आणि इतर सर्व जणांबद्दल कौतुकाने सर्व वर्णन करत होती. पण एका खास व्यक्तीचे नाव वारंवार तिच्या तोंडातून, अगदी प्रत्येक दोन वाक्यांगणीक येत होते. आणि ते नाव घेत असताना तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव, तेज आणि डोळ्यांतील लकाकी काही वेगळीच जाणवत होती. या सर्व गोष्टींपासून ...अजून वाचा

8

सर येते आणिक जाते - 8

घरी प्रथमाची आई तिची वाट पाहत होती. तिची घरी येण्याची नेहमीची वेळ केव्हाच टळून गेली होती. काही फोन देखील नव्हता. आईला आधी वाटले की ऑफिसमध्ये काही ज्यादाचे काम निघाले असेल, कदाचित त्यामुळे तिला आज घरी यायला उशीर झाला असेल. पण असे असते तर तिने फोन करून किंवा मेसेज करून कळविले असते. शेवटी न राहवून आईने तिला फोन लावला. पण छे, आईचा फोन देखील ती उचलत नव्हती. काही कळण्यास मार्ग नव्हता की प्रथमा गेली तरी कुठे. असे न कळविता ती कधीही घराबाहेर इतका वेळ राहिली नव्हती. आता मात्र आईच्या काळजाची धडधड वाढू लागली होती. काय करावे असा विचार करत करत ...अजून वाचा

9

सर येते आणिक जाते - 9

प्रथमाला अचानक जाग आली. तिचे डोके अतिशय जड झाले होते. अंग अगदी तापाने फणफणत होते. तिने डोळे उघडण्याचा प्रयत्न पण लगेच काही तिला डोळे उघडता आले नाही. तापाने फणफणल्यामुळे तिच्या अंगात अजिबात त्राण नव्हता. बेडवरुन उठण्याचा प्रयत्न केला. पण शरीरात अवसान नसल्यामुळे तोही प्रयत्न फसला. नाईलाजाने ती थोडावेळ तशीच पडून राहिली. आता ती जागीच होती. फक्त थोडे अवसान एकवटून डोळे उघडण्याचा प्रयत्न करत पडून राहिली होती. तेवढ्याच पाच ते दहा मिनिटांत कालचा आख्खा दिवस तिच्या डोळ्यांसमोरून गेला. अस्वस्थपणा, उद्विग्नता, पहिल्यांदांच कामावर असूनही काहीही काम न करता चाल ढकल करत मार्गी लावलेला दिवस, घरी न परतण्याची ...अजून वाचा

10

सर येते आणिक जाते - 10

दोन दिवस आराम करून, औषधपाणी करून प्रथमाला बऱ्यापैकी नॉर्मल वाटू लागले होते. तोंडाला आता चव आली होती. थोडी चालू शकत होती. तसेही परवापासून तिला ऑफिसला जाणे गरजेचे होते. त्यामुळे तीही लवकरात लवकर पूर्ण बरी होण्याचा प्रयत्न करत होती. आईलाही तिची तब्बेत पूर्ववत होत असल्याचे बघून बरे वाटत होते. आईने बराच संयम दाखवला होता. पण आज प्रथमाशी बोलणे रास्त होणार होते. संध्याकाळी प्रथमा आणि आई टीव्ही बघत बसल्या होत्या. प्रथमाचा मूडही बरा दिसत होता. आईला हीच योग्य वेळ वाटली विषयाला हात घालण्याची. आईने प्रथमाच्या हातातील रिमोट घेऊन टीव्हीचा आवाज बारीक केला. आणि प्रथमाकडे पाहू लागली. आई प्रथमाला विचारू लागली... ...अजून वाचा

11

सर येते आणिक जाते - 11

आई पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ बद्दल जे बोलली ते अगदी खरे होते आणि आहे. आपण पहिल्यापासूनच त्या गोष्टीकडे, म्हणजेच आणि प्रोफेशनल लाईफ वेगळे ठेवण्याबद्दल कायम सतर्क राहिलो आहोत, कायम लक्ष दिले आले. पण खरंच त्या एका दिवसामुळे खूप अपराधी वाटत आहे.इमेज बनवायला आयुष्य कमी पडते. पण ती खराब व्हायला एक छोटासा क्षण देखील पुरेसा असतो. या गोष्टींची तोंडी जाहिरातबाजी होत असते आणि ती होऊन तिचा गावभर बोभाटा व्हायला आजकालच्या सोशल मिडीयाच्या काळात अजिबात देखील वेळ लागत नाही. त्यामुळे प्रथमा आता इथून पुढे जास्त सतर्क राहणार होती. आणि इथून पुढे असे कधीही घडणार नाही याची काळजी ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय