सर येते आणिक जाते - 5 Ketakee द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सर येते आणिक जाते - 5ट्रेकिंग इन्स्ट्रक्टर त्यांना मार्गदर्शन करत होते. ते जे जे आणि जसे जसे सूचना करत होते त्याप्रमाणे सर्वजण त्या इन्स्ट्रक्शनस्, दिलेली प्रत्येक बारीक सूचना लक्ष देऊन ऐकत आणि फॉलो करत होते.

ट्रेक सुरू करण्यापूर्वीच इन्स्ट्रक्टरने सर्वांना चढाई संदर्भात सर्व प्रकारची पूर्वकल्पना दिली होती. या ट्रेकमध्ये साधारण किती वेळ लागेल, किती कठीण गोष्टी आणि अडथळ्यांचा सामना करावा लागेल, आपली स्ट्रेंथ, इच्छाशक्ती कुठे कुठे पणाला लागू शकेल, तसेच कोणाला त्रास झाला किंवा काही इमर्जन्सी निर्माण झाली तर फर्स्ट एड टीमला त्वरित संपर्क कसा करायचा आणि इन्स्ट्रक्टर पर्यंत गोष्टी सप्लाय चेन द्वारे शक्य तितक्या वेगाने कशा पोहोचवायच्या वगैरे वगैरे...


सर्वांना एक चढाईचा नकाशा बनवून देण्यात आला होता. तो सर्वांनी स्वतःजवळ ठेवला होता. कोणालाही काही अडले, किंवा कोणी हरवले, मार्ग चकले तर या नकशाचा वापर करून योग्य ठिकाणी पोहोचता येणार होते.


चार चार लोकांचा एका टीम मध्ये समावेश करण्यात आला होता. प्रत्येक टीमचा एक प्रतिनिधी, लीडर नेमण्यात आला होता. त्या लीडरवर सर्व टीमची जबाबदारी होती.


सर्वजण आपापल्या टीम सोबत, टीम लीडरच्या मागे आणि टीम लीडर इन्स्ट्रक्टरच्या मागे त्यांना फॉलो करत चालत होते.


सुरवातीचा बराचसा भाग हा जंगलमय होता. तो भाग पार करत करत सर्वजण हळूहळू आता जिथून खरी चढण सुरू होणार त्या चढणीच्या पायथ्याशी येऊन पोहोचले होते. इथून मार्ग अधिकाधिक कठीण होत जाणार होता. त्यामुळे तिथे सर्वांनी थोडी विश्रांती घेतली.


फ्रेश होऊन, एनर्जी रिगैन करून पुन्हा नव्याने पुढच्या चढाईला सुरुवात केली.


चढाई अजून कठीण कठीण होत गेली. त्याची सूचना त्यांना सुरुवातीलाच दिली गेली होती. सर्वांनी सपोर्टसाठी हातात काठ्या घेतल्या होत्या. त्याने खरंच खूप फायदा होत होता. सगळ्यांचा स्टॅमिना हा वेगवेगळा असल्यामुळे कोणी मागे तर कोणी पुढे, कोणी मधेमधे थांबत, कोणी धापा टाकत तर कोणी अगदीच सहज चढाई करत होते.


निमुळते रस्ते, वेडीवाकडी वळणे, निसरड्या पायवाटा यांचा सामना करत आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर ही ट्रेकिंगची तुकडी अग्रेसर होत होती. या अधिकाधिक कठीण होत गेलेल्या रस्त्यांवर नवनवीन अडथळे, नवनवीन आव्हाने त्यांचा शारीरिक फिटनेस, इच्छाशक्ती आणि एनड्युरन्स टेस्ट करत होती.


मजल दरमजल करत, या सर्व अडथळ्यांना पार करत, अखेर सर्वजण ट्रेकच्या सर्वोच्च शिखरावर, डेस्टिनेशन पॉईंट जवळ येऊन पोहोचले.


सर्व टीमलीडर्सनी आपापल्या ग्रूपमधील सर्वजण सुखरूप आणि सोबत असल्याची सूचना इन्स्ट्रक्टर पर्यंत पोहोचवली.


सर्व ट्रेक कोणतीही अडचण न येता, आपत्ती न उद्भवता अतिशय छान पार पडला होता. इन्स्ट्रक्टरच्या नियोजनबध्द आणि सूचनात्मक आराखड्याच्या जोरावर हे सर्व शक्य झाले होते. प्रथमाला इन्स्ट्रक्टरच्या नियोजनबध्दतेचे खूप कौतुक वाटले.


सर्वोच्च शिखरा वरून जे नयनरम्य आणि विहंगम दृश्य दिसत होते ते बघून प्रथमा अगदीच विस्मयचकित होऊन गेली. कितीवेळ तरी भान हरपून ती फक्त ते सारे आपल्या अंतरी सामावून घेत होती. नंतर मिटलेल्या डोळ्यांनी हात पसरवून ते आभाळ बहुधा कवेत घेण्याचा किंवा पांघरण्याचा प्रयत्न करत असावी. वसुंधरेवरचे हे पारदर्शी आच्छादन, वसुंधरेचा हात हातात घेऊन तिला आपल्यासोबत क्षितजाकडे घेऊन जात असल्याचा भास प्रथमाला झाला.


तिन्हीसांज अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपली होती. हा क्षण, हे पुन्हा नव्याने जिवंत होणे हृदयाच्या खूप खास अश्या कप्प्यात आयुष्यभरासाठी साठवून ठेवण्यासारखे होते.


खरंच तो अविस्मरणीय अनुभव, तो प्रवास, ती सोबत, तो आत्मनिर्धार, तो शिखर पादाक्रांत केल्यानंतरचा आनंद, टीम बरोबर अत्युच्य शिखरावर उभे राहून साजरे केलेले क्षण, हे सारे जरी फोटोमध्ये अडकवून ठेवण्याचा प्रयत्न केला होता तरीही हे फोटोंत समावण्यासारखे किंवा शब्दांत व्यक्त कण्यासारखे नव्हतेच. फक्त भावविभोर होऊन ,आत्ममुग्ध होऊन डोळ्यात आणि हृदयात सामावून घेण्यासारखे होते, अगदी कायमचे...