दांडे निवती वरून दर्याचा एक फ़ाटा पठार, तरवड आणि कोंड सखला पर्यन्त गेलेला आहे. निवतीवरून तरवडातल्या जुगाईच्या देवळापर्यंतगाडी रस्ता होता. दिवसातून तीन चारएस्ट्या असायच्या. पण पुढे कोंड सखलात जायचं तर चालसूर माणसालाही दीड घंटा वेळ लागायच्या. तरवडच्यावेशीकडे गेलं की समोर माडभरापेक्षा खोल उतरती घसारीची वाट होती. दरडीच्या कडेने जेमतेम बैल गाडी घालता येईल इतपत चाकोरी होती. पायथ्याला सवथळ भाग गाठी पर्यंत मोडणा मोडणानी बैल गाडी नेता येत असे. अर्थात भरवण बेतानी घालावे लागे , आणि घसारी चढता उतरताना दोन ठिकाणी तरी थांबून इस्वाटा घ्यावा लागे. गाडीरस्त्याने जाण्यापेक्षा भरती सुकतीचे ताणबघून पडावाने सामानाची ने आण करणे अधिकसोईचे आणि कमी वेळात फावणारे होते. तरवडतल्या सड्यावरून नजर टाकली की पायथ्याशी सुपाच्याआकारासारखा सवथळ भाग दिसे तेच कोंड सखल.

1

जितवण पळाले- भाग 1

दांडे निवती वरूनदर्याचा एक फ़ाटा पठार, तरवड आणिकोंड सखला पर्यन्त गेलेला आहे. निवतीवरून तरवडातल्या जुगाईच्या देवळापर्यंतगाडी रस्ता होता. दिवसातून चारएस्ट्या असायच्या. पण पुढेकोंड सखलात जायचं तर चालसूर माणसालाही दीड घंटा वेळ लागायच्या. तरवडच्यावेशीकडे गेलं की समोर माडभरापेक्षा खोलउतरती घसारीची वाट होती. दरडीच्या कडेने जेमतेमबैल गाडी घालता येईल इतपत चाकोरी होती. पायथ्याला सवथळ भाग गाठी पर्यंत मोडणा मोडणानी बैल गाडी नेता ...अजून वाचा

2

जितवण पळाले- भाग 2

गोड्या पाण्याचीटंचाई असली तरी गाव सधन होता.मळ्याच्या कडेने आंग ओलीवर बिनशिपण्याचे माड नारळानी ओथंबलेले असायचे.एकेका माडापर दीड दोनशे नारळलागलेले . खाऱ्या पाण्याचा उग्रम असल्यामुळे कोंड सखलातल्या नारळाचं खोबरं गोडूस लागायचं.मंगळवारी दांड्यातला बाजार नी शुक्रवारीपठारातल्या बाजाराला कोंड सखलातले लोक नारळ विकायला जात. त्यांच्या नारळावर गिऱहाईकं नुसती तुटून पडायची. नारळाचं बेफाट उत्पना असल्यामुळेकोंड खोलात प्रत्येक वाडीत तीन चार तरी तेलाचे घाणे असायचे. खाडीच्या कडेला उंडिली नी करंजाची झाडं माजलेली होती.मळ्यात उन्हाळी भुईमूग व्हायचा. ढोरं कायम मोकाट सोडलेलीअसल्यामुळे पिकदाऊ मळ्यातजायला एक वाट ठेवून भोवतीवावभर रुंद चर खणलेले असत. माऱ्याच्या ...अजून वाचा

3

जितवण पळाले- भाग 3

पोटं तटम्म फुगल्यावर तिथेच कडेलाचिखलटीत लोळत पडली. त्याच दरम्यानेसुकती लागली नी सुस्त झालेलीडुकरं रुपणीत अडकून पडली. गावातलीढोरं सुद्धा असंख्य अंदाजचुकला की रुपणीत अडकत असत. रुपणी कमरभरखोल होत्या. ढोरांचे पाय चिखलात फसत पण पोटवळाचा भाग पृष्ठभागावर उपेवत राही. आपण फसलो हे लक्षात आल्यावर मग़ ढोरंपाय फाकवून तशीच निपचित पडूनरहात. अगदी लहान वासरं सुद्धा रुपलीतरी पोटवळाचा भाग वरच उपेवत राही.घाबरलेली वासरं हंबरून हंबरून हैराण व्हायची. पण त्या चिखलडीत पुढे जावून त्यानाबाहेर काढणं महाकर्म कठिण होतं. दीड दोन तासानीभरती लागली नी चिखलवटीच्या भागात पाणी ...अजून वाचा

4

जितवण पळाले- भाग 4

जितवणीपळाले- भाग ०४ जीतवण्याच्या सभोवतालीजांभ्या दगडाचे कातळ असले तरी उभ्या कड्यातकाळवत्र भरलेले होते. कड्याचीउंची दहाबारा पुरुष सहज भरली असती.पाणवठ्याचा फूट भागसोडून त्यापलिकडे कड्याचा भाग खोदून काळवत्रीखडी मिळू शकेल.या भागातून अगदी अल्प खर्चात कच्चा रस्ताकरून खडीची वाहातुक करता येईल असाअंदाज सर्व्हेअर सायबाला आला त्याप्रमाणे त्याने आपला अहवालतयार केला. पंधरा दिवसानी रस्त्याचा सर्वे करून त्या प्रमाणेमार्किंग करून झाल्यावर साहेबाचा तळ उठला. सर्वे रिपोर्ट गेला आणि महिनाभरातच मंजुरी आली. अनंतरावाचे साड भाऊशंभूराव दळवी जिल्हा परिषदेची लहान मोठी कंत्राट घेत. रस्त्याचं काम मोठं होतं. त्यानी अनंतरावांशी टाळी मारून टेंडर भरलं. एवढं मोठं काम करायची हिंमत असणाराकंत्राटदार जिल्ह्यात कोणीचनव्हता. शंभूरावानी सगळ्या गोष्टीपद्धतशीर ...अजून वाचा

5

जितवण पळाले- भाग 5

जितवणी पळाले- भाग ० ५रिवाजअसा होता की. सीझनच्या बोलीवर दरठरवून टोळी प्रमुखांशी सौदे केलेजात. केलेल्या कामाच्या निम्मे रक्कम हप्त्याला जाई. बोलीप्रमाणे केलेली मुदत भरली की मग त्या त्याटोळीचा हिशोब पुरा भागवला जात असे. प्रत्येक टोळीचा कामाचा उरका भिन्न असे त्यामुळे एखाद्या हप्त्याला कामाचा सरिफा पडत नसे. अशावेळी मिळणारी रक्कमहप्त्याच्या खर्चा साठी पुरी पडणारी नसली की मग टोळीतल्या लोकांचीमुकादमाची हमरातुमरी व्हायची. वडार आले नी गावात कोंबड्या पाळणारे, मासेपागणारे, शेरडं पाळणारे धनगर आणिगावठी दारू विकणारांची चलती सुरू झाली. पूर्वी एकटाजग्या परीट गावठी दारू गाळून ती विकायचा धंदा करी. बेलदारांच्यातबापयांच्या बरोबरीने बायल ...अजून वाचा

6

जितवण पळाले- भाग 6

बेलदारांकडे नेमस्त हांडी भांडी. दिवसाडी पुरेल इतकं पाणी न्यायला लागणारी आयदणं नव्हती. पाणी संपलं की तळावर माघारी जावून पाणी घंटाभर सहज मोडायचा. यावर काय तोडगा काढायचा ? याचा विचार करीत असता कोणाला तरी विहीर मारायची युक्ती सुचली. नाहीतरी भर घालायला डेगा खणायला लागत असे. तेच खणकाम एका जाग्याला केलं तर सहज दहा वीस हात डबरा मारता येईल , हा विचार सगळ्यानाच पटला.त्या दिवशी मल्लूचा पाव्हणा आलेला होता. तो पाणक्या आहे हे कळल्यावर बेलदारानी त्याला गळ घातली, दुसरे दिवशी तो काम सुरू होते त्या जाग्याला आला. तो दोन हातांची ओंजळ करून त्यावर नारळ ठेवून त्या ...अजून वाचा

7

जितवण पळाले- भाग 7

जितवणी पळाले- भाग ०७ थोड्याच वेळात कसलातरीपाला घेवून नाऊ आला. त्यानेमागारणीला हाक सुपात राख घेवूनती आली. राखेचसूप बाजुला ठेवला. मग तिने पाट्यावरठेचून ठेचून गंधासारखा थलकझाल्यावर तो चौपदरी फडक्यातूनगाळून त्यातला निम्मे दंशकरणीला पाजला. “ह्ये बग बया, आता वांतीचीभावना आली की सुपातल्या राखाडीवरवोक......”असं सांगून फडक्यातला चोथा बाईचा तळहाताना नी तळपायाना चोळू लागली. काही वेळात बेलदारणीला जोराची वांती झाली. नाऊने सूपबाहेर उजेडाला न्हेवून परीक्षा केली. “आजून वाईच उग्रम हाये…..” उरलेलेऔषध पाजायला सांगितले. ते पाजल्यावर बाईला पुन्हा उलटी झाली तेंव्हा....“आता ईख़उतारलें ...... हिला वाईच पाणी पाजा.आता हप्ताभर आंबाटतिकाट वशाट काय ...अजून वाचा

8

जितवण पळाले- भाग 8

जितवणीपळाले- भाग ०८ त्या दिवशी पाच वाजे पर्यंत जेवणावळीझडल्या. बरेच अन्न उरले होते. उठल्यावर गावकरी आणि वडारा-बेलदारानी उरलेलेसगळे अन्न भरून नेले, अगदी कणही वाया गेला नाही. यानिमित्ताने बाबाजीराव आणि पंचायत समितीचे सभापती अनंतराव धुरीयांची ख्याती तालुकाभर सर्वतोमुखी झाली. बाबाजीरावांचे घोरणही फळाला आले आणि राजकीय पटावर बाळासाहेबांचे वजन वाढले.लगतच्या सार्वत्रिक निवडणुकीतअनंतरावाना आमदारकीचे तिकिट मिळालेनी ते बहुमताने निवडूनही आले. त्यानंतर बाळासाहेबांकडे मुख्यमंत्रीदाची सुत्रंगेली नी बाबाजीरावांची वट वाढली.अगदी ग्राम पंचायत पातळी पर्यंत सत्तेची समिकरणं बदलली. बाबाजीरावानीअनंतरावांच्या ऐवजी रावाच्या वाडीतल्या धकलोजीमर्गजाला पंचायत समितीचा सभापती केला. धकलोजी मर्गजाला गाववाले अचागणी मर्गज म्हणून संबोधित, ...अजून वाचा

9

जितवण पळाले- भाग 9

जितवणीपळाले- भाग ०9 अंडर ग्राऊण्ड टाकीचे खोदकाम सुरू झाले . चाळीस फूट खोदकाम झाल्यावर बारीक झरे लागले. आश्चर्यम्हणजे ते गोड्या पाण्याचे झरे होते.जितवण्याचे पाणी त्यात आणून सोडले कीगावाचा पाण्याचा प्रश्न शाश्वतस्वरुपात सुटणार म्हणून गावकरी खुशहोते. टाकीची खोदाई झाल्यावरकडेला कॉन्क्रिटच्या भिंती ओतण्यात आल्या. दरम्याने जलकुंभाचाबेस बांधून होत आला. पाऊसकाळ नजिक आल्यामुळे काम थांबले. पावसाळ्यात अंडर ग्राऊण्डटाकीत साधारण पुरुषभरपाणी साठलेले होते. पुढच्या दसऱ्यानंतरपुन्हा कामाला सुरुवात झाली. दोन महिन्यात जलकुंभ पुरा झाला नी गावभर पाईप लाईन टाकायची सुरुवात झाली. दरम्याने मंत्रालयपातळीवरून उच्च्स्तरीय समितीरिव्ह्यू घ्यायला आली. अंडर ग्राऊण्डटाकीत मूळ जलस्त्रोतातले पाणीसोडल्यावर तीस तासानी सरफेस पर्यंतवॉटर लेव्हल आली तर ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय