एक निरोप असाही...

(0)
  • 36
  • 0
  • 501

आपल्या एकुलत्या एक बहिणीच्या लग्नासाठी तो सुट्टी टाकून आला होता. बहिणीच्या साखरपुड्याला त्याला यायला जमले नव्हते म्हणून तो थोडा लवकरच म्हणजे फक्त ३ दिवस आधीच आला होता. कारणही तसेच होते कारण त्याच्या कर्तव्यासमोर सगळी नाती गौण होती. तसा हा कोल्हापूरला राहणारा पण बहिणीचे लग्न कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात होत. बहिणीला हळद लागत होती आणि सगळे बेफाम होऊन नाचत होते पण याचे लक्ष सतत टीव्हीवर सुरू असलेल्या बातम्यांकडे लागून होते. आता बहिणीला हळद लावायची वेळ त्याची होती. सगळे त्याला हाका मारत होते पण याचे लक्ष बातम्यांमध्येच. शेवटी कोणीतरी येऊन त्याला बाहेर घेऊन गेले. आंब्यांच्या पानांनी हळद घेऊन तो त्याच्या बहिणीला हळद लाऊ लागला. कठोर, दगडी हृदयाचा तो बहिणीला हळद लावताना मात्र हळवा झाला. तरीही भावना आवरून हसत हसत त्याने बहिणीला हळद लावली.

1

एक निरोप असाही... - 1

जेव्हा वैयक्तिक आनंद आणि देशाचं रक्षण समोर उभं ठाकतं, तेव्हा एक सैनिक नेहमी देशालाच निवडतो. ही गोष्ट आहे अशा भावाची, जो आपल्या बहिणीच्या लग्नाच्या धामधुमीत हजर राहू शकत नाही, कारण त्याला आकाशात राहून देशाच्या घराघरांचं रक्षण करायचं आहे. विमानाचा गडगडाट आणि लग्नातील सनई यांच्यातील विरोधाभास मांडणारी, एका पायलटच्या बलिदानाची आणि कर्तव्याची ही अनोखी कहाणी ...अजून वाचा

2

एक निरोप असाही... - 2

इतक्यात भारतीय आर्मीचा तो भलामोठा ट्रक हॉलच्या गेटवर येऊन थांबला. काळया गडद हिरव्या रंगाचा ती टाटाएलपीटीए 715/4x4 ट्रकपाहिल्यावर धडकी असा होता. आर्मीचा ट्रक असल्याने त्याच्यासाठी गेट लगेच उघडला गेला. जिथून त्याच्या बहिणीची डोली आता आलेली अगदी तिथेच येऊन तो ट्रक थांबला. ह्याचे लक्ष नव्हते पण जान्हवीने तो ट्रक पाहताच त्याचा हात धरला. तो मात्र विधीत गुंग होता. बहिणीने सुद्धा ट्रक पाहिला होता. त्यातून २ आर्मी ऑफिसर्स उतरून हातात एक कागद घेऊन स्टेजच्या दिशेने येऊ लागले. बहीण समजून गेली की हा आपला भाऊ युनिफॉर्म का घेऊन आलाय. तिने पटकन त्याचा हात पकडला आणि बोलली."दादा.""काय झालं?"तिने फक्त डोळ्याने खुणवून सांगितले. त्याने ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय