आज मी आपणहून एका संशोधनासाठी बाहेर पडली होतो.रत्नागिरी जिल्ह्यातील 'देवाचे ठाणे ' इथल्या कातळ शिल्प याबद्दल मी व्हिडिओ पाहिले होते व वाचलेली होते.माझ्या पुरातन वस्तूसंग्रहालयाची जबाबदारी मी आईवर सोपवली होती. आईला सुद्धा पुरातत्त्व विषयाची आवड होती. ती सहंग्रालयाला भेट देणाऱ्या लोकांना छान माहिती देते.अर्थात काही वस्तु माझ्या जवळ कश्या आल्या हे मी आईलाही सांगितले नव्हते.ते कळले असते तर तिने मला संशोधनच बंद करायला लावले असते.

1

देवाचे ठाणे - 1

देवाचे ठाणे १( कथा पूर्णतः काल्पनिक आहे.)आज मी आपणहून एका संशोधनासाठी बाहेर पडली होतो.रत्नागिरी जिल्ह्यातील 'देवाचे ठाणे ' इथल्या शिल्प याबद्दल मी व्हिडिओ पाहिले होते व वाचलेली होते.माझ्या पुरातन वस्तूसंग्रहालयाची जबाबदारी मी आईवर सोपवली होती. आईला सुद्धा पुरातत्त्व विषयाची आवड होती. ती सहंग्रालयाला भेट देणाऱ्या लोकांना छान माहिती देते.अर्थात काही वस्तु माझ्या जवळ कश्या आल्या हे मी आईलाही सांगितले नव्हते.ते कळले असते तर तिने मलासंशोधनच बंद करायला लावले असते." तूझ्या सोबत काम करायला लवकरच हक्काचा माणूसआण." ही नेहमीची सूचना करायला ती विसरली नाही.मी हसलो व म्हणालो.." हल्लीच्या मुलींना अश्या गोष्टी अजिबात आवडत नाहीत."" कोणीतरी असेलच ना? मी किती दिवस ...अजून वाचा

2

देवाचे ठाणे - 2

देवाचे ठाणे २( कथा पूर्णतः काल्पनिक आहे.)पुढे चालू...मी पार काळोख पडेपर्यंत काम करत होतो.खरतर मलारात्री तिथेच तंबू लावून राहायचे त्या शिल्पा पासून २०फूटांवर एक छान जागा दिसली होती.तिथे पाणी नव्हतं.पण मला काही गोष्टी स्कॅन करायच्या होत्या.लॅपटाॅपवर काहीआराखडे तयार करायचे होते.माझा अंदाज होता की ते शिल्पकिमान दहा हजार वर्षांपूर्वीचे असावे.शिवाय माझ्या सिस्मोग्राफ मध्ये काही विचित्र कंपने दिसली होती.त्याचे विश्लेषण करायचे होते.त्यासाठी टेबल खुर्ची व लाईट लागणार होती.म्हणून मी त्या रात्री खाली गावात राहायचे ठरवले. मी माझं सगळं सामान आवरलं .मी गाडीवरून खाली उतरलो.चौकशी करता कळलं की गावात एकच होम स्टे होता. मी तिथे पोहचलो.ते एक मजली घर होतं.खाली बाहेरच्या रुममध्ये ...अजून वाचा

3

देवाचे ठाणे - 3

देवाचे ठाणे ३आम्ही दोघ दोन दिशांना गेलो.ती फुलांच्या ताटव्यात शिरली.मी उजवीकडे वळलो.मला अजून पाच एक मिनिटे चालावं लागणार होतं.चालता माझं लक्ष काल रात्रीच्या त्या आंब्याच्या कलमाकडे गेले. मी सहज तिथे गेलो.कालच्या दो-या...फाटक शर्ट..बोळा तिथेच होता.पण त्या सोबत आणखी काही अचंबित करणा-या गोष्टी तिथे होत्या.एक आयफोन व एक हजार रुपये एका कागदावर ठेवलेले होते. मला कळेना की हे काय गौडबंगाल आहे ते. काल रात्रीनिश्चितच तिथे फोन व पैसे नव्हते. मग आता कुठून आले ?जर चोरांनी राकेशला मारुन त्याच्याकडचा फोन व पैसेपळवले होते तर आता ते इथे कसे आले ते समजत नव्हते.मी सुजाताला हाक मारली पण तिला ती ऐकू आली नाही.ती ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय