देवाचे ठाणे - 6 Balkrishna Rane द्वारा थरारक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

देवाचे ठाणे - 6

देवाचे ठाणे६       दश दिशातून हवा शिल्पा भोवताली ओढली जावू लागली. बघता - बघता हवेचा एक भोवरा परीसरात तयार झाला. तो भोवरा एवढा शक्तीशाली होता की सुरुंग पेरणारी माणसंही त्यात ओढली जावू लागली. माझ्या कपाळावर लावलेली गन त्या माणसाच्या हातून निसटली व त्या भोव-यात सामावली.तो गुंड सुध्दा ओढला जावू लागला.त्याने चि-याच्या दगडी कुंपणाचा आधार घेण्याचा प्रयत्न केला.मी सहज मनगटावरील घड्याळाकडे नजर टाकली ते बंद पडले होते.पेरलेलेसगळे सुरुंग व वायर्स गरगरा सभोवताली भिरभिरु लागले.या सगळ्या गडबडीत मी व माझा तंबू जागच्या जागी होता.सभोवतालची वावटळ ही हवेच्या दाबातील फरकाने झाली नव्हती तर ती चुंबकीय क्षेत्रातील बदलामुळे निर्माण झाली होती. तो चुंबकीय भोवरा  हवेत उंच उंच जावू लागला.ते एक विचित्र दृश्य होते.माणसे त्यात बंदोबस्त करणारे पोलीसही होते...,बॅट-यांचे हलणारे प्रकाश झोत,   व हत्यारे अक्षरशः वेगाने गरगरत होती.अचानक ते सुरुंगहवेतच पेटू लागले.आसमंतात आतषबाजी चालली होती.पण आवाज येत नव्हते.दूरून पाहणा-याला वाटलं असतं की आकाशातून उल्का पडत आहेत.सगळ्या सुरंगाचा हवेत स्फोट झाला तसं ती चुंबकीय वावटळ थांबली .सगळं वातावरण शांत झालं.आत्ता काही क्षणापूर्वी तिथं काही घडलं होतं हे कुणालाच सांगूनही पटले नसते.        सड्यावर वर्माची माणसे व काही पोलिस निपचित पडले होते.आकाशातून हिरवा प्रकाशझोत त्या मानवी शिल्पावर पडला.माझं लक्ष त्या कातळ शिल्पाकडे गेले.त्याचा काळपट रंग हळूहळू बदलू लागला होता.सुरुवातली सौम्य तांबूस नंतर गडद लाल झाला होता.मग ते शिल्प कालच्या प्रमाणे उठून उभे राहिले. त्याने माझ्याकडे नजर फिरवली.त्याने मला हाताने खुणा करत  बोलावले.मी यंत्रवत पुढे सरकलो." तुम्ही मानव खूप अधाशी आहात. जे सुंदर व चांगले आहे.ते तुम्ही नष्ट करत आहात."मी आवंढा गिळत मान हलवली." पण हे आता लवकरच संपेल नवी सुरुवात होईल ! तुझ्या मनात काही प्रश्न निर्माण झालेत. जसे हे शिल्प कोणी कोरले? केव्हा? तूझ्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुला मिळतील? जे घडलं ते तू प्रत्यक्ष भूतकाळात जाऊन पाहू शकशील?"त्या आकृतीने आपला उजवा हात पुढे केला व माझ्या डोक्याला हलकेच स्पर्श केला.अंगाला एक झटका बसून माझं अंग थरथरू लागले.मेंदूला विजेचा धक्का बसल्यागतझिणझिण्या उठल्या.माझ्या मेंदूतील अज्ञात कवाडे उघडू लागली.चेतापेशींची गुंतागुंतीची रचना विद्युत प्रवाहाने भारीत झाली.माझे डोळे जड होत मिटले.माझ्यातला ' मी ' बाहेर पडून प्रचंड वेगाने अज्ञात जगात शिरत असल्याचे मला जाणवले.-------*******-----*****------*******-------******----दहा हजार वर्षांपूर्वी       मला जाणीव आली तेव्हा मी एका टेकडीवर उभा होतो.सगळं आकाश नारिंगी रंगाने उजळले होते.समोर अनेक छोट्या मोठ्या टेकड्या....खोल द-या .... खडकांच्या विचित्र आकारांच्या चळती व दूरवर एक नदी दरीतून वळसे घेत पलीकडे जात असलेली दिसली.मला कळेना मी पृथ्वीवर आहे की कुठच्या दुसऱ्या ग्रहावर आहे ते! त्या विस्तीर्ण प्रदेशात माझ्या शिवाय एकही सजीव वस्तू दिसत नव्हती. मी टेकडी उतरायला सुरुवात केली. काही वेळातच मी खाली खडकाळ जमीनीवर पोहचलो होतो.इथे काही खुरटी झुडपे सर्वत्र पसरलेली दिसते होती.मी त्या दगडातून तसाच चालत राहिलो.तेवड्यात मातीच्या एका  छोट्या टेकडीआडून एका विचित्र प्राण्यांचा चेहरा दिसला.त्यांची उंची वीस फूटांपेक्षा जास्त असावी. एखादा डायनोसोरस प्रजातीचा वाचलेला एखादा प्राणी असावाअसं मला वाटलं.मला दिसलेला तो पहिला सजीव होता.या प्राण्याला टाळूनच मला पुढे जायचं होतं.मी डावीकडून पळायला सुरुवात केली. काही काळाने मी एका माळरानावर होतो.सगळीकडे काळे व जांभळे दगड दिसत होते.काही खुरटी झुडपे व छोटी झाडे तिथे दिसत होती. आता सूर्य वर आला होता.सर्वत्र रखरखीत उन्ह पसरलं होतं.हे माळरान खूप मोठं होतं .पण पूर्वेला काही डोंगर दिसत होते जे दाट जंगलाने भरलेले असावेत.आता असं बाहेर मोकळ्या जागेत राहणं धोकादायक होत.मला एका ठिकाणी खडकांचा ढिगारा दिसला. मी झपाझप तिथे गेलो.या ढिगा-याच्या आडोशाला मी थांबलो.तेवड्यात अनेक माणसं एकाच वेळी ओरडत असल्याचा आवाज मला ऐकू आला. मी आवाजाच्या दिशेने पाहिले.पंधरा वीस माणसे हातात दगडी हत्यारे व काठ्या घेऊन धावत येताना दिसली.त्यांच्या पुढे एक भला मोठा डुक्कर पळत होता .तो डुक्कर जवळपास पाच फूट उंच व तेवढाच लांब होता.जाड जूड मांसल कातडी ...वळलेली लांब दणकट शिंगे...अंगभर दाट केस....असा त्याचा अवतार होता.जरी तो जीवाच्या आकांताने पळत होता तरी त्याचा आविर्भाव बघता तो केव्हाही मागे वळून हल्ला कर शकेल असं वाटतं होत.आणि झालेही तसेच ! तो थोडा पुढे गेला आणि थांबला व वळला वेगाने मुसंडी मारत एका माणसाच्या पोटात शिंगे खुपसत त्याने त्याला वर उडवला.रक्ताच्या चिळकांड्या हवेत फवा-या सारख्या उडाल्या. पण त्याच वेळी अनेक दगडी हत्यारांचे वार त्या वराहाच्या अंगावर पडले. जायबंदी होत तो तिथेच कोसळला.पण त्याच्यावर घाव पडतच राहिले.जशी डुक्कराची तडफड थांबली तसे ते सगळे मानव आपली हत्यारे उंचावत नाचू लागले.आता मी त्या माणसांचे निरीक्षण करू लागलो.सात फूटांपेक्षा उंच.... दाढी व मिश्यांमध्येहरवलेले चेहरे...सर्व अंगावर दाट केस...अगदी आदिमानवाच्या काळातले वाटत होते.त्यांनी त्या मृत डुक्कराला एका मोठ्या लाकडी ओंडक्याला बांधला व ओरडत नाचत ते पलिकडच्या डोंगराकडे निघाले.त्या तडफडणा-या जखमी माणसाकडे कुणाचच लक्ष नव्हते.मी सुध्दा त्यांच्या पाठोपाठ लपत लपत चालू लागलो.काही वेळात घनदाट अरण्य सुरू झालं. चिंचोळ्या पायवाटेवरून सारे एका गुहेजवळ पोहचले. त्या डुक्कराला खाली ठेवून ते एका विशिष्ट सुरात ओरडू लागले. तो आवाज सा-या अरण्यात घुमला. त्या पाठोपाठ गुहेततून एक विचित्र आवाज उमटला व आतून काही स्त्रीच्या बाहेर आल्या.सगळ्यांच्या कमरेला भली मोठी पाने गुंडाळली होती. मधोमध एक स्री इतर दोन स्त्रीयांच्या खांद्यावर बसून येत होती.जिच्या केसात फुलांचा तुरा खोवलेला होता.ती बाहेर येताच सारे स्री -पुरुष गुढग्यावर बसून हात वर खाली करू लागले.कदाचित ती त्या मानवांची प्रमुख असावी.त्यांच्यामध्ये मातृसत्ताक पद्धती चालू असावी.त्या स्रीने हाताने सर्वांना थांबण्याचा इशारा दिला.ती खाली उतरली व तिने डुक्कराला हाताने स्पर्श केला. ती वर बघून ओरडली.मग हातातल्या दगडी हत्याराने तिने डुक्करावर सपासप वार  केले.डुक्कराच्या  मांसाचा एक भला मोठा तुकडा तिने ओरबाडून काढला व रक्ताळलेले ते कच्चे मांस तिने अधाशीपणे खाल्ले.या मानवी जमातीला अजून बोलणे,अग्नी व शेती यांची माहिती नव्हती. आपले खाणे झाल्यावर तिने हात वर केला तसे सारे जण त्या डुक्करावर तुटून पडले.ज्याला जमेल तसं ओरबाडून खात होता.ते दृश्य माझ्यासारख्या एकविसाव्या शतकातील माणसाला भयाण व अनैसर्गिक वाटत होते.पण त्या काळी तेच शक्य होते.जे जास्त शक्तीशाली होते त्यांनी जास्त मांस ओढून घेतले.     त्याच वेळी आकाशात अनेक मंजुळ घंटा किणकिणतात तसा आवाज ऐकू आला.सारे आदिमानव जागेवरच स्तब्ध झाले.त्यांची प्रमुख आकाशाकडे टक लावून पाहू लागली.काही क्षणात सौम्य हिरव्या पोपटी प्रकाशाचा झोत सर्व जंगल व परीसरात पसरला.  तो प्रकाश पाहून मी दचकलो.देवाचे ठाणे येथील कातळशिल्पावर असाच प्रकाश दोनवेळा पडला होता.त्या प्रकारातून एक लंबगोलाकार वस्तू वेगाने जमिनीकडे येवू लागली.सारे आदिमानव भयाने थरथरकापत मान खाली घालून जमिनीवर पालथे झोपले.ती लंबगोलाकार वस्तू जमिनीजवळ आली .ती वस्तू अत्यंत चकचकीत वाटत होती. सुमारे शंभर मीटरचा परीसर तिने व्यापला होता.त्या अवकाशयानाला दरवाजा असल्याचे दिसत नव्हते.पण त्यातून एक शिडी सारखं साधन सरसरत खाली आलं. शिडीवरून एक आकृती खाली येताना दिसली.तिच्याकडे बघताच क्षणी लक्षात आलं की देवाचे ठाणे येथील कातळावरच शिल्प आणि खाली उतरणारी आकृती सारखीच आहे.उंच...डोक्यावर कवच व त्यावर दोन कंप पावणाऱ्या उभ्या नळ्या ...पूर्ण अंग झाकलेला पोशाख अगदी त्या मानवी शिल्पा सारखा.      ती आकृती खाली आली व तिने सर्वत्र नजर फिरवली.त्याच्या डाव्या हातात असलेली गोल वस्तू त्याने समोर धरली.ती वस्तू गरगर फिरत  व चमचमत राहिली.ज्यावेळी ती गोल वस्तू थांबली तेंव्हा त्या आकृतीने उजवा हात वर केला.तेव्हा अवकाशयानातून दोन तेजस्वी पुरुष खाली उतरले. डोक्यावर हिरेजडित मूकूट,कानात चमकदार कुंडल, गळ्यात रत्नखचित हार,कमरेला पिवळं पितांबर,पायात खडावा.अगदी राजा रविवर्मा यांच्या चरित्रातील देवासारखा वेष होता. तोपर्यंत आदिमानवांची जमात ओरडत तिथपर्यंत आली. समोरचे दिव्य पुरुष पाहून ते  गुढग्यावर बसून हात जोडून तसेच राहिले.-----*****-----****-----*****------*****--------****भाग सहा समाप्त.बाळकृष्ण सखाराम राणे