दैत्य ही कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेत उल्लेख केलेली पात्र, नावे, घटना, स्थळ ह्यांचा वास्तवाशी कुठेही संबंध नाही. तसे आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. कथेत वर्णन केलेल्या घटना, पात्रे आणि प्रसंग हे काल्पनिक असून त्यांचा उद्देश केवळ मनोरंजन आणि सामाजिक वास्तवातील काही पैलूंवर प्रकाश टाकणे हा आहे.

1

दैत्य - भाग 1

दैत्य ही कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेत उल्लेख केलेली पात्र, नावे, घटना, स्थळ ह्यांचा वास्तवाशी कुठेही संबंध नाही. तसे निव्वळ योगायोग समजावा.कथेत वर्णन केलेल्या घटना, पात्रे आणि प्रसंग हे काल्पनिक असून त्यांचा उद्देश केवळ मनोरंजन आणि सामाजिक वास्तवातील काही पैलूंवर प्रकाश टाकणे हा आहे.-------------------------------------------------------------------------------भाग १रात्रीचे फक्त 8.30 वाजले होते. तरीही रात्र गडद होती…आकाशात ढग दाटले होते.चंद्र लपला होता…शहराच्या काही गल्ल्या नेहमीप्रमाणे अंधारातच जगत होत्या. दिवसभर असलेली उन्हाची काहीली अजूनही जाणवत होती. आणि अचानक तापलेल्या जमिनीवर काही थेंब टप टप पडले. आणि काही कळायच्या आतपावसाच्या सरी अचानक कोसळायला लागल्या.चिटपाखरू नसलेली ती अरुंद गल्ली... गल्लीच्या टोकाशी नगरपालिकेचा एक स्ट्रीटलॅम्प ... ज्याचा ...अजून वाचा

2

दैत्य - भाग 2

भाग २ रात्र संपली होती… पण अंबिकाच्या मनातली अस्वस्थता अजूनही जागी होती.पहाटे कधीतरी तिला डोळा लागला होता. पण खोल नव्हती. डोळे मिटले की तीच अरुंद गल्ली समोर उभी राहत होती… पावसाने धुसर झालेल्या भिंती… लालसर पाणी… आणि ते भेदक, थंड, निर्विकार डोळे.अंबिका दचकून जागी झाली.खिडकीतून सकाळचा प्रकाश आत येत होता. रात्रीचा पाऊस थांबला होता. रस्त्यावर पाण्याचे ओघळ चमकत होते. घरात नेहमीची सकाळ सुरू झाली होती. आईने फोडणी घातलेल्या भाजीचा वास… स्वयंपाकघरात भांड्यांचा आवाज… बाबांनी पेपरची पानं उलटण्याचा आवाज. सगळं नेहमीसारखंच. फक्त तिच्या आत काहीच नेहमीसारखं नव्हतं.ती अंथरुणावर बसून काही क्षण स्थिर राहिली. हात नकळत बोटांकडे गेले. त्या बोटांना ...अजून वाचा

3

दैत्य - भाग 3

भाग ३ जुन्या गोदामाच्या वरच्या मजल्यावरची खोली धुराने भरली होती.लोखंडी टेबलावर शहराचा नकाशा पसरलेला होता. दोन रस्त्यांवर लाल खूण, मार्गावर काळी रेघ, आणि एका गोदामाभोवती गोल.टेबलाभोवती चार माणसं बसली होती. सगळे निरढावलेले दिसत होते. पण कोणीही आरामात नव्हतं. त्यातल्याच एकाचा पाय सतत हलत होता कदाचित ताणामुळे.सिगारेट मागोमाग सिगारेट.... खोली धुराने भरलेली. एकजण शांत बसून फक्त बघत होता.“उद्याची खेप थांबवली तर नुकसान होईल,” पाय हालवणारा दात आवळत म्हणाला.खोलीत पुन्हा शांतता पसरली.पहिल्याने टेबलावर मुठ आपटली,“तो अजून फोन उचलत नाही.”दुसरा कटाक्ष टाकत म्हणाला, “फोन उचलत नाही… की उचलणार नाही?”तिसरा पुढे झुकला.“सरळ बोल.”“सरळच बोलतोय. दोन महिन्यांपासून हालचाली बाहेर जात होत्या.”“म्हणजे?”तेवढ्यात दरवाजा उघडला.कोणी आत ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय