रात्रीचे जवळपास साडेअकरा वाजले होते. मुंबईचा पाऊस आणि त्या जोरदार सरी, मुंबईचा पाऊस सुरू झाला की रात्र कधी संपते आणि सकाळ कधी होते, हे कळत नाही. रस्त्यावरच्या गाड्यांचे आवाज कमी झाले होते , पण पूर्णपणे शांत झाली नव्हती. पूर्ण शांत होईल ती मुंबई कसली? कुठेतरी दुरून एखाद्या बाईकचा आवाज यायचा, समोरच्या बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये पानी सांचल्याचा हलका आवाज यायचा आणि मध्येच पावसाचे थेंब खिडकीच्या काचेवर येऊन आपटायचे. आरव खिडकीजवळ बसला होता. मुंबईच्या पावसाचा पुरेपूर आनंद घेत होता. आरव समोर टेबलवर एक

1

नाते डायरीशी ... - 1

रात्रीचे जवळपास साडेअकरा वाजले होते. मुंबईचा पाऊस आणि त्या जोरदार सरी, मुंबईचा पाऊस सुरू झाला की रात्र कधी संपते सकाळ कधी होते, हे कळत नाही. रस्त्यावरच्या गाड्यांचे आवाज कमी झाले होते , पण पूर्णपणे शांत झाली नव्हती. पूर्ण शांत होईल ती मुंबई कसली? कुठेतरी दुरून एखाद्या बाईकचा आवाज यायचा, समोरच्या बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये पानी सांचल्याचा हलका आवाज यायचा आणि मध्येच पावसाचे थेंब खिडकीच्या काचेवर येऊन आपटायचे. आरव खिडकीजवळ बसला होता. मुंबईच्या पावसाचा पुरेपूर आनंद घेत होता. आरव समोर टेबलवर एक ...अजून वाचा

2

नाते डायरीशी ... - 2

दुसऱ्या दिवशी सकाळी आरव कॉलेजमध्ये नेहमीपेक्षा दहा पंधरा मिनिट अगोदर पोहोचला...का? कारण तर त्याला स्वतःला सुद्धा माहिती नव्हतं..कदाचित प्रॉजेक्ट काम करायचं होत..कदाचित लेक्चर लवकर असेल...सगळं काही कदाचित.....आरव... पाठीमागून त्याला आवाज आला.आरव पाठीमागे वळला आणि बघू लागला..समीर त्याच्या दिशेने धावत येत होताआज एवढ्या लवकर?हो..कशासाठी? काही खास?लेक्चर आहे..दहा वाजता आहे माहिती आहे...हा मग? आरव ने खांदे उडवत म्हणाला...अरे मग काय? आत्ता किती वाजले?9.45 झाले आहेत..माहिती आहे..समीर दोन सेकंद थांबला..आरव ने त्याच्याकडे बघितला?तुला त्या मुलीला बघायचं आहे ना? समीर ने हसत आरव ला चिडवायला सुरू केलं.आरवाने चेहरा खाली केला आणि म्हणाला कोणती मुलगी?कालची मुलगी....समीर लगेच म्हणाला.मला काय माहिती... आरवला काही माहिती नाही ...अजून वाचा

3

नाते डायरीशी ... - 3

सोमवारची सकाळ... आज कॉलेजच्या गेट जवळ नेहमीपेक्षा जास्तच गर्दी होती..कोणाच्या हातामध्ये फाईल्स, कोणाच्या हातामध्ये कॉफी, कुणी बस पकडण्यासाठी पळत तर कोणी अटेंडंस कमी असल्यामुळे प्रोफेसरच्या मागे फिरत होतं. आरव आजपण नेहमीप्रमाणे थोडा लवकर आला होता.त्याच्या हातात लॅपटॉप बॅग होती आणि दुसऱ्या हातात प्रॉजेक्ट ची फाइल होती. तो थेट क्लासरूम मध्ये शिरला ... तिथे अगोदरच चारपाच मुलं होती.. त्याने त्याची नेहमीची जागा पकडली.. लॅपटॉप सुरू केला आणि प्रोजेक्ट ची फाइल चालू केली. काल रात्री त्याने प्रश्नावली पुन्हा एकदा पाहिली होती.. प्रोफेसर कुलकर्णी ने दिलेला प्रोजेक्ट साधा दिसत होता पण प्रत्यक्षात बरंच काम होतं... प्रोजेक्ट टॉपिक होता..Consumer Behaviour and Digital Buying ...अजून वाचा

4

नाते डायरीशी ... - 4

प्रोजेक्ट च काम संपवून सगळे बाहेर पडले होते... नेहा आणि सायली बस स्थानकाच्या दिशेने रवाना झाल्या.. आरव आणि समीर मागेच होते.. समीर ने आरवला विचारले . ती तुला आवडते का? आरव जागेवर थांबला... कोण? त्याने तो काय बोलतोय हे समजल होत पण त्या गोष्टी बद्दल अज्ञान आहे अस दाखवत विचारलं... तीच व्यक्ती जिच्या सोबत तू गेले तीन तास प्रोजेक्ट वर काम करत होतास... समीर सरळ म्हणाला... You mean सायली....हो ...तीच ती..नाही रे...आम्ही फक्त मित्र आहोत ..हो? समीर ने प्रश्नार्थक विचारले. मी तिला विचारला होत आपण मित्र आहोत का? पण मला उत्तर नाही मिळालं..आरव ने हसतच म्हणाला आणि टॉपिक बदलण्यासाठी ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय