नाते डायरीशी ... - 2 Dipak Ringe द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नाते डायरीशी ... - 2

दुसऱ्या दिवशी सकाळी आरव कॉलेजमध्ये नेहमीपेक्षा दहा पंधरा मिनिट अगोदर पोहोचला...
का? कारण तर त्याला स्वतःला सुद्धा माहिती नव्हतं..
कदाचित प्रॉजेक्ट वर काम करायचं होत..
कदाचित लेक्चर लवकर असेल...
सगळं काही कदाचित.....
आरव... पाठीमागून त्याला आवाज आला.
आरव पाठीमागे वळला आणि बघू लागला..
समीर त्याच्या दिशेने धावत येत होता
आज एवढ्या लवकर?
हो..
कशासाठी? काही खास?
लेक्चर आहे..
दहा वाजता आहे माहिती आहे...
हा मग? आरव ने खांदे उडवत म्हणाला...
अरे मग काय? आत्ता किती वाजले?
9.45 झाले आहेत..
माहिती आहे..
समीर दोन सेकंद थांबला..
आरव ने त्याच्याकडे बघितला?
तुला त्या मुलीला बघायचं आहे ना? समीर ने हसत आरव ला चिडवायला सुरू केलं.
आरवाने चेहरा खाली केला आणि म्हणाला कोणती मुलगी?
कालची मुलगी....समीर लगेच म्हणाला.
मला काय माहिती... आरवला काही माहिती नाही अशा आवाजात म्हणाला.
तू आज मग एवढ्या लवकर कशाला आलास?
अरे सांगितलं ना प्रॉजेक्ट आहे..
हो.... समीर प्रश्नार्थक नजरेत म्हणाला
खरंच... आरव उतरला
हो..हो..हो...
दोघंही क्लासरूम मध्ये गेले.
आरवने बॅग खाली ठेवली आणि त्यामधून लॅपटॉप बाहेर काढला.
प्रॉजेक्ट फाईल ड्राइव मधून शोधून ओपन केली.
त्यांच्या प्रॉजेक्ट चा नाव होतं..
Consumer Behaviour and Digital Buying Patterns Among Young Investors.
प्रोफेसर कुलकर्णी यांनी फक्त एक महिन्याचा प्रॉजेक्ट दिला होता.
ह्या प्रॉजेक्ट साठी कमीत कमी 100 रिस्पॉन्डेंड पाहिजे होते..
त्यासाठी प्रश्नावली पण पाहिजे होती...
एक्सेल मध्ये डेटा ॲनालिसिस करून ..
त्याचा प्रेझेन्टेशन चार्ट मध्ये करायचं होत..
आणि आज त्यांना प्रश्नावली चा भाग पूर्ण करायचं होता.
मला एक प्रोब्लेम आहे . समीर म्हणाला
काय?
100 लोकांचं रिस्पॉन्डेंड कुठून घेऊन येणार?
Obviously लोकांकडून...
अरे ते मला पण माहिती आहे...समीर लगेचच उतरला..
मग काय प्रोब्लेम आहे?
मला लोक माहिती नाहीत... कॉन्टॅक्ट पाहिजे ना..
आरव हसला...
तू कॉलेज मध्ये किती वर्ष आहेस?
3 वर्ष.. समीर म्हणाला
मग?
हो ते लोक आहेत पण ते माझी मित्र आहेत..
हा मग तू त्यांच्याकडून घे रिस्पॉन्डेंड
अरे पण इन्व्हेस्टमेंट नाही करत.... चिडतच समीर म्हणाला
मग तुला कोणी त्यांच्याकडून इन्वेस्टमेंट घ्यायची आहे? आरव समीर कडे बघत म्हणाला
आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणारेच लागतील असं काही नाही... प्रश्नावली मध्ये नॉन इन्व्हेस्टर सुद्धा आहेत..
समीर पुढे काही बोलणार इतक्यात क्लासरूम च्या दरवाज्यातून आवाज आला..
Excuse me.....
आरवने लॅपटॉप मधून डोक वर केलं..
तीच मुलगी....
आज तिचे केस कोरडे वाटत होते...पाऊस नव्हता म्हणून...काहीही पण विचार करतोय..
हातात नोटबुक होते..
ती आत आली..
तिने आरवकडे बघितलं..
क्षणभरासाठी दोघांची नजर भिडली..
ती त्याच्या दिशेने आली
आणि इकडे तिकडे बघितलं... बसायला कुठे जागा नव्हती..
इथे बसू? तिने आरवला त्याच्या बाजूला असलेल्या जागेवर बसण्यासाठी विचारला..
हो .. बस ना..
समीर सगळ बघत होता..
दोन मिनिट साठी कोणी काही बोलत नव्हत.
मग तिने हळूच त्याला म्हटलं..
कालच्या कॉफी साठी पुन्हा सॉरी...
आरव हसला...
आजही त्याच विषयावर...? प्रश्नार्थक नजरेने तिला म्हणाला
हो...
मी विसरलो सुद्धा...
खरंच...?
हो...खरंच...आरव आश्वात्मक म्हणाला.
नाही तसं काही नाही ते तुमचा शर्ट खराब झाला होता ना..
हो माहिती आहे..काही खास नाही...धुतला जाईल..
हो... Thank you...
आरव मी हलकी स्माईल दिली...
तुमचं नाव? तिने थोड्या वेळेने त्याला विचारलं..
आरवने तिच्याकडे बघितलं..
मी आरव..
ती हसली..
Its Sayli....
Nice to meet you sayali...
Same here..
समोरच्या बेंच वरून समीर चा आवाज आला..
कॉफी शिवाय introduction झाला...हे चांगलंच झालं..
सायली ने त्याच्याकडे वाकड्या नजरेने बघितलं..
तुम्ही कोण?
मी ... मी समीर..
तुम्ही कालपासून माझी मस्करी करताय ना? सायलीने डायरेक्ट सिक्सर मारला..
हो...
का? सायली ने आश्चर्याने विचारला...कोणी तरी तिच्यासारखं त्याला भेटल...बेधडक..बिनधास्त.
माहिती नाही...पण आवडत मला..समीर बोलून गेला..
सायली त्याच बोलणं ऐकून हसली...
इकडे आरव पण डोक हलवायला लागला आणि त्याला म्हणाला..
तू शांत बसणार आहेस का?
नाही बसणार.....समीर लगेच म्हणाला..
प्रोफेसर कुलकर्णी क्लासरूम मध्ये आले..
Good morning everyone...
सगळे शांत झाले...
प्रोफेसर ने बोर्ड वर लिहायला सुरुवात केली..
CONSUMER BEHAVIOUR
आज आपण Decision Making Process. बद्दल डिस्कस करणार आहोत...
आरवने नोटबुक उघडली...
सायली सुद्धा लिहू लागली..
प्रोफेसर ने बोर्ड वर पाच स्टेप लिहिले..
1. Need Recognition
2. Information Search
3. Evaluation of Alternatives
4. Purchase Decision
5. Post Purchase Behaviour

प्रोफेसर बोलू लागले...
समजा... तुम्हाला नवीन फोन घ्यायचा असेल .. तर तुम्ही लगेच दुकानात जाता का? नाही ना? मग तुम्हाला कशाची गरज भासते?
समीर ने हळू आवाजात म्हणाला..
Girlfriend...
सायलीने त्याच्या कडे बघून तीच हसू दाबल..
आरवने त्याच्या डोक्यात नोटबुक मारली...
प्रोफेसर पुढे बोलायला लागले....
Need Recognition म्हणजे.. समस्यांची गरज ओळखणे ...
त्यानंतर information search.... त्या नंतर त्याच alternative compare करणे...
सायली ने आरव च्या नोटबुक मध्ये बघितला..
त्याने कस सगळ सुरळीत लिहिल होतं..
ती त्याला हळू आवाजात म्हणाली..
तू पहिल्यापासून इतक छान लिहितोस?
हो..आरव लगेच उतरला..
आणि माझे notes बघ..
तिने नोटबुक त्याच्या समोर केली.
CONSUMER BEHAVIOUR
एकदम कॅपिटल लिटर मध्ये मोठ्या अक्षरात लिहिला होता...
त्याच्या खाली दोन ओळी...
मग त्याच्या पुढच्या पानावर काही रँडम आरोस काढले होते..
आरवने तिच्याकडे बघितला..
हे तुझे नोट्स आहेत?
हो...
हे नोट्स आहेत? आरवने पुन्हा विचारला...
हो .....हेच माझे नोट्स आहेत...
आरव हसतच म्हणाला मला वाटलं तू डूडलिंग करत आहेस....
ती पण हसली...
मी फक्त ऐकते...
पण लिहित नाहीस....
माझं सगळ लक्षात राहते...ती ठामपणे म्हणाली..
मग exam मधे काय करणार? बाजूच्याकडून नोट्स घेणार का?
नाही... ती म्हणाली
मग?
तेव्हा मी आणि माझा देव... ती वरती बघत म्हणाली...
आरव हसला...अवघड आहे.....
सायली ने हळू आवाजात त्याला विचारलं...
तू प्रत्येक गोष्ट एवढी serious घेतोस का?
नाही.... तो म्हणाला.
मला तसं वाटलं... म्हणून विचारलं..सायली म्हणाली...
आणि का बरं? आरवने एक भुवई वर करत विचारलं...
तुझ्या चेहऱ्यावरून....
काय?
हम्म्म...ती म्हणाली..
माझं चेहरा काय सांगतो..? आरव ने आत्ता कुतुहलाने तिला विचारलं..
तिने दोन तीन सेकंद आरव च्या चेहऱ्याकडे बघितलं...
तू खूप जास्त विचार करतोस...
आरव काही बोलला नाही...
प्रोफेसर ने अचानक आवाज दिला..
आरव...
तो एकदम दचकलाच...
Yes sir... गडबडीत म्हणाला..
Decision making मधला चौथा स्टेप सांग काय आहे?
Purchase Decsion..
Okay good...
सायली त्याच्याकडे बघून हसली..
आरवने कुजबुज करत तिला विचारलं...
काय झालं?
काही नाही ....सहज...
मग हसते कशाला?
तू एवढा nervous का होतोस...
मी....मी nervous नव्हतो...
होतास....
नव्हतो... खरंच...
होतास...ती हसत त्याला म्हणाली...
Okay..शांत बस....
ती पुन्हा हसली...
आणि कदाचित तिथूनच काहीतरी सुरु झालं...
काही मोठ नाही..
प्रेम नाही...
फक्त...
दोन अनोळखी व्यक्तींमध्ये निर्माण झालेलं एक छोटीशी ओळख...

त्या रात्री आरव पुन्हा खिडकीजवळ बसला होता..
समोर तीच काळी डायरी... बाजूला पेन होता...
त्याने डायरीची पान उघडलं...
काहीवेळ विचार केला...
नंतर लिहायला सुरुवात केली....

आज मला तीच नाव कळलं...
सायली....
ती खूप बोलते...
कधी कधी जास्तच...
तिला बोलायला जास्तच आवडत वाटत....
पण तिच्याशी बोलताना वेळ कधी जातो समजत नाही...
आज तिने मला विचारलं की मी प्रत्येक गोष्ट इतकी सिरीयसली का घेतो..
मी काही उत्तर दिलं नाही तिला...
कारण तर मला सुद्धा माहिती नव्हतं...
आणि ही अजून एक..
आज तिच्याशी बोलताना मला कॉफी आठवली नाही...
मला तीच हसन आठवतंय...
आरवने पेन खाली ठेवला...
पेन दातात घेऊन बघत बसला होता...
त्याने डायरी बंद केली...
पण लगेचच पुन्हा उघडली...
एक शेवटची ओळ लिहिली...
कदाचित आमची ही फक्त एक ओळख आहे...
कदाचित यापेक्षा काहीच नसेल...
पण मला माहिती नाही का... मला आत्ता अस वाटतं की उद्याचा दिवस लवकर यावा...
त्याने डायरी बंद केली...
खिडकीबाहेर नजर केली....पाऊस सुरू झाला होता...
आणि त्या पावसात...आरवला first time काहीतरी जाणवलं...

कधी कधी काही लोक आपल्या आयुष्यात येतात..तेव्हा आपल्याला लगेच काही कळत नाही की ते आपले कोण असणार आहेत...आपल्या सोबत कायमचे असणार की फक्त थोड्या वेळासाठी...
काही लोक फक्त भेटतात....
काही लोक कायमची आठवण बनतात...
आणि काही......आपल्या आयुष्यातील कथेचा भाग बनून जातात...
आरवला अजून काही माहितीच नव्हतं...
फक्त तीच नाव माहिती होत...सायली...
आणि त्याच्या काळया डायरीत..तिच्यासाठी आठवणे पान कधीच उघडलं होतं....


To be continued...

©DipakRinge05