नाते डायरीशी ... - 4 Dipak Ringe द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नाते डायरीशी ... - 4

प्रोजेक्ट च काम संपवून सगळे बाहेर पडले होते...

नेहा आणि सायली बस स्थानकाच्या दिशेने रवाना झाल्या..

आरव आणि समीर  थोडे मागेच होते..

समीर ने आरवला विचारले .

ती तुला आवडते का?

आरव जागेवर थांबला...

कोण? त्याने तो काय बोलतोय हे समजल होत पण त्या गोष्टी बद्दल अज्ञान आहे अस दाखवत विचारलं...

तीच व्यक्ती जिच्या सोबत तू गेले तीन तास प्रोजेक्ट वर काम करत होतास...  समीर सरळ म्हणाला...

You mean सायली....

हो ...तीच ती..

नाही रे...आम्ही फक्त मित्र आहोत ..

हो? समीर ने प्रश्नार्थक विचारले.

मी तिला विचारला होत आपण मित्र आहोत का? पण मला उत्तर नाही मिळालं..आरव ने हसतच म्हणाला आणि टॉपिक बदलण्यासाठी तो म्हणाला..

उद्याच डाटा कलेक्शन आहे.

समीर ने त्याच्याकडे बघितला आणि म्हणाला.. टॉप टॉपिक change करतोय...

हो... आरव ने एका शब्दात उत्तर दिलं.

म्हणजे तुमच्यात काहीतरी आहे... समीर ने पुन्हा  टिपिकल डिटेक्टिव सारखं विचारलं..

नाही...काही नाही आमच्या मधे..आरव ने पुन्हा उत्तर दिलं..

समीर एक सेकंद थांबला आणि म्हणाला.

एक बोलू..?

काय? आरव म्हणाला..

तू जेव्हा जेव्हा तिच्याकडे बघतो तेव्हा तेव्हा तू वेगळाच दिसतोस...

आरव ह्यावर काही बोलला नाही.

समीर पुढे निघून गेला..

पण समीर तिथेच उभा राहिला..त्याला स्वतःलाही तो प्रश्न पहिल्यादांच गंभीर वाटला आणि त्याने स्वतःला विचारले.

सायली आवडते का?

नाही.. त्याने स्वतः स्वतःला उत्तर दिलं...

त्याच्या मनामध्ये गोंगाट सुरू झाला... त्याला त्याच्या उत्तरावर विश्वास बसत नव्हता. 

पुढच्या सकाळी पावणे आठ वाजता आरव चा फोन वाजला..

समीर सायली कॉलिंग अस लिहून आलं..

काही सेकंद त्याने स्क्रीन कडे बघितला आणि मग कॉल उचलला.

Hello?

झोपेत होतास.... समोरून सायली बोलली..

नाही ... झोपेत नाही आहे..

खोट... सायली हसत म्हणाली..

काय झालं? आरव ने मुद्द्यावर बोट ठेवलं

प्रोजेक्ट बद्दल बोलायचं आहे.. सायली मुद्द्यावर आली..

काय बोलायचं आहे? काय झालं? आरव ने विचारलं

आज आपल्याला कमीतकमी 50 तरी रिस्पॉन्डंड पाहिजेत..

हो माहिती आहे मला त्याच काय?  आरव स्पष्ट बोलत होता

तुझ्याकडे किती आहेत? सायली ने त्याला विचारलं

माझ्याकडे सात आहेत.. आरव म्हणाला

सात? सायली जोरात म्हणाली.... फक्त सात.

हो तुला काय झालं.. अशी का बोलते..

मी तुझ्यावर विश्वास ठेवून बसले होते.. मला वाटलं तुझ्याकडे जास्त असतील...

तुझे स्वतःचे किती आहेत मग आरव ने प्रश्नाला प्रश्न केला..

माझे अकरा आहेत...

मग?

अरे मग काय म्हणजे एकूण आठरा झाले .. सायली म्हणाली

एकूण बत्तीस बाकी आहेत ना..

हो... ती म्हणाली

दोघ थोडावेळ शांत होते..

आज मला कॅन्टीन मधे भेटशीलं मला थोड बोलायचं आहे तुझ्याशी... सायली म्हणाली

कशासाठी?  आरव म्हणाला

प्रोजेक्ट वर बोलायचं आहे...

किती वाजता?

लेक्चर नंतर भेटू ना

आरव ने ओके केलं...

आणि हो... आज कॉफी मी घेणार..

आरव हसला आणि म्हणाला का?

कालची  भरपाई...

अजूनही तेच...

हो मग....

ठीक आहे.. bye..

Bye...

कॉल कट झाला.. आरव ने फोन खाली ठेवला. त्याच्या चेहऱ्यावर हसू होत.

कोणाचा फोन होता रे? आईने किचन मधून बाहेर येत विचारलं..

ते कॉलेज मधून... आरव ने अडखळत उत्तर दिला..

इतक्या सकाळी सकाळी..

हो...

आई ने त्याच्याकडे बघितला...

आग बघते काय.. प्रोजेक्ट च काम आहे... आरव तिच्याकडे बघत म्हणाला.

हो.. मग इतका हसतोय का?

आरव थोडा गोंधळला ... मी हसतोय.. ते स्वतःला म्हणाला... नंतर अगं काही नाही ते असाच.. जास्त काही नाही...

आई काही बोलली नाही ती तशीच आतमध्ये गेली.

प्रोफेसर कुलकर्णी च लेक्चर संपला तसा दोघ पण कॅन्टीन मधे आले..

सायली ने दोन कॉफी ऑर्डर केल्या..

आरव पैसे काढणारच होत की सायली ने त्याला थांबवलं....

तू नाही द्यायचं मी देते... सांगितलं होत ना आज माझ्याकडून..

ठीक आहे आरव काही बोलला नाही..

ती कॉफी घेऊन आली आणि दोघे एका कोपऱ्यात बसले..

सायली ने नोटबुक उघडली..

चल responses बघू आत्ता..

ओके...तुझे सांग तू किती आणले आहेस..

मी 23 आणले आहेत..

कुठून आणि कसे?

फ्रेंड, cousins...आणि बाजूवाले..

तू सगळ्यांच प्रश्नावली पाठवलीस?

हो मग...माझं काम एकदम झटपट असता..

तू चक्क लोकांना त्रास देते माहिती आहे ना..

हो माहिती आहे मला..मी अशीच आहे..

माझे 21 आहेत...आरव ने त्याचे रिस्पॉन्डेंड दाखवले..

म्हणजे टोटल 44 झाले...तरी अजून आपले 6 कमी आहेत..सायली निराश होत म्हणाली..

मी 12 घेऊन आलो आहे...समीर तिथे येऊन बोलला..

सायली खुशी मधे टाळ्या वाजवायला लागली...

झालं एकदाच...

आरव ने एक्सेल अपडेट केला..

टोटल 103 रिस्पॉन्डेंड पर्यंत डाटा पोहचला होता...

आत्ता ॲनालिसिस करायचं ....

Age group , Risk Reference, investment Products, Digital Platformz, Information source..

सायली त्याच्या बाजूला बसून चार्ट बघत होती..

हे बघ...

काय?

इथे 22 ते 25 age ग्रुप मधे mutual funds करणारे जास्त आहेत..

हो मग....तो म्हणाला

म्हणजे young इन्व्हेस्टरमधे SIP जास्त पॉप्युलर असेल.

शक्यता आहे. तो खांदे उडवत म्हणाला

तू प्रत्येक गोष्टीला असे का उत्तर देत आहेस ती थोड रागात म्हणाली

कारण आपल्या कडे डाटा 103 च आहे...

ती काही क्षण त्याच्याकडे बघितला आणि म्हणाली

कधी कधी वाटत तुझ्यासोबत बोलताना मी प्रोफेसरशी बोलते.

Sorry...तो बोलून गेला..

नको... मला आवडत ती हसत म्हणाली

आरव ने तिच्याकडे बघितला

काय? तो म्हणाला

तू सिरीयस आहेस.

त्या एका वाक्यामुळे आरव काही सेकंड शांत झाला..

दुसरा दिवस...

सकाळपासून सायलीचे मेसेजेस येत होते .

Morning ... सायली

आज लेक्चर आह का? ...दहा मिनिटांनी विचारला..

प्रोफेसर आज assignment देणार आहेत का? ... सायली 5 मिनिटांनी

तू ऑनलाईन आहेस का? ..... सायली

तिला एकही रिप्लाय नव्हता जात.. ती काहीच बोलली नाही

इडके आरवचा फोन सायलेंट व होता.. तो एक meeting मधे होता त्याने दुपारी फोन पहिला...बघतो तर मेसेजेस वर मेसेज होते..

त्याने लगेच रिप्लाय दिला..

Sorry फोन सायलेंट व होता..

समोरून लगेच रिप्लाय आला..

Okay.

आरवला काहीतरी विचित्र वाटलं...सकाळपासून एवढे मेसेज केले आणि आत्ता फक्त okay.

त्याने लिहिल..

रागावली आहेस का?

नाही....तिने रिप्लाय केला

दहा पंधरा मिनिट तो तसाच बघून होता...मग त्याने फोन बाजूला ठेवला.

लेक्चर संपल्यानंतर आरव कॉरिडॉर मधे आरव सायलीची वाट बघत होता.

सायली त्याच्याकडे बघून पुढे निघून गेली.

सायली....आरव ने आवाज दिला..

ती थांबली..

काय झालं आहे रागावली आहेस का?

नाही ....तीच एकेरी उत्तर त्याला आतमधून खात होतं

मग बोलत का नाही तू?

मी बोलतेय तुझ्याशी.. बोलत नसते तर आत्ता इथे नसतो आपण...तिने उत्तर दिले

असं?

म्हणजे? ती म्हणाली

काही नाही...तो म्हणाला

ती काही सेकंद थांबली मग म्हणाली

तू रिप्लाय का दिले नाहीस?

अगं अस काय करते..मी तुला सांगितलं होतं ना फोन सायलेंट व होता आणि मी मीटिंग मधे होतो.

एक मेसेज करायला किती वेळ लागतो? 1 सेकंड पण नाही.

त्यावेळी ते ऑन शक्य नव्हतं.. आरव म्हणाला

ठीक आहे सायली एकदम सायलेंटकी म्हणाली

अरे...पण तू का इतक मनावर घेते...आरव तिला कुतुहलाने विचारलं

माहिती नाही....पुन्हा सायली सायलेंटकी म्हणाली

मग ... मग काय झालं.

कदाचित.....ती थांबली

कदाचित मला वाटत तू माझ्याशी बोलायला avoid करत आहेस...

आरवचा चेहरा बदलला...

मी तुला का avoid करेल? त्याने विचारलं

माहिती नाही...ती पुन्हा तसंच बोलली..

आरवने एक दीर्घ श्वास घेत म्हणाला...

मी सगळ्यांना लगेच रिप्लाय देऊ शकत नाही.

ती शांत झाली. आणि म्हणाली.

पण मला वाटलं...  ती अडकली

काय ? तुला काय वाटत?

मी तुझ्यासाठी वेगळी असेल..म्हणून अपेक्षा केली होती.

आरव काही बोलला नाही...

सायलीची नजर खाली होती..

आरव ने हळू आवाजात टीका विचारलं...

तू माझ्यावर एवढा विश्वास ठेवते?

हो.... तिने लगेच त्याच्याकडे बघत उत्तर दिला.

तुला नाही आहे माझ्यावर विश्वास...

हो आहे ना...त्याने उत्तर दिल

किती करतो तू माझ्यावर विश्वास

हम्म्म...मी अजून मोजला नाही...आरव नाटकी भाषेत म्हणाला

ती लगेच हसली...

आरव तिच्याकडे बघत बसला...हसताना खूप सुंदर दिसते...मनातच बोलला

मला एक गोष्ट सांग...सायलीच्या बोलल्याने तो जागा झाला

कोणती? तो म्हणाला

आपण नक्की कोण आहोत....तिने सरळ विचारलं

आरव ला अपेक्षित नव्हतं..तो भांबावला...

मित्र ...त्याने लगेच उत्तर केलं

फक्त मित्र...? तिने निराश होत उत्तर दिलं

आत्ता तरी...तो म्हणाला

Okay... सायली ने मान हलवली

ती निघून गेली...

आरव तिला जाताना बघू लागला. .

त्याला तीच okay खूप काही सांगून गेल होत.

त्या रात्री त्यानं पुन्हा ती डायरी उघडली..

बाहेर थंड हवा होती..सोबत गार पाऊस पडत होता.. खिडकी बंद होती आणि ख्रिकीवरून पाझरणारे पाणी बघत तो विचार करत होता...खूप विचार करून शेवटी त्यानं लिहिल..

आज चक्क ती माझ्यावर रागावली. मला आश्चर्य वाटल नाही .. आश्चर्य ह्या गोष्टीच वाटत होतं की तिचं रागावणं मला इतकं का वाटलं..ती माझ्याशी बोलली नाही की मला काहीतरी कमी असल्यासारखं वाटत होत.तिने मला विचारलं आपण कोण आहोत..मी मित्र म्हटल्यावर तिचा बदलता चेहरा त्याने हेरला होता.फक्त शब्दांवर जोर देत तो हसला.... फक्त मित्र..ही मैत्री आहे का? की मैत्रीच्या नावाखाली काहीतरी दुसरच आहे. मला माहित नाही..काय होतंय पण एक गोष्ट नक्की आहे ... मला तिची सवय होत आहे आणि सवयी तुटायला वेळ लागतो.कधी कधी माणूस सवयीला प्रेम समजतो.. आणि कधी कधी प्रेमाला फक्त सवय म्हणून दुर्लक्ष करतो. पण मी काय करतोय... हे मला अजून समजता नाही..

आरवने डायरी बंद केली. पण ह्यावेळी त्याने ती ड्रॉवर मधे न ठेवता खिडकीजवळ ठेवली...पावसाचा ओघ थोडा शांत झाला होता..झरपणारे पाणी शांत झाले होते. .. त्या खिडकीवर ठेवलेल्या डायरी कडे बघत तो झोपी गेला..त्याला उद्या सकाळी पुन्हा कायतरी लिहायच आहे म्हणुनच वाटत त्याने डायरी खिडकीवर ठेवली  नाहीतर तो ड्रॉवर मधे ठेवायचं.

उद्याचा दिवस कसा असेल...

त्यांच्यासाठी उद्याचा दिवस फक्त प्रोजेक्ट  चा दिवस नव्हता तर तो दिवस त्यांच्यासाठी त्यांच्या मैत्रीतली पाहिली परीक्षा घेणार होता.

पुढे आपली कथा खूप चांगल वळण घेणार आहे... आरव आणि सायली मैत्रीच्या नात्यामध्ये येणार की अजून काही होणार..

नक्की कमेंट मधे सांगा..

तुमच्या टिपण्या लिहायला motivate करतात..

क्रमशः..

©DipakRinge05