Nishabd Antrang - 2 books and stories free download online pdf in Marathi

निशब्द अंतरंग - 2

निशब्द अंतरंग

भाग - 2

क्षणभर...........|

क्षणभर तुझी भेट हवी होती,

मनातलं बोलण्यासाठी,

आठवणी खोलण्यासाठी,

विरहाचं दुःखं,

तुझ्या ओटीत सांडण्यासाठी,

क्षणभर तुझी भेट हवी होती,

मनातलं बोलण्यासाठी |

रात्रीचा दिवस कधी झाला,

कळलंच नाही,

मनासी भावनांचा भार,

जराही बिलगला नाही,

पण नयनांतील आसु,

का ? ..... कशासाठी ?

अजुनही उमगलं नाही,

आज तरी शोधतोय कारण,

फक्त रडण्यासाठी,

रित्या काळजात कुणाच्या,

नाव आपलेपणाचं कोरण्यासाठी,

क्षणभर तुझी भेट हवी होती,

मनातलं बोलण्यासाठी |

हि रात्र अशी विटलेली...

पापण्यांत दडण्यासाठी,

आतुर तरी क्षण,

उमलुन जगण्यासाठी,

प्रहर रात्रीचा .....

आजही सरत नाही,

ढळल्या, पिंजल्या दिशांत,

दुःखही विरत नाही,

तु हवीस हर क्षणीच मला,

परी....

नियतीस बघ रुचत नाही,

तु आणि मी .....

अबोल ....असाह्य ...

पाहुन मन कधी ...

तिचंही भिजत नाही,

म्हणुनच हवेत....

उसनेच क्षण काही,

गुज मनीचं खोलण्यासाठी,

क्षणभर तुझी भेट हवी होती,

मनातलं बोलण्यासाठी |

दोन पंक्ती ...|

दोन पंक्ती आसवांच्या कधी,

तुजसाठी बोललो होतो,

दोन उक्ती समजाव्या म्हणुनी,

रात्रभरही जागलो होतो,

त्या दोन शब्दांत तुझ्या,

काय सांगु .....

किती क्षण धुंदलो होतो,

दोन पंक्ती आसवांच्या कधी,

तुजसाठी बोललो होतो |

विसरून जावे तुला म्हणुनी,

द्वेषाखातर पेटलो होतो,

विसरेन तुला .... कायमचा,

या हट्टाखातर झटलो होतो,

विसरशील तु .... वाटता वाटता,

कधी .... स्वतःलाच भुललो होतो,

दोन पंक्ती आसवांच्या कधी,

तुजसाठी बोललो होतो |

इतके का कुणी...

कुण्या काळजात जाते,

हुंकारास काळजाच्या,

मग मीही तसाच हुंकारलो होतो,

दूर दूर जाता जाता,

पासही तुझ्या ......

तितकाच मी येत होतो,

आता येणे राहिले न कुठले,

न राहिले जाणेही ,

अशा अंधारी ....कुट्ट भरल्या,

रात्रीत मी रमलो होतो,

दोन पंक्ती आसवांच्या कधी,

तुजसाठी बोललो होतो |

ते प्रेम ....|

जे शब्दांत कधीच बांधता येत नाही,

ते प्रेम आज...........

या चारोळींत भरू पाहतोय,

किती हताश....... किती उदास,

लेखणीस काही सांगु पाहतोय,

जव पाण्याचे अगणित तुषार,

पावसासंगे धरीत्रीस भिडतात,

तव सुगंध मातीचा....

चहुवार दरवळतो ,

तसाच पाडुनी भावनांचा पाऊस,

हृदयी तुझ्या प्रेमसुगंध,

मी आणु पाहतोय,

जे शब्दांत कधीच बांधता येत नाही,

ते प्रेम आज....

चारोळींत भरू पाहतोय |

प्रथमच तुला सांगतो जरी,

कधीच तुला बोललो तरी,

तु वाट शब्दांची फक्त पाहु नकोस,

शब्दवाटेवर पडलेली .....

भावनांची मऊ मखमल .......

ती एकवार तु स्पर्शुन पहा...

घडलेला .... आनंद क्षणाचा...

असा उडु देऊ नकोस,

ठेव अंतरात तो .... आठवण म्हणुन माझी,

उगाच परका त्यास मानू नकोस,

हे विचित्र तरीही वास्तवदर्शी .....

स्वप्नांत कधी...

अंतात कधी...

ती वेडी जाणीव ... वेडी भावना,

मीच जणु सभोवताली,

.... घडवु पाहतोय,

ते प्रेम आज....

या चारोळींत भरू पाहतोय |

आता तुला सारं काही.....|

आता तुला सारं काही,

आठवेल की नाही कुणास ठावूक?

भावनेच्या भरात, थकल्या उरात,

दुःखं विरहाचं दाटेल की नाही कुणास ठाऊक?

आता तुला सारं काही,

आठवेल की नाही कुणास ठाऊक ?

तो दिवस अजुनही स्मरतो,

ज्याक्षणी.....

सारं काळीज , तुझ्यासमोर रितं केलं,

ओतल्या भावना...

ओतली तडफड...

आसवांचे थेंब .... अगदी...

पापण्यांच्या कडांवर,

कुणास ठाऊक कसं,

पण सारं नकळतच घडलं,

क्षणभर मिटले डोळे,

पण आभाळ मात्र ...

असं उगाचचं बरसलं,

तु बोललीस काही,

अगदी काळीज चिरून जाणण्याइतपत,

तु आघातही केलेस...

अगदी मरून जाणण्याइतपत ....

पण आजही मी जिवंत ....

फक्त तुझ्या आठवणी .... जगवत ....

हे तुला कधी....

कळेल की नाही कुणास ठाऊक ?

आता तुला सारं काही,

आठवेल की नाही कुणास ठावूक?

तुला आठवतंय ...

जेव्हा ... तु बोलायचीस,

कारण नसताना कधी,

उगाचच भांडायचीस,

नको नको म्हणता....

अरे .... किती हळवी तु व्हायचीस,

आत्ता... आला ओठांवर...

म्हणता म्हणता ...

ती एक ओळ मात्र...

सदैव अशीच दूर पळायची,

मी म्हणे तु म्हणशील,

तुझ्या मनात... की मी म्हणेन,

अन् असं मी तु ... मी तु .. करता करता,

वेळ मात्र कापरागत उडुन जायची,

रहायची विषन्न मने ...

रहायच्या धुसर आठवणी...

पण निजताना मात्र..

ओल्या डोळ्यांत भिजली...

उशीही काही ओलीच असायची,

कारण नीज जरी ... थकल्या डोळ्यांत,

पण तुझी आठवण मात्र...

सारखीच छळायची.. हे असं कुठवर ..?

म्हणुन खिन्न आज जरी...

तरी उमेद नवी ... उद्या नव्याने जागायची,

बोलेन आज, सांगेन आज,

म्हणता म्हणता ....

तु मात्र निघुण जायचीस...

आता ... या आठवणींच्या धुक्यात...

माझा कवडसा...

तुला दिसेल की नाही ... कुणास ठाऊक ?

आता तुला सारं काही,

आठवेल की नाही कुणास ठावूक ?

निघुन तु जाशील.....|

भीती वाटते की .....

निघुन तु जाशील...

न सांगता कधी..

एकट्या क्षणी..

मला सोडुन तु जाशील,

भीती वाटते की..

निघुन तु जाशील |

चांदण्यांच्या रातीत,

चांद कधी...

निपचीत बसलेला,

चांदण्यांचाच महाल,

जणु तयास दिसलेला,

वेडात क्षणभर,

तोही फसलेला.. तुही अशी,

फसवुन मला,

कधी लावुन लळा ...

पापण्यांत ओल देऊन जाशील,

भीती वाटते की..

निघुन तु जाशील |

आज क्षणभर स्वस्थ...

जीव माझा नाही...

सारखी तळमळ...

चैन जीवा नाही,

हि वेडी बडबड ...

हि उनाड शांतता ...

... वाटतं कधी...

असंचं समोर तुझ्या जावावं,

धरावा हात हाती,

अन् मनातलं सारं,

एका दमात सांगावं,

पण घाबरतो जीव पुन्हा...

की तु वेडा ठरवुन जाशील,

अन् पुन्हा...

मला कधीच ना तु पाहशील,

भीती वाटते की..

निघुन तु जाशील |

चांदण.......|

उरी तुझ्या हे चांदण ल्याले,

सांग कुणा पायी,

मनही तुझे वेडे झाले,

सांग कुणा पायी,

साऊलींचे आभास किती...

अन् किती घडतील ... स्वप्न गीते...

आठवणींचा ओलावा कधी,

कधी विरहाची सल येई,

पाठवतील उषा नव्याने ...

भास कुणाचे बाई,

उरी तुझ्या हे चांदण ल्याले....

सांग कुणा पायी...

मनही तुझे वेडे झाले,

सांग कुणा पायी |

रात्र कधी हि अबोल होते,

चंद्रचांदणी .... अमोल होते,

स्वप्नांचे नील सरोवर,

... मग् धुंद पापण्यांत येऊन जाते,

हे स्वप्न कुणाचे...

अन् का ... हि काया शहारत जाई,

उरी तुझ्या हे चांदण ल्याले,

सांग कुणा पायी....

मनही तुझे वेडे झाले,

सांग कुणा पायी |

अंधारास तीट जणु....

शब्दांचाही वीट जणु...

अन् भावनांचे साचे हि ...

किती लोभस ...

तरी....

आज परी निरस झाले,

शब्द उठले अंतरातुनी,

भाव परी...

नयनात अडले...

घडले आभासांचे ...

असंख्य कल्लोळ ....

तरीही काळीज ..

न जाणे ... कैसी

भाषा मज बोलुन जाई,

उरी तुझ्या हे चांदण ल्याले,

मनही तुझे वेडे झाले,

सांग कुणा पायी |

कधी काळीज.....|

कधी काळीज काढुन उरीचं,

तुझ्या हाती ठेवावं वाटतं,

जे नाहीच जमत सांगणं मला,

ते त्यानं सांगावं वाटतं,

कधी काळीज उरीचं,

हाती तुझ्या ठेवावं वाटतं |

प्रत्येक क्षणाची वेदना,

थरथरत्या हातांनी तुझ्या जाणावी,

प्रत्येक वेडी घटका,

तुझ्या ओठांत पुटपुटावी,

कधी झुगारून जगाची बंधनं,

अन् सोडुन लाजेची लख्तरं,

आहे ते सहज प्रेम ....

तुझ्यासमोर .... पायघड्यांपरीस..

अंथरावं वाटतं ....,

कधी काळीज उरीचं,

तुझ्या हाती ठेवावं वाटतं,

जे नाहीच जमत सांगणं मला,

ते त्यानं सांगावं वाटतं |

ऐकुन त्याचे शब्द ....

तुझ्या पापण्या पाणवतील कदाचित,

..... न वाटताहि कधी....

प्रेम .... वेडं स्मरणात येऊन जाईलही कदाचित,

बोलावं काही म्हणुन ....

ओठ तुझे हलतील हि किंचित ....

पण् पुढच्याच क्षणी....

हुंदका आठवणींचा आल्यावाचून राहणार नाही,

कारण ......

काळीज जरी तुझ्या हातात...

तरी मी .... अन् माझं अस्तित्व...

जगी या उरणारचं नाही...

म्हणुन जाण्याआधी वेळ ....

तुझ्याशी बोलावं वाटतं...

अन् तडफडत तडफडत अंती...

विव्हळणारं .... असं...

माझं काळीज उरीचं ....

हाती तुझ्या ठेवावं वाटतं,

जे नाहीच जमत सांगणं मला,

ते त्यानं सांगावं वाटतं,

कधी काळीज उरीचं,

तुझ्या हाती ठेवावं वाटतं |

कशी विसरशील ........|

कशी विसरशील तरी सांग,

भरल्या आभाळाशी केलेलं गुज,

... कुठे माझ्याविना अस्वस्थ कुस ,

पापण्यांच्या कडांशी असाच,

दाटलेला आसवांचा सडा,

सांग ..... जमेल विसरणे तुला....

गजऱ्याचा .... वेडा सुगंध ....

अन् माळताना मी तो,

अंगभर .... उठलेला शहरा...

तु बोलली नाहीस कधी तरी,

शब्दावीनाच जाणलेला प्रत्येक,

क्षणांचा तो अर्थ निराळा...

अजुन तर उतरली नाहीच,

आसवांखाली दडुन गेलेली...

नयनांची सुज .......

अन् कशी विसरशील ते तरी सांग,

कशी विसरशील तरी सांग,

भरल्या आभाळाशी केलेलं गुज,

... कुठे माझ्याविना अस्वस्थ कुस |

शांत कधी कुण्या उनाड प्रहरी,

कुठे .... वनीच्या शांत वेली ....

आपणही ..... किती शांत ....

कसे एकमेकांत झोकु पाहयचो,

न बोलता .... न स्पर्शता.....

फक्त नजरेतुन ....

तुझ्या मनातलं ओळखु पाहयचो,

कधी कधी तु चिडायचीस ...

तेव्हा गोऱ्या गालांवर तुझ्या,

गोड लाली दाटुन यायची,

....मग त्या गुलाबी छटांत....

ते क्षण .... अन् अवघं विश्वच माझं,

गुलाबी व्हायचं ....

अन् चिडलीस तु तरी,

हसु माझं मुळीच नाही जायचं ....

मग ढाळून आसवं,

कशी पट्कन कुशीत शिरायचीस ...

बोल म्हंटलं काही ...तर...

हुंदके देऊन रडायचीस ...

.... आता ना ती कुशी...

ना ... तुझ्या असण्याची भुल ...

आता तुही नाहीस...

ना तुला छळु पाहणारी...

माझी शब्दांची कुस ....

पण तरीही कशी विसरशील ते तरी सांग,

भरल्या आभाळाशी केलेलं गुज,

... कुठे माझ्याविना अस्वस्थ कुस |

इतुके अलगद ....|

इतुके हे अलगद घडले,

म्हणता म्हणता माझे माझे,

सर्वस्व जणु तुझ्यात मिटले,

इतुके कसे भान मला न की,

.... काळीज जणु उरातुन सुटले,

नाही बंधन नाही ... अडचण ...

तुज काळजात का हे जाऊन फसले,

इतुके हे अलगद घडले,

मलाही माझे भानच नुरले |

साद तुझी कुण्या संध्याकाळी ...

हाक तुझी ... या वेडापायी ...

खुळेच अनुभव शब्दांनाही...

स्वप्नही तु अन् ...

वास्तवाशी तुझी नवलाई...

आवर्तने तुझी,

तुझ्या आठवनींची उजळाई ...

वेड कसे .... ठाऊक नव्हते...

आज परी...

क्षण सारेच कसे हे वेडे ठरले,

इतुके हे अलगद घडले,

मलाही माझे भानच नुरले |

कंठ्ताना क्षण एक...

भासती हे .... युगाचे पर्व,

पर्वाची कल्पणा फक्त....

परी ..... अस्तित्वावीनाच सर्व...

असा उदास किती होतो,

आणि उधान मनात कधी...

तुलाच भरतो...

अन् नकोच तु..

म्हणुनही .... तयास छळतो,

ते मनही आज जणु,

माझ्यावर रुसले....

आठवण तुझी...

वेड तुझे .... सहवास तुझा...

अन् सर्वस्वही तुझे

कितीसे ठाऊक ...

मला ...प्रेम तरी ..

वेड मात्र काळजासही पुरून उरले,

इतुके हे अलगद घडले,

मलाही माझे भानच नुरले |

नकोच.....|

नको मजला...

तो स्वप्नांचा गाव आता,

नको मज स्वप्नांची वाट,

अवघी फरफट जयावरती,

नको मजला असली रहाट,

प्रीत नको मज ...

अन् नको कुणाची आठवण फार,

ते शल्य मनी ....सदैव,

ऐशी ... नकोच मज ती काळी रात,

नको झुल चांदण्यांची ,

नको मज कुणाचे भास,

का कुणाचे हे स्वप्न ..

का कुणाची ओढ ...

नकोच मजला अविट काही,

अन् नको काही कटु विरहता,

शब्दासंगे .... बहुत खुष मी...

नको मला कुणाची सात्वंनता ...

हे विश्व माझे...

जे घडले आहे माझेभोवती,

हा प्रत्येक क्षण माझा ...

जो माझ्यासाठी माझा होतो...

सर्वस्व हरपुन तयाचे ...

माझ्यात कधी विरू पाहतो,

असली माणसे नको...

नको माणसांच्या सावल्याही ...

असली वतने नको...

अन वतनाची मालकीही,

सरसर जातील या जन्मघटिका,

.... नसेल उद्या नंदनवन ...

न कोणती वाटिका ,

हे सत्य असता ....

माझे स्वप्न जपता ...

घडेल ... उरास त्रास थोडा,

येतील कधी कंठात प्राण,

पण आता नकोच मजला,

तो स्वप्नांचा गाव ...

अन् नको मज ती स्वप्नांची वाट,

अवघी फरफट जयावरती,

नको मजला असली रहाट |

तुझ्यावीना अन् तुझ्यावाचुन ....|

तुझ्याविना कंठत नाही क्षण,

तुझ्यावाचुन भरत नाही मन,

रात्र तुझ्यावाचुन रिती,

दिवस तुझ्यावाचुन बेभान,

कितीएक आसवं ढळली,

क्षणांसाठी दुःखं उधार,

नीज कधीच उडुन गेली,

गेलं शब्दांचही शब्दपण,

तुझ्याविना कंठत नाही क्षण,

तुझ्यावाचुन भरत नाही मन |

रीत जणु जन्मभराची...

रीत अशी उगा जराशी,

मनात दडली सुरा कशाची,

तुझी .... तुझ्या असण्याची,

तुझ्या .... आकंठ धुंद्ण्याची...

वाट अजुनही धुसर,

धुक्यात माखलेली,

पाऊलवाट जुनी...

आसवांत भिजलेली,

झाडवेलीही स्तब्ध ...

पाहुन दुःखराशी ...

आता पाणीही दडतय पापण्यांत,

अन् पेटतय ... अंतरात कुठे,

विरहाचही एक वन,

तुझ्याविना कंठत नाही क्षण,

तुझ्यावाचुन भरत नाही मन |

मी उदास ... रडवेला..

रक्तात जणु श्वास न्हाला..

प्रेमाचा जणु क्षण एक...

मी माझ्या मनात केला,

ते स्वप्नांचे गाव आता,

उघड्या डोळ्यांत दिसते,

तुझ्या पाऊलांचे ठसे,

अजुनही दुर किनारी तसे,

अजुनही .....

पुसली नाहीच मी,

लिहलेली तु एक कविता,

लाटांनाही .... अन् सागरास मी,

सांगितले .... ‘ आता दुर रहा ‘

एकच तर आठवण ती,

तीही ... का दुर करता,

वेडे प्रेमात तुझ्या जणु,

नवे विश्व माझ्या मनात झाले,

सारे जुनेच..... काहीच नवे,

परी सारे फक्त तु ... तुझा..

... अन् तुझ्यात न्हाले,

हे तरी सांग मज...

कुठवर चालेल पण ?

करशील काही की राहशील अशी,

जणु केला काही प्रण,

तुझ्याविना कंठत नाही क्षण,

तुझ्यावाचुन भरत नाही मन |

गंध ....|

माझ्यात जसा हा,

तुझ्यात कसा हा,

गंध उरतो राणी,

प्राणात कधी मग,

ओठांत क्षणी मग,

हुंदका फुटतो राणी,

माझ्यात जसा हा,

तुझ्यात कसा हा,

गंध उरतो राणी |

बेचैन क्षणी,

बेचैन वनी,

वणवा घडतो रानी,

पानात कधी .... पाचोळाही,

वेडात जळतो काही,

मनात परी आकंठ वाहतो,

रक्तशिरांतुनी ... अंगी भरतो,

तो शहारा उनाड नाही,

माझ्यात जसा हा,

तुझ्यात कसा हा,

गंध उरतो राणी |

काल रातीला...|

धुंद रातीला स्वप्न पडले,

तुला पाहुनी उशास दडले,

ठाऊक नाही मज काय घडले,

परी परतीच्या वाटेवरती,

आसवांचे थेंब सांडले,

खरचं ...

काल रातीला स्वप्न पडले |

मनामनांची घरे धुंडली,

आकाशीही परे झाडली,

मातीवरती कंप ढाळला,

सरावरती त्वेष झाळला,

परी चाहुल तुझी,

का दुरच राहिली,

कुणास ठाऊक का हे घडले,

काल रातीला स्वप्न पडले |

उष:काल ना सांज पाहिली,

कधी न आशा धरली साउली,

वनवास तरी मला मिळावा,

सुंभ प्रेमाचा देहासंगे जळावा,

परी पीळ तयाचा,

सदैव आठवावा,

कुशीत तुझ्या मज,

हवा फक्त थोडासा विसावा,

मनात तु तरी रान धुंडले,

काल रातीला स्वप्न पडले |

खपले चढली घावावरती,

उकलन्या का पुन्हा फिरली,

मन वळवूनी ....पुन्हा...

माया का धरली ?

सांग सखे का ,

रोमारोमात भरली,

झुरवुनी मला मग्,

स्वयेच शमली,

एक न दोन ... हजार,

आकाश आज ताऱ्यांनी मढले,

काल रातीला स्वप्न पडले |

शोधताना....|

मुकस्पर्शाची जाणिव सदा,

मनचक्षु मज आठवती,

आठवणींच्या सुमनकळ्या,

पापण्यांतीरी साठ्वती,

का कोण जाणे फुलांच्या हृदयी,

आठवण माझी मावळती,

मनातले हरबिंदू .... क्षणोक्षणी,

फक्त तुलाच ते आळवती,

का आली माझ्या वाटी,

झुरण्याची हि भावगती,

का नाही होडी माझी,

नयनरम्य पैलतीरी,

शब्दांहून पलीकडची,

दुनिया माझी गजबजती,

नसे ठाऊक कुणासी,

चाहुल असे कुणाची,

खोडकर अन् नटखट ती,

ठाव घेत मग डाव घालितो,

आज प्रेमाची नाव सारितो,

अधुरी तुझ्यावीना तरी,

वल्ह्यांसी मी गती धाडीतो |

ऐकुन घेशील.....|

बोलायचं बरचं काही,

पण ऐकुन तु घेशील,

क्षणा मागुन क्षणांचं,

वेड दुःखं तु देशील,

पर लावुन आशेचं,

कधी स्वप्नात तु येशील,

बोलायचं बरचं काही,

पण ऐकुन तु घेशील ?

जड भावनांना सहायचं गं कोणी,

उण्या हर क्षणाला,

समज घालायचं कोणी,

रित्याच आठवणींना,

का बाळगायचं उरी,

नसतो तुझ्या अंतरी,

मी कधीच जरी,

पण तरीही वाटतं तु येशील,

वेड्या भावनांना ,

अशी कुरवाळून तु घेशील,

खरचं गं....

असं बोलायचं बरचं काही,

पण ऐकुन तु घेशील ?

स्वप्नांची माळरानं,

विटली वाट पाहुन,

क्षणांचीही पारडी,

झुकली तटस्थ राहून,

आता उरलेल्या दमात तरी,

एकदा भेटुन जाशील ?

बोलायचं बरचं काही,

पण ऐकुन तु घेशील ?

तुझा छंद.....|

वेडापिसा जणु मी,

आतुर आज झालो,

न पाहता तुलाही,

पाहुनी आज गेलो,

आहे जणु मनीचा,

भास हाची सारा,

परी ठेवणे उरीचे,

उरीच दंग आहे,

तुज आठवणींचा तो,

वेडाच छंद आहे |

काहीतरी करावे,

मन वेडेच गुंतवावे,

वेड्यात वेड्पनाचे,

भरते उरीच यावे,

एका क्षणीच मी पणाचे,

वारेच गुप्त व्हावे,

तुज अस्तित्व ते मनीचे,

साक्षात मी पहावे,

परी ठेवणे हे उरीचे,

उरीच दंग आहे,

तुज आठवणींचा तो,

वेडाच छंद आहे |

तु यावे कधीही,

मी शोधीत आज आहे,

तुज अस्तित्व पावलांचे,

मी शोधीत माग काढे,

राहुनी रहात जावे,

जे क्षण मी साठवावे,

हर क्षणी पुन्हा पुन्हा ते,

मज तुझीच साक्ष द्यावे,

ठेवणे असे उरीचे,

उरीच दंग आहे,

तुज आठवणींचा तो,

वेडाच छंद आहे |

आठवण माझी.....|

तु राहशील मनी,

मनाच्या उरी,

शोधणाऱ्या पापण्यांतीरी,

अन् अबोल मज ओठांवरी,

तु स्मरशील विसरशील,

कधी काढुन आठवण माझी,

कुठे एकांती रडशील |

क्षण आठवणींचे,

काही दबले उरी,

काही ओल्या नयणांनी स्मरतील,

कधी हळव्या,

हृदयास जावुन छळतील,

काही अगदी तुझ्या,

काळजास जावुन भिडतील,

अन् काढुन आठवण माझी,

कुठे एकांती रडशील |

कधी अबोल भावना,

बोलुन सांगतील,

परी ऐकण्या कर्ण माझे,

क्वचितच तुज लाभतील,

तु बोलशील सारं काही,

अगदी भावनाही ओतशील,

परी विरहाचे दुःखं खरे,

तेव्हाच तु जाणशील,

अन् काढुन आठवण माझी,

कुठे एकांती रडशील,

..... कुठे एकांती रडशील |

सहवास.....|

सहवास तुझा,

मला कधी कळलाच नाही,

भावनांच्या गर्द्वनी,

मज प्रेमाची ती पाऊलवाट,

शब्दांच्या पलीकडची,

अस्तित्वाची गोड पहाट,

तु उमगावे शब्द माझे,

भावनांचे व्यक्त साचे,

परी योग ऐसा,

कधी जूळलाच नाही,

सहवास तुझा,

मला कधी कळलाच नाही |

श्वासांत गुंतले श्वास जसे,

वाऱ्याचाही स्पर्श हसे,

ते बंधन गोड फुलांचे,

विहरणाऱ्या अल्लड परांचे,

गीत कधी कळलेच नाही,

उमगावे मी तुला....

अन् कधी तुही मला,

प्रसंग कधी बेतलाच नाही,

सहवास तुझा,

मला कधी कळलाच नाही |

एकटेपणाच्या साथीला,

भावनांच्या असंख्य संगती,

पावलागणिक भेटतात आजही,

ते क्षण अन् त्या गाठी भेटी,

दुरवर कधी भासतेस मजला,

तु अन कधी तुझी साउली,

पण मृगजळाचा छंद पोरका,

आज मनाला स्मरलाच नाही,

न घडुनही घडावे पुन्हा,

असे काही घडलेच नाही,

अन् सहवास तुझा,

मला कधी कळलाच नाही |

तो पाऊस....|

चिंब भिजल्या पावसाळी,

गार वारी धुंद सारी,

कुठे दमटलेले शब्द माझे,

नव्या उत्साही चिंब झाले,

असाच एका छत्रीखाली,

मज नयनांनी,

ते रूप न्हाले |

मी अवचित पहुडलो,

या दिशांच्या दरबारी,

पाहुणा जणु त्या इंद्राच्या घरी,

मज अप्सरांची,

नव्हती फिकीर,

असतील समोर,

हजार गणिक,

मनाने वेड मात्र एक ल्याले,

अशाच एका छत्रीखाली,

मज नयनांनी,

ते रूप न्हाले |

शोधीत पापण्यांची,

झडपे सारी,

कधी बंद कधी अधीर,

पाहण्यास धुंद झाली,

परी पावसाळी पावसाने,

पावसाचेच छंद केले,

म्हणुन तर,

अशाच एका छत्रीखाली,

मज नयनांनी,

ते रूप न्हाले |

तु गेलीस...|

तु बोलुन मोकळी झालीस,

सांगुन समजावून गेलीस,

पण काळजावरच्या असंख्य जखमा,

त्या मात्र पाहुनही,

न पाहता गेलीस,

मनाच्या हळव्या भावनांना,

उगाच तत्वांत गुंडाळून गेलीस,

अशीच सांगुण समजावुन गेलीस |

कुणी कुणासाठी किती करावं,

अन कुणी कुणावर,

कशासाठी मरावं,

जगावं तर कुणासाठी जगावं,

अवचित घडल्या भावनांना,

किती एकदा साठवावं,

परंतु तुला सांगुन काय,

तु तर फक्त शब्दांना भुललीस,

भावनांचा गंध मात्र,

घेऊनही विसरलीस,

अन् सांगून समजावुन,

तु मात्र निघुन गेलीस |

तुझ्या जाण्याचं दुःखं नव्हतं,

तुझ्या बोलण्याचं सांगण्याचं,

तर नव्हतंच नव्हतं,

परंतु भावनांची जाणिव व्हावी,

एवढं मात्र मन सारखं सांगत होतं,

आता तु जाणल्या नाहीस,

हि ना तुझी चुक,

ना माझी चुक,

परंतु परिस्थिती मात्र तु आणलीस,

काहीतरी बोलुन,

उगा शब्दांचा आव आणुन,

असं एकटं सोडुन गेलीस,

काहीतरी सांगुन समजावुन गेलीस |

तो वेडेपणा........|

आज मजला हवा वाटतो,

तुझाच तो वेडेपणा,

तुच माझी मित झाली,

वेदनेची प्रीत झाली,

तुज बाहूंनी ग्रासलेला,

.... अश्व उधळलेपणा,

आज मजला हवा वाटतो,

तुझाच तो वेडेपणा |

रातराणी गीत झाली,

मित झाला चंद्रमा,

चांदणे विखुर सारे,

साज झाले अंगना,

तरीही अस्फुट तुझा,

जणु कळीचाच लाजलाजलेपना,

आज मजला हवा वाटतो,

तुझाच तो वेडेपणा |

लहर झील तीरी कधी,

मनातही तुज प्रीत करी,

मुसमुसलेल्या काजव्यांचीही.

सल.... तु नसल्याची किरकिरी,

हा कैसा निसर्ग तुझा,

नसतानाही तु........

तुझाच सारा असलेपणा,

आज मजला हवा वाटतो,

तुझाच तो वेडेपणा....

तुझाच तो वेडेपणा |

छळ ....|

कधी कधी भेटतेस,

उगाचच छळतेस,

उगा पुन्हा रडतेस,

हात माझा धरतेस,

रुसवा कुणाचा अन्,

कुणाशी धरावा,

तुझी तुच अन्,

तुझा तुझ्यात असावा,

असा शालु भरजारी,

जणु आठवांचा विनतेस,

कधी कधी भेटतेस,

अन् उगाचच छळतेस |

पात पानांची रुसवी,

वात मनाची विझवी,

तुझ्या गोड तरुवेली,

माळती गजऱ्याची गाणी,

शहाणी शहाणीच,

म्हणून पुन्हा पुन्हा पिडतेस,

आठवांच्या छायेखाली,

टाळेबंद अशी कधी,

भावनाही बनतेस,

कधी कधी भेटतेस,

अन् उगाचच छळतेस |

जखमा...|

ती तशी चालत गेली,

अन् काळजावर न भरणाऱ्या जखमा,

काळासहित लावुन गेली,

तिच्या प्रत्येक पावलात अडखळ होती,

तिच्या जाण्यात तिची,

चालही बेचैन होती,

बोलली होती तीच की,

“ नाही येणार परत ”

तरीही पापण्यांत नक्कीच,

ओली थोडीच कड होती,

ती पाठ्मोरीच दूर होत होती,

तिच्या जाण्यानं श्वासांचीही,

तगमग थोडी वाढत होती,

काय बोलु अन काय सांगु,

ओठ थरथरत होते,

काळीज दाटुन आलं होतं,

तीला साद घालायला,

जीभ उचलत नव्हती,

नको जाऊ सांगायला,

कंठ वळत नव्हता,

तीही तशीच मंद पावलात अडकत होती,

पाठमोऱ्या तिचं .... मुख

काही दिसलं नाही,

पण पावलांतील,

ओल्या थेंबांची रांगोळी,

अन् वेडी मुसमुस,

स्पष्ट कानावर येत होती,

कंठ माझाही फुटत नव्हता,

डोळे माझेही,

बरसण्याच्याच मार्गावर,

पण दोघेही स्वतः

स्वतःलाच सावरत होतो,

उगाच एक क्षण ....

ती फिरून तर पाहणार,

नाही ना ... म्हणुन

पाणावल्या डोळ्यांनी,

ओठांची कोर साधत होतो,

अन् ती गेल्यावरही....

त्याच ओल्या जखमा,

आयुष्यभर कुरवाळत होतो,

आजही नियतीशी झगडा चालुच,

की अशी दशा माझी,

का म्हणुन केली,

.... ती तशी चालत गेली,

अन् काळजावर न भरणाऱ्या जखमा,

काळासहीत लावुन गेली |

तु नसल्याची उणीव....|

या शांत धुंद रात्रीत,

काजव्याची किरकिरहि काहीतरी सांगतेय,

उगाच शांत बेढब वळणावरती,

वाटही .... उगाच उठुन उठुन पाहतेय,

सांगतेय, डोलतेय ...

उगाच मनातल्या भावानांसंगे,

दिवसागणिक .....

सरल्या कित्येक रात्रींचा मळभ,

कुठेतरी मनात खोलवर रुजलाय,

कुणाच्या जाण्याचा, कुणाच्या येण्याचा,

ठाव कदाचित कुठेतरी... चुकलाय,

.... उगाच पण हि थरथर....

काळीज जणु भरतेय,

तु नसल्याची उणीव कुठेतरी सलतेय |

काळाकुट्ट अंधार पापण्या मिटूनही दिसतोय,

परी उघड्या नयनांत जणु कुट्ट काळोख दरी,

तुझ्या आठव आसवांशी भिडतेय,

उनाड वाटेवर प्रीतीच्या,

अशा रानथांब्यावरतुला उगाच शोधतेय,

वेध या शांत वनाचा,

कीर्र .... काजवा भेद्तोय,

क्षणी अशा एकुलत्या तुझ्यावीना,

कुणास ठाऊक .... वेळ का न कशी कंठ्तेय,

कदाचित नसेल ठाऊक तुला पण....

तु नसल्याची उणीव कुठेतरी सलतेय |

या वीरान शांततेत आजही ती साद,

जणु पुन्हा पुन्हा या काळजाशी भिडतेय,

मग बावरलेलं मन....

या अंधारातच .... सैरावैरा पळतेय,

तु दिसत तरी नाही कशी,

तु उमटत का नाही दिशी,

सवाल हा उराशीच पुसतेय,

तीच वेडी आठवण तुझी,

पहा कशी कशी छळतेय,

तु नसल्याची उणीव,

सारखीच सलतेय..... सारखीच सलतेय |

वाटतं तु यावं....|

दुरच्या तारकांनाही,

कधी दुःखं माझं कळावं,

क्षणी भरल्या आसवांनी,

कधी येऊन मज पुसावं,

तु येशील ... न येशील...

सारी तुझी मर्जी,

मज जाणुन घेशील ...न घेशील,

.... तुझी मर्जी,

परंतु काळजाच्या हर एक कणांत,

आठवणींनी भरलेल्या मनांत,

माझं मीपण तरी कुठवर शोधावं,

.... खरचं वाटतं तु यावं |

हे पोरकेपणाचं प्रेम,

असं कुठवर निभवावं,

प्रत्येक क्षणी .... मिटल्या डोळ्यांनीच,

तुला कुठवर पहावं,

तु येतेस ....पाहतेस,

कधी गोड येऊन हसतेस,

पण असुन आपलं,

अगदी परक्यासारखी बोलतेस,

व्यथा तर माझी मी कधीच मांडली,

तु देखील ती वाचली,

परंतु भावना या ,

तुझ्या अन् तुझ्याचसाठी,

हे कसं पटवावं,

.... खरचं वाटतं तु यावं |

तु दिसु नकोस,

मला नाही वाईट वाटणार,

तु पाहु नकोस,

मी नाही खंत करणार,

तु बोलुही नकोस,

मी नाही राग धरणार,

परंतु मनात तुझ्या काय,

सांग कसं कळणार,

अन् एवढ्यासाठी तुला टाळनं,

मला जास्त दिवस नाही जमणार,

मग तुच सांग,

असं विरोधाभासात,

जगावं तर कसं जगावं,

पण अगदी......

खरच वाटतं तु यावं |

आठवण .....|

माझ्या हर एक क्षणाला,

तशीच पाचुवरच्या दवांना,

वेनीवरच्या फुलांना,

साऱ्यांच्याच मनांना,

एक गोष्ट सलतेय,

तुझी आठवण ,

सारखीच छळतेय |

धुंद पाखरांना,

अल्लड त्या थव्यांना,

दूर आकाशी ढगांना,

त्यांनाही बहुदा ....हिच गोष्ट,

रात्रीही जागवतेय,

तुझी आठवण ,

सारखीच छळतेय |

रीत असेल जरी कळ्यांना,

वाऱ्याचे बंधन असेल जरी तयांना,

हळुवार झुळुक वाटते हवी जयांना,

परी त्यांचाही काहीतरी घोळ होतोय,

उमलण्याची वेळ काळ,

त्यांचीही बिघडतेय,

तुझी आठवण ,

सारखीच छळतेय |

जुनं ... नवं ....|

खरचं बोलायला शब्द नाहीत,

मांडायला भाव नाहीत,

मनाचं म्हणत असाल,

तर त्यालाही स्वतःचं भान नाही,

कधी रोजच्याच वाटेने,

नवं काही भासतं,

तर कधी नव्या वाटेवर,

जुनंच कोणीतरी पुन्हा पुन्हा भेटतं |

शंका येतात, कुशंका वाढतात ,

शब्दांना बांधणाऱ्या भावनाही भेटतात,

रडतात कधी , हात धरून सांगतात,

त्यांच्या मनाचं मळभ,

कधी माझ्या मनी रीत करतात,

पण असं जागताना,

कुणाकडे उगीच वळुन वळुन पाहताना,

मनाला मात्र सारखं वाटतं,

जेव्हा अशा नवीन वाटेवर,

जुनंच कोणीतरी पुन्हा पुन्हा भेटतं |

शमुन जातात भावना,

कधी वाऱ्याच्या आर्त स्वरांनी,

मनही सावरतं,

उन्हाच्या तप्त किरणांनी,

पण हे सारं विचित्र,

कधी कधीच घडतं,

जेव्हा अशा नवीन वाटेवर,

जुनंच कोणीतरी पुन्हा पुन्हा भेटतं |

रात्रीच्या चांदण्यांचही काही असंच असतं,

दिवसभर थकल्यावर जेव्हा मन रुसुन बसतं,

तेव्हा त्या मला खुणावतात,

ये लवकर म्हणतात,

तेव्हा मी मात्र असाच उदास बसतो,

मग तो वेडा चंद्र बघुन माझ्याकडे हसतो,

असं वेड मन.... जाणुन सारं,

पुन्हा नव्याने फसतं,

जेव्हा अशा नवीन वाटेवर,

जुनंच कोणीतरी पुन्हा पुन्हा भेटतं |

प्रभात...|

पांघरल्या केवढ्यात जणु,

प्रातः ऐसी भिजुनी जाई,

ओल्याच भरल्या दवांनी,

पाचुंचीही उगाच घाई,

श्वेत एकवटून सारे,

नभही नव्या दमात येई,

नखरेल एका प्रभाती,

मनही कुठे हरवुन जाई |

धुक्यांचे ते स्पर्श बावरे,

भिरभिरणारे परी स्वस्थ भवरे,

पाकळ्यांची कुजबुज काही,

कळ्यांनाही उमलण्याची घाई,

चंद्राचे पाऊलही ऐसे,

निघता निघता निघत नाही,

नखरेल एका प्रभाती,

मनही कुठे हरवुन जाई |

आग ओकणारा रवी जसा,

आज परी लाजुनी सांगे,

मजही यायचे भेटण्या तुम्हा,

पाठवूनी केशरी संदेश बोले,

आता पापण्यांनाही,

झोपणे तसे जडच होई,

नखरेल एका प्रभाती,

मनही कुठे हरवुन जाई |

शब्द ...|

शब्द माझे,

द्वंद् सारे,

भावनांचे दंग वारे,

शब्दांच्याही श्ब्द्तेला,

स्तब्धतेचे रूप आहे |

रेखा किती हातांवरच्या,

पाहुनी कोण मोठे झाले,

शब्दांच्या परी परांवरी,

आभाळाचे स्वप्न न्हाले |

रंग किती भावनांचे,

सप्तसुरांचे असंख्य जणांचे,

रंगीत रंग साऊल्यांचे,

असे किती खिन्न झाले,

शब्दांच्याही शब्दतेला,

स्तब्ध्तेचे रूप आहे |

लोक म्हणती साऊलीला,

आपुलकीचे सुख आहे,

मन परी माझेच माझ्या,

हाती कुठे स्थिर आहे,

अंगी परी अजुनही माझ्या,

तप्ततेचे तेज आहे,

शब्दांच्याही शब्द्तेला,

स्तब्धतेचे रूप आहे |

तुझा छंद.....|

वेडापिसा जणु मी,

आतुर आज झालो,

न पाहता तुलाही,

पाहुनी आज गेलो,

आहे जणु मनीचा,

भास हाची सारा,

परी ठेवणे उरीचे,

उरीच दंग आहे,

तुज आठवणींचा तो,

वेडाच छंद आहे |

काहीतरी करावे,

मन वेडेच गुंतवावे,

वेड्यात वेड्पनाचे,

भरते उरीच यावे,

एका क्षणीच मी पणाचे,

वारेच गुप्त व्हावे,

तुज अस्तित्व ते मनीचे,

साक्षात मी पहावे,

परी ठेवणे हे उरीचे,

उरीच दंग आहे,

तुज आठवणींचा तो,

वेडाच छंद आहे |

तु यावे कधीही,

मी शोधीत आज आहे,

तुज अस्तित्व पावलांचे,

मी शोधीत माग काढे,

राहुनी रहात जावे,

जे क्षण मी साठवावे,

हर क्षणी पुन्हा पुन्हा ते,

मज तुझीच साक्ष द्यावे,

ठेवणे असे उरीचे,

उरीच दंग आहे,

तुज आठवणींचा तो,

वेडाच छंद आहे |

माझ्या भावना.....|

मम भावना उरीच्या,

माझ्यात धुंद आहे,

या भावभावनांचा,

ओलाच अर्थ आहे,

मी बोलणे तरीही,

सारेच व्यर्थ आहे,

या भावभावनांचा,

ओलाच अर्थ आहे |

तुजसवे ज्या क्षणांची,

आतुर वाट पाहे,

मनतरी पावलांचे,

तुजकडे धाव घेते,

मी क्षणांचाच होतो,

पाहुणा तुज उरीचा,

सांगणे ते कितीही,

सारेच व्यर्थ आहे,

मम भावभावनांचा,

ओलाच अर्थ आहे |

तुज पाहताच माझे,

डोळे किती दिपावे,

मज पापण्यांत सारे,

गुंतुनी आज आहे,

ते दुःखं मज मनीचे,

वेडावते मला गे,

ऐसे कितीही माझे,

सांगणे व्यर्थ आहे,

मज भावभावनांचा,

ओलाच अर्थ आहे |

तुज एकदा तरी हे,

सांगुनी मी पहावे,

ती भेट एकदाची,

नातरी खंत वाटे,

हे चिंबचिंब माझे,

काळीज ते पहाते,

उमगणे तुला जे,

मज हवेहवे वाटे,

ऐसे किती तरीही,

सांगणेच व्यर्थ आहे,

मज भावभावनांचा,

ओलाच अर्थ आहे |

भावना उरीच्या....|

शब्दांचे डोंगर,

मी बांधीत गेलो,

भावना उरीच्या,

जणु सांधित गेलो,

जड अंतकरणी असे,

काहीतरी दडवुनी गेलो,

न वाटता न वाटणारे,

सारेच जणु वेधित गेलो,

शब्दांचे डोंगर,

ऐसे मी बांधीत गेलो,

भावना उरीच्या,

जणु सांधित गेलो |

तु फुल अबोल,

धुंद जणु वेलीवरचे,

तु शब्द जणु,

दरवळनाऱ्या गंध फुलांचे,

तुच होतीस भुंग्याचे गुंजन,

तुच बनलीस,

वाऱ्याची .... हळुवार झुळुक,

मी परी शोधीत गेलो,

रुक्ष मनांच्या रुक्ष जगी,

साद तुज घालीत गेलो,

शब्दांचे डोंगर,

ऐसे मी बांधीत गेलो,

भावना उरीच्या,

जणु सांधित गेलो |

तु कोकीळेची कुहुक,

जणु श्वासांची,

मंद मंद चुणुक,

तु तृणांवरचे दव जणु,

तुच भावनांचा आर्त क्षणु,

तु हृदयाची धकधक जणु,

तर कधी ओल्या नयनांचे आसु,

तुज ऐसी कितीक रूपे,

परी फक्त मीच ती पाहीत गेलो,

भावना उरीच्या,

जणु सांधित गेलो |

कधीतरी एकांतात....|

संपता संपता संपेना,

दिनदिवसाचा हा गाभारा,

कुणी शोधावे किती कुणा,

मनासी परी सदा उभारा,

ठाऊक जरी उद्याचा कल्लोळ,

जीवासी परी सदा घोर,

आठवणींच्या रानामधला,

पिकांचा हा जल्लोष,

दबले कितीही जरी,

काळ पाताळ अंतरी,

तरी धरणीकंपाची,

सांगा द्यावी कुणी ग्वाही,

मग झुलतात दिशा दाही,

आठव तुषारा नवीच उभारी,

दुःखाचे नाहीच मुळी,

जे दिसतात ...

नयनडोहाच्या तीरी |

परंतु.....|

शब्द ओठांनी कोरले,

मन घायाळ आज सांधले,

उडणाऱ्या पाखरांच्या,

गतीत साद धाडिले,

उन्हाच्या त्वेषातुनी,

आज पेरिले,

संध्येच्या मुखात,

फळ केशरी पुन्हा पाहिले,

हृदयातले भाव परी,

कंठानिशीच आडले |

कोण कोणाची होतीस तु,

का मनाशी भिडलीस तु,

नजर प्रेमाची,

का दिधलीस तु,

अन् मग घायाळ,

हृदयात का बरं झुरलीस तु,

काय गुन्हा माझा,

मलाच नकळे,

हृदयातले भाव परी,

प्रातेःआधीच मावळले |

मळभ...|

उगाच माझे मळकटलेले,

शब्द तुला ऐकवतो,

दडलेले ते पडलेले,

पर्ण उगा कुरवाळतो,

अंतात कुणाच्या घडलेले,

जन्म कधी अनुभवतो,

उगाच माझे मळकटलेले,

शब्द तुला ऐकवतो |

ओठात कधी ते थरथरलेले,

मृदु शहार आज आठवतो,

रंगीत तरीही बरबरटलेले,

क्षण उरी बाळगतो,

रात्रीत कधी ती रटरटलेली,

पहाट मनी साठवतो,

उगाच माझे मळकटलेले,

शब्द तुला ऐकवतो |

रित्याच साऱ्या आठवणी,

रिती झाली मस्तिष्के,

तरीही उद्याचा सुर्य हवा मज,

म्हणुनी गीत आळवतो,

वेडात असे गडबडलेले,

मन फुकाच ते मी सावरतो,

उगाच माझे मळकटलेले,

शब्द तुला ऐकवतो |

आभास.....|

आभास सावल्यांचा,

आभास पावलांचा,

आभास कधी कुणाचा,

आभास अंतराचा,

शब्दांत सांगण्याचा,

ओठात डोलण्याचा,

नयनात बोलण्याचा,

आभास सावल्यांचा,

आभास पावलांचा |

कधी आभाळ छेदण्याचा,

सल वेडीच झेलण्याचा,

आभास त्या क्षणांचा,

मी क्षणात दुर जातो,

क्षणी पुन्हा तीत येतो,

वेड्यात वेडपणाचा,

आभास सावल्यांचा,

आभास पावलांचा |

शोधीत शोधण्याचा,

कोणास वेधण्याचा,

ऐकुन ऐकण्याचा,

क्षण एक ...तरीही,

एकांती कोंडण्याचा,

वेडेच बोलण्याचा,

वेडात डोलण्याचा,

वेडात वेड सारे,

वेढुन संपण्याचा,

आभास सावल्यांचा,

आभास पावलांचा |

भावनांचे झरे....|

त्या निळ्या आभाळांत,

काही शोधात होते ढग ,

अंतीची रग ... आठवणींची धग,

त्या रित्याच क्षणात ...

काही शोधीत होते मग,

.. ती आसवे बोलण्यास आतुर,

क्षणास कारण थातूर मातुर,

सदैव चैर्या अशी चिंतातुर,

अशात कधी .... आसमान वेडे झाले,

संपली निळी नवलाई,

अन् भावनांचे झरे झाले |

तु भेटशील .... भेटणार...

भेटुन जाणार ...

म्हणून मनाला उभारी,

काळजात काळजाचे जसे,

गोड गोड पाणी,

तु असणार .... मला दिसणार,

म्हणुन वेडावलं मन,

मग सुटलं कोडं,

त्या निळ्या आभाळांत ....

काय शोधीत होते ढग,

.... आता तुला भेटण्याची घाई,

... एका क्षणात डोळा तुला साठवावे काही,

ओढ वेडी तुझी ... कशी भरभर चाले,

पापण्यांत आसवांचे बघ ढोह दाटू आले,

संपली निळी नवलाई,

अन् भावनांचे झरे झाले |

प्रेमातुर साथ वेड पांघरून आली,

क्षण दोन जणु,

काळीज चिरतच गेली,

आता पुन्हा भेट.....?

जणु भांडले शब्दांशी थेट,

ओलाव्यात भावनांच्या,

आडोसा स्वप्नांचा घेत,

वास्तव परी समोर...

जीव तरी कसा ...व्हावा बिनघोर...

काय करावे... कुणास स्मरावे,

तुझ्यावाचुन उरी ...कुशीत..

असे कुणास धरावे..

आशेचे रंग फिकट...

पापण्यांत जसे वाहुनच गेले,

संपली निळी नवलाई,

अन् भावनांचे झरे झाले |

हसु गालावर थोडे ... तरी...

आणलेच कधी...

शब्दावाचून जाणशील सारे,

वाटले होते मनी...

दूरची रहाट,

विरहाची पहाट,

वाटले होते बदलेल काही,

जडतील भावना...

घडतील उसासे...

माझ्या मनी क्षणाचे,

जाणुन घेशील सारे..

पण तु ... असा कोरड्या आसवांत दडला,

मेघांनी जणु आवेशच ढळला,

असा कसा रे ... तु...

न सांगताच चाललास ...

आठवणींचे सोड...

निर्वाणीचे तरी का ... बोललास?

घडलेच सारे निपचित ...

कोणी काही बोललेच नाही...

लागली ... जन्माची हुरहूर ,

तरी आभाळ मात्र चिंब न्हाले,

डोळ्यांत कधी...

तर कधी ... दूर आकाशी,

असेच काही अनघटीत...

ढग जणु उन सारे प्याले,

संपली निळी नवलाई,

अन् भावनांचे झरे झाले |

कातरवेळी....|

कातरवेळी क्षणांची रांगोळी,

कसा ... ऋतु हिरवा,

घालून जातो...

अंबरात कधी गजबजलेली,

प्रीत दिशांत दाही,

.... उधळुन देतो....

स्पर्शतात स्पंदनांचे भाव....

काळीज हळवे...

अन् सहवासही मग् हळवा होतो,

कातरवेळी क्षणांची रांगोळी,

कसा ... ऋतु हिरवा,

घालून जातो |

शहारतात तरु लता अवचित,

झोंबत .... वारा...

येऊन जातो....

जगण्याचे अन् फुलण्याचे,

अर्थ नवे मज देऊन जातो...

पानात अजुनही ओल दवांची,

वृक्ष तरीही...

हसुन पुसतो....

आलास तर बस क्षणभर...

अन् हळवाच भास...

मनी दाटुन येतो...

कातरवेळी क्षणांची रांगोळी,

कसा ... ऋतु हिरवा,

घालून जातो |

पाणवठ्यावर अजुनही शुकशुकाट...

.... कुठे खळखळाट ...

घागरीत कुण्या येवुन जातो,

सुर्यही पुरता तजेल भासतो,

आळस कुठे निघुन जातो,

स्पंदन तव स्मरते...

कधीचे ....

आवेश जगण्या ..

मग येऊन जातो...

कातरवेळी क्षणांची रांगोळी...

ऋतु हिरवा...

कसा घालुन जातो |

***

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED