धावत्या खिडकीतलं जग
By: कौस्तुभ अनिल पेंढारकर
kaupend@gmail-com
© COPYRIGHTS
This book is copyrighted content of the concerned author as well as Matrubharti.
Matrubharti has exclusive digital publishing rights of this book.
Any illegal copies in physical or digital format are strictly prohibited.
Matrubharti can challenge such illegal distribution / copies / usage in court.
अनुक्रम
हैप्पी गो अनलकी
आभाळ कोसळलं
वर्ल्ड अंडर अंडरवर्ल्ड
ती कुठे गेली?
स्पंदन
ब्लैंक मेल
मन वढाय वढाय
अजुन एक
पहिली चुक
माय गॉड
विश्वासघात
फर्स्ट डेट
चित्र
पाठलाग
काय झालं?
मधुर मिलन
बॉसचा फोन
कमांड 2चा डाव
डाव फसला?
बॉसचा मेसेज
जॉनच्या बॉसची व्हीजीट
डिटेक्टीव्ह
हॅपी बर्थ डे
मिस उटीन हॉपर
वेळेचा घात?
ऋषी
खुनाचा तपास
धाड
बॉसचा पुन्हा फोन
प्रेस कॉन्फरन्स
पॉलीटीक्स
व्हॅकेशन
सुगावा
फिशींग
चार तासांचा अवधी
प्रपोज
चांदन्या रात्री
डिटेक्टव्हचा फोन
सुटीत व्यत्यय
ठोका चूकला
अचानक मेडीयाशी सामना
शून्याचा शोध कुणी लावला?
पुन्हा प्रेस कॉन्फरन्स
एका दगडात दोन पक्षी
आय एम सॉरी बॉस
गुगल सर्च
यस्स
ओ के देन कॉल द मिटींग
मिटींग
अॉडीओ
वनवा
ब्रम्ह हे परीपूर्ण
वाय स्टार
हिलव्ह्यू अपार्टमेंट
भिंतीवरचा शेवटचा
शेवटचे सावज
जशास तसे
आठवणी
आर्यभट्ट
रात्री बेरात्री
आठवणी
आर्यभट्ट
रात्री बेरात्री
कंपाऊंडच्या आत
बहरलेली वेल
रेकॉर्ड डिटेल्स
डॉ. कयूम खान
कागदाची पुंगळी
झीरो मिस्ट्री
शुन्यातून शुन्याकडे
धावत्या खिडकीतलं जग
ट्रेनमध्ये बसलो होतो. खिडकीची जागा पकडली होती. पुस्तक वाचत बसलो होतो. पाय पसरलेले, पुस्तकावर नीट प्रकाश यावा, आणि पंख्याचा वारा मिळावा म्हणून पुढे वाकलेलो. एक स्टेशन आलं, गर्दी वाढली. एक लहान मुलगा झटकन खिडकीपाशी येऊन उभा राहिला, माझ्या पायांवर पाय देऊन. माझं डोकं पुस्तकात खुपसलेलं होतं. मी रागाने श्कोण तो!श् हे पाहण्यासाठी मान वर काढली. बघतो तर तो मुलगा! मी पाय हलकेच पाठी घेतले. बाहेर पाऊस पडत होता. खिडकी बंद केलेली होती. खिडकीच्या काचेला नाक लावून तो बाहेर बघत होता. त्याने एकदोनदा खिडकी वर ओढण्याच्या कळीकडे पाहिलं, मग आशेने माझ्याकडे आणि माझ्या समोर बसलेल्या माणसाकडे पाहिलं. बाहेर अजूनही पाऊस होता. पाणी भसाभसा आत आलं असतं. मी नजरेनंच त्याला नाईलाज दाखवून पुन्हा डोकं पुस्तकात खुपसलं. तो मुलगा थोड्या वेळाने कंटाळून तिस—या सीटवर बसलेल्या त्याच्या वडिलांच्या मांडीवर जाऊन बसला. मुलाचा चेहरा हिरमुसलेला होता.
अजून एक स्टेशन आलं, माणसं चढली, बसण्याच्या जागेच्या मध्ये दोन माणसं येऊन उभी राहिली. आणि तो मुलगा दिसेनासा झाला. माझं पुस्तकातल्या कथेत लक्ष लागेना. मला काही वषार्ंपूर्वीचा मी आठवलो. लहानपणी आई—बाबा मला कधी ट्रेनमध्ये घेऊन गेले की मी सुद्धा असाच खिडकीजवळ जाऊन उभा राहायचो. सगळीच मुलं राहतात.
खिडकीबाहेर उभं असलेलं जग उलट्या दिशेने धावत जाताना दिसतं तेव्हा ते पाहायला भरमसाठ मजा येते. आपण वेगाने पुढे जात असतो. बाहेरच्या सगळ्यांना मागे टाकून. आपण जिंकत असतो, वा—याला कापणा—या भरधाव ट्रेनबरोबर आपणही उभ्या उभ्या धावत असतो. आपण बाजूचे रूळ पाहतो, तेही आपल्याबरोबर धावत असतात, मधूनच तिरके जातात, दुस—या रूळात मिसळून जातात, पुन्हा मूळपदावर येतात. मग आपण रूळांच्या पलिकडे पाहतो. कधी इमारती दिसतात, कधी झोपडपट्ट्या दिसतात. कधी एखाद्या रस्त्याला समांतर जातो, तिथल्या गाड्यांशी आपणच मनातल्या मनात स्पर्धा करतो. कधी आपण नदी नाल्यावरून जातो, तेव्हा रूळांवरून धावणा—या ट्रेनचा आवाज घुमतो, आणि आपण आत्ता अख्ख्या ट्रेनसकट खाली पडलो तर... अशी कल्पना मनात येते. कधीकधी पावसाळ्याचे दिवस नसूनसुद्धा आपल्या तोंडावर अधूनमधून पाण्याचे शिंतोडे उडता असतात. आपल्याला सुरुवातीला लक्षात येत नाही, पण पुढे दारापाशी उभ्या असलेल्या माणसांची वा—याबरोबर पाठी वाहत आलेली ती पिंक आहे हे लक्षात आल्यावर आपण खिडकीपासून लांब जाऊन उभे राहतो.
आपली ट्रेन कितीही भरधाव सुटलेली असली, तरी मधूनच उलट्या दिशेने धावत जाणा—या आणि मला दचकवणा—या ट्रेन्समधल्या लोकांचा हेवा वाटतो. किती जोर्रात्त गेली ती ट्रेन!! आपण ज्या ट्रेनमध्ये चढतो ती कधीच कशी एवढ्या जोरात जात नाही? त्या वेळी त्या समोरच्या ट्रेनच्या एखाद्या खिडकीत उभ्या असणा—या एखाद्या लहान मुलालाही आपली ट्रेन तशीच भरधाव जाताना दिसत असते हे मला तेव्हा कळलं असतं, तर हेवा वाटणं बंद झालं असतं, पण मग सगळी मजाच गेली असती. वय वाढत गेल्यावर ती मजा तशीही कमी कमी होत गेलीच म्हणा.
पण माणूस कितीही मोठा झाला तरी ते खिडकीत उभं राहणारं लहान मूल त्याच्या मनात खोल कुठेतरी दडलेलं असतं. ते बाहेर डोकावायला लागलं, की मग बसायला जागा असूनही आपण दारात जाऊन उभे राहतो, ट्रेनने कापलेल्या वा—याची मजा लुटायला(काहींच्या मनात मूल जागं होण्याऐवजी आपल्या पूज्य आदिपूर्वजांचा अंश जागा होतो, आणि मग ते दारात उभं राहून माकडचाळे करत राहतात).
मला पुन्हा लहान व्हावंसं वाटायला लागलं. पुन्हा त्या खिडकीत उभं राहावंसं वाटायला लागलं. मी खिडकीबाहेर पाहिलं. पाऊस ब—यापैकी ओसरला होता. मी माना वेळावून समोर उभ्या असलेल्या दोन माणसांच्या पलिकडे पाहिलं. तो मुलगा त्याच्या वडिलांच्या मोबाईलवर गेम खेळत बसला होता. त्याच्या चेह—यावर कुठलेच भाव दिसत नव्हते, डोळे टक लाऊन मोबाईलच्या स्क्रीनमध्ये घुसलेले. मी मुद्दाम आवाज करत खिडकी उघडली. काच वर सरकवली. थोडंसं पाणी माझ्या मांडीवर येऊन सांडलं. पण माझं तिथे लक्ष नव्हतं. मी त्या मुलाकडे पाहात होतो. त्याने मान मोबाईलमधून वर काढली होती. तो खिडकीबाहेर बघत होता. मग तो गोंधळला. एकदा खिडकीकडे, एकदा मोबाईलकडे पाहायला लागला. त्यालाच कळेना त्याला जास्त मजा कशात येणार होती. तेवढ्यात त्याचं लक्ष माझ्याकडे गेलं. मी हसून मानेनेच त्याला खिडकीपाशी बोलावलं. त्याचा निर्णय झाला. मोबाईल वडिलांच्या खिशात परत डुलकी काढायला गेला. तो मुलगा पुन्हा उठून खिडकीपाशी येऊन उभा राहिला. माझ्याकडे पाहून हसला. आणि मी समाधानाने तोंड पुन्हा पुस्तकात खुपसलं.
कौस्तुभ अनिल पेंढारकर
ांनचमदक/हउंपस.बवउ