अपराध बोध 3 Anita salunkhe Dalvi द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अपराध बोध 3

अपराध बोध 3.

मेघाला हर्षवर्धन अचानक मॉलमध्ये भेटला तिला खूप बर वाटलं शाळा कॉलेजच्या आठवणी ताज्या झाल्याते दोघे इतके वर्ष कधीच भेटले नव्हते पण अचानक भेटून तिला दिलासा वाटला. इतक्या वर्षांचा अंतर कधी आलाच नव्हता असं त्यांना वाटलं. दोघंही खूप हसले. दोघांच्या तोंडून शब्द फुटत नव्हते काय बोलावं काय नाही याचा काही भानच नव्हतं. कोण सुरुवात करणार, कुठून सुरुवात करणार यासाठी बोलायला शब्द उरले नव्हते, शेवटी दोघा मॉलच्या फुड कोर्टमध्ये एका टेबलवर बसले बराच वेळ कोणीच काही बोलत नव्हत. दोघंही एकमेकांना बघत आपल्याला विश्वात रमले होते. एकमेकांमध्ये झालेले बदल पाहात होते. मुक्त शांततेला मेघाने वाचा फोडली.

*मेघा- “कसा आहेस हर्ष? ”

*हर्षवर्धन- “मी एकदम मस्त, तू कसा आहेस ? ”

*मेघा- “मी पण मजेत”

*हर्षवर्धन- (इतका वेळ त्याच्या डोक्यात समीरचा विषय आलाच नाही पण त्याला अचानक समीरची आठवण झाली) “आणि समीर काय म्हणतो? कसा आहे तो? ”

*मेघा- “तोही एकदम मस्त फिट एन फाइन. ”

*हर्षवर्धन- “मग कसा चाललाय संसार? ”

*मेघा- “छान चालू आहे. तू सांग तू लग्न केलंस की नाही? ”

या प्रश्नावर हर्षवर्धनची नजर क्षणासाठी तिच्यावर खिळली. आणि सहजच त्याने दुसरीकडे बघत उत्तर दिला

*हर्षवर्धन- “नाही अजून…….. ”

*मेघा- “का रे, अजून लग्न का न केलस?

*हर्षवर्धन- “काय करु, चांगली मुलगी नाही मिळाली आणि ज्या माझ्या ओळखीच्या होत्या त्यांची लग्न झाली. ”

*मेघा- “हो ….. हो……. माहितीय कॉलेजमध्ये सतत घोळका असायच्या तुझ्या बाजूला पण काय रे त्यातली एकही नाही आवडली तुला ? ”

*हर्षवर्धन- “हमममम……. नाही एकही नाही…. ”

*मेघा- “खरंच रे तू अवघडच होता आणि आहेस.. तू नाहीच बदललास…”

*हर्षवर्धन- “हो माहिती मला पण मी असाच होतो आहे आणि राहणार. ”

दोघेही या गोष्टीवर खूप हसले.

*मेघा-तू या शहरात असा अचानक कसा? ”

*हर्षवर्धन- “ मी माझा बिझनेस वाढवतोय नवीन शहरांमध्ये नवीन ब्रांचेस उघडतोय. या शहरातही हाच विचार आहे माझा म्हणून स्वतः या शहराची ओळख करून घ्यायला आलोय. ”

*मेघा- “ओळख ? म्हणजे नक्की काय? ”

*हर्षवर्धन- “ओळख म्हणजे हेच की माझ्या बिजनेसला इथे मागणी आहे का ? आणि आहे तर बिजनेस साठी ऑफिस कुठे उत्तम राहील? व वेअरहाऊस कुठे घ्यायचं ? माझा स्टाफ कुठे राहणार? जाहिरातीची व्यवस्था इ. हेच सगळं जाणून घेण्या साठी मी इथे आलोय आणि बघ बरंच झालं ना तू पण इथे मला भेटलीस. ”

*मेघा- “ओहहह, म्हणजे तू बिझनेस ट्रीपसाठी आला आहेस तर…. ”

*हर्षवर्धन- “हो तू तसं म्हणू शकतेस…”

*मेघा- “अरेवा !!!! मी इतके दिवस या शहरात फिरता फिरता या शहराचे कानेकोपरे मला माहीत झाले आहेत. ”

*हर्षवर्धन- “ अरे वा!!! छानच की मग मला हे शहर बघायला मदत करशील का? ”

*मेघा- “अरे…. हो का नाही…. ”

*हर्षवर्धन- “ पण याचा समीरला काही त्रास नाही होणार ना? ”

*मेघा- “नाही त्याला त्रास नाही होणार आणि तसाही त्याला इतर गोष्टींकडे बघायला सध्या वेळ नाही …. ”

*हर्षवर्धन- (तिच्या उत्तराने आणि तिच्या हावभावांनी हर्षला विचार करायला भाग पाडला की काय झाले मेघा असं उत्तर का देते ? तिच्या मनातली खच त्याला जाणवली.) काय झालं मेघा ? समीर आणि तुझ्यामध्ये सगळं ठीक आहे ना?

*मेघा- (तिला जाणवलं नकळत तिच्या संसाराचे सत्य तिच्या मुखावर झळकत तिला हे कोणालाही सांगायची इच्छा नव्हती तिला हे कोणालाही सांगायची इच्छा नव्हती तिन्ही वेळ सावरून नेली) “हो रे बाबा समीर आणि माझ्यामध्ये सगळं ठीक आहे काळजी करायचं काही कारण नाही. फक्त त्याला सध्या वेळ नसतो आणि मी पूर्ण व मोकळी असते तेवढाच. ”

*हर्षवर्धन- “मग ठीक आहे तर मग ठरलं तु मला शहर दाखवणार. ”

*मेघा - “हो. ”

त्या दोघांनी काहीतरी खाल्लं आणि त्यांच्या जुन्या वर भरपूर गप्पा मारल्या आणि मग ते दोघं घराकडे निघाले हर्षवर्धनने मेघाला घरापर्यंत सोडलं मग तिने त्याला विचारलं की घरी चल तर त्याने नकार दिला तो म्हणाला मला एक काम आहते झालं की मग मी हॉटेलवर जाऊन आराम करेन. ती म्हणाली ठीक आहे मग ती घरी गेली.

त्या दिवशी घरी आल्यावर तिला घर परत खायला उठलं तिला परत एकटे आणि उदास वाटायला लागलं इतका वेळ तिला एकटेपणाची जाणीव झाली नव्हती. किंवा तिला हर्षवर्धन मुळे एकटे वाटत नव्हतं ती परत गप्प झाली कारण संवाद साधण्यासाठी घरात कोणीच नव्हतं, गेली सहा महिने कोणी नव्हतं. तिला पुन्हा तिच्या रोजच्या जीवनाची आणि खाली कप्प्याची आठवण झाली.

त्या दिवशीही समीर रोजच्या सारखाच उशिरा मेघाने जेवण बनवलं होतं ते दोघांनी शांततेत जेवण झाली समीरने तिच्याशी बोलायचा आणि तिचा मन रमवा चा प्रयत्न केला ती ही वरवर बोलली आणि परत गप्प झाली. आजच्या दिवसाची सविस्तर चर्चा मेघाने समीरची केली नाही किंवा हर्षवर्धनच्या भेटीबद्दल ती काहीच बोलली नाही. इतके दिवस त्यांच्या मध्ये चांगल्या चालणाऱ्या गोष्टी या वरवरच्या होत्या कोणीही गोष्टींच्या खोलवर जाऊन बोलतच नव्हता म्हणूनच कदाचित तिला हर्षवर्धन बद्दल बोलण्याची इच्छा झाली नाही. समीरही आहे ते सगळं ठीक मानून त्याच्या कामावर लक्ष देत होता. मेघा मात्र एकटेपणाच्या भोवऱ्यात फसत चालले होते मानसिक अस्थिरते कडे ओढावली जात होती.

त्या दिवसानंतर रोज मेघा सकाळी समीरचा टिफेन, सगळी तयारी करून द्यायची माग समीर ऑफिसला गेल्यावर स्वतःची तयारी करायची आणि हर्षवर्धनला शहर दाखवण्या साठी जायची परत संध्याकाळी आल्यावर समीर साठी जेवण बनवायचं घर आवरायचं आणि रात्री समीर आल्यावर जेवण करून वरवर गप्पा मारायच्या आणि मग परत झोपायचं. दुसऱ्या दिवसा उगवायचा की तीच दिनचर्या पुन्हा सुरू व्हायची आणि ते आपल्या आपल्या कामाला लागायचे.

मेघा हर्षवर्धनला रोज शहरातल्या नवीन नवीन जागा, इमारती, वर्दळीचे ठिकाण, शांततेची ठिकाणाच्या, खास पदार्थांची ठिकाणं सगळं दाखवत होती. तिला कधी कधी असं वाटायचं ते अजूनही कॉलेजमध्ये आहेत ते दोघं खूप प्रकारच्या गप्पा मारायचे हर्षवर्धन तिच्याशी मोकळ्या पद्धतीने बोलत होता जसा तो लग्नाच्या आधी तिच्याशी बोलायचा तसाच. तिला खूप बरं वाटत होतं बऱ्याच वेळानंतर तितकी आनंदी इतकी सहज आणि नॉर्मल फिल करत होती. तिच्या मनाची मळवट हळूहळू दूर होत होती तिला तिच्या अस्तित्वाची जाणीव होत होती तिला पुन्हा स्वतःच्या आनंदाची स्वातंत्र्याची आणि बिनधास्त अॅटिट्यूड ची आठवण झाली. इतका दिवसांमध्ये समीर आणि तिच्या मध्ये सगळ्या घडणाऱ्या घटनांमुळे तिच्या मानसिक बदलांमध्ये ती स्वतःलाच विसरली होती. तिच्या आणि समीर मध्ये कुठल्याही प्रकारची भांडणं नव्हती पण कुठल्याही प्रकारचा संवादही नव्हता. संवादाचा अर्थ दोन लोकांचा फक्त बोलणीच नाही होतं दोन व्यक्ती स्वतःच्या भावना जेव्हा एकमेकांबरोबर वाटतात तो संवाद. एकमेकांना जाणून घेण्यासाठी जेव्हा एकमेकांशी चर्चा करतात तो संवाद. पण त्यांच्यात होती एक ती फक्त शांतता आणि ती शांतता कुठल्या भांडणाचे आवाजा पेक्षा जास्त भयानक. तिचे पडसाद दोन व्यक्तीच्या संसारामध्ये खूप भेदून नेणारे परिणाम सोडून जातात. मेघाणी समीरच्या संसाराला याच शांततेची नजर लागली होती.

मेघाला आता खूप बर वाटत होतं ती खूप मोकळी झाले होती. तिच्या डोक्याने आता विचार करायला सुरुवात केली तिच्या मनातल्या भावना तिच्या पर्यंत आता स्पष्ट पोहोचू लागल्या होत्या. इतक्या महिन्याच्या मळवटी मध्ये तिच्या डोक्याने आणि तिच्या भावनांनी तिला समजून सांगणे सोडून दिलं ती कुठल्याही प्रकारचा सारासार विचार करण्यात असमर्थ होती. पण आता मेघा तिचा स्वतःच्या स्वरूपात आली होती. तिला स्वतःची ओळख पुन्हा मिळाली होती, जी ती इतक्या महिन्यांमध्ये विसरली होती. मुळात मेघा एक न घाबरणारी सत्य बोलणारी आणि कुठल्याही परिस्थितीशी झगडणारी मुलगी आहे. तिने विचार करायला सुरुवात केली. तिच्या मनाने तिच्यासमोर एक प्रश्न उपस्थित केला. हर्षवर्धन बरोबर आपण जे फिरत आहे, ते ही नवऱ्याला न कळत त्याला काय म्हणतात? या प्रश्नाने तिचं डोक भणभणलं. कारण याच उत्तर तिला माहिती होतं समाजात त्याला काय म्हणतात हे ही माहिती होतं आणि ते होतं विवाहबाह्य संबंध. तिच्या मनात अपराधाची भावना निर्माण झाली. तिच्या कडून हा गुन्हा झाला होता. तिन्ही गुन्हा केला होता पण ती वाईट नव्हती म्हणून तिने झालेला सगळा प्रकार समीरला सांगायचा ठरवलं कारण तिला माहिती होतं नकळत गुन्हा करणं आणि गुन्हा कळाल्यावरही पुन्हा तो करत राहणं हा सगळ्यात जास्त मोठा गुन्हा होता. तिला तिचा अपराध बोध झाला होता म्हणून अपराधाची शिक्षा काय असेल हे तिने समीरवर सोडायचा ठरवल.

***

पुढच्या भागात मेघा समीरलासत्य सांगणार आहे भारताच्या संसारामध्ये सगळय़ात मोठा असा बदल घडणार आहे.