its the time to disco books and stories free download online pdf in Marathi

ईट्स टाईम टु डिस्को


Its the time to disco

“दिल है मेरा दिवाना क्या.
कहेता है अब घबराना क्या.
ताल पे जब झुमे बदन
हिचकीचाना शर्माना क्या’’
“कल हो ना हो” ह्या सिनेमा चे “इट्स द टाईम टू डिस्को” हे गाणे ऐकू येत होते.हळूहळू हृदयाचे ठोके वाढत जातील असा आवाज वाढत जात होता.आजूबाजूला सुगंधी लेडीज perfume चा घमघमाट पसरलेला होता.हळूहळू ह्या गाण्याचा आवाज वाढू लागला आणि हवेतल्या हवेत चुटक्यांचा आवाज येऊ लागला आणि काही सेकंदानी चुटक्यांचा आवाज आणि गाणे बंद झाले.गाणे बंद झाल्यावर  ४५ वर्षाच्या माणसाचा आवाज आला.
“ऑफिस आले.”
“...”
“Madam,ऑफिस आले.’’
Madam ने कानाला लावलेला हेडफोन काढला.
“हो,कळले मला.”
ती कॅब मधून खाली उतरते.
“अहो, दरवाजा तरी बंद करा...”
“हो...मला आज गडबड आहे.”
चालक तावातावाने कॅब मधून बाहेर आला आणि madam च्या सीट चे उघडे असलेले दार त्याने बंद केले आणि आणि परत तो त्याच्या जागेवर जाऊन बसला आणि काहीतरी पुटपुटत निघाला.
ती ऑफिसच्या बाहेर उभारलेली होती.ऑफिस चार मजली होते.तिने तिच्या हातात असलेल्या घड्याळात वेळ बघितली.सकाळचे ८.४५ वाजलेले होते.तेवढ्यात तिने तिच्या पर्स मधून बारीकसा आरसा बाहेर काढला आणि त्यात तिने स्वतःचा चेहरा एक मिनिट न्याहाळून पाहिला.चेहरा टापटीप असल्याचे खात्री झाल्यावर तिने आपला आय-फोन सेवन एस पर्स मधून बाहेर काढला.आय-फोन बाहेर काढून तिने तिच्या ओठांचा चंबू केला आणि उभ्या उभ्या एक मिनिटात ५० सेल्फी काढले. त्यातले काही सेल्फी तिने उभ्या उभ्या तिच्या Instagram ला अपलोड करत “Pout a day keeps boyfriend and doctor away” असा विचित्र स्टेटस टाकला.
तिच्याकडे ऑफिसमध्ये जाणारी मंडळी  पाहू लागली.सहा फुट उंची,गोरा वर्ण,नजरेला नजर देणारे असे टपोरे आणि बोलके आणि काजळयुक्त असे डोळे,शिडशिडीत अशी झिरो फिगर,उभे नाक,लाल रंगाने रंगवलेले ओठ,कुठलाही तरुण मुलगा तिच्याकडे पाहतच राहील असे ऐश्वर्यसंपन्न रूप,चेहऱ्यावर न संपणारे attitude आणि सर्वांच्या नाकात जाणारा लेडीज सेंट चा स्वाद आणि डोळ्यांना आणि मनाला मोहून टाकणारे असे हास्य असलेल्या कन्येकडे ऑफिसमध्ये जाणारे सर्व मुलं डोळे फाडून पाहत होते आणि काही मुली आणि स्त्री वर्ग मन भरून पाहत होत्या.
फोटो काढून झाल्यावर ती ऑफिसमध्ये जाऊ लागली.ती ऑफिस च्या दिशेने जात असताना तिला हाक ऐकू आली.
“Hi!”
“Hey!”
“Looking good.”
“I always look good Yash darling.”
“Beyond good…”
“Thank you.”
“How was yesterday?”
“Time with you is always golden time for me.”
“Let’s start for work.”
ते दोघे बोलत असताना ग्राउंड फ्लोअर च्या लिफ्ट जवळ आले.त्यांच्या जवळ एक २९ वर्षाचा तरुण आला.तो तरुण तिच्याकडे पाहू लागला.सर्व तरुणांच्या नजरेची नजर असलेल्या तिने त्याच्या नजरेकडे न पाहताच दुर्लक्ष केले.थोड्या वेळात लिफ्ट आली.तिघे लिफ्ट मध्ये गेले.
तो तरुण तिच्याकडे पाहू लागला.ती मात्र तिच्या मित्राबरोबर गप्पा मारण्यात व्यस्त होती.
“Excuse me. What is the time now?”
त्या तरुणाने तिला प्रश्न विचारला.
तिने परत त्याला आपला attitude दाखवला आणि त्याच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केले.
“Its 9.00 A.M”
यश ने त्या तरुणाकडे पाहत उत्तर दिले.
“आभारी आहे.”
त्या तरुणाने यश कडे पाहून स्मितहास्य दिले.काही वेळाने पहिला मजला आला आणि तिघे लिफ्ट च्या बाहेर आले आणि त्यांच्या ऑफिस च्या दिशेने निघाले.ती आणि यश एकत्र जात होते आणि तो एकटा निघाला होता.
ती,’’यश, तो लिफ्ट मध्ये आलेला किती मळकट कपडे घालून आला होता ना...त्यात त्याच्या पायात चक्क चप्पल होती.”
यश,’’ Let’s go for the work.त्याच्याकडे नसतील कपडे.पण मी बघ किती टापटीप आहे! माझे बूट ४००० चे आहेत;पेन ३००० चे;रोजचा सेंट ५०० चा;फोन ७०००० चा...’’
“You are Brandman my boy…”
ती आणि यश गप्पा मारत ऑफिसमध्ये पोहोचले.
सायंकाळी...
ती आणि यश गप्पा मारत लिफ्टमध्ये आले.सायंकाळचे ६.०० वाजलेले होते.ते लिफ्ट मध्ये येत असताना त्यांच्याबरोबर अजून ५ लोकं लिफ्टमध्ये आली.त्यांच्याबरोबर तो देखील आला.लिफ्ट मधून ८ लोकं ग्राउंड फ्लोअर वर येऊ लागली.लिफ्टमध्ये तो तिच्याकडे आणि यश कडे पाहू लागला.ती त्याच्याकडे पाहून न पाहिल्यासारखे करत होती.थोड्या वेळात लिफ्ट ग्राउंड फ्लोअर ला आली.सर्व जण लिफ्ट मधून बाहेर पडले आणि वेगाने चालत बिल्डींग च्या बाहेर पडू लागले.ती आणि यश कॅब ची वाट पाहत बसले.तिला आणि यश ला परत तो दिसला.त्यांच्याकडे पाहत तो चालत निघाला होता.
“कोण असेल रे हा...”
“मला माहित नाही.’’
“सारखा माझ्याकडे पाहत होता.”
“हा..हा..You are the celebrity. तुझ्याकडे पाहणार नाही मग कुणाकडे पाहणार तो?’’
यश ला जोरदार हसू फुटले.
“त्याला कुठेतरी पाहिल्यासारखे वाटत आहे.”
“कुठे?’’
“आठवत नाही.असू दे...उद्या परवा सुट्टी आहे.Let’s party tonight. Just you and me. What say…’’
“I am always ON for the party. Let’s go at 9.00 P.M”
“I want to tell you something tonight.”
“What?’’
“Not now. I will tell it tonight at pub.”  
दोघे बोलत बिल्डींग च्या बाहेर थांबले होते.ऑफिस स्टाफ हळूहळू बिल्डींग च्या बाहेर येत होता.
“Yash. Let’s have selfie till the cab arrives.”
“Common.”
यश ने लगेचच त्याचा आय-फोन एक्स बाहेर काढला आणि दोघांनी ओठांचा चंबू करत सेल्फी काढला.तेवढ्यात त्यांची ऑफिस ची कॅब आली आणि दोघे कॅब मध्ये बसून निघाले.

रात्री...
“Lady hear me tonight.”
“Cause my feeling is just so right”
“As we dance by the moonlight”
Enrique चे गाणे चार तरुण मुले गिटार आणि ड्रम च्या मदतीने गात होते.रात्रीचे १०.०० वाजलेले होते.एकएक ग्लास रंगीत पाण्यांनी भरले जात होते.आजूबाजूला अनेक तरुण आणि तरुणी हातात काचेचा प्याला घेऊन गाण्याच्या ठेक्यावर डान्स करत होते.चारही बाजूला चित्र-विचित्र दिव्यांचा पाऊस पडत होता.चार तरुण मुलांमध्ये दोघे गिटार वाजवत होते आणि एकटा ड्रम वाजवत होता आणि त्याच्याबरोबर एक २८ वर्षाची मुलगी पिआनो वाजवत होती.
ती आणि यश दोघेही गाण्यावर ठेका धरत होते.तिच्या आणि यश च्या हातात ग्लास होते.काही वेळ डान्स करून झाल्यावर आणि हातातला प्याला ची झिंग उतरल्यावर दोघेही एका टेबलावर शांत गाणी ऐकत बसले होते.
“I love this song.”
“Me too.”
“They are good musicians Yash. Aren’t they?
“Yes.”
“I love this place and…”
ती यश कडे एकटक पाहत होती.डोळ्यांमध्ये काजळाची अंघोळ केली असल्यामुळे रात्रीच्या चित्रविचित्र लाईट आणि प्रकाशात ती सुंदर दिसत होती.काळा top आणि ब्लू जीन्स घातली असल्यामुळे तिच्याकडे तो देखील एकटक पाहू लागला.तेवढ्यात ती तिच्या टेबलच्या शेजारी बसलेल्या एका २८ वर्षाचा मुलाकडे पाहू लागली.
“Hey.!Is that same guy we had seen today in lift?”
यश ने त्या तरुणावर बारीकशी नजर टाकली.
“हो.”
“किती विचित्र असतात ना लोकं! ऑफिसमध्ये येताना पायात चप्पल घालतात आणि पब मध्ये येऊन बसतात.कुठली मुलगी बघणार ह्याच्याकडे...”
ती त्याच्याकडे पाहून उपहासात्मक हसू लागते.तो देखील तिच्याकडे आणि यश कडे पाहू लागतो आणि एक-एक पेप्सी चे घुटके घेऊ लागतो.
“Yash. I want to talk to you about something.”
“बोल ना..”
“Do you have any GF?”
“Never at all. Did you had any BF?’’
“Never. I had one friend from Ichalkaranji 10 years ago. He was nice guy. We never meet face to face .We used to talk a lot on the phone. He was Mech guy.”
“Oh! So what happened next?’’
“He was very poor guy. He had very low life style. Along with it he failed in the Engineering. He was writer. So I decided to leave him behind. He was not my kind of guy.”
“Oh! Poor guy. Where is he now?
“Don’t know…”
“Listen Yash. Have you ever thought about our relationship?”
तिचा प्रश्न ऐकताच यश जागचा उठला.त्याच्याबरोबर ती पण बाहेर पडली.दोघे बिल पेड करून त्यांच्या पार्किंग मध्ये असलेल्या गाडीजवळ आले.
“Say something Darling. Don’t you love me…?”
ती त्याला पार्किंग मध्ये तिच्या जवळ ओढू लागली आणि त्याच्या खूप जवळ जाऊ लागली.पण तो तिच्यापासून लांब जाऊ पाहत होता.
“आपले लग्न होऊ शकत नाही.”
“का?”
“कारण माझे लग्न झाले आहे.”
“काय?मग माझ्यापासून का लपवून ठेवलास....”
रागाने तिने यश ला कानाखाली मारले.
“You slapped me. You only need bunch of money. You are with me since I have lots of branded things. If I didn’t had them would be with me? I am married guy and I have my wife that doesn’t mean that I should always be with you. My wife had married me when I was not in a good financial condition. Now I give her full credit for my prosperous life that I had achieved in past 5 years. I thought we are good friends. Real fact is that you are money hungry girl. Run away before I give you back.”
ती ताडताड चालत बाहेर आली.ती बाहेर आल्यावर यश त्याच्या अलिशान ऑडी मधून तिच्यासमोरून निघून गेला.तिच्या डोळ्यांमधून पाणी येत होते.तिने घड्याळात पाहिले.रात्रीचे १२.०० वाजले होते. हार्ड रॉक पब जवळ एकही कॅब थांबत नव्हती.तिने तिच्या मोबाईलवर कॅब बुक करायचा प्रयत्न केला पण तिचा फोन सेल्फी काढून आणि चोवीस तास नेट चालू ठेवून बंद पडला होता.ती रिक्षा ची वाट पाहत थांबलेली होती.
रात्रीचे १२.३० वाजले.तिला एकही रिक्षा मिळत नव्हती.तेवढ्यात तिच्याजवळ एक २८ वर्षाचा तरुण आला.
“Should I drop you?’’
त्याच्याकडे पाहताच ती चपापली.तोच तो मुलगा होता ज्याला ती सकाळपासून attitude दाखवत होती.तिने त्याला मानेने होकार दिला आणि मुकाट्याने त्याच्या Bullet च्या मागे बसून ती निघाली.

३० दिवसांनी....
ठिकाण:-Hard Rock Café Pune
सायंकाळचे ७.०० वाजले होते.भरपूर गर्दी जमलेली होती.स्टेज वाद्यांनी सजलेला होता.तरुण आणि तरुणींनी कॅफे भरलेले होते.प्रचंड गर्दी मधून ती आणि तिची मैत्रीण अर्चना देखील आलेल्या होत्या.तेवढ्यात स्टेज वर काही हालचाली सुरु झाल्या आणि काही क्षणात ड्रम्स आणि गिटार चा सुरेल असा तडका सुरु झाला.तिचे स्टेज वर लक्ष गेले आणि ड्रम वाजवणाऱ्या व्यक्तीकडे पाहताच ती जागची हबकली.तिने attitude दाखवलेला तरुण चक्क तिला ड्रम वाजवताना दिसत होता आणि त्याचे कपडे पाहताच ती हबकली.
पंधरा मिनिटे ड्रम वाजवल्यावर त्याने माईक हातात घेतला आणि तो audience मध्ये आला आणि त्याने “Just wanna be with you” गाणे म्हणायला सुरवात केली.गाणे म्हणत सर्व audience मध्ये फिरत तो शेवटी तिच्याजवळ आला.
ती,“You sing very good.”
तो,’’धन्यवाद.”
ती,’’Friends…”
तिने तिचा नाजूक आणि कापसासारखा असा हात पुढे केला.
“ I am Manasi Lele. I am Mechanical Engineer.”
सर्व तरुण बेशुद्ध पडतील असे मोहक आणि चार्मिंग हास्य तिने त्याच्याकडे पाहत दिले.
त्याने देखील त्याचा हात पुढे केला.
“ I am…..”
त्याचे नाव ऐकून तिला जागचा जोरदार धक्का बसला.ती काम करत असलेल्या कंपनी चा C.E.O  आणि दहा वर्षापूर्वी तिने सोडून दिलेला इचलकरंजी चा “तो” तिच्यासमोर उभा होता.सकाळी त्याच्याकडे पाहत असताना तिला व्यवस्थित आठवत नव्हते.Bollywood Superstars ना लाजवेल असा त्याचा ड्रेस पाहून ती खाजील झाली.आपण उगाचच त्याच्या कपड्यांवर शेजेबाजी केली म्हणून तिला गिल्टी वाटू लागले.
तेवढ्यात तिथल्या audience ची दुसऱ्या गाण्याची फरमाईश आली आणि तो परत स्टेज वर गेला आणि काही क्षणात त्याने दुसरे गाणे गायला सुरवात केले आणि त्याच्याबरोबर audience मध्ये असलेल्या काही तरुण मुली देखील join झाल्या आणि काही क्षणात जोरदार डान्स सुरु झाला आणि तो डान्स मानसी निर्विकार होऊन पाहू लागली.
“दिल है मेरा दिवाना क्या.
कहेता है अब घबराना क्या.
ताल पे जब झुमे बदन
हिचकीचाना शर्माना क्या...’’
खुलके झुमो खुलके गाओ
आओ आओ ये खुलके कहो.
इट्स द टाईम टू डिस्को.”

©

Kaushik

इतर रसदार पर्याय