Maanuskich khara dharm books and stories free download online pdf in Marathi

माणुसकीच खरा धर्म ...

माणुसकीच खरा धर्म ...

जुना पुणेरी वाडा. जानकीबाई देशपांडे शुद्ध ब्राम्हण . आजच्या या काळातही जानकीबाई नवारी काष्ठा , नाकात नथ
आणि कपाळी चंद्रकोर , अंबाडा , हातभर बांगड्या असाच पेहराव करत. त्यांना सर्व काही सोवळ्यात करायची
सवय होती. हल्ली त्यांची तब्येत खराब असल्यामुळे त्यांना काम करण्यासाठी मोलकरीन ची आवश्यकता भासत
होती. पण ; त्यांच्या प्रथा आणि नियमांना कंटाळुन कुठलीच मोलकरीन काम करण्यास तयार नव्हती. जानकीबाई
ओसरीवर वाती वळत बसल्या होत्या . तेवढयात त्यांचा शेजारी सदानंद आला.' काकू एक मोलकरीन मिळाली आहे
पण ; ती मुसलमान आहे चालेल का ? 'जानकीबाई नकार दर्शवणार तेवढ्यात त्यांना घरातील सर्व पसारा आठवला
आणि स्वतः च दुखण आठवलं व त्यांनी नकळत होकार दर्शवला . त्यावर सदा म्हणाला , पण तिच्या दोन अटी
आहेत. एक, ती बुरखा काढणार नाही व ती कोणाशीच बोलणार नाही कारण ; ती मुकी आहे. जानकीबाई कडे
काहीच पर्याय नव्हता. त्यांनी अटी मान्य केल्या.
बुरखा घालून शहनाजने जानकीबाईंच्या घरात प्रवेश केला. जानकी देवींचे पती धोतराला धरुन दोन पायऱ्यां उतरुन
अंगणात येत म्हणाले ' शिव..शिव..शिव.सदा हे काय ? ' चक्क मुसलमान मोलकरीन ? त्यावर सदा हसत म्हणाला , "
कोण हिंदु..कोण मुसलमान ? इंसानियत ही मेरा ईमान ..!" त्यावर जानकी बाईंचे पती थोडे वरमले. शहनाज
कामाला लागली. बुरख्यात काम करणारी शहनाज त्यांना वेगळ्या विश्वातील बाहुली वाटत होती. कारण ; तिचे
डोळे सोडुन काहीच दिसत नव्हते.तिने सर्वांना जेवणाची ताट वाढली. सर्वानी एक घास खाल्ला आणि एकमेकांकडे
आश्चर्याने बघु लागले. शहनाज सर्वांकडे प्रश्नार्थक नजरेने बघु लागली. जानकी बाईंचे पती भरल्या डोळ्याने
शहनाजकडे बघुन म्हणाले..' चव एकदम घरच्यासारखीच आहे..छान ! ' शहनाजला खुप हायस वाटलं. तिने उजवा
हात पुढे करुन शुक्रिया केला.
स्वयंपाक , धुणी , भांडी , फरशी पुसणे, जानकी बाईंच्या गुडघ्याला बाम चोळण्यापासुन सर्व काम शहनाज
उत्तम रित्या करत होती. जानकी बाईंना माञ शहनाजकडे बघुन वेगळेच विचार मनात येतआणि प्रश्न पडत. तिला

बघुन त्यांच्या मनात जात - पात , धर्म यांच्याविषयी गदारोळ माजतं . त्यांच्या मनात शहनाजविषयी शंका निर्माण
होतं. त्या रोज शहनाजच निरिक्षण करत. १५ दिवसात शहनाजने सर्वांची मने जिंकली होती. ति त्यांना आता
आपलीशी वाटत होती. ब्राह्मण आणि मुसलमान या गोष्टी कधीच गळुन पडल्या होत्या. पण ; जानकीबाईंची शंका
दिवसेंदिवस बळकावत चालली होती. आता त्या सतत तिच्या मागे मागेच नजर ठेवुन फिरत असत.
शहनाज देवघरातील फरशी पुसत होती. तेवढ्यात देव्हार्यातील दिवा आपोआप विझला. शहनाजने लगेच
माचिस घेतली व दिवा लावण्यासाठी हात पुढे केला पण ; काहीतरी विचार करुन ती थांबली. तेवढ्यात
जानकीबाईंनी तिचा हात हाताने धरुन दिवा पेटवला. शहनाज त्यांच्या कडे आश्चर्याने बघु लागली. जानकीबाई
तिच्याकडे बघुन म्हणाल्या , ' सर्वांचा देव एकच.. फक्त रुप वेगवेगळी ! . ' शहनाजचे डोळे नकळत भरुन आले होते.
आज पहिल्यांदा जानकीबाईंनी तिचे डोळे जवळुन पाहिले आणि त्यांची शंका अजुन पक्की झाली. शहनाजने लगेच
टाळाटाळ करत नजर चुकवली व पुन्हा फरशी पुसण्यास सुरुवात केली. जानकीबाईंनी तिला ओळखल होतं फक्त
खाञी करण्यासाठी त्यांनी एक युक्ती केली . मुद्दाम पाय घसरुन पडण्याच नाटक केल आणि विव्हळण्यास सुरुवात
केली. शहनाज लगेच ओरडली , ' आई... आई ... लागल का ? कशी पडलीस ? तुझ ना स्वतः कडे लक्षच नसत.. !'
एवढ बोलुन तिच्या लक्षात आल की आपलं भांड उघड पडलं आहे. तिने तोंडावर हात ठेवला. जानकीबाईंनी तिचा
बुरखा बाजुला सारला . बुरख्यामागे पोटची पोरगी ' हिरा ' हे पाहुन त्यांना आश्रु रोखता आले नाहीत. रडक्या सुरात
त्या म्हणाल्या , 'मला वाटलच ... तुच असणार !'हिरा तुच असणार..!' पहिल्याच दिवशी जेवणाचा पहिला घास
खाताच सर्वांनी तुला ओळखलं होत. हिरा भरल्या डोळ्यांनी आईकडे पाहत होती. फिरोजशी लग्न करायला नकार
दिला म्हणुन घर सोडुन गेलीस ! आणि आज स्वतः च्याच घरात दुसर्या नावाने मोलकरीन बनुन आलीस ? का बेटा
का ? ' आई वेगवेगळ्या धर्माची वस्ञ अंगावर चढवली म्हणजे माणुस वेगळा होत नसतो. माणुस फक्त माणुसच
असतो. हेच समजावण्यासाठी फिरोजने मला इथे पाठवलय. त्याने माझ नाव नाही बदललं. कधीच बुरख्यासाठी
आग्रह नाही केला.मी जशी आपल्या घरी राहत होते तशीच तिथेही राहते. माझ जेवढ प्रेम त्याच्यावर आहे तेवढच
तुमच्यावरही आहे. मला तुम्ही पण हवे आहात. जानकी बाईंना त्यांची चुक उमगली. व त्यांनी तीला घट्ट मिठी
मारली. नवारी नेसलेल्या जानकीबाई व बुरख्यातील हिरा यांचे आलिंगन जणू.. साक्षात श्रिकृष्ण आणि अल्हा ..
यांनी एकमेकांना अलिंगन दिल्यासारखे वाटत होते.
धर्म - जात- पात या गोष्टी माणसाने त्याच्या सोयीसाठी किंवा काही अंशी स्वार्थासाठी बनवलेल्या आहेत.
माणुसकीच खरा धर्म आहे.

- साधना वालचंद कस्पटे

इतर रसदार पर्याय