Blue love letter books and stories free download online pdf in Marathi

ब्लु लव लेटर..

ब्लु लव लेटर..

लेक्चर्स सुरु झाले होते. सर्वजण क्लास रुम मध्ये असल्याने काँलेज मध्ये भयाण शांतता पसरली होती. तिला उशीर झाला होता. त्यामुळे ती घाई घाईत चालत होती. अचानक तिच्या समोर तो आला आणि ती थबकलीच . तो..तो होता, ज्याने मागच्या काही महिन्यांपासुन तिची झोप उडवली होती. ज्याने तिच्या हृदयावर कब्जा केला होता. ते एकाच क्लास मध्ये होते. पण आजपर्यंत ते एकमेकांना कधीच बोलले नव्हते. ते रोज एकमेकांकडे फक्त चोरुन चोरुन पहायचे. न बोलताही त्यांच्यात एक अनामिक , सुंदर , हळुवार नातं निर्माण झाल होत. तो आज अचानक तिच्या समोर येवुन थांबला होता. तिला ब्लु कलरआवडतो हे त्याने शोधुन काढल होत. आणि आज ब्लू कलरचाच सुंदर शर्ट घालून तो उभा होता. तिला काहीच कळेना. त्याचा शर्ट पाहुन उगीच तिच्या मनाला एक सुंदर प्रेमाची झुळुक स्पर्श करुन गेली आणि तिच्या ओठांवर हलके हसु उमटले. तिने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहीले. तो माञ पुरता घाबरला होता. डोळ्यात भिती आणि संभ्रमता उमटली होती. त्याच्या हृदयाची धडधड माञ अचानक वाढली होती. तिला ती स्पष्टपणे ऐकु येत होती. त्याने खिशातुन एक ब्लु कलर चे लव लेटर काढले. तिला ब्लु कलर आवडतो म्हणुन ब्लु कलर च्या लेटर वर ब्लु पेनने लव लेटर लिहीले होते पठ्ठ्याने . मुल मुलींसाठी काय करतील सांगता येत नाही. त्याने तिला लेटर दिले. ते घेताना दोघांच्याही बोटांचा स्पर्श झाला. इतका वेळ शांत उभ्या असलेल्या तिच्या शरीरात जणु विज संचारावी तशी नसानसात एक जाणीव पोहचली. आणि डोक्याच्या केसापासुन पायाच्या नखापर्यंत शरीरातुन गरम वाफा बाहेर पडत असल्याची तिला जाणीव झाली. आता माञ तिचे हात थरथर कापत होते. हृदयाची धडधड वाढली होती. तिने लेटर उघडले. आणि विज कोसळावी तसे अचानक काही शब्द तिच्या कानावर आदळले. "बेटा वडिल खुप मोठ्या विश्वासाने ,शिकण्यासाठी शहरात पाठवतायत . त्यांचा विश्वास तुटेल आणि इज्जत जाईल अस वागु नको. " गावातुन शहरात शिकायला येताना तिच्या आईने तिच्याकडुन वचन घेतल होत. तिच्या जवळच्या नात्यातील दोन बहिणी पळुन गेल्या होत्या . तेव्हा घरच्यांनी जळक्या लाकडांनी त्यांना जनावरांसारख बडवल होत. ओठ आणि कोपरे फुटेपर्यंत. डोक्याची केस उपटुन हातात येईपर्यंत . आणि राञीतून त्यांना जीवे मारण्याचा कट रचतानाही घरच्यांना दरवाज्या च्या फटीतून तिने पाहील होत. एवढ होऊनही घरच्यांनी परत विश्वास ठेवून तिला शिकण्याची परमिशन दिली होती. त्यांचा विश्वास तोडण योग्य आहे का ? आईला दिलेले वचन आणि तिने घातलेल्या शपथा तोडण योग्य आहे का ? शिवाय हा मुलगा वेगळ्या कास्ट चा त्यामुळे घरच्यांनी समजुन घेण अशक्यच. माहीती आहे प्रेम विचार करुन होत नाही.. ते आपोआप होत.. पण प्रेम करुन शेवटी दोघे एक होणार नसतील तर त्या प्रेमाचा फायदा काय ? चार दिवस मजा करण्यासाठी प्रेम करणाऱ्या तील ती नव्हती . आणि आत्ता प्रेमाला हो म्हणुन शेवटी आई - वडील हो म्हणत नाहीत म्हणुन त्या व्यक्तीला आयुष्यभर एकट वार्यावर सोडण तिला पटत नव्हत. पळुन जावून लग्न केलही असत पण तिच्यापेक्षा छोटी बहीण १० वी ला होती. पळुन गेली तर त्या छोटीला शिकवण तर दुरच परिक्षा संपली की कौणासोबत तरी लग्न लावुन घरचे मोकळे होतील हे तिला ठाऊक होत. स्वतःच्या स्वार्थासाठी बहिणीला शिक्षा का ? हा सर्व विचार करुन तिने ते लेटर न वाचताच फाडले आणि मुद्दाम डोळ्यात खोटे रागाचे निखारे उभारुन , त्याच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकुन लेटरचे तुकडे त्याच्या चेहऱ्यावर भिरकावले. कारण प्रत्येकवेळी प्रेम करण आपल्या हातात असत पण काहीवेळा ते मिळवण आपल्या हातात नसत. ज्याच्यावर एवढ प्रेम करतो , त्याच्या सोबत चार क्षण सुखाचे जगुन त्याला आयुष्यभर ञासात ढकलण्यापेक्षा , आजचा एक क्षण ञास दिला तर त्यात काय चुक ? असा विचार करुन ती निघुन गेली. जरी तिने डोळ्यात खोटे निखारे उभारले असले तरी त्याच्या मागे प्रेमाच्या अश्रुंनी पेटलेला वणवा त्याच्या नजरेतुन सुटला नव्हता. जे समजायच ते त्याला समजल होत. ओल्या पापण्यांनी , जोपर्यंत ती नजरेआड होत नाही तोपर्यंत तो तिच्याकडे अभिमानाने बघत राहीला. ती गेली. एकदाही वळुन न बघता. त्याने तिच्या हातांचा स्पर्श झालेले लेटर चे तुकडे प्रेमाने उचलले. आणि ओंजळीत घेवुन अशा पद्धतीने त्यांच्यावर ओठ टेकवले जणु काही त्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत ज्यावर आत्ताच एक प्रेयसी तिच्या श्वासांचे अत्तर शिंपडुन गेली आहे. हे तुकडे त्याने हळुवार शर्टच्या खिशात ठेवले आणि एखाद्या तान्ह्या बाळाला आपला स्पर्शही जाणवू नये अशा पद्धतीने हळुवारपणे खिशावरुन हात फिरवला. आणि भिंतीआडुन तिने हे वाकुन पाहीले. इतकावेळ मनात दाटलेला पाऊस आता ती रोखु शकत नव्हती. डोळ्यातून धो धो पाऊस कोसळत होता. आणि ती स्वतः ला सावरण्यासाठी भितींला बिलगुन रडत होती.

ती चुक होती की बरोबर माहीत नाही. पण तिच्या ठिकाणी मला ती योग्य वाटते. प्रेम प्रेम असत . कधी ते फक्त करावं..दुसऱ्याच्या नकळत , मिळण्याची अपेक्षा न ठेवता. जर कथेचा शेवट दुःखद आणि मनाला चटका लावणारा होणार असेल तर त्यापेक्षा ती कथा सुरुच न केलेली काय वाईट ? जिवापाड प्रेम करणाऱ्या व्यक्तीला मरणयातना भोगण्यासाठी सोडण्यापेक्षा त्या प्रेमाचा स्विकार न करण काय वाईट ? प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या वेगवेगळी असते...पण अशा सुरु होण्यापुर्वीच संपलेल्या प्रेमकथाही असंख्य असतील नाही ?

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED