देवाचं देवपण Sushil Padave द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

देवाचं देवपण

छत्तीसगढ़ आणि महाराष्ट्राची ची बॉर्डर..संध्याकाळ ची वेळ होती ती..आपल्या मातृभूमिची रक्षा करणारे काही सैनिक नेहमीचा संध्याकाळचा मार्च (कदमताल) करत एका नक्षली आतंकवाद असलेल्या भागातून चालले होते....
झाडाझुड पाणी घनदाट भरलेलं ते जंगल आणि किर्रर्रर्ररर करणारे पक्षी आणि रातकिडे..कान अगदी सुन्न होतील असा तो किलबिलाट..पायाखाली काटेरी झाडी झुडपे..
त्यातूनच ते चालत होते

चालता चालता त्याच्यातला एकजण मधेच थांबला..
त्याला कुनी तरी कण्हत (रडत ) असल्याचा आवाज आला ..अगदीच बारीक आवाज होता..तो..
कॅप्टन रणजीत तो..उच्चपुरा..भरगच्च छाती..आणि कान आणि नजर अगदी तिक्ष्ण..
त्याने तो आवाज लगेच हेरला..
त्याने इकडे तिकडे वळून पहिलं तर आजूबाजूला कोणीच दिसत नव्हतं..

हातातल्या भल्यामोठ्या बंदुकीने त्या झाडीत इकडे तिकडे तपासून पाहिलं पण कोणीच नव्हतं..
पण तो कण्हन्याचा आवाज मात्र येत होता..
त्याने आपल्या बाकीच्या टीम ला आवाज लगावला..
तसे सर्वजण मागे फिरले आणि कॅप्टन ज्या ठीकाणी काहीतरी शोधत होते तिथे आले..

कॅप्टन "दोस्तो तुमहें यहां कोई आवाज सुनाई दे रही है क्या..??"

त्यांच्यातलाच एक बोल्ला "हो सर आवाज तर ऐकू येतोय कोणाचा तरी रडण्याचा पण कुठून येतोय ते समजत नाहीये"
तसेच ते इकडे तिकडे शोध घेऊ लागले त्यांना वाटले एखादा जखमी जवान असावा..
असे समजून त्यांनी शोध सुरू केला..
तेवढ्यात एकाला एका खडकाच्या खाली झाडाच्या बाजूला एक बऱ्याच काटेरी झाडे तोडून ढीग केल्यासारखं करून ठेवलेलं दिसलं...

त्याने ओरडून इशारा केला..
"सर इथे...!!"

सर्वजण त्या खडकाजवळ जमले आणि हातातल्या हत्यारांची ती झाडी बाजूला करू लागले..
थोडा ढिगारा उखरल्यावर त्यांना जे दिसले ते हृदयद्रावक होते..

एखाद्याच्या हृदयाचा थरकाप होईल असं ते दृश्य..
एक 10 ते 12 वर्षाची मुलगी विवस्त्र अवस्थेत सर्वांग रक्ताने भरलेली त्या त्या काटेरी झुडपाच्या ढिगाऱ्यात कण्हत विव्हळत पडलेली होती..
एवढ्या अल्पवयीन मुलीची अशी अवस्था डोळ्यांना बघवनारी सुद्धा नव्हती..

नक्कीच तिच्याबरोबर काहीतरी अघोरी आणि भयानक कृत्य घडलेलं असावं हे एव्हाना त्या जवानांच्या लक्षात येऊन चुकलं होतं..

तीच दैव बलवत्तर होत म्हणून तिचा श्वास चालू होता तोंडातून थोडा आवाज फुटत होता..डोळे मात्र बंदच होते..
जवानांनी तश्याच अवस्थेत तिला उचलून आपल्या कॅम्प मध्ये घेऊन गेले..

कॅम्प मध्ये तिथे असलेल्या सैन्यदलाच्या काही उपचारिकांनी तिच्यावर उपचार करायला सुरवात केली..
उपचारिकांना आणि तिथल्या जवानांना तिच्यावर अमानुष पणे अत्याचार करून तिला निर्घृण पणे मारून टाकण्याचा प्रयन्त झाला असावा हे कळून चुकलं होतं...

तिच्यावर उपचार झाल्यावर ती शुद्धीवर येण्याची ते वाट बघू लागले..

रात्री सुमारे 12 च्या सुमारास तिने डोळे उघडले..अंग अजूनही थरथर कापत होतं तिचं..डोकं सुन्न होत..तिला काहीही कळत नव्हतं..शरीरातल्या वेदनेने फक्त उघड्या डोळ्यातून पाणी वाहत होत..
ओरडण्याएव्हढा घश्यात त्राणही राहिला नव्हता..
तेवढ्यात तिथे कॅप्टन रणजीत आणि एक दोन जवान अजून आले...

त्यांना बघताच तिने तिचे डोळे घट्ट मिटून घेतले आणि शरीर आकसून घेतलं..एक प्रकारची भीती तिच्या चेहऱ्यावर जाणवत होती..

कॅप्टन "डरो मत बेटा हम हैं ना...आपको अब कुछ नहि होगा आप बहोत मेहफुज जगह पर हो..हम सैनिक है हिंदुस्तान के..आपकी हिफाजत के लिय आए हैं डरो नहीं आप अभी शांती से सो जाओ.."


असं म्हणून कॅप्टन ने एक हळुवार हात तिच्या डोक्यावरून आणि चेहऱ्यावरून फिरवला..
तिच्या जखमांनी भरलेल्या शरीराला हा हात मायेचा आणि सुरक्षतेचा जाणवला..तशी तिच्या चेहऱ्यावरची भीती कमी झाली..
आणि काही क्षणातच ती झोपी गेली..
ती झोपली पण तिच्याबरोबर काय झालं असेल नेमकं ह्या विचारांनी मात्र कॅम्प मधल्या जवानांना रात्रभर झोप नव्हती..


 सकाळ झाली कॅप्टन रणजीत आणि एक दोन उपचारिका त्या टेंट(तंबू ) च्या बाहेरच होते रात्रभर जशी तिला जाग आली तसे ते तिच्याजवळ पोहचले..
 अजूनही ती घाबरलेलीच होती..
 पण आत्ता ती जरा शरीराने सुरक्षीत आहे अस तिला जाणवत होतं..
 
 कॅप्टन ने तिला तीच नाव ती कुठून आली आणि तिची ही अवस्था हे सगळं विचारलं..
 पण तिचा आवाजच फुटत नव्हता..
 बऱ्याच वेळांनंतर ती थोडी थोडी बोबडी वळत बोलू लागली..
 
पण तिचे शब्दच बाहेर फुटत नव्हते..बिचारी तिच्यावर झालेल्या त्या अत्याचारांमुळे एवढी घाबरली होती की त्या धक्क्यातून अजून ती बाहेरच येऊ शकत नव्हती..
बोटांनीनी आणि इशार्यानीच काही दाखवण्याच्या पर्यन्त करत होती..

एक दोन दिवस असेच गेले..

ती शारीरिक रित्या आणि मानसिक दृष्टया ही थोडीफार सावरली होती..
आत्ता तिने तिच्याबरोबर नेमकं काय घडलं हे कॅप्टन आणि त्याच्या टीम ला सांगायला सुरवात केली...
तिची भाषा शुद्ध मराठीच नव्हती पण ती काय बोलतेय हे जवानांना कळू शकत होतं..
तिच्या भाषेवरून ती इथलीच आदिवासी पाड्यात राहणारी मुलगी वाटत होती..
ती त्या जवानांना सांगू लागली


"मी सायरा..इथं कनेली मायन(माझं)...
पाच दिस आधी 3 लोकानी मी संध्याकाळचे रानातून घरला जात असतांना माझी वाट अडवून मला पकडले..
तशी ती लोके(माणसं) मला रोज दिसाची माझ्याकडं बघून अचरट चाळे करायची पण त्या दिवशी त्याचबरोबर एक वर्दी (पोलीसी पेहराव केलेला) वाला पण होतं..
त्यासनी मला उचलून नेलं डोक्यावर काठीने हल्ला केला..
मी बेशुद्ध झाले..

शुद्ध आली तेंव्हा मी आमच्या तळ्याच्या काठच्या गांगो महादेवाच्या मंदिरात होतो..
गंगो महादेवाचं मंदिर गावाच्या एका टोकाला जंगलात होतं
(ती हे सगळं सांगत असताना ढळाढळा रडतचं होती..)
माया अंगावर एक भी कपडा नव्हता..अंग आखडून
गेलंत..काय झालंय काय नाय काय बी कळत नव्हतं..दिस-रात कायबी समजत नव्हतं..


तेवढ्यात तिथं एक जेमतेम 50-60 वर्षाचं म्हातारं आलं त्यानं माझं केंस पकडलं आणि ओरबडत एका खोलीत घेऊन गेलं..गांगो महादेवाचा गाभारा व्हता तो..
तिथंच
बळजबरीने त्यानं माझ्या शरीराचा ताबा मिळवला आणि भुकेलेला भयानक प्राणी जसे मांसाचे लचेके तोडतो तसं तो माझ्या अंगाचे लचके तोंडात होता..

काही वेळातच मला मूर्च्छा येई आणि मी बेशुद्धावस्थेत..
पुन्हा शुद्धीवर आले तेव्हा तीच परिस्थिती माणूस वेगळा 
पण त्याच्यातला प्राणी तोच..
एक नाय दोन नाय जवळ जवळ चार दिवस माझ्या शरीराशी हे राक्षस असे खेळत होते..
ज्या वेळी मंदिरात कोणी येई तेव्हा मला मंदिराच्या गाभाऱ्यातल्या खोलीत बांधून ठेवे..


हे सगळं घडत असताना मला एकच वाटतं होतं..इथं मला वाचवायला कोणी मानस नाही कोणी नाही..पण ये ज्याच्या समोर होतंय तो माझा देव कुठंय..उघड्या डोळ्यांनी हे हा बघू कसं शकतो..
माणसांची तुझ्यावर श्रद्धा असते म्हणून ते तुझ्याकडे येतात..एक विश्वास असतो की संकटकाळी त्यांच्यासाठी तू धाऊन येशील मग आत्ता कुठंयस..
तुझ्यातल देवपण संपलं आहे का..??
हे राक्षस तुझ्याच घरात तुझ्याच समोर माझ्या अब्रूची वाताहात लावतायत आणि तू नुसता बघत बसलायस...??
त्याला काहीच फरक पडत नव्हता..
कदाचित एवढ्या जवळ असूनही माझ्या वेदना त्याच्यापर्यंत पोहचत नसाव्यात..


असो..

मी पडलेलीच असायची एका कोपऱ्यात..त्या राक्षसांच मन व्हायचं तेव्हा यायचे आणि माझे लचके तोडायचे जणू जेवणाचं ताट चं आहे..

आणि ज्या वेळी मंदिरात कोणी येई असे वाटे तेव्हा मला मंदिराच्या गाभाऱ्यातल्या खोलीत दोराने बांधून ठेवे..
मग बात पसरेल म्हणून 4-5 दिवसांनी त्यांनी एक भल्या बांबूने मरेस्तोवर मारलं..आणि डोक्यावर लाठ्या पडल्या मी बेशुद्ध झाले अवस्था मेल्यासारखी झालेली..
ह्या यातनांपरी मरणं बरं..असं वाटायला लागलं..

शुद्ध आली तेव्हा त्या झाडीत होतो..
चालता बोलता काय डोळ पण उघडतं नव्हते..
अंगाच्या वेदना आणि लाही सहन होण्या पलिकडली होती..
4 दिवस त्या राक्षसांचा जाचा पेक्षा मरणं पत्करल होतं.."


ती रडत होती..

कॅप्टन रणजीत ला आणि त्याच्या टीम ला तिच्या ह्या दयनीय अवस्थेची चिंता वाटत होती..
रडता रडता सायरा थांबली..तिला मूर्च्छा आली होती...
पण ह्या वेळी तिचे फक्त डोळेचं बंद झाले नव्हते..
आत्ता तिचा श्वाससही बंद झाला होता..
एकूणच काय..तिचा हा सगळा त्रास संपला होतो..
होय...ती गेली होती..

देवाघरी..

त्याच देवाकडे ज्या देवाने उघड्या डोळ्यांनी तिचा हा जाच पाहिला..
कदाचित त्या देवालाही तिच्या ह्या वेदना सहन झाल्या नसतील म्हणून त्यानेच तिला त्याच्याकडे बोलावून घेतलं असावं..
असंच म्हणावं आत्ता..


कॅप्टन रणजीत ने आणि त्याच्या जवानांनी तिचा दफणविधी केला..
त्यानंतर जवानांनी शपथ घेतली की त्या राक्षसांचा शोध घ्यायचा आणि त्यांना संपवायचं..
कदाचित त्यांनी शोध घेतला ही असले आणि त्यांना संपवल ही असेल माहीत नाही..


पण ती चिमुकली सायरा काही परत येणार नव्हती तीच बालपण तीच आयुष्य परत येणार नव्हतं..

अश्या अनेक निष्पाप जीवांचे लचके तोडणारे हे राक्षस अजूनही समाजात वावरत आहेत..

आपल्या देशात राज्यात अश्या अनेक घटना घडतात..
प्रसारमाध्यमांद्वारे अश्या घटनेवर काही दिवस बोललं ही जातं..

अजुन पुढे जाऊन पोलीस-कोर्ट कचेऱ्या- खटले हे ही चालतं पण ते काही दिवसांपुरतचं..
पुन्हां जे आहे तेच आहे..

मानसातली माणुसकी कुठे हरवली आहे का हा ह्याच्या मागचा प्रश्न..?

कधी शाळेत-कधी मंदिरात-कधी भर रस्त्यात ह्या घटना घडतच आहेत..

शाळेत सरस्वती वसते..मंदिरात देव बसतो..आणि आपण लहान पणा पासून ऐकतोय देव तर सगळीकडेच आहे..

मग त्याच्या समक्ष ह्या गोष्टी घडतातच कश्या..खून-बलात्कार-दरोडे केलेले माणसं ह्या देवाच्या दुनियेत तर मोकाट फिरत असतात..


माणसात माणुसकी नसेलही पण देवाचं देवपण ही नाहीस झालंय का हा दुसरा प्रश्न..?

धन्यवाद..!!


लेखक:- सुशिल सुर्यकांत पाडावे