Mard Sahyadri books and stories free download online pdf in Marathi

मर्द सह्याद्रीचा - अथांग

राहुल  तसा अभ्यासात जास्त हुशार जरी नसला तरी त्याला  दुनियादारीच्या गोष्टी  त्याला खूप समजत होत्या
समजदारी त्यात खूप भरलेली होती।

लहानपणा पासून घरचे आर्थिक नियोजन त्याने चांगले सांभाळले होते  त्यामुळे त्याचा आईवडीलाचा कामाचा  भार थोडा हलका झाला होता   घरी चांगल्यापैकी आर्थिक सुबत्ता होती.

किराणा, बाजार , बँक व्यवहार, विम्याची काम सगळे तोच करायचा त्यामुळे त्याला सगळ्या आर्थिक गोष्टी ची माहिती झाली अन त्यामुळे साहजिक त्याचा शैक्षणिक ओढा हा वाणिज्य शाखेकडे गेला.  बारावी नंतर त्याने वाणिज्य शाखा घेण्याचा विचार घरी बोलून दाखवला घरी त्याला  तुला आवडत आहे ना कर म्हणून सांगितले घरच्यानी  त्याला जास्त अडसर केला नाही .

कॉलेज सुरू  झाले  पाहता पाहता त्याचे शिक्षण संपले वाणिज्य शाखेत त्याने उच्चशिक्षण घेतले (M.COM)
एक दोन लहान मोठे उपयोगी कोर्स करून त्याने नोकरीचा शोध सुरू केला.

घरीही परवानगी दिली
काही दिवसात त्याला एक छोट्या कंपनी मध्ये अकाऊंट पाहण्यासाठी एक व्यक्ती ची गरज आहे असे समजले सारिका मशीन असे कंपनी चे नाव

पण कंपनी  लहान आहे त्यामुळे पगार जास्त मिळणार नाही ह्याची त्याला जाणीव झाली त्याने अनूभव मिळवण्यासाठी
ही नोकरी करण्याचा निर्णय घेतला

त्या कंपनी मध्ये चौकशी करून तो दिलेल्या वेळेत कंपनी मध्ये पोहचला.
कंपनी फार मोठी नव्हती त्याला मिळालेली माहिती बरोबर होती
त्याने पाहिले. एका मोठ्या कंपनीला ही कंपनी काही पार्ट तयार करून सप्लाय करत होती . साधारण तीसेक लोक तिथे काम करत असतील.

त्याचा सोबत कंपनी कार्यालय होते,
त्याचा सोबत अजून  पाच ते सहा जण आले होते मुलाखती साठी
राहुल आपला मुलाखती साठी कधी नाव येते ह्याची वाट पाहत होता.

अखेर त्याचे नाव आले तो मुलाखती साठी केबिन कडे गेला
त्याने दरवाज्या वाजवून आता येऊ का असे विचारले
तर आतून आवाज आला हो या आता या

राहून आत गेल्यावर तिथे  कंपनीचे मालक श्रीराम अन त्याची  मुलगी  सारिका     असे दोन व्यक्ती होते  सारिका
साधारण राहुल च्या वयाची असेल
त्याने दोघांना गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग मॅडम असे बोलला
त्यानंतर त्यांनी त्याला बसायला सांगितले
आभारी आहे असे बोलून तो बसला।

त्याने आपल्या सोबत आणलेल्या शैक्षणिक कागदपत्राची छायांकित प्रत  त्याच्याकडे दिली.
त्यांनी ती कागदपत्रे नीट पहिली राहुल कडे उच्चशिक्षण असून त्याच्या सोबत कोर्स  पण केले आहेत हे त्याच्या लक्षात आहे
मार्क पण त्याला चांगले होते.

त्यांनी मग मुलाखती ला सुरवात केली
श्रीराम बोलले आपले शैक्षणीक अर्हता चांगली आहे
आपण दोन अकाउंट चे कोर्सेस पण केले आहेत,
जर आम्ही तुम्हाला ही नोकरी दिली तर तुम्ही हे काम पार पाडू शकता का

राहुल ह्या वर बोलला मी
हो सर मी ही जबाबरदारी योग्य रीतीने पार पाडील
तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या

कोणत्याही प्रकारची तक्रारी येणार नाही मी  माझी स्वतःची कंपनी आहे असे काम करीत
मला जर संधी दिली तर मी कंपनी  चांगल्या भविष्यासाठी मेहनत करील।
त्यांनी राहुल ला अकाउंट बद्दल खूप काही प्रश्न विचारले अन राहून ने त्याचे यथोचित उत्तर देऊन त्याला इंप्रेस केले  अजून
असे काही प्रश्न विचारला वर त्याचे समाधान झाले

त्यांनी सांगितले अजून काही मुलाखती बाकी आहेत। आमही तुम्हाला नक्की कळवू
त्यानंतर  राहुल आभारी आहे असे बोलून निघाला
राहुल ला वाटत होते आपली मुलाखत चांगली झाली
घरी आल्यावर त्यांनी आपली मुलाखत चांगली झाली असे त्याने सांगितले,

त्यानंतर 4 दिवस झाले तरी कंपनी मधून काही फोन आला नव्हता तो निराश झाला
पण पुढे दुसरी नोकरी पहावी ह्या विचारात होता.

त्याला एक वेळ वाटले की आपण कंपनी मध्ये फोन करून विचारावे पण त्याला असे ही वाटले की आपली नेमणूक झाली असती तर त्याचा फोन आला असता ।

ह्या विचारात तो झोपला
सकाळी उठल्यावर आवरून दुसरी नोकरी शोधण्यासाठी तो पुन्हा तयार झाला ।

पुन्हा नव्याने काम  करण्यासाठी तो  तयार झाला

एकदिवस अचानक त्याच्या फोन वर एक अनोळखी व्यक्ती चा फोन आला पलिकडून एक स्त्री च्या बोलण्याचा आवाज आला
त्या बोलल्या की राहुल आहेत का

राहुल बोलला की हो मी राहुलच बोलतोय
त्यावर ती व्यक्ती बोलली नमस्कार मी सारिका बोलत आहे  सारिका मशीन मधून
राहुल- नमस्कार मॅडम बोला
‌सारिका- मी तुम्हाला ह्या साठी फोन केला आहे की आम्ही तुमची अकाऊंटंट म्हणून  निवड केली असून आम्हाला तुमचा स्वभाव
वागणूक अन सहनशीलता आवडली
म्हणून आम्ही तुमची नेमणूक ह्या पदावर करत आहे
तुम्ही दोन दिवसात हजर व्हा  आणी महत्त्वाचे म्हणजे
तुमचा पगार असेल महिना वीस हजार रुपये
बेस्ट ऑफ लक राहुल

राहूल- आभारी आहे मॅडम आभारी आहे
मी परवा हजर होतो .
सारिका- ठीक आहे

राहुल ने घरात जाऊन आईवडिलांना ही आनंदाची गोष्ट सांगितली पगार वीस हजार रुपये
सगळ्यांना आनंद झाला आई ने देवा पुढे साखर ठेवली

राहुल- आता मला परवा तिथे हजर होईचे आहे
तर उद्या निघावे लागेल मला
तर सगळी आवरआवरी करून मला जावे लागेल
आई च्या डोळ्यात पाणी तरळले  आईला तर एक डोळ्यात आनंद अन एक डोळ्यात मुलगा दूर जात आहे ह्याचे दुःखही होत होते।

वडील बोलले अरे तो जास्त दूर  जात नाहीये जवळ आहे पाहिजे तेव्हा  तो आपल्याला भेटायला येईल किंवा आपण जात जाऊ ना
सगळे आनंदात बरोबर  थोड विरहाचे दुःखही होते

राहुल ने सगळे आवराआवर करून घेतले अन जायला निघाला
आईवडिलांचे  आणी देवाचे दर्शन घेऊन तो निघाला
आई- नीट जपून जा अन जपून राहा
राहुल नजरेच्या दूर  जाईपर्यंत ते तिथे उभे होते

राहुल ला पण अश्रू अनावर झाले होते पण तसाच तो मार्गस्त झाला
जाऊन त्याने घरी कळवले की सुखरूप पोहचलो आहे म्हणून

त्यानंतर त्याने कंपनी जवळ रहण्याची  अन जेवण्याची व्यवस्था केली
सगळे योग्य पद्धतीने झाले

सकाळी आवरून तो बरोबर वेळेवर कंपनी मध्ये पोहोचला
कंपनी मध्ये  गेल्यावर त्याने ऑफिस  मध्ये गेला तिथे मालक
श्रीराम अन त्याची मुलगी सारिका दोघेही होते

त्याने विचारून ऑफिसमध्ये प्रवेश केला
त्यावर दोघांनी त्याचे अभिनंदन केले त्याला त्याच्या कामाचे स्वरूप अन कामाची जागा दाखवुन दिली अन त्यानंतर
कंपनीतील इतर सर्व लोकांबद्दल माहिती दिली,

सगळ्या बरोबर ओळखी अन ते  झाल्यावर
सारिकाने  त्याला त्याच्या कामाबद्दल माहिती दिली
आपले खरेदीदार कोण आपल्याला  कच्चा माल कुठून येतो कसा येतो तुम्हाला कसे सगळे एकत्र ठेवायचे आहे सगळे समजून सांगितले
अन काही अडचण आली तर आम्हाला नक्की विचारा असे सांगितले

राहुल आभारी आहे असे बोलून आपल्या जागेवर गेला आना त्याने कामाला सुरुवात केली

अनुभव नसताना कमीत कमी चूका करून त्याने चांगला वचक  कामावर बसवला होता

कंपनीत तो मालक सोबत आदराने अन  बाकी लोक सोबत चांगल्या पद्धतीने वागत होता

त्याच्या ह्या सगळ्या गोष्टी कंपनीचे मालक अन सारिका अभिमानाने पाहत होते

ह्या सगळ्या गोष्टी संभाळून तो आईवडिलांना भेटायला  जायचा कधी ते राहुल ला भेटायला यायचे

अश्या तर्हेने सगळया गोष्टी चांगल्या चालूं असताना  काही आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या
श्रीरामसेठ सगळया गोष्टी काळजीपूर्वक हाताळत होते आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे आपल्या कामगारांचे पगार बंद होऊ नये म्हणून काळजी करत होते.
ही सगळी धडपड राहुल एक अकाउंटंट म्हणून जाणून होता तो पण कंपनीच्या खर्च काटकसरीने करत होता.

गरजेच्या गोष्टी साठी फक्त खर्च होऊ लागला
सारिका मशीन मधून जे पार्ट तयार होऊन जात होते त्या कंपनीने
आपले आर्थिक व्यवहार काही काळासाठी बंद केले होते.
त्याचा डायरेक्ट परिणाम सारिका मशीन वर झाला होता.

तरी सारिका मशीन ने  आपले  उत्पादन चालू ठेवले होते अन आता सारिका मशीन नवीन खरेदीदाराच्या प्रतीक्षेत होती.

श्रीराम सेठ ने सगळी जमापुंजी आता कंपनी मध्ये लावली होती
कामगाराना पगार देण्यात येतील इतके पण पैसे शिल्लक नव्हते
तरी पण कामगार काम करत होते,

मालकांना वाटत होते की कामगार आपल्याला साथ देत आहेत पण गोष्ट काहीतरी वेगळी होती,

असेच 4 महिने निघून गेले आर्थिक परिस्थिती बदलत नव्हती

अश्यात  एक दिवस श्रीरामसेठ आणी    सारिकाने  कंपनीच्या
कामगार संघटनेच्या नेत्याला  बोलावले अन बोलले की आज पर्यंत आपण कंपनी ला खूप सहकार्य केले आहे.

आज आपल्याला कंपनी ला खुप मोठे काँट्रॅक्ट मिळाले आहे.
अन आपल्या कंपनी ने नाव पाहून त्यांनी खूप मोठी अमाउंट मिळाली आहे.

आता आपण सगळयांचे पगार करून एक महिन्याचे पगार अग्रीम करू शकतो,
त्यावर कामगार नेता बोलला की तुम्हाला काही माहीत दिसत नाहीये आम्हाला तर राहुल सर ने सगळयांचे  पगार वेळेवर केले आहेत , आणी कंपनी कसल्याही प्रकार चे  कामगारांचे देने लागत नाही.
हे ऐकून दोघे इतके शॉक झाले की त्याला काहीवेळ समजत नव्हते काय करावे अन काय नाही,

त्यांनी ताबडतोब राहुल ला बोलावले  राहुल केबिन मध्ये आला त्याला बसायला सांगितले, त्यांनी सांगितले आम्हाला समजले की तू कंपनीच्या वाईट काळात मदत केली आहे सगळ्या गोष्टी नीट
पार पडल्यात अन ह्या गोष्टी ची आम्हाला माहीत पण झाली नाही.
त्यावर राहुल बोलला सर मी काही खूप मोठं काम केलेले नाहीये
मी फक्त सगळी परिस्थिती व्यवस्थित पार पाडली.

श्रीरामसेठ बोलले की तू  फक्त जबाबदारी पार पडली नाहीस ह्या सारिका मशीन ला वाचवले आहेस माझ्या 20 वर्षाच्या मेहनतीला वाचवले आहेस तुझे आभार मी कसे मानू समजत नाहीय

त्यावर राहूल बोलला सर  आभार मानन्याची काही गरज नाहीये मी आपल्या  कंपनी काम करतो म्हणजे ही माझी पण कंपनी आहे त्यात  माझा ही वाटा आहे
मी तुम्हाला माझ्या मुलाखतीत सांगितले होते मी ह्या कंपनीत स्वतःची कंपनी म्हणून काम करेल
अन जेव्हा कंपनी ची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना
माझे कर्तव्य बनते मी मला शक्य होईल ते प्रयत्न केले पाहिजेत.
मी जर हे केले नसते तर नक्कीच आपल्या कंपनीचे नुकसान झाले असते.

राहुल चा प्रामाणिकपणा अन कार्यनिर्भरता पाहून दोघांना ही त्याची ह्या पदासाठी केलेली निवड सार्थक ठरली

आजच्या काळात असा कर्तव्यदक्षपणा शोधून सापडणार नाही.

त्यांनी कुतुहलाने विचारले की  राहुल तू  5 महिने तुझा   अन कंपनीचे  सगळे खर्च कसे भागवलेस

राहुल बोलला  सर मी काही झाले तरी एक अकाउंटंट आहे लहानपणा पासून सगळे आर्थिक व्यवहार करतो आहे त्यातून मला
बचत अन गुंतवणूक ह्या बद्दल माहिती आहे अन त्या   गोष्टी किती महत्त्व आहे हे पण माहीत आहे. अश्या गरजेच्या वेळी गुंतवणूक उपयोगी पडते हे मी जाणून आहे
 
लहानपणी  माझी आई काही पैसे वेगळे काढून ठेवत असे ते पैसे आम्हाला अडचणीत खूप कमी आले ,

तसेच माझी काही ठराविक रक्कम  जमा केली आहे
त्यावर मला माझ्या  अडचणीत  खर्च भागेल अशी व्यवस्था मी केली आहे. त्यातून मी माझा सगळे खर्च केला

श्रीरामसेठ  सगळे ऐकून थक्क झाले.
त्यांनी राहुल ला सांगितले की खप मोठया कंपनी ने आपल्याला खूप मोठे काँट्रॅक्ट दिले आहे
अन ऍडव्हान्स मध्ये खूप मोठी अमाउंट  दिली आहे.

सर ने राहुल ने केलेले पगार अधिक त्याचा पगार अधिक 2 महिण्याचा बोनस असा एकत्र चेक बनवला
   पण राहुल ने बोनस नाकारला कारण राहुल बोलला की मी माझ्या कंपनी साठी  काहितरी केले आहे

ह्या सगळ्या गोष्टी नंतर राहुल आता कंपनीच्या एकदम जवळच अन विश्वासू लोकांपैकी झाला होता.
श्रीरामसेठ आता राहुल वर सगळ्या कामासाठी विसंबून राहू लागले होते.  सगळे व्यवहार आता राहूल पाहत होता राहुल ने कमी विलसत त्याचा विश्वास मिळवला होता.

श्रीरामसेठ आता राहुल च्या कर्तबगारी वर खूप खुश होते .

.

.
 
त्यानंतर त्याची कंपनीची  मोठी  कामगिरी सोपवण्यात आली अन तो त्याच जिद्दी ने अन मेहनतीने ती कामगिरी पार पाडू लागला .
  एक एक दिवस तो अधिक विश्वास पात्र होत होता.

कंपनीचे सगळे व्यवहार आता राहुल एकटा पाहत होता
श्रीरामशेठ आता राहुल वर पूर्ण पणे निर्भर होते

राहुल सुद्धा इमानेइतबारे काम करत होता आणी मालकाच्या आणखी जवळ जात होता.

आता श्रीरामसेठ  राहुल ला जावयाच्या रुपात पाहू लागले होते
सारिकाला हा विचार बोलून दाखवला सारिका फक्त लाजली त्यातच तिचा होकार कळला होता

त्यांनी राहुल ला नकळत राहुल च्या घरी हा विषय कळवळा
सारिकाला राहुल हुशार वाटत होता म्हणून तिने त्याची आधी कंपनी साठी नेमणूक केली होती

घरी पण आनंद झाला की राहूल त्याचा एकुलता एक होता
आणी सारीका ही एकुलतीएक कन्या होती. सारिकाच्या आईच्या निधनानंतर श्रीरामसेठ ने तिला खूप जपले होते लाडाकोडात वाढलेली होती ती,

श्रीरामसेठ ने  राहुल च्या घरी कळवले

एक दिवस राहुल खूप वेळ ऑफिस मध्ये 
काम करत होता
खूप उशीर झाला होता सारिका बोलली त्याला मला घरी सोडताल का खूप उशीर झाला आहे आता मला काही मिळणार पण नाहीं जायला

राहुल बोलला की हो काही अडचण नाही सोडतो तुम्हाला
राहुल सगळे काम आवरून निघाला
  त्याने बाईक वरून सारिकाला तिच्या घरी सोडले
सारिका- राहुल घरात ये ना चहा घेऊन जा
राहुल नको नको करत असताना तिने आग्रह करून त्याला घरी नेले

तिच्या घरी गेल्यावर राहुल चकित झाला कारण तिथे त्याचे आईवडील आधीपासून उपस्थित होते.

राहूल-आई बाबा तुम्ही इथे कसे
श्रीराम-त्यांना मीच बोलावले आहे तुमचा मुलगा किती कर्तबगारी आहे हे सांगण्यासाठी
अन तुझ अन सारिकाच्या लग्न बद्दल बोलणी करण्यासाठी

राहुल ला काहीवेळ समजले नाही
पण सगळी गोष्ट श्रीरामसेठ ने सविस्तर सांगितली अन बोलले
की सारिका ही माझी एकुलती एक मुलगी आहे अन त्यानंतर
ती माझ्या सगळ्या इस्टेटीची मालकीण होणार आहे अन लग्न नंतर तू पण माझ्या इस्टेटीमध्ये सारखा मालक असणार आहेस

राहुल पण खुश होता सगळे खुश होते
आता तो कंपनी चा फक्त नोकर नव्हता तर मालक पण झाला होता
राहुल चे आणी सारिकाचे लग्न सगळयांनी  एकदम धूमधडाक्यात
पार पडले अन सगळ्या विधी पार पाडून सारिका अन राहुल पुन्हा कंपनीच्या कामाला हजर झाले.

राहुल जास्त काळजीपूर्वक सगळे काम हाताळू लागला
त्याच मेहनतीने अन कष्टाने त्याने कंपनी खूप मोठी केली
श्रीरामशेठ खूप खुश होते राहुल  चे आईवडील पण त्याच्या मुलाच्या कामावर खुश होते.

सगळे आनंदात  असताना एक दिवस एक दुदैवी घटना घडली
श्रीरामशेठ बाहेरगावाहून येताना एक एक मोठया ट्रक च्या धडकेत त्याचा  जागीच मृत्यू झाला. त्यादिवशी ड्राइवर सुट्टी घेऊन गावी गेला असताना श्रीरामसेठ ला  ला स्वतः गाडी चालवावी लागली होती. सारिका अन राहुल च्या डोक्यावरचे छत हरपले होते,
सरकला ह्या घटणे वर विश्वास बसत नव्हता,

राहुल च्या आधाराने ती थोडी भानावर आली होती

श्रीरामशेठ च्या मृत्यूनंतर  त्याच्या  मृत्यूपत्रा नुसार सगळ्या इस्टेटची जबाबदारी सारिका ना राहुल वर येऊन  ठेपली.
होती.

सारिका वडिलांच्या अपघाताला सहा महिने झाले तरी भानावर नव्हती सतत तिला सगळीकडे वडीलच दिसायचे.

सारिकाच्या आईसुद्धा आठवत नव्हती तेव्हा पासून तिला बाबाने वाढवले मोठे केला पालनपोषण केले, आईची कमी कधी तिला जाणवू दिली नाही

सारिका दुःखात होती राहुल सारिका अन सारिकामशीन दोन्ही ची जबाबदारी  निभावत होता

सारिकाच्या कोणीतरी सोबतीला हवे होते  म्हणून राहुल 
चे आई वडील तिच्या सोबत राहून तिला  आधार देत होते

अपघातानंतर  पोलीस कडे गुन्हा दाखल करण्यात आला होता,
त्यावर वरीष्ठ पोलिस निरीक्षक श्री शिंदे सर ह्या कामी होते
अपघातात मरण पावणारे हे पोलीस अधीक्षक यांचे चांगले मित्र होते त्यायोगे त्यांनी शिंदे यांच्याकडे पुढील तपासाची जबाबरदारी सोपवली.
शिंदे साहेबाची खासियत म्हणजे त्याच्या कडची एकही केस आजपर्यंत उगडल्याशिवाय राहिली नाही

ही केस साधीसुधी नव्हती सारीक मशीन चे खूप मोठे नाव बाजारात होते हा अपघात होता की खून ह्यावर अजून समजत  नव्हते,

का व्यावसायिक प्रतिस्पर्धतून काही झाले आहे अश्या सगळ्या गोष्टी पोलीस हाताळून पाहत होते,

श्रीरामसेठ च्या बाकीच्या मित्रपरिवाची कंपनीतल्या लोकांची सगकीकडे चौकशी झाली होती त्या गोष्टीतुन काही उलगडत नव्हते,
केस खूप कठीण होत चालली होती.

सगळ्या शक्यता  पडताळून पहिल्या तरी काही धागेदोरे हाती येत नव्हते,

एक दिवस अचानक काहीतरी माहिती  इंस्पेक्टर शिंदे ला समजली अन ते तडक सारिका मशीन मध्ये गेले.

कंपनी मध्ये फक्त  कामगार अन राहुल होता

इंस्पेक्टर ला पाहून राहुल बोलला या साहेब आज इकडे कसे येणे केले.  काही तपास लागला का
इंस्पेक्टर साहेब
त्यावर इंस्पेक्टर शिंदे बोलले की आज पर्यंत माझ्या कडे केस आली अन मी ती सोडवली नाही असे कधी झाले नाही

राहुल -काही तपास लागला का
इंस्पेक्टर शिंदे-  हो  तपास तर लागला आहे पण त्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो

एक त्रिकोणी कुटूंब असते आईवडील मुलगा असे एक परिवार खुशाली पूर्ण घर असते
आई गृहिणी असते अन वडील बँक मॅनेजर
सगळे चांगले चालू असताना एक दिवस अचानक ते बँक मॅनेजर आत्महत्या करतात सगळे चांगले चालू असताना असे अचानक ते का आत्महत्या करतात काही समजत नाही त्या धक्क्याने त्या मुलाची आई सुद्धा मरण पावते तो मुलगा एकदिवसात आईवडील दोघांना गमावून बसतो.
तो इतका लहान असतो कि त्याला काहीच माहीत नसते हे काय झाले अन कसे  झाले.

त्याला त्याचे मामा मामी घेऊन जातात अन पुढे त्याला दत्तक घेऊन त्याला स्वतःचे नाव देतात तो मोठा झाल्यावर त्याला त्याच्या वडिलांच्या आत्महत्येचे  कारण उमगते.
त्याच्या बँक मधून एक जण काही खोटी कागदपत्रे दाखवुन करोडो रुपयांचे कर्ज घेतो.

अन अचानक नाहीसा होतो पुढे ही गोष्ट बँकेत समजते  वरिष्ठांना ही गोष्ट समजते. 
वरिष्ट अधिकारी सगळी चौकशी करून सगळे कागदपत्रे तपासून पाहतात अन

सगळ्या गोष्टी चा ठपका का एकट्या बँक मॅनेजर प्रधान यांच्यावर ठेवतात.

चुकीच्या कागदपत्राच्या आधारे एका चुकीच्या माणसाला कर्ज दिले गेले आहे एक तर तुम्ही सगळे कर्ज भरा किंवा जेल मध्ये जायला तयार रहा,  बदनामी अन नाहक दुसरीच्या चुकीचा भुर्दंड सोसावा लागत होता,
प्रधान यांना  बदनामीच्या भीतीने प्रधान आत्महत्या करतात अन त्याचा पत्नी ह्या त्या धक्क्याने मरण पावतात अन तो लहान निरागस मुलगा अनाथ होतो.

त्या बँक मॅनेजर ला फसवणारी व्यक्ती म्हणजे सारिका मशीन चे मालक श्रीरामसेठ होते.अन तो मुलगा दुसरा तिसरा कोण नसून तू आहेस राहुल तू

तू पद्धतशीर पने  थंड डोक्याने सगळे घडवून आणले

त्याचा अपघात घडवून तू आपल्या आईवडिलांच्या मृत्यूचा बदल घेतलास

ह्या कंपनी मध्ये नोकरी करून त्याचा विश्वास कमावला
त्याच्या मुलीसोबत लग्न करून त्याच्या कंपनी चा मालक पण झालास .
सारीक मशीन सोबत सगळ्या स्थावर अन जंगम मालमत्तेचा तू अर्धा मालक झाला.
मालमत्तेसोबत श्रीरामसेठ च्या  विम्याच्या मिळणाऱ्या 20 करोड चा मालक पण तूच झालास.

श्रीरामसेठला तू खूप आधीच मारले असते पण तू त्याच्या मुली सोबत लग्न केले,कारण तुला  त्याच्या मृत्यूपत्र माहिती मिळाली त्यात असे लिहिलेले होते ह्या मालमत्तेची वारसदार त्याची मुलगी आहे अन तिच्या लग्न नंतर मुलीचा होणारा नवरा पण हिस्सेदार असणार आहे,
सगळ्या गोष्टींचा विचार करून तू हे सगळे कारस्थान केलेस,
अन ते पूर्ण पण केलेस.

ह्यात तूच एकटा सामील आहेस की तुझे आईवडील म्हणजे तुझे मामा मामी पण सामील आहेत
राहुल- त्यांना ह्या बद्दल काहीच माहीत नाहीये हे सगळे माझेच एकट्याचे कारस्थान होते त्यांना ह्याबद्दल किंवा माझ्या वडिलांना फसवणारी व्यक्ती ही श्रीरामसेठ होते हे देखील माहित नव्हते.

इन्स्पेक्टर शिंदे - राहुल तू हे जे केले आहेस ना त्याची  शिक्षा तुला कायदा   नक्कीच देईल पण तू सारिकाचा पण गुन्हेगार आहेस तिच्या प्रेमाचा अन विश्वासा चा ही तू खून केला आहेस त्याबद्दल तुला सारिका देईल ती शिक्षा ही तुला भोगावी लागेल.
आता तुला मी अटक करत नाहीये सगळ्या गोष्टीची पूर्तता करून मी तुला अटक करणार आहे पळूनवगैरे जायचा विचार ही करू नकोस

इंस्पेक्टर गेल्यावर राहुल ने एक फोन लावला
इंस्पेक्टर आताच इथून गेला आहे त्याला सगळे समजले आहे
तो पोलीस स्टेशन ला पोहोचण्याच्या आत वर गेला पाहिजे
त्याला श्रीरामसेठ गेला तिकडे  पाठवून दे त्याला

राहुलच्या चेहऱ्यावर क्रूर अन छद्मी हास्य तरळले.
.........


इतर रसदार पर्याय